Bara Jyotiling - 13 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग १३

बारा जोतिर्लिंग भाग १३

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे.
हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.
हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडव वंशाचा राजा जनमेजय याने केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते.
केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असुन येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे.
गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.

२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पुर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले.
परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही.
हिमालयाच्या गढवाल पट्ट्यात उत्तराखंडात केदारनाथाचा निवास आहे.
मंदाकिनी नदीच्या तटाजवळ केदारनाथ मंदिर आहे.
केदारनाथजवळच गांधी सरोवर आणि वासुकीताल आहे .
केदारनाथला जाण्यासाठी रुद्रप्रयाग कडून गुप्तकाशीला जाऊन तेथुन २० किलोमीटर पुढे गौरीकुंडपर्यंत मोटरमार्गाने व नंतर १४ किलोमीटर यात्रा पायी करावी लागते .
हे मंदिर बहुतांशवेळा बर्फाच्छादित असते .
या मंदिरात प्रवेश करणे बर्फामुळे खुप कठीण असतं.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे शीत ऋतू मध्ये भाविकांसाठी बंद करण्याचे आणि यात्रेसाठी पुन्हा उघडण्याचे मुहूर्त काढले जातात.

ही यात्रा शीत ऋतूचे आगमन होईपर्यंत सहा महिने सुरु राहते.
एकदा शीत ऋतूला प्रारंभ झाला, की केदारनाथ आणि त्याचबरोबर बद्रीनाथ धामांची द्वारे पुन्हा बंद केली जाऊन यात्रा समाप्त होते.
या मंदिरांची द्वारे बंद केल्यानंतर येथे कोणीही प्रवेश करीत नाही.
अशा वेळी मंदिरातील देवतांची नित्याची पूजा-अर्चा देवतांच्या द्वारेच केली जात असल्याची मान्यता येथे रूढ आहे.

केदारनाथ धामाची द्वारे जेव्हा सहा महिन्यांकरिता बंद केली जातात, तेव्हा द्वारे बंद होण्यापूर्वी एक अखंडज्योती मंदिरामध्ये तेवती ठेवण्यात येते. मंदिराची द्वारे सहा महिन्यांनंतर पुन्हा खुली करण्यात आल्यानंतरही ही ज्योती तेवत असल्याचे दिसून येते.
ही ज्योती अखंड तेवत ठेवण्याची कामगिरी देवता स्वतः बजावीत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
शीत ऋतूमध्ये साधारण नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास हे मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यांनतर सहा महिन्यांनी, म्हणजेच साधारण पंधरा ते वीस एप्रिलच्या सुमाराला मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले गेले, की केदारनाथ यात्रेला सुरुवात होते.
मंदिराची द्वारे उघडल्यानंतर येथील शिवप्रतिमा उखीमठ येथे आणली जाते.
येथील रावल ह्या प्रतिमेची पूजा करतात.
येथे येणाऱ्या भाविकांना पूजा करण्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे रोख रक्कम देता येऊ शकते.
केदारनाथ देवस्थान समुद्र सपाटीपासून ३५९३ फुटांच्या उंचीवर वसलेले आहे.
इतक्या उंच ठिकाणी ह्या मंदिराचे निर्माण केले जाणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
हे निर्माण कसे काय करण्यात आले असेल, ह्याची पुरती कल्पना अजूनही कोणी करू शकलेले नाही.
मंदिराचे निर्माण नेमके कोणी करविले ह्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख आढळत नसला, तरी आदी शंकराचार्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली असल्याचे म्हटले जाते.
हे मंदिर एका फुट उंचचौकोनी चबूतर्यावर बनवले गेले आहे

मंदिराचा मुख्य भाग मण्डप आणि गाभारा याच्या चारी बाजुला प्रदक्षिणा पथ आहे.
बाहेर पटांगणात नंदी हा बैल वाहनाच्या रूपात विराजमान आहे .
मंदिर वास्तुकलेचा अद्भुत आणि आकर्षक नमूना आहे .
मंदिराच्या गाभाऱ्यात टोकदार खडक भगवान शिव यांच्या सदाशिव रूपात पुजला जातो .

