sher - 5 books and stories free download online pdf in Marathi

शेर (भाग 5)

शेर पूर्वार्ध (भाग 5)


मागील भागावरून पुढे......


शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. आई च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन थिएटर ला घेतले. सहा तास ऑपरेशन चालले होते. पहाटे तीन वाजता ऑपरेशन झाले. मूर्ती त्याला भेटायला आले.

" शेखर सर , ऑपरेशन इज सक्सेस... पेशन्ट आऊट ऑफ डेंजर..."

" थँक्स डॉक्टर..."

" नो... नो.... सर... इट्स माय ड्युटी...... ओके नाऊ आय मस्ट टेक सम रेस्ट..."

" ओह.. शुअर डॉक्टर... थँक्स अगेन..." हात मिळवून मूर्ती निघून गेले. सुजाता झोपली होती. पण सुकन्या जागी होती. तिने सगळे ऐकले होते. शेखर तिच्या पासून काही अंतर ठेऊन बसला होता . बसून बसून त्याचे पाय आखडले होते. म्हणून तो फिरत फिरत कॅन्टीन कडे निघाला. त्याने दोन कॉफी घेतल्या आणी परत आला. एक कॉफ़ी मग त्याने सुकन्या ला दिला. आणी दुसरा घेऊन तो परत काहीसा लांब जाऊन शांत पणे कॉफी पिऊ लागला..

" थँक्स.. शेखर सर.." ती कधी त्याच्या बाजूला आली ते त्याला कळलेच नाही. अचानक तिच्या बोलण्याने तो चमकला आणी त्याच्या हातातील कप हिंदकळला..

" आज पुन्हा तुम्ही आमच्या साठी धावून आलात.."
ती पुढे म्हणाली..

त्यावर त्याने तिच्या कडे अतिशय थंड नजरेने पाहिले आणी परत कॉफी पिण्यात मग्न झाला जसे काही ती तिथे नव्हतीच.. त्याने असे दुर्लक्ष करणे तिला मनाला कुठेतरी खोल लागून गेले. तिला पण तो आवडत होता. पण घाईघाईने कोणता निर्णय घ्यायचा हा तिचा स्वभावच नव्हता.. त्यात त्याचे शेर प्रकरण त्यामुळे मनातून नसताना ही तिला तसा निर्णय घ्यावा लागला होता.. बराच वेळ तो काही बोलत नाही हे बघून ती नाराज होऊन पुन्हा सुजाताच्या बाजूला जाऊन बसली.

सकाळी तो घरी गेला. ऑफिस ला काही फार महत्वाची कामे नव्हती म्हणून त्याच्या न जाण्याने काही फरक पडत नव्हता.. पण पुन्हा ती संध्याकाळी हॉस्पिटल वर जाऊन आला. आई चीं प्रकृती आता स्थिर होती. पुढील पंधरा दिवस तो सकाळ संध्याकाळ हॉस्पिटल ला जातं होता. त्यामुळे आईला पण त्याच्याबद्दल खूप विश्वास वाटू लागला होता..

शेवटी डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.हॉस्पिटल चे बिल शेखर ने आधीच पेड केले होते. काही औषधे आणी पथ्य पाणी करायचे होते.. तेव्हडे सोडले तर सगळे नॉर्मल होते..

त्या दिवशी शेखर त्यांना सोडायला घरी आला. मधल्या काळात त्यांनी आधीची रूम बदली केली होती. आता ते एका झोपडपट्टीत रहात होते.

तिथे आल्यावर इस्माईल ने गाडी बाजूला लावली. शेखर गाडी खाली उतरला.

" आई ला इथे ठेवणार आहात ? " त्या अथांग , दुर्गंधी ने भरलेल्या झोपडपट्टी कडे नजर टाकत त्याने विचारले. त्याच्या आवाजात चीड होती.

दोघी मान खाली घालून उभ्या होत्या.

" अग.. आताच तिचे ऑपरेशन झालेय.. जखम ओली आहे. इन्फेकशन चा धोका आहे.. हे तरी कळतंय कां तुम्हाला...?"

