my corner - 1 books and stories free download online pdf in Marathi

माझा कोपरा भाग पहेला

हां तोच माझा कोपरा कि मी तिथे तासनतास बसायचो,सगळ्यांचे सतत विचार एकावेळी माझ्या कानात घुमायचे आणि मला तेव्हा खूप Problem चे सोल्युशन मिळायचे कारण त्या कोपऱ्यात मी एकटा बसलेला असायचो , आणि एकटा बसलो म्हणजे त्यात फक्त नि फक्त माझ्याच विचारांचे हक्क त्यावर असायचे आणि त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर लवकर तोडगा मिळायचा, मी एकटा कोपऱ्यात असायचो तेव्हा मी कोणाला माझ्याजवळ बसायला मी जागा देत नसायचो कारण कोणी पण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणणार हे तितकंच खरं असायचं आणि म्हणूनच मी कोणाला माझ्याजवळ बसायला द्यायचो नाही.

नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर तुम्हाला वाटलं असेल कि हां महान तत्ववादी चंद्रशेखर आझाद तर नाही ना, लोक हाच विचार करतात केशव,चंद्रशेखर,रामगोपाळ इत्यादी असे कोणाचे नाव असेल तर आडनाव पण एकदम मजेदार असेल म्हणजे काय तर एकदम स्वातंत्रपूर्व किंवा त्या आधी काळातलं असेल असा विचार करतात ,
माझ्या बाबतीत असे खूप झालेत मी जेव्हा माझा परिचय करायला जातो तेव्हा
समोरचा व्यक्ती , "hii तुझं नाव काय मग..?
मी फक्त " चंद्रशेखर आणि पुढे सांगणार तेवढ्यात
समोरचा व्यक्ती ," आझाद व्वा काय नाव आहे , मी बरोबर ओळखलं ना तुझं आडनाव (तेव्हा माझी इच्छा खूप असते ह्याच्या दोन द्यावी पण तो इतका हसत असतो की मी सोडून देतो)
त्याच्या हसण्यात आपलं हसण मिसळून मी मग त्याला जोरात शेहॅन्ड करून करून "माझं पूर्ण नाव चंद्रशेखर घाडगे" असं आडनाव सांगतो
एव्हाना त्याला पण कळलं असत कि आपण काहीतरी चूक केलीय त्याचा पडलेला चेहरा बघून मला पण मनातल्या मनात थोडं हसू येत आणि घरी गेल्यावर हि गोष्ट आठवून आठवून हसतो.

हि झाली माझ्या परियचायची ओळख म्हणजे काय तर लोक पाहिलं मला "आझाद " ह्या आडनावाने guess करतात हसतात आणि मी खर आडनाव सांगितलं की गप्प बसतात.

मी लहान असताना मला आठवतंय, बाबा मला चंद्रशेखर आझाद चे गोष्टी सांगायचे , म्हणजे सगळ्या नेत्यांची गोष्टी सांगायचे पण मला त्यातल्या त्यात चंद्रशेखरची गोष्ट खूप भावली कारण त्यांनी खूप कमी वयात खूप मोठं काम केलेलं असतं त्यामुळेच मला त्यांचा अभिमान वाटायचा आणि त्यातच मला फक्त माझ्या नावाचा अभिमान वाटायचा कारण मी खराखुरा चंद्रशेखर नसलो तरी माझं नाव होत.हो नि मला हे नाव लाभलं ह्याच मी भाग्य समजतो.

मी एक कॉलेज student होतो आणि सांगायला लाज नाही वाटणार कि मी पण माझ्यासाठी एक girlfriend शोधत होतो.
हो हे सगळं हल्ली करतात आणि मी काय वेगळं कलेलं नाही असं मला वाटत. कधी कधी माझ्या मित्रांकडे बघयचो तेव्हा असं वाटत कि आपण काय वाईट करतोय कि आपल्याला कोण मुलगी हो बोलत नाही
एकदिवस असच झालं मका एक मुलगी मला खूप आवडली म्हणजे म्हणतात ना लव्ह ऍट फर्स्ट साईट असं माझं झालं होतं, दिसायला सावळी होती पण तेवढीच ती रेखीव होती , स्वतःला जास्त maintain करायची , आणि तिचा स्वभाव होता की सगळ्यांना खूप मदत करायची आणि ते मला भावलं होत म्हणूनच माझ्या ती मनात बसली होतो.
ती जेव्हा जेव्हा क्लासरूम मध्ये यायची तेव्हा माझा जीव धधडायचा (ती फक्त एका तासासाठी आमच्या क्लासरूम मध्ये यायची)का तर तेव्हा मला समजलं होत की प्रेमाची जाणीव ,

माझी लहान बहीण बोलायची कि कोण मुलगी जेव्हा तुला आवडेल तेव्हा तुझा जीव धडधडत राहील . तेव्हा समजलं की मी प्रेमात पडलोय, मी माझ्या ग्रुप मध्ये सांगितलं की मला ती आवडलीय तर बोलले कि चालेल