kadambari - jeevlagaa - 13 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - जिवलगा ... भाग - १३

कादंबरी - जिवलगा ..

भाग-१३ वा .

ले- अरुण वि.देशपांडे

--------------------------------------------------------------------

संध्याकाळची वेळ झालेली होती ..नेहाने बागेतील झाडांना पाणी देण्यात एक तास घालवला , तरी पण ,वेळ जाता जात नाहीये असे वाटून तिला खूप कंटाळून गेल्या सारखे झाले , हॉलमधून एक खुर्ची बाहेर आणून टाकीत नेहा शांतपणे बसून राहिली .आजकाल लोकांच्या मनात ..स्वतहा शिवाय दुसरा काही विचार येतच नाहीत की काय ?

आणि कधी विचार आलाच तर तो असतो इतरांना फक्त तुच्छ लेखण्याचा .
अशा लोकांना भेटून आल्यावर मला कळाले की माझे कहाणी बोरिंग होतीय ", अशा कमेंट कुणाकडून तरी कळतातच ,तेव्हा मनाला खूप वाईट वाटते .

माझ्या आयुष्यात - चटपटीत सांगावे असे काही घडलेलेल नाहीच .मग ..तुम्हाला आवडेल असे ..रोमेंटिक..काय सांगणार ?आहे माझे जगणे अळणी , बेचव .आणि संथ .कंटाळवाणे..

म्हणून काय तुम्ही माझ्याशी मैत्रीपण करणार नाही काय ?


एक सांगू का ..तुमच्याशिवाय ..अनेकजन नक्कीच माझ्यासारखे असतील ,ज्यांना माझी ही कहाणी आवडत असणार ,त्यांना माहिती आहे ..की "साधे -सरळ ,भिडस्त स्वभाव्ची व्यक्ती असणे ही काही चुकीचे नाही . या दुनियेत स्वतहाला -इतरांपेक्षा चलाख ,चतुर , हुशार , बुद्धिवान .समजून , स्वतहाच्या भ्रमात वावरणारी ..अशी माणसे ही नेहमीच दुसर्यांना बावळट ,मूर्ख समजून चालत असतात .पण म्हणून काही " आमच्या सारखी माणसे ,स्वतःला शहाणे समजणाऱ्या माणसांसारखे तुटक आणि कुणी दुखावले जाईल असेकधी वागत नाही.


इथे आल्यापासून मला अशा वागणार्या लोकांच्या बोलण्याची - वरवरच्या वागण्याची सवय झाली आहे ..मी कबुल करते की मला असे सराईतपणे वागणे इतक्या लवकर जमणारे नाही ..म्हणून मी तुमच्या चेष्टेचा आणि टिंगल करण्याचा विषय असावे का ?

मी माझ्या परीने प्रयत्न करते आहे हळू हळू बदलण्याचा , एक दिवसात .काही असे होत नसते " हे तर तुम्हाला महितिआहे , मग,मला इतके हीन - कमीपणाचे लेखणे कशामुळे ?


नेहाने आपल्या मनातल्या भावना जशाच्या तशा कागदवर उतरवल्या ..त्या वाचून पाहिल्या ..आपले हे मनोगत ..मावशीला दाखवू, मधुरिमाला दाखवू म्हणजे त्यांनाही आपल्या मनात चालू असलेल्या या गोंधळाची कल्पना येईल. आता ४-५ दिवसात मावशी आणि काका दोघे ही परदेशातील वास्तव्यास जाणार होते , सारी कागदपत्र ,तयार होती . मुलाने विमान-प्रवासाची सगळी व्यवस्था केली होती . मुलांच्या सहवासात राहण्यास मिळणार या कल्पनेने मावशी आणि काकांचे मन उत्साहाने भरून आले होते .
मुलगा -सून आणि नातू , लेक-जावईबापू आणि फमिली ..अशा दोन्ही कुटुंबासाठी मावशींनी स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ केले होते .या कामात नेहाने मावशीला मदत केली ,काकांनी नेहाच्या हाताला अशा कामाची सवय आहे पाहून आनंद व्यक्त करीत म्हटले ..
नेहा ..सोरी बेटा ..त्या दिवशी मावशीबरोबर पार्टीला जाताना तुला तुझ्या कपड्यावरून बोललो , ते विसरून जा ." हे जग किनई ..बाह्य-रुपा वरून माणूस कसा आहे ते ठरवून टाकीत असते ..तुझ्या सहवासात राहून ..मला कळते आहे ..तू एक छान .मुलगी आहेस.. जिला माणसांची जाणीव आहे , घराची जाणीव आहे..जुनाट विचार म्हणून तू सगळ्या गोष्टींना सोडून दिले नाहीस , या गोष्टींचे महत्व तुला कळाले आहे..अशी माणसेच घराची किमत जाणून असतात .अशी समज सगळ्यांना आली तर खूप चांगले होईल .
काकांचे हे कौतुकभरे शब्द ऐकून .नेहाच्या मनावर आलेले निराशेचे मळभ दूर झाले . लोक समजतात तितके आपण नक्कीच बोरिंग नाही आहोत.काही वेळापूर्वी लिहून काढलेले मनोगत मावशीच्या हातात देत म्हटले ..हे वाचून झाल्यावर मधुरिमाला देणे.
या दोघींना आपल्या मनोगतास वाचून काय वाटते..हे जाणून घेण्याची उत्सुकता नेहाच्या मनास लागली होती...

मावशी आणि काका परदेशी जाणार , लगेच पुढच्या महिन्यात मधुरिमा देखील जाणार ..मग एकटीने राहायचे , एक मात्र बरे झाले होते की ..मागे एकदा नोकरीसाठी म्हणून अनेक ठिकाणी

बायोडाटा पाठवला होता , त्यापैकी ..काही ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलावणे आलेले होते ..त्यामुळे मावशी -काका जाण्या अगोदर नाही ,पण, माधृरीमा जाण्याच्या अगोदर तरी नोकरी मिळाली

तर दिवसभर एकटीने राहण्याचा प्रश्न येणार नव्हता . दिवसभर ऑफिस आणि रात्री मुक्कामास लेडीज होस्टेल ..हे सहज जमण्य सारखे होते. आता उद्यापासून इंटरव्ह्यू मोहीम सुरु करायची

मधुरिमाच्या काही मित्रांनी नेहाचे इंटरव्यू अरेंज केले होते ..म्हून नेहा जास्त आशावादी होती..के या पैकी कुठे तरी आपल्याला नक्की जोब मिळणार .

जॉब मिळाला तर ,आपण ज्या उद्देशाने गाव आणि घर सोडून बाहेर पडलो आहोत ,त्या नव्या प्रव्साचा एक टप्पा पूर्ण होऊन ..नवा अध्याय सुरु होईल ..त्यासाठी आपण खूप आतुर झालो आहोत हे नेहाला जाणवत होते...

एका नवी पहाट उजाडण्याची ती वाट पाहू लागली ...

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------बाकी वाचू या ..पुढील भागात ..भाग -१४ वा लवकरच येतो आहे..

.------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जिवलगा ....भाग- १३ वा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------

Share

NEW REALESED