Athavanitalya kathaa - 3 in Marathi Short Stories by Hemangi Sawant books and stories PDF | सोबतीचा पाऊस - भाