Two points - 1 in Marathi Fiction Stories by Kanchan books and stories PDF | दोन टोकं... भाग १

The Author
Featured Books
Categories
Share

दोन टोकं... भाग १

भाग १

पहाटेचे चार वाजले होते . रस्ता पुर्ण सामसुम होता. भटकी कुत्री सुद्धा नव्हती रोडवर. टाचणी जरी पडली तरि आवाज येईल इतकी भयानक शांतता होती. काय माहिती का पण अशी शांतता नेहमीच प्रिय असते.
तसं तर ती रात्रीच घराबाहेर पडताच नव्हती पण आज कारण अचानक आलं होतं.

" माझ्या आजच्या सकाळच्या appointments जरा पुढे ढकल. मी उशीरा येईन . " आपल्या हाताखालच्या नर्सला सुचना देऊन ती निघाली. अंगातला कोट काढून तिथेच ठेवला. केस क्लचने वर बांधून टाकले.
तीने गाडी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून काढली आणि रिकाम्या रस्त्यावर speed मध्ये पळवायला लागली. मज्जा वाटते अशा शांत रोडवर आपण एकटेच, ना कोणाच्या हॉर्नचा आवाज, ना कुठला गजबजाट. गाडीच्या काचा खाली करून तीने fm लावला आणि त्यावर तीच आवडीच गाणं, आवडीच म्हणण्यापेक्षा त्या वातावरणाला साजेस असं गाणं लागलं.


ये रात भीगी-भीगी,
ये मस्त फिजायें
उठा धीरे-धीरे,
वो चाँद प्यारा प्यारा

क्यों आग सी लगा के,
गुमसुम हैं चांदनी
सोने भी नहीं देता,
मौसम का ये इशारा
❤️


" यार, ये ठंडी हवा और यह गाणा, बस अजून काय पाहिजे राव " म्हणत ती ते गाणं गुणगुणत होती.

तेवढ्यात खडखड करत गाडी बंद पडली.
" आता तर चांगली होती मधेच काय मेली काय माहिती. श्या..... साला ह्याला पण माझं सुख बघवत नाही. "
गाडीतुन उतरुन जोरात गाडीचा दरवाजा बंद केला.
चिडचिड व्हायला लागली तीची. एकतर रात्रभर झोप नाही त्यात हे असं काहीतरी.

आजूबाजूला बघितलं तीने तर गाडी बरोबर एका गार्डन समोर बंद पडली होती. आणि ते गार्डन एका नदीच्या किनारी होत.
" चला एकतरी चांगलं काम केलय देवाने माझ्या आयुष्यात. आता इथे बसते थोडावेळ, मग रिक्शा चालू होतील तेव्हा जाईल घरी. "

चालत चालत गार्डन मध्ये आली. तिथे दोन जण आधीच फिरत होते. ती तशीच पुढे गेली. पाय-या उतरून खाली आली. समोर नदी दिसत होती. तिथेच खाली एका पायरी वर बसली ती. खिशातून सिगरेट काढली, लायटरने पेटवली आणि झुरके मारत बसली.

" काय लाईफ आहे राव, लोक ज्या टायमिंगला झोपतात त्या वेळेस मी ओटीमध्ये......
इथं कुठं फिरायला जायची पण मुश्किल झालीये. सुट्ट्या पण घेता येत नाहीत. चार दिवस बाहेर फिरायला गेलो की आल्यावर रांग लागते पेशंटची. आणि आजकाल तर नवीनच आजार यायला लागलेत. साला वाटलं होतं कामाला लागल्यावर तरी लाईफ सेट होईल पण नाही. इथं पण डोक्याचा भुंगा सुटतच नाही. आधी त्या आजाराचा अभ्यास करा आणि मग त्याच्या antidote काढत बसा. तसं शिकायला भरपुर मिळत पण किती दिवस यार. अजून किती शिकायचं काय माहिती. "
तिचं झुरके घेत स्वत:शीच बडबडत चालू होतं. तेवढ्यात तिला श्वास घेतल्याचा आवाज ऐकायला यायला लागला.

तीने नजर टाकून इकडे तिकडे बघितलं तर शेजारीच एक मुलगी जोरात आणि मोठा श्वास घेत होती.

