Aghatit - 13 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत भाग १३

अघटीत भाग १४

ही सर्व माहिती ऐकताना आणि स्लाईड शो बघताना पद्मनाभ चक्रावून गेला .
विशेषतः पार्टीत नाचणाऱ्या मुलांचे आणि निर्लज्ज मुलींचे बीभत्स आणि अर्धनग्न व्हिडीओ पाहून त्याला शिसारी आली .
पद्मनाभला नवल वाटत होते ,काय असेल अशा मुलींची अवस्था आणि काय असेल त्यांचे भविष्य ?

राहून राहून त्याला वाटत होते या मुलींच्या पालकांचे इतके कसे दुर्लक्ष होत असेल मुलींकडे

आणि मुली पण इतक्या कशा बेदरकार ...?

जवळ जवळ अशीच भावना इतर अधिकाऱ्यांची पण झाली होती .
यानंतर प्रश्नोत्तराचा सेशन होता .
बर्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले .
त्यात महत्वाचा प्रश्न हाच होता की या मुलांच्या पालकांना याबद्दल समजत नाही का ?
आणि जर असेल तर ते त्यांना कसे काय रुचते ?
खरेतर या प्रश्नाला उत्तरच नाहीये कारण ही सर्व युवा पिढी समाजातली उच्चभ्रू लोकांची मुले आहेत.
बहुतांश वेळी या पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नसतो .
त्याना गाड्या, पैसे किंवा मागतील त्या वस्तू उपलब्ध उपलब्ध करून दिल्या की त्यांची जबाबदारी संपली असे त्यांना वाटते .
काही वेळा या गोष्टीचा सुगावा पालकांना लागलेला असतो ,पण आता त्या सर्व गोष्टी त्यांच्या आटोक्या बाहेर गेलेल्या असतात ,आणि मुले पण आईवडिलांचे ऐकत नसतात .
या गोष्टीना आळा बसायला हवा कारण आता पुढील समाजाचे भविष्य या पिढीच्या हातात आहे .
जर हीच पिढी नशेच्या आणि गैर गोष्टींच्या आहारी गेली तर समाजाचे पर्यायाने देशाचे नुकसान व्हायला वेळ लागणार नाही .
ड्रग्ज चा हा ओक्टोपस वेळीच खतम करायला हवा .
यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या धाडी व त्यात जप्त केलेल्या गोष्टी ही माहिती
पोलिसांनी समाजत पेरलेले “खबरे “असतात ज्यांच्याकडून या पार्ट्यांच्या आयोजनाची माहिती समजत असते .
मग अशा वेळा बेसावध क्षणी या बेधुंद रेव्ह्यांना धाड घालून अटक करण्यात येते .


मध्यंतरी एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली त्यामध्ये अल्पवयीन मुलं आणि मुलींसह 600 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते.
यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी दारू आणि इतर गोष्टी ताब्यात घेतल्या होय .
दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या रेडनंतर एक्साईज विभागानं देखील यावर धाड टाकली होती .
खबरी लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली होती .
सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या बातमीनुसार अलिबाग येथे सुद्धा पोलिसांनी एका बंगल्यावर धाड टाकून रेव्ह पार्टी करणार्‍या 14 जणांना अटक केली, तर 7 मुलींची सुटका केल्यानंतर पुन्हा एकदा
आबकारी विभाग व महरौली पोलीस यांनी छतरपुर एक्सटेंशनच्या एका कैफे वर छापा मारून रेव्ह पार्टी पकडली होती .
मुख्य आयोजकांच्या सोबत 8 लोकाना गिरफ्तार केले होते .
पार्टीमध्ये हरियाणा मधून आणलेली परदेशी अवैध दारू या व्यतिरिक्त चरस व मॉर्फिन ड्रग्स वापरली जात होती कैफेला ताबडतोब सील करण्यात आले .

त्यावेळी या संदर्भात नंतर असे सत्य पुढे आले की या पार्टीत दारू आणि ड्रग्स दोन्ही खुप महाग विकली जात होती .
ऐकले तर नवल वाटेल एक पेग दारूची किंमत 5000 रुपये होती आणि ड्रग्स च्या एका डोस ची किंमत 10000 रुपये होती .अबकारी विभाग अधिकार्यांच्या मते या रेव्ह पार्टीत एकदम हाई प्रोफाइल परिवारातील मुले शामिल होती .
या पार्टीमध्ये सामिल होण्यासाठी खुप मोटी रक्कम खर्चायला लागत होती .
सध्या पोलीस आरोपीने मॉर्फिन ड्रग्स कुणाकडून आणि कोठून आणली होती याचा शोध घेत आहेत .
मिळालेल्या माहिती नुसार आरोपी आधी कैश जमा करून घेत होता त्यानंतर कूपन (बैंड सारखे )दिले जात होते
बैंड असल्यावरच ड्रग्स आणि दारू दिली जात होती .
आबकारी अधिकार्यांनी पार्टीकडे लाइसेंस मागितले पण ते तो दाखवू शकला नाही .
या सार्या गोष्टीवर चर्चा झाल्यानंतर ही मिटिंग समाप्त झाली .
आता पद्मनाभ कडे या पार्ट्यावर ऱेड घालायचे मुख्य काम सोपवण्यात आले .
पद्मनाभ घरी पोचला तेव्हा रात्र होत आली होती .
क्षिप्रा जेऊन झोपली होती मधुरा मात्र त्याची वाट पाहत होती .
दोघे जेवायला बसले तेव्हा हा सारा विस्तृत मिटिंग चा विषय निघाला .
मधुराला सुद्धा या गोष्टींचे फार नवल वाटले .
खरेच फार भयानक प्रकार होता तो .
“अरे पण यांच्या आईवडीलांना काहीच कसे वाटत नसेल आणि यातल्या मुलीना सुद्धा लाजा कशा नाहीत “?
मधुरा तिडीक येऊन म्हणाली .
“काही नाही ग हा सगळा हाय सोसायटीचा खेळ आहे .
मुले मुली तर दोषी आहेच पण आपल्या मुलांच्याकडे लक्ष न ठेवणारे पालक ही तितकेच दोषी आहेत .
दुसर्या दिवशी पासून पद्मनाभ फारच बिझी झाला .
दिवसभर काम चालुच असे शिवाय रात्री अपरात्री रेव्ह पार्टीची खबर घेऊन पोलीस गाडी आली की लगेच निघावे लागे आणि मग ती ऱेड आणि त्याचे सोपस्कार होऊन घरी येईपर्यंत सकाळ झालेली असे .
पुन्हा दिवसाचे रुटीन सुरु होत असे .

क्रमशः