" एक काम करा जा तुमचे सामान घेऊन या... मी तिला इथं ठेवणार नाही.. चला माझ्या बरोबर..."
सुकन्या ने पटकन मान वर करून बघितले.

" मला माहीत आहे तु मोठी स्वाभिमानाची आहेस पण जीवावर बेतणार स्वाभिमान काय कामाचा ?.... जा.. तुमचे आणी आईचे कपडे , तुझे पुस्तके वैगरे काय हवे ते घेऊन या... जो पर्यंत आई पूर्ण बरी होत नाही तो पर्यंत तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी राहा... " तरी दोघी उभ्याच होत्या.

" जा आता.. " तो कठोर आवाजात म्हणाला.. त्याचा तो आवाज ऐकून दोघी दचकल्या असा त्याचा आवाज त्यांनी कधी ऐकला नव्हता. पण शेखर चा नाईलाज झाला होता.

दोघी निघाल्या काही वेळानी त्या काही बॅग घेऊन आल्या त्या कार च्या डिकीत टाकून सगळे परत शेखर च्या बंगल्यावर आले . शेखर ला बघून गेट वरील वॉचमन ने कडक सलाम ठोकला.

" या.. " तो खाली उतरत म्हणाला.. सुकन्या आणी सुजाताला आईला आधार देत आत घेऊन जातं होत्या. तो आलिशान बंगला बघून तिघींच्या मनावर उगाचच दडपण आले.

" बाळु.. ही सुकन्या आणी ही सुजाता.ह्या त्यांची आई... ह्यांना खालची रूम उघडून दे...आणी आई चे जेवण पथ्याचे आहे तेव्हा त्यांना विचारून जेवण करायला सरु ला सांग...
बॅग राहूदे बाळु आणूंन ठेवेल.. " त्यांना सांगून शेखर वर निघून गेला.. बाळु ने त्यांना रूम उघडून दिला. ac लावला. आता सगळ्या सोयी होत्या. त्याने फ्रिज मध्ये काही बाटल्या ठेवल्या काही सध्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या..

" ताई साहेब.. काही चहा , कॉफी वैगरे घेणार कां ?" बाळु ने अतिशय अदबीने विचारले..

" हो. कॉफ़ी .." सुजाता पटकन म्हणाली...शेखर चें ते वैभव बघून तिचे डोळे मोठे झाले होते.

" बरं... " बाळु निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सुकन्या ला लवकर जाग आली. तिने अंघोळ वैगरे आटपून आपल्या रूम बाहेर पाय ठेवला तर समोर शेखर बसला होता. सरू त्याला कॉफी देत होती. तिला पाहून सरू ने तिला ही चहा कॉफी विचारली.

शेखर एखादा कटाक्ष तिच्या कडे टाकत असे.. तिने प्रफ्फुलीत चेहरा, ओले केस , कमानदार भुवया , सारे सारे तो टिपून घेत होता. सुकन्याच्या ते लक्षात आले. खरं म्हणजे ज्या दिवसा पासून आई हॉस्पिटल ला होती शेखर रोज तिच्या प्रकृतीचीं चौकशी करायला येत होता. पण त्याने तिच्या कडे बघणे , बोलणे सोडले होते आणी आज त्याचे असे बघणे तिला आवडून गेले. चला किमान तो चोरून कां होईना बघायला लागला हे पण काही कमी नव्हते.
कॉफ़ी पिऊन शेखर ऑफिस ला निघून गेला. आणी ती नुसतीच बसून राहिली.

" ताई साहेब आज जेवायला काय करायचे? " बाळु ने येऊन विचारले.

" बाळु दादा... ! मला ताई साहेब म्हणतं जाऊ नका... नुसते सुकन्या म्हणालात तरी चालेल..."

" नाही ताई साहेब... इथली रीतच आहे ती.. " तो ठाम म्हणाला.

