Nava adhyaay - 9 books and stories free download online pdf in Marathi

नवा अध्याय - 9

ईकडे अजयच्या जेवणाची वेळ झाली .पण आईने डबा न दिल्यामुळे अजयला आज कण्टिणच खावे लागणार होते . कण्टिणमधे तो गेला पण तिथले ते बेचव अन्न त्याला काही केल्या जयीणा . तसच अर्धपोटी तो काम करण्यास निघून गेला . ईकडे निशा अजयच्या बायकोची अवस्था ही तीच होती . तिला ही कण्टिण चे जेवण काही जात नव्हते . आणि कामाची सवय नसल्यामुळे आणि सकाळपासून काम केल्यामुळे तिचे अंग ही दुखत होते .शिवाय घरी जाऊन ही पुन्हा कामच करायचे त्यामुळे ती व्याताग्ली होती .
निशा ईकडे घरी आली . घरात येताच तिने मेह्ण्दीचा क्लास लावला होता .त्या क्लासला जायला ती निघाली . ती निघणार ईतक्यात सुंदराबाई नी तिला आवाज दिला . ' ' निशा थांब , मुलांची काळजी घे , मी अतुल आणि मीना आह्मी नाटकाला चाललोय आणि तिथेच जेवून येणार आहे .' ' एवढ बोलून त्या मीना आणि अतुल निघून गेले . निशा जागायावरच थांबली . , ती विचार करू लागली . आई मधे एवढा बदल कसा झाला . पहील्यातर कोणत्याच गोष्टी साठी त्या आपल्याला बोलत नव्हत्या .आणि आता . तिने ह्या सगळ्याची शहानिशा करायची ठरवली . तेवढ्यात तिची दोन्ही मूल भूक लागली म्हणून रडू लागली . निशाने त्याना कस बस समजावलं पण ते काही ऐकायला तयार नव्हते . शेवटी तिने कसा बसा वरण भाताचा कुकर लावला . आणि बाकीचे जेवण बाहेरून ऑर्डर केल . ती अजय ची वाट बघत बसली . ईत्क्यात अजय आलाच . मुले भूक भूक करून रडून झोपी गेली होती . अजय घरात येताच निशाची आणि अजयची भांडणे सुरू झाली . शेवटी अजय नी ह्यावर तोडगा काढायचा ठरवला .
त्यानी मुलाना सांभाळ करायला आणि घरकामासाठी कामवाली ठेवायचे ठरवले . त्याचा हा निर्णय निशाला ही पटला . तिने उद्याच मैत्रिणीना कामवाली विषयी विचारायचे ठरवले .आणि अजय नि त्याच्या मित्राना कामवाली विषयी विचारायचे ठरवले . पण तो पर्यंत आळीपाळी ने दोघांनी मूल सम्बलयच ठरवल . निशाने सकाळी आणि अजय नि संध्याकाळी .
ईकडे महिना उलटला .पण निशाला काही कामवाली मिळाली नाही .आणि ज्या मिळाल्या त्या टिकल्या नाहीत .आणि त्यामुळे निशा आणि अजय मधे भांडणे अधीकच वाढू लागली . ईकडे सुंदराबाई ची मसाल्याची कंपनीने जोर धरला होता .सुंदराबाईच्या निदर्शना खाली ही कंपनी चालत होती . मसाल्याच मार्केटिंगच सगळ अतुल पाहत होता . सुंदराबाईनी बरीच लांबची मजल मारली होती . त्यांच्यात खूप फरक पडला होता .त्याच राहणीमान , वागणे सगळेच बदले होते . त्यानी इंग्लीश शिकायला सुरवात केली .
घरचे वातावरण असे चालू असतानाच अचानक सुंदराबाईचे पती बाहेरगावातून परतले . घरी आल्यावर निशा नी त्यांचे कान भरले . घराची हलेली घडी त्याना सांगितली . सुंदराबाई करत असलेल्या कामाबद्दल ही सांगितले . त्या चालवत असलेल्या कंपनी बदल सुधा सांगितले . बाबाचा पारा चढत होता . आणि ते बघून निशाला फार आनंद झाला .आता बाबा आईना रग्व्तील आणि आई पुन्हा सगळ सोडून घरकामाला लागतील अस निशाला वाटल .
सुंदराबाईचे पती जेव्हा घरी आले .तेव्हा सुंदराबाई घरी नव्हत्या . अतुल आणि मीना ही घरी नव्हते . जेव्हा सुंदरबाई घरी आल्या , तेव्हा त्यांचे पती त्यांच्या रूम मधे आराम करत बसले होते . सुंदराबाईना आल्या आल्या त्यांच्या पतीची चाहूल लागली . त्या आवरून स्वयंपाक घरात शिरल्या . त्यानी सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले .मीना ही त्याना स्वयंपाक घरात मदत करण्यासाठी आली .