" आयला‌ हिला allergy आहे वाटत सिगारेटची. मग इथंच कशाला यायचं कडमडायला. जायचं ना दुसरीकडं, एवढ मोठ गार्डन आहे. जाऊदे मला काय करायचय " असं म्हणत तीने स्वत:च्या सिगरेट वर लक्ष केल. पण तरीही एकदा बघावं ती काय करतीये म्हणून हिने नजर वळवून बघितलं तर ती रडत होती.

" च्यायला यात रडण्या सारखं काय आहे. साधी सिगारेट नाही विझवली मी म्हणून कोणी रडत का ?? " तीने घाईगडबडीने सिगारेट विझवली.

तीने परत त्या मुलीकडे लक्ष दिलं. डोक्याला भरपुर तेल लावून वेणी घातलेली, साधा पंजाबी ड्रेस त्यावर ओढणी जी तीने पुर्ण अंगाला गुंडाळल्या सारखी केली होती. आत्ताच्या मुली राहतात तसा लवाजमा काहीच नव्हता.

" ही अशी काय काकुबाई टाईप आहे. हां आता कपडे कोणते घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण म्हणून किती ते तेल लावावं. केसांवरून घरंगळून पडेल इतकं तेल लावलय हिने. पण ही का रडतीये. आता तर मी सिगारेट पण टाकून दिली. विचारू का जाऊन तिला. नको परत म्हणेल तुला काय करायचंय. आपलाच पोपट त्यापेक्षा गप्प बसावं. "

ती मनातल्या मनात बडबडतच होती. आपल्याला घरी जायचंय हे सुद्धा लक्षात नव्हतं तीच्या.

" का रडत असेल ही, विचारावं का ?? कोण ओरडला असेल का ?? पण एवढ्या पहाटे कोण ओरडणार ?? ब्रेकप झालं असेल का ?? पण अवतार बघून तर हिला बॉयफ्रेंड असेल असं वाटत नाही. मग .........
यायला मी हिचा का विचार करत बसलीये. मला परत हॉस्पीटलला जायचंय आवरून. चला घरी. "
ती उठली, कॅब बुक केली आणि निघून गेली.

आणि ही इथेच विचार करत बसली.
" किती चांगली आहे ही, मी न सांगताच हिला कळालं की मला सिगारेटचा त्रास होतोय आणि तीने लगेच टाकून दिली. किती भारी ना, मस्त कपडे घातले होते तीने. छान दिसत होती. " तशीच विचार करत बसली होती ही.

" नाहीतर प्रत्येक गोष्ट बाबांचं ठरवतात. मी काय घालायच, मी कसं रहायचं इथपासून ते माझ्या मैत्रिणीं कोण असणार हे ही ठरवतात. आणि त्यामुळे मला एकही मैत्रीण नाहीये. दिदी कुठल्या तरी मुलांसोबत पळून गेली पण त्याची शिक्षा मला मिळतीये. साध रडता सुद्धा येत नाही घरात, लगेच ओरडतात, भरलेल्या घरात रडायला काय झालंय म्हणून. मान्य की जरा possesive झालेत पण ही possessivity आता जेल सारखी वाटायला लागलीये. आईला काही सा़गितल की तीच एकच म्हणणं असतं की ते खुप प्रेम करतात तुझ्यावर म्हणून असे वागतात.
त्या दिदीच भारी आहे, तिच्या मर्जी प्रमाणे जगायला तरी मिळतंय. नाहीतर मी, माझं आयुष्य त्यांच्या म्हणण्यानुसार जगतीये. चला घरी जावं नाहीतर परत ओरडतील की इतका काय व्यायाम करतेस तिथे जाऊन, इतका वेळ कसा लागला " ही पण उठून घरी निघून आली.

हीला आवडायचं असं इथे येऊन बसायला. मन मोकळं करताना कोणच बघत नाही, आणि नदीकडे बघून मनातली वादळ थांबतात असं म्हणणं होतं हीच.

आणि ती तर कॅब करून घरी जाऊन झोपली सुद्धा. तसं तर ती ही थकायची दिवसभर पेशंटस् बघून. पण ती कधीच असं येत नाही इकडे. कदाचित भेट असेल ही पहिली.