" किती वर्ष इथे काम करताय बाळू दादा..? " तिच्या त्या बाळु दादा अश्या बोलण्याने तिने त्याला आपलेसे करून घेतले. त्याने एक नजर किचन कडे टाकली आणी जमिनीवर बसकण मारली..

" अहो... खाली काय बसताय..? इथे वर बसा..? हवंतर तुमच्या साहेबाना मी सांगीन..नाहीतर मीच खाली बसते. " असे म्हणून ती उठली ही.. ते बघून...

" नको... नको..." म्हणून बाळू सोफ्यावर बसला..

" मला चार एक वर्ष झाले इथे येऊन ? आमचे दोन्ही साहेब एकदम देव माणूस.. तुम्हाला सांगतो ताई साहेब कोणी कोणासाठी एव्हडे करत नाही तेव्हडे साहेब आमच्या सारख्या नोकर माणसासाठी करतातं..."

" मला काही कळले नाही... " सुकन्या सावरत बसली. आता तिचे लक्ष बाळू च्या बोलण्यावर एकवटले होते.

" ताई साहेब... आम्ही तिघे म्हणजे मी, सरू आणी वैष्णवी आमची मुलगी तिघे गावावरून कामाच्या शोधात मुंबई ला आलो. ना कामाचा पत्ता , ना राहण्याची सोय फुटपाथ ला रहात होतो. अशातच एके रात्री चार गुंडानी सरू वर हात टाकला. मी त्यांना प्रतिकार करत होतो पण त्या चौघासमोर माझे काही एक चालत नव्हते. सोबत वैष्णवी पण होती . तेव्हा छोटे साहेब मध्ये आले. त्यांनी त्या चौघाना बेदम मारले. आणी आम्हाला इथे घेऊन आले.. तेव्हा पासून आम्ही इथेच आहोत.."

" मग तुमची मुलगी नाही दिसली काल पासून ?"

" ती इथे रहात नाही.. तिला छोट्या साहेबांनी महाबळेश्वर मोठ्या शाळेत शिकायला ठेवली आहे. त्यांचा तिच्यावर खुप जीव आहे. आम्ही जातो महिन्यात दोन महिन्यात तिला भेटायला.. आत्ता बघा ती दिवाळीत सुट्टीत येईल तेव्हा दहा वीस हजार चे फटाके तर साहेब फक्त तिच्या साठी घेऊन येतील.."

" ह्म्म्म..."

" खूप चांगली माणसे आहेत.. कधी काही लागले फक्त सांगायचे, न विचारात ते देतात.. खुप विश्वास पण आहे.."

" मला नव्हते माहीत... " सुकन्या म्हणाली.

" दर वर्षी खूप काही पैसे वेगवेगळ्या संस्था , मंदिरे ह्यांना जातात. त्यातून गरजू लोकांना आजारपण, ऑपरेशन ह्या साठी मदत केली जाते. ते कोणावर उपकार अश्या भावनेतून करत नाहीत. त्यांचा स्वभावच तसा आहे. कोणाला अडचणीत बघितले तर ते स्वतः मदत करायला पुढे येतात. " बाळु सांगत होता आणी सुकन्या हे शेखरचे नवीन रुप बघत होती. आता तर तिला तो खूपच आवडायला लागला होता.

" बरं जेवायला काय करायचे ? " बाळु ने पुन्हा विचारले.

" आज बुधवार.. आज मासे करू या कां ?"

" मासे करायला काही नाही पण मला त्यातले फारसे कळत नाही . आम्ही पडलो देशावरचीं माणसे ... म्हणून शक्यतो आम्ही मासे बनवत नाही. कधी कधी छोटे साहेब घेऊन येतात.. त्यांना खूप आवडतात.."

" हातीच्या त्यात काय एव्हडे मी आणून देते मासे. आणी बनवूंन पण देते मग तर झाले.."

" नको... नको.. त्या पेक्षा तुम्ही फक्त आणा आम्ही बनवायचे बघतो..."

