Nava adhyaay - 8 books and stories free download online pdf in Marathi

नवा अध्याय - 8

खरच मीनू तू म्हणजे डोळे उघड्लेस . मी विसरून गेलतो की , आईने त्यावेळी कष्ट घेतले .स्वतः अशिक्षित असून घरातील प्रत्येक व्यक्तीला शिकवले . त्याना स्वताच्या पायावर उभे केले म्हणून तर आज आह्मी एथे आहोत . आणि आह्मी तिलाच विसरलो . अतुलचे डोळे भरून आले.
असू दे रे अतुल तुला तुजी चूक समजली ना , मग झाल . मीना त्याला समजाव त म्हणाली . आणि आता आपल्याला घरच्या पण हे समजावे लागणार आहे . ते आता पर्यंत कोणती चूक करत होते . हे ही दाखवून द्यावे लागणार आहे . आणि आणखी मी ' ' सुंदराबाई मसाले ' ' ह्या नावाची एक कंपनी चालू करयाची ठरवली आहे .त्यात आई सारख्या किती तरी महिला आहेत .
अरे वाह , मस्तच मी तुला आणि आईला हवी ती मदत करायला तयार आहे . अतुल म्हणाला . अतुलच बोलण ऐकून मीनाला त्याचा अभिमान वाटला . ' ' बर ....अतुल आता घरी निघायचे . घरी सगळे वाट बघत असतील . आणि हसत हसत अतुल आणि मीना घरी जायला निघाले .
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सुंदराबाई आणि मीना स्वयंपाक घरात काम करत होत्या . सगळे नाष्टया साठी जमले .सुंदराबाईनी अतुल आणि मीनाला नाश्ता दिला .मुलाना दूध दिले . बाबा घरात नसल्यामुळे त्या स्वता नाश्ता करायला बसल्या . ईत्क्यात अजय म्हणाला , आई मला नाश्ता , नाही दिलास . त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या हेतूने सुंदराबाई म्हणाल्या , मी कालच सांगितलय की तुजी बायको तुजा आणि तिचे जेवण बन्वेल
आणि तस तिला जर जमणार नसेल .तर तिने स्वयंपाक घरात सकाळी आणि संध्याकाळी मला मदत केली पाहिजे . यावर अतुलची बायको म्हणाली .मला हे जमणार नाही .त्यापेक्षा मी जेवण पार्सल आणेल .यावर सुंदराबाई हळूच हसत म्हणाल्या .जशी तुमची ईचछा . सगळे नाश्ता करू लागले . अजयची बायको आणि अजय तेथून निघून गेले .
सकाळी नाश्ता न केल्यामुळे अजयनी ऑफीस मधे जाताना नाश्ता करायच ठरवल . त्याने आवरून ऑफीसला निघाला . तो ऑफीसला जाताना आवारत असताना सुंदराबाई अजयला म्हणाल्या मुलाना शाळेत सोडाव. ' ' अग आई पण मुलांना तर तूच शाळेत सोडव्तेस ना मग आज , काय झाल ' ' . अजय नी विचारले . आज तुजी बायको उशिरा उठल्यामुळे मुलांना तिने उशिरा तयार केले . आणि रोज मुलाचे मीच आवारते .त्यामुळे मुलाची कोणती गोष्ट कुठे असते , हे ही तिला माहीत नाही . त्यामुळे मुलांच उरकाय्ला तिला उशीर झाला . आणि मुलाची गाडी गेली . आता त्याना शाळेपर्यंत तर कोणी सोडवले पाहिजे ना . तुजी बायको तर कामावर निघून गेली . मग तूच त्याना सोडव्णार ना . सुंदराबाई अजयला म्हणाल्या .
अग आई पण जर गाडी गेली , तर तू त्याना रिक्क्षाने सोड्वयाचि मग आज ...तोंडातले शब्द तोण्डतच ठेवत . मी कालच सांगितलय आणि आता ही सांगते , ह्या पुढे मुलांची जबाबदारी तुज्या बायकोने घेतली पाहिजे .आणि स्वयंपाक घरात सुध्दा मदत केली पाहिजे . आईला मधेच थांबवत अजय म्हणाला ' ' हो , मी सांगतो तिला ' ' .
ई कडे मुलांना शाळेत सोडव्ल्यामुळे अजयला ऑफीसला जायला उशीर झाला . त्यामुळे त्याला बॉसची बोलणी तर खावीच लागली . पण सकाळचा नाश्ता ही करता नाही आला . त्यामुळे त्याची आणखीनच चिडचिड होऊ लागली . आणि कामात ही चूक्या होऊ लागल्या .
पुढील कथा नवा अध्याय भाग - 9मधे .