मंदिर मंदाकिनीच्या घाटावर बनवले आहे .
आतमध्ये गडद अंधार असतो आणि दिव्याच्या प्रकाशात शंकरांचे दर्शन होते .
शिवलिंग स्वयंभू आहे.
समोरून भक्तगण जलाभिषेक करतात आणि फुले वाहतात .
दुसरीकडे देवाला तुपाचा अभिषेक केला जातो .
मूर्ति चार हात लांब आणि दीड हात मोठी आहे .
मंदिरात जगमोहन सहीत द्रौपदी आणि पाच पांडवांच्या विशाल मूर्ति आहेत .
मंदिराच्या मागे अनेक कुंडे आहेत ज्यात आचमन तथा तर्पण केले जाते .
पहाटे ह्या शिवपिंडीला स्नान घालून ह्यावर तुपाचा लेप चढविला जातो. त्यानंतर यथासांग पूजा होऊन आरती होते. त्यानंतर आलेले भाविक, केदारनाथांचे, मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेतात.
संध्याकाळी मात्र केदारनाथ शिवपिंडी सजविली जाते.
विविध आकर्षक रंगसंगतीच्या मदतीने ही सजावट केली जाते.
ह्यावेळी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश करता येत नाही.
त्यामुळे संध्याकाळच्या वेळी येणाऱ्या भाविकांना दुरूनच दर्शन घेता येते.

ह्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करणारे पुजारी म्हैसूरचे जंगम ब्राह्मणच असतात.
वृषभाच्या पाठीसारखी दिसणारी केदारनाथची शिवपिंडी आहे.
या शिवलिंगाचा आकार त्रिकोणी आहे
असे म्हणतात की जेव्हा पांडव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा शोध घेत होते, तेव्हा शंकरांनी वृषभाचे रूप धारण केले.
जेव्हा शंकर वृषभाचे हे रूप घेऊन अंतर्धान पावले, तेव्हा त्यांच्या शरीराचा वरचा भाग पशुपतीनाथाच्या रूपाने नेपाळ मधील काठमांडू येथे प्रकट झाला.
शंकरांच्या भुजा तुंगनाथ येथे, तर मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले.
शंकरांची नाभी मदमदेश्वर येथे, तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या.
शंकरांच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे आहे असे म्हणतात.
म्हणूनच ह्या पाचही ठिकाणांना मिळून ‘पंचकेदार’ असे म्हटले जाते. ह्या सर्व ठिकाणी शंकरांची भव्य देवस्थाने आहेत.
केदारनाथ मंदिर सर्व भक्तांसाठी पहाटे 6:00 ला उघडते .
दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत विशेष पूजा कर्ली जाते .
त्यानंतर विश्रांती साठी मंदिर बंद केले जाते .
पुन्हा संध्याकाळी 5 वाजता दर्शनासाठी मंदिर उघडले जाते .
पाच तोंडांच्या भगवान शिव प्रतिमेला विधिवत सजवून 7:30 ते 8:30 वाजता नियमित आरती होते.
रात्री 8:30 ला केदारेश्वर ज्योतिर्लिंग चे मंदिर बंद केले जाते .
इथे अशा प्रकारच्या प्रमुख पुजा क्रमाने केल्या जातात प्रात:कालिक पूजा, महाभिषेक पूजा, अभिषेक, लघु रुद्राभिषेक, षोडशोपचार पूजा , अष्टोपचार पूजा , संपूर्ण आरती, पाण्डव पूजा, गणेश पूजा, श्री भैरव पूजा, पार्वतीजींची पूजा, शिव सहस्त्रनाम इत्यादी ..


क्रमशः