" अरे एकदा माझ्या हातचे खाऊन तर बघ... चल मला सांग कुठे आहे मासळी बाजार.. " ती त्याला विचारू लागली.

दुपारी सरू आणी तिने मस्त खमंग पापलेट तळली , कोळंबीचा घट्ट रस्सा केला.

" साहेबाना ऑफिस ला पाठवू या कां ?"

" ते कधी ऑफिस ला टिफिन घेऊन जातं नाहीत. ऑफिस ला छान कॅंटीन आहे. तिथेच जेवतात.."

" अग.. पण त्यांना आवडतात ना मासे तर पाठवू या.."

" बरं..." मग सरू ने एक डब्बा शोधला आणी त्यात सगळे भरून त्यांनी तो डब्बा बाळू बरोबर ऑफिसला पाठवला.

शेखर कामात व्यस्त होता. तर सदा आत आला.

" सर , बाळू आलाय..."

" बाळु... इथे ? पाठव." शेखर विचारात पडला.

" साहेब , टिफिन घेऊन आलो होतो."

" टिफिन ? कोणी पाठवला ?"

" त्या मोठ्या ताई साहेबांनी...."

" बरं... " आणी बाळू निघून गेला. शेखर विचार करत होता आज सुकन्याने कसा काय डब्बा पाठवला. सरू ला माहित आहे की मी डब्बा नेत मग आज डब्ब्यात काही स्पेशल ?
तो मनात विचार करत परत कामात व्यग्र झाला. बरोबर एक वाजता विनू त्याच्या केबिन ला आला.

" अरे वा आज टिफिन..." बाजूला ठेवलेल्या टिफिन कडे त्याचे बरोबर लक्ष गेले.

" थांब मी सारंग ला बोलावतो.."

" आता त्याला कशाला बोलावतो आहेस ?"

" अरे बाबा असे एकटे ऐकटे डब्बा खायचा नसतो.. पाप लागते.." हसून विनू म्हणाला.. तेव्हाच शेखरच्या लक्षात आले आज आपल्या वाट्याला फार काही येणार नाही.

थोड्याच वेळात दोघे प्लेट वैगरे घेऊन आले.

" ह्म्म्म.. तळलेला मासा , आणी कोळंबी चा रस्सा आहे.. "नुसता वास घेऊन त्याने घोषित केले. आणी मग डब्बा उघडला.

" बघ बोललो होतो ना ? आपला अंदाज खाण्याच्या बाबतीत तर चुकणारच नाही."

" घ्या.. घ्या... " म्हणत विनू ने सारंग च्या ताटात एक लहानशी तुकडी टाकली.. थोडा रस्सा दिला..

" ह्म्म्म करा सुरवात.." शर्टाच्या बाह्या वर सरकवत विनू म्हणाला.

" हे काय..? एव्हडेशे..?" आपले तोंड वाकडे करत सारंग ने विचारले.

" ए जाड्या... जास्त तेलकट खाऊ नकोस. नाहीतर आधीच जाड आहेस कधी तरी फुटशील..."

" काही होत नाही ... अजून दे..." ते लहान मुला सारखे भांडत होते.

" अरे जाड माणसानी जास्त तेलकट खाऊ नये त्याने हार्ट ला धोका असतो असे डॉक्टर म्हणतात..."त्याची समजूत काढत विनू म्हणाला.

" ह्याला काय अर्थ आहे... त्या दिवशी म्हणालास जास्त चायनीज खाऊ नको आज म्हणतो हे खाऊ नको मग खायचे तरी काय ? आणी माझ्या पेक्षा जास्त तर तू खातोस .."

" माझी गोष्ट निराळी आहे. मी कुपोषित आहे कितीही खा अंगाला काही लागतं नाही."

" हो कां ? कोणता डॉक्टर म्हणाला तुला ?"

" अरे ते नाही कां आमच्या बाजूला राहतात ते डॉक्टर कापसे."

" तूझ्या त्या कापसेला एकदा चांगला पिंजून घेतो.... आणी काय रे तो कापसे तर आय स्पेशलिस्ट आहेत ना ?"

