Bara Jyotiling - 15 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग १५

बारा जोतिर्लिंग भाग १५

केदारनाथच्या माहितीसोबत तेथे २०१३ साली आलेल्या भयंकर आपत्ती बाबत माहिती घेणे संयुक्तिक ठरेल .

२०१३ मध्ये केदारनाथ समवेत उत्तराखंड मध्ये आलेले हे संकट हिमालयाच्या इतिहासात सर्वात भयानक म्हणावी लागेल .

ही प्राकृतिक आपत्ती कशामुळे आली हे कोणालाच त्यावेळी समजु शकले नाही .
बरेचसे कयास केले गेले पण नक्की कारण समजुन आलेच नाही .
अगदी त्यावेळेस उपस्थित असेलेले प्रत्यक्षदर्शी लोक असोत अथवा देशातले नामवंत इतिहासकार, वैज्ञानिक, भूगर्भशास्त्री किंवा आपत्तीविशेषज्ञ सुद्धा त्याचा बारकाईने अभ्यास करून देखील एका विशिष्ट कारणा पर्यंत पोचू शकलेले नाहीत .

त्या वेळेस केदारनाथच नव्हे तर नदीच्या प्रवाहासोबत पुढे ढकलल्या जाणाऱ्या रामबाड़ा, गौरीकुंड, सोनप्रयाग, चंद्रापुरी, अगस्त्यमुनि आणि श्रीनगरच्या भागात सुद्धा निसर्गाने जोरदार तांडव केले .
या सर्व प्रदेशाच्या बरबादीची सुरवात केदारनाथला आलेल्या पुरापुर्वीच सुरु झाली होती .
उत्तराखंड मध्ये कित्येक ठीकाणी मोठ्या मोठ्या जमिनी खचल्या तसेच रस्ते मोडले आणि पुल देखील तुटले .
हे तांडव काही फक्त एक दिवस आलेल्या पुरामुळे झाले नव्हतें तर दोन तीन दिवसपर्यंत वेगवेगळ्या जागांवर संपूर्ण राज्यात चालु होते .
केदारनाथमध्ये झालेली बरबादी एकंदर 24 तास चालू होती .

रविवार, 16 जून रोजी केदारनाथमध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती सकाळपासुनच भयभीत झाली होती .
गेले 3 दिवस म्हणजे 13 तारखेपासुन पाउस थांबायचे नावच घेत नव्हता .
या भागात कित्येक वर्षे रहात असलेल्या लोकांनी सुद्धा आकाशातून इतके पाणी पडताना पाहीले नव्हते .
या तीन दिवसाच्या संततधार पावसाचा परिणाम आता दिसू लागला होता .
16 तारखेला सकाळी भैंरोनाथ मंदिर असलेला पहाड़ कोसळायला लागला .
तेथूनच भूस्खलन सुरू झाले आणि केदारनाथ पासुन भैंरो मंदिर जाणारा मार्ग बंद झाला .

केदारनाथला मागील काही दिवसापासून एक धरणा आंदोलन आणि हड़ताल चालुच होता .
हा हड़ताल इथे काही प्राइवेट कंपन्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या हेलीकॉप्टर सेवेच्या विरोधात होता .
ही हेलीकॉप्टर सेवा त्या लोकांसाठी होती जे गौरीकुंड पासुन केदारनाथ पर्यंतचा रस्ता पायी अथवा घोडे आणि पालखीच्या मदतीने करू इच्छित नव्हते .

घोड़ेवाले म्हणत होते की या हेलीकॉप्टर सेवेमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते आहे .
आणि त्यांच्या धंद्यावर गदा आली आहे .

काही स्थानीय नेत्यांनी या हड़तालासोबत पर्यावरणाचा मुद्दा जोड़ला आणि तक्रार केली की या हेलीकॉप्टर मुळे डोंगरात आवाजाचे प्रदूषण होत आहे व यामुळे इथल्या संवेदनशील भागातल्या वन्य जीवनावर वाईट परिणाम होत आहे .

16 जूनला प्रथम जेव्हा केदारनाथमध्ये पुर आला तेव्हा सर्वप्रथम हे हेलीपैडच तुटून पडले ज्यावर हे धरणा आंदोलन चालु होते .
संपूर्ण हेलीपैड तुकडे झाल्याने नदीच्या प्रवाहात काही मिनिटात वाहून गेले .
..या वेळेस तर केदारनाथच्या आसपासच्या भागातील सर्वच नद्यांना पुर आले होते .
वासुकी येथून येणारी दूधगंगा आणि मधुगंगा आपल्या नेहेमीच्या रेषेपेक्षा कितीतरी फुट उंचीवरून वाहात होत्या .
हीच परिस्थिती मंदाकिनी आणि इतर नद्यांची सुद्धा होती.
दुपार होता होता या नद्यांचे पाणी केदारनाथला देशाच्या इतर भागांना जोड़णाऱ्या दोन पुलांच्या वरून वाहू लागले .
परिस्थिती अधिकच हलाखीची होऊ लागली होती .

