Aghatit - 1 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग-१

अघटीत भाग १

पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले .

पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात दोन नोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते .

सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले नव्हते .मात्र एक इमानदार पोलीस म्हणून त्यांचा चांगला लौकिक होता . त्यांचे बघून पद्मनाभने लहानपणा पासून पोलीस सेवेत जायचे स्वप्न जोपासले होते .
पदवीनंतर लगेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याला ही नोकरी मिळाली होती .आपले स्वप्न पूर्ण झाले म्हणून तो खुप खुष होता आणि आपल्या हुशारीने हळूहळू त्याने डी एस पी पदापर्यंत मजल मारली होती .

इतकी वर्ष सातारा ,सांगली ,कोल्हापूर भागात काढल्यावर एकदम पुण्यात बदली म्हणून घरचे पण खुप खुष होते .सध्या घरी त्याची आई, बायको वरदा ,आणि मुलगी क्षिप्रा होती.

क्षिप्राने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती .आता रिझल्ट आल्यावर अकरावी साठी पुण्यात प्रवेश घ्यायचा होता.
ती प्रचंड खुष होती बाबाची प्रमोशन वर बदली आणि ती सुद्धा पुण्यात ...
“पुणे तेथे काय उणे” हे तर खुप दिवसापासून ऐकत होतीच .
त्यामुळे एक सुप्त आकर्षण पण होते तिच्या मनात पुण्याबद्दल .
आता पुण्यात मस्त नवीन नवीन मित्र मैत्रिणींचा ग्रुप होईल मस्त मजा करायची .
सध्या तरी काही अभ्यासाचे टेन्शन नाहीये ,हळू हळू सुरु करायचा
खरेतर सातारच्या मित्र मैत्रिणी सोडताना तिच्या जीवावर आले होते .
अगदी शाळेच्या पहिल्या इयत्तेपासुन त्यांचा मस्त ग्रुप जमला होता .
बाबाची बदली झाली तरी त्यांनी सातारा सोडले नव्हते .
त्यामुळे पोलीस कॉलनी मध्येच त्यांचे वास्तव्य राहिल्याने मैत्री घट्ट होती .
तसे सातारा लहान गाव असल्याने ग्रुप मध्ये मुले फारशी नसायची त्यांचे वेगळे ग्रुप होते .
इथे मात्र मित्र आणि मैत्रिणींचे एकत्र ग्रुप असतात असे ती ऐकुन होती .
ते ही एक थ्रील तिच्या मनात तारुण्यसुलभ असते तसे होतेच .
गाडीतून उतरल्यावर एवढा मोठा बंगला पाहून “वाव “ असे पटकन तिच्या तोंडून निसटून गेले .
घरची सर्वचजण बंगला पाहून थक्क झाली ,वरदा आणि तिच्या सासुबाईनी एकमेकीकडे बघून स्मित केले .
क्षिप्राचे चकित होणे त्यानाही आवडून गेले होते .
पद्मनाभने मात्र एक प्रेमळ कटाक्ष टाकला क्षिप्रा कडे ..
तिच्या डोक्यावर एक टपली मारून तो म्हणाला “काय खुष न आमची प्रिन्सेस ?
क्षिप्रा हसून बोलली हो रे बाबा खुप खुप खुष ..
“हे बघ वरदा मला लगेच निघायला लागेल ,तुम्ही आता आत जाऊन बंगला बघून आपापल्या खोल्या ठरवून घ्या बर का ..इथे सगळे सामान आहेच एकदम अद्यावत आहे बंगला .
आपले तिकडचे सामान उद्या येईल बघु त्याचे काय करायचे ते “
त्याचे बोलणे ऐकुन वरदा म्हणाली ,’अरे लगेच निघालो काय ..जरा विश्रांती चहापाणी वगैरे ..”
“म्याडम विसरा आता ते सगळे ,इथे सगळे पूर्ण जबाबदारीचे काम आहे आधी काम आराम नंतर ..
आणि दोन तास तर वातानुकुलीत गाडीतुन प्रवास झालाय .कशाला हवीय विश्रांती ?
आणि ऑफिसवर तर जंगी स्वागत असणार आहे तिकडे सगळे होईलच
मी निघतो ..आई तु पण आराम कर “
असे बोलून पद्मनाभ गाडीत बसून गेला सुद्धा .

क्रमशः