" मग काय झाले? आहेत तर डॉक्टरच ना ?" त्यावर सारंग ने त्याच्या कडे असे काही बघितले की विनू ने आणखीन एक तुकडी त्याला दिली. अशी त्यांची जेवणे झाली.

" वा... एक नंबर बनवले होते... मज्जा आली. बऱ्याच दिवसात जिभेला असे रुचकर काही मिळाले नव्हते..."

शेखर काही म्हणाला नाही सुकन्या ने पाच चपात्या दिल्या दोन दोन त्या दोघांनी खाल्या होत्या जेमतेम एक त्याच्या वाटेला आली होती.

" वहिनीला थँक्स सांग हा.. " असे म्हणून विनू आपली प्लेट घेऊन बाहेर पडला.

" हा खायला कधी नाही म्हणतो कां रे ? " शेखरने सारंग कडे बघत विचारले.

" मि तर कधी बघितले नाही...." सारंग म्हणाला..

शेवटी सदा ला सांगून त्यांने पुन्हा जेवण लावायला सांगितले.

संध्याकाळी तो आला तेव्हा सुकन्या बाहेरच होती. तो जेवणा बद्दल काही बोलेल अशी तिची समजूत होती पण तो काहीही न बोलता वर आपल्या रूम मध्ये निघून गेला. फ्रेश वैगरे होऊन तो जेवायला खाली आला. जेवताना पण तो शांत जेवत होता. त्याने अजिबात टिफिन बद्दल विषय काढला नाही..

सकाळी ती उठली पण कालच्या प्रकारानंतर तिची इच्छाच होत नव्हती.. निवांत आवरून ती बाहेर आली. शेखर ऑफिस ला निघून गेला असेल असेच तिला वाटले पण बाहेर आली तर तो समोरच काही कागदपत्र चाळत बसला होता. तीला बघून बाळु ने कॉफी आणली.

तिची कॉफी पिऊन झाल्यावर तो कागदपत्र आवरत उठला..

" हे काही पैसे आहेत... आईच्या औषधाला वैगरे लागतील म्हणून... हॉस्पिटल ला जायचे असेल तर मला फोन कर मी गाडी पाठवून देईन..." असे म्हणून तो निघून गेला. खरंतर तिने पैसे घेतले नसते पण आता तिला त्याचा स्वभाव माहित झाला होता.

" काय सरू ताई ? आज काय करणार आहात जेवायला ?"
किचन मध्ये शिरत सुकन्या ने विचारले. तिला बघून सरू पण आनंदली..काल चा तिचा किचन मधील वावर बघून तिला खूप बरे वाटले. अशी कोणी मुलगी ह्या घराला सून म्हणून मिळाली पाहिजे असे तिला वाटून गेले.

" आज कारले करूया कां ?"

" अरे छान...तुझ्या साहेबाना पण कारले खुप आवडते ना ?"

" तुम्हाला कसे माहीत ?"

" मला माहीत आहे. " हसून सुकन्या. म्हणाली. मग दोघीनी पटापट जेवणाला लागल्या.. तासभरात त्यांनी सगळे जेवण बनवले.

" अहो ताई साहेब एक गोष्ट तर मी विसरलीच..." चाचरत सरू ने सांगितले.

" काय ?"

" अहो .. साहेबांनी कालचा डब्बा परत नाही आणला... आणी दुसरा डब्बा पण नाहीय आपल्या कडे..."

सुकन्याला हा एक झटका होता. काल पण तो एका शब्दाने डब्ब्या बद्दल बोलला नव्हता. कदाचित तिचे असा डब्बा पाठवणे त्याला पसंद नसावे म्हणूनच तो कालचा डब्बा पुन्हा घेऊन आला नव्हता जेणेकरून ती आज परत डब्बा देऊ नये.. तिच्या मनावर एक नाराजी पसरली . मन खिन्न झाले. सकाळ पासून राबून तिने त्याला आवडते म्हणून कारल्याची भाजी बनवली होती. पण आता त्याचा काय उपयोग... ती काहीही न बोलता आपल्या रूम मध्ये गेली.

कितीतरी वेळ झाला पण तिला राहून राहून त्या गोष्टीचे वाईट वाटत होते आणी बाहेरून सरू तिला हाक मारत होती..

" अहो ताईसाहेब..... ओ ताईसाहेब..."

" काय झालं ग ?"

" हे बघा..." सरू ने तिच्या हातातला डब्बा तिला दाखवला. हा कालचाच डब्बा आहे हे तिच्या पहाताच क्षणी लक्षात आले.

" अय्या... कुठे होता ?"

" ऑफिस वरून सदा भाऊ घेऊन आलेत. काय सांगू त्यांना ? " सरू ने गमतीने विचारले.

" काय सांगू काय विचारतेस वेडे... चल पटकन भरूया.. वाजलेत बघ किती भूक लागली असेल त्यांना.." कमालीच्या उत्साहाने सुकन्या किचन कडे वळली....

" अहो ताई साहेब हे बघा काय ?" त्या डब्यातून एक कागद काढून तिच्या समोर धरत सरू ने विचारले.

" बघू .."

आज जर जेवण तयार असेल तर जास्तच दे... इथे दोन अधाशी माणसं आहेत. काल पण फक्त एक चपाती माझ्या वाट्याला आली.
कालचे जेवण मस्तच झाले होते. तुझ्या हातची खास टच मला ओळखता येते.
शेखर.

ते वाचून सुकन्याचा चेहरा आरक्त झाला...

" काय लिवलंय ओ..."

" काही नाही.. चल पटकन जेवण भरूया. आणी आज जास्तच भर बारा चपात्या आणी खूप सारी भाजी दे... ऑफिस ला सगळे मिळून जेवतात मग त्यांना पुरतं नाही."

" त्यांना ? "सरू ने डोळे मिचकावत विचारले..

" सरू ताई फाजीलपणा पुरे भरा डब्बा..." तिला खोटे खोटे दटावत सुकन्या म्हणाली...

ईकडे ऑफिस ला विनू सदा ला शोधात होता. बाहेरून काही चमचमीत मागवावे असा त्याचा विचार होता. पण कोणी तरी बोलले की शेखर ने सदा ला घरी पाठवले.
तो चमकला.. सदाला कां काढले कामावरून? त्या बद्दल माहिती घेण्यासाठी तो शेखर च्या केबिन ला गेला.

" शेखर , सदा ला घरी पाठ्वलेस ?"

" हो..."

" असे काय झाले की त्याला तडकाफडकी काढून टाकलेस ?"

" काय..? तू काय डोक्यावर पडला आहेस काय ?"

" मग बाहेर कोणी तरी बोलले की तू त्याला घरी पाठवलेस म्हणून..."

" अरे मी त्याला माझ्या घरी म्हणजे बंगल्यावर पाठवले आहे."

" ओह.. मला वाटले.... जाऊ दे... काही काम होते कां ?"

" हो काम होते."

" महत्वाचे काम होते?"

" नाही फार काही महत्वाचे काम नव्हते.. " शेखर पण त्याला अजिबात थांगपत्ता लागू देत नव्हता. पण त्या दिवशी शेखरचे नशीबच गांडू होते. नेमका त्याच वेळी सदा हातात डब्बा घेऊन आत प्रकटला...

" सर घरून डब्बा आणलाय कुठे ठेऊ ?"

" अरे वा.... असे प्रकरण आहे तर... आण इकडे घेऊन ये... जेवायची वेळ झालीच आहे..." सदाने एकदा विनू कडे बघितले आणी मग शेखर कडे बघितले. शेखर ने त्याला इशाऱ्याने होकार दिला.

" आह... आजपण मस्त घमघमाट येतोय... बहुतेक कारल्याची भाजी... आणी आज डब्बा पण खूप भरलेला आहे.... जा सदा तू सारंग ला पाठवून दे..."