यात्रीगण आपापल्या हॉटेलमध्येच आणि गेस्टहाउसमध्येच थांबुन राहीले होते .
बाहेर पडणे अजिबातच शक्य नव्हते .
केदारनाथला पहील्यांदा ज़बरदस्त पुर 16 तारखेला संध्याकाळी आला .
संध्याकाळी मंदिरात होणाऱ्या आरतीच्या पुर्वी....
हा रविवारचा दिवस होता .
आलेला पुर आपल्यासोबत खुप सारा चिखल आणि मलबा घेऊन आला आणि मंदिराजवळ बनवलेले हेलीपैड वाहुन गेले हे संध्याकाळी 6.50 च्या आसपास घडले .
हा पुर इतका ज़बरदस्त होता की जेथून पाणी वाहीले तेथे काहीच शिल्लक राहीले नाही .
पाउस बिल्कुल थांबत नव्हता
लोक हॉटेलच्या खोल्यात एकत्र झाले .
सर्व दुकानें बंद झालेली होती .
शंकरचार्य यांची 8व्या शतकात बनवलेली समाधि पण राहीली नाही .
याशिवाय शंकराचार्य यांच्या दोन मुर्ती , एक स्फटिक लिंग,एक हनुमानाची मूर्ति हे सर्व वाहून गेले.
काही काही ठिकाणी फक्त सांगाडे शिल्लक राहीले.
सर्व आश्रम वाहून गेले .

केदारनाथ मंदिर परिसर काही मिनिटात पाण्याने खचाखच भरले आणि यात कित्येक लोक बुडले .

सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते कारण पोवर हाऊस फेल झाल्यामुळे लाईट गायब झाले होते .
नंतर जनरेटर चालु केले गेले पण लोकामध्ये घबराहट पसरल्याने त्यांच्यात आता निराशा निर्माण झाली होती. बरेचसे लोक घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेले होते.
पर्यटक पण येथून बाहेर पडू इच्छित होते पण इतक्या अंधारात चालणे सर्वांना शक्य नव्हते तसेच त्यात काही आजारी आणि वृध्ध्द पण होते,काहींच्या सोबत लहान मुले होती.
ते या जंगलाच्या रस्त्याने बाहेर कसे जाणार होते कारण त्यांना एकतर रस्ते माहित नव्हते तशात सगळीकडे जमीन खचत चालली होती आणि पहाड पण कोसळत होते
सर्वांनी आता देवाचा धावा सुरु केला होता
मंदिराजवळ पाणी आल्याने संकटात आणखीनच वाढ झाली .
पाण्यासोबत आलेल्या चिखल आणि कचऱ्यात पन्नास साठ लोक वाहुन गेले .
मंदिरातील लाऊड स्पीकरवरून सर्व लोकांना केदारनाथ मंदिराच्या आत येण्याचे आवाहन केले केले कारण हे मंदिर सोडता आता तेथे सर्वच वाहुन चालले होते.

भारत सेवा आश्रम, बिर्ला आश्रम आणि शंकराचार्य समाधि तर 16 तारखेलाच वाहुन गेले होते .
या पुरानंतर काही काळ शांतता राहीली.
असंख्य लोक मंदिरात आश्रयाला होते आणि कित्येक जण हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउस मध्ये लपले होते जे अजुन तरी सुरक्षित होते .
काही वेळानंतर जे लोक जंगलाच्या दिशेने पळाले होते ते सर्व परत आले कारण त्यानाही पुढे रस्ता सापडणे कठीण झाले होते .
ती रात्र फारच कठीण होती .
प्रत्येकाच्या मनात मृत्यूची भीती होती ,आणि सर्वजण सकाळ होण्याची वाट पाहात होते .
जे लोक जंगलात गेले होते ते भिजल्यामुळे थंडीने काकडून गेले होते.
अजुनही मृत्यूचे भय होतेच .
17 जून 2013 ला सकाळ होताच लोकांना विश्वास वाटू लागला की त्यांचे प्राण वाचतील.
आता किती लोक वाचले आहेत याची माहिती काढणे सुरु झाले .
आजूबाजूला कित्येक प्रेते पडली होती ज्यापैकी कित्येकांच्या अंगावर कपडे नव्हते .
केदारनाथ मंदिराच्या मागच्या सर्व इमारती नाहिशा झाल्या होत्या .

प्रत्येक जण इथुन लवकरात लवकर बाहेर पडायची खटपट करी होता .
मागली रात्र एक काळरात्र होती ..आता तरी परिस्थिती सुधारेल आणि ते इथुन बाहेर पडतील.
पण सगळ्यात भयानक संकट तर पुढेच होते ..

क्रमशः