Rang he nave nave - 9 books and stories free download online pdf in Marathi

रंग हे नवे नवे - भाग-9

मैथिलीला अजूनही काहीच कळत नव्हते विहान जाणार म्हंटल्यावर इतक का वाईट वाटतय. खर तर तिला विहानची खूप सवय झाली होती, आता त्याच्या पासून दूर राहणे तिला ही शक्य नव्हते हे तिलाही कळून चुकले होते. 'आता विहान ला काही दिवस भेटायलाच नको, नाही तर पुढे खूप कठीण जाईल, होईल तितकं विहान पासून दूर रहायला हवं.', खर तर हे खूप अशक्य होतं पण तिने ठरवलं होतं. पुढचे 2-3दिवस तिने विहान च्या message, कॉल कशालाही reply दिला नाही, त्यात कॉलेज मध्ये प्रोजेक्ट, सबमिशन ह्या मुळे तिला वेळही मिळत नव्हता त्यातच ती टुरिझम मध्ये PHD करत असल्यामुळे तिला पुढच्या 3 महिन्यांसाठी दुसऱ्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जायचं होतं. जेव्हा तिच्या समोर option आले तेव्हा तिने नकळत स्कॉटलंडला prefrence दिला खर तर तिला इजिप्तला जायचं होतं पण तिने फर्स्ट preference स्कॉटलंडच टाकल. ती ह्या गोष्टी का करत होती खर तर हे तिलाही कळत नव्हतं. त्यात विहानची सोबत नव्हती त्यामुळे ती आणखीनच उदास उदास रहात होती. विहान ची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती त्याला तर मैथिलीच्या वागण्याचा काही अर्थच लागत नव्हता. ती त्याच्या कुठल्याही फोनचा मेसेजचा काहीही रिप्लाय देत नव्हती त्यामुळे त्याला तर नेमकं काय झालंय हेही कळत नव्हतं. शेवटी विहानने कंटाळून मैथिलीला फोन केला.
मैथिलीला हया वेळेस विहान ला टाळणं अवघड झालं होतं तिने शेवटी फोन उचललाच.'hi मैथिली, 'कशी आहेस? विहान ने विचारलं. खर तर त्याला बरंच काही विचारायचं होत पण हे फोन वर बोलयला नको म्हणून त्याने फक्त कशी आहेस हेच विचारलं. 'मी ठीक आहे बोल न काही काम होत मैथिली म्हणाली'. 'मैथिली मी फक्त पुढचे 10 दिवसच भारतात आहे मला अस वाटत की मी हे तुझ्या सोबत घालवावे म्हणजे बघ तुझी ईच्छा असेल तर,' 'मला जातांना सोबत चांगल्या काही आठवणी घेऊन जाता येईल'. विहान म्हणाला. विहान च्या ह्या बोलण्याने मैथिली विचारातच पडली. ह्याला नाही म्हंटल तर परत तेव्हा सारखा राग येईन, आणि हो म्हणावं तर तो जाताना खूप त्रास होइन काय करावं, पण विहान एकदा गेल्यानंतर कधी येईन माहिती नाही आणि आला तरी आमची भेट होईन की नाही हेही माहिती नाही कदाचित हे शेवटचं! 'ठीक आहे विहान आपण भेटूया, and i promise this will
be the best 10 days of your life!' मैथिली म्हणाली. म्हणाली. 'तसा तुझ्या सोबतचा प्रत्येक दिवसच best असतो ग!' विहान त्याच्या नेहमीच्या शैलीत म्हणाला. 'विहान'....... मैथिली काही बोलणार बर 'चल भेटतो तुला थोड्या वेळात बाय' अस म्हणून त्याने फोनही ठेवला. काय मुलगा आहे हा ! मैथिलीला हसू आलं त्याच्या ह्या वागण्याचं.
विहान आणि मैथिली ठरलेल्या ठिकाणी भेटले खर तर दोघेही बऱ्याच दिवसांनी भेटत होते.विहान ला मैथिलीला तिच्या वागण्याचं कारण विचारायचं होत पण त्याने काहीही नाही विचारलं आधी काही झालंच नाही असं दाखवलं आणि अगदी नॉर्मल वागत होता. मैथिलीला ही विहान ला भेटताना थोडं दडपण आलच होत आता विहान च्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील पण विहान ने काहीही विचारलं नाही म्हणून तिला थोडं नवलच वाटलं, एका अर्थाने बरंच झालं म्हणा हा काही विचारत नाही आहे. नाही तर काय उत्तर दिलं असत मी त्याला? मैथिली मनातच विचार करत होती. 'मग मैथिली कुठे कुठे नेणार आहेस मला तू ह्या 10दिवसांत?' विहान ने विचारलं. मैथिली विचारात पडली कुठे जाणार? इतक्यात विहानच म्हणाला ' चल माझ्या सोबत' आणि तो तिला घेऊन निघाला. दोघे शहराच्या बाहेर आले छान निसर्गरम्य ठिकाणी तो तिला घेऊन आला 'wow विहान खूपच सुंदर जागा आहे रे ही!' 'अग हे तर काहीच नाही तू वर चल टेकडी वर तिथून तर काय view दिसतो एक नंबर!' 'चल पटकन' तो म्हणाला. ऐ वर काय वर मी नाही येणार!मैथिली म्हणाली.'आता काय झालं न यायला' तो म्हणाला. 'इतक्या वर कुणी जात असत का ?' पडलं वगैरे म्हणजे ! 'मी नाही येणार' . विहान तिच्या बोलण्यावर हसायलाच लागला. 'तुला काय जात हसायला !''मी नाही येणार तू जाऊन ये हवं तर 'मैथिली म्हणाली. 'अग मला वाटलं नव्हतं मैथिली तू इतकी घाबरट असशील!' 'छे काहीही करू शकणार नाही तू ', 'एका कलाकाराने असा निसर्ग पहायला नाही म्हणावं!' विहान तिला म्हणाला. 'हे बघ विहान निसर्ग खालून पण छान दिसतोय त्यासाठी वरच जावं लागतं अस काहीही नाही!'मैथिली म्हणाली. 'अरे यार तो काही मोठा गड नाही ग बाई किंवा मी काही तुला एव्हरेस्ट चढायला नाही सांगत आहे ₹,एक साधी टेकडी आहे टेकडी!'विहान तिला म्हणाला. 'तुझ्या साठी टेकडी आहे','माझ्या साठी तो गड च आहे'मला भीती वाटते रे! ती म्हणाली.'अच्छा तर हे कारण आहे', 'चला म्हणजे मैथिली ला कश्याची तरी भीती वाटते', विहान तिला चिडवत म्हणाला. 'हे बघ तू आज कितीही चिडवलं आणि कितीही बोलला तरी मी येणार नाही'. मैथिली ठाम पणे म्हणाली.'आणि आता तर मी तुला घेऊनच जाणार काहीही होऊ दे'! अरे काय जबतदस्ती आहे!'व्यक्तिस्वातंत्र्य नावाचा काही प्रकार आहे की नाही'. ती म्हणाली.'हे बघ जेव्हा ते व्यक्तिस्वातंत्र्य शिकवलं ना शाळेत मी नव्हतो गेलो त्या दिवशी त्यामुळे मला ही concept माहिती नाही आता चल गुपचूप!''आणि नसेल यायचं तर वापस जाऊ', तो थोडंस नाटकी रागातच म्हणाला.