" सारंग ला कशाला सगळ्या ऑफिसलाच बोलाव..." शेखर वैतागून म्हणाला...

" मला काय? , आता बोलावतो..." खुर्चीतून उठत विनू म्हणाला.

" राहू दे दानवीर कर्ण.... साल्या दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही दानधर्म करणार .. बसा तुम्ही... जा सदा, सारंग ला पाठव.. " आपल्या टेबलवरच्या फाईल्स उचलत शेखर ने सदा ला सांगितले. काहीवेळातच सारंग पण आला.. आणी तिघांनी जेवण केले . आजही भाजी अतिशय रुचकर झाली होती. ही भाजी सुकन्याने केली होती ह्यात शंकाच नव्हती.. अशीच भाजी जेव्हा पहिल्यांदा शेखर त्यांच्या घरी गेला होता तेव्हा तिने बनवली होती.

संध्याकाळी खुश होऊन शेखर घरी गेला. आज तिच्या स्वैयंपाकाचीं तारीफ करायची हे ठरवूनच तो घरी गेला होता. घरी बाबा आले होते. त्यांनी तिच्या आईची चौकशी केली. काही लागल्यास अजिबात संकोच न करता सांगायला सांगितले.. आणी बाबा आले म्हणून शेखर ला तिच्याशी बोलायला मिळाले नाही.. पण तिच्या बाजूने जाताना तो हळूच कोणाच्याही लक्षात येण्या आधी पटकन...

" आज जेवण मस्तच झाले होते..." हळुवार तिच्या कानाजवळ पुटपुटला.. ते ऐकून तिला खूप बरं वाटले. तिने लाजून हळूच चेहरा खाली झुकवला.

रात्री सगळे सोबत जेवायला बसले.

" अरे शेखर किती दिवस झाले आहेत ह्या मुली इथे आहेत. ह्यांना कुठे फिरायला घेऊन गेलास की नाही? बिचाऱ्या एकाच जागी बसून बसून कंटाळल्या असतील...
एक काम कर आता मी आलोय तर उद्या ह्या सगळ्यांना घेऊन कुठे तरी फिरायला जा... काय ?"

" मी नको बाबा.... मला नाही जमणार..." आईने आधीच नकार कळवला...
" हा.. ह्या दोघी येत असतील तर ह्यांना घेऊन जा..."

" नको ... नको.... आम्ही गेलो तर तुझ्या औषधाचे काय..?"
सुकन्या म्हणाली.

" एका दिवसानी काही होत नाही. आणी सरू आहे की इथे ती देईल मला औषधे... जा तुम्ही माझी काळजी करू नका.. असे पण मागील पंधरा दिवस तुमची धावपळच चालली आहे..." आई च्या बिनतोड उत्तरावर आता सुकन्या कडे कोणतीच सबब राहिली नव्हती..

" मग जाणार ना ? " बाबा नी पण विचारले...
सुकन्या ने मान हलवली.

" बरं.... शेखर उद्या घेऊन जा ह्यांना... आरामात या इथली काही काळजी करू नका... मी पण हवं तर घरीच थांबतो.."

" ह्म्म्म...." शेखर उद्या कुठे जायचे ते ठरवू लागला... आई आणी बाबा उठून गेले. आता ते तिघेच तिथे बसले होते.

" मग कुठे जायचे आहे?"

" तुम्हीच ठरवा..." सुकन्या म्हणाली...

" मला वाटते आपण सकाळी मस्त फिरू त्यानंतर एखादा पिक्चर बघू संध्याकाळी मारिन लाईन्स वर समुद्रावर जाऊ मग रात्री जेवून घरी येऊ..."
" छान कल्पना आहे..." सुजाता पण उत्साहात म्हणाली..खरं म्हणजे फिरायला जाण्यापेक्षा शेखर बरोबर असणार आहे ह्याचाच तिला जास्त आनंद झाला होता..

" ठीक आहे..."


पुढील भाग लवकरच.....


© सर्वाधिकार लेखकाकडे...


























Share

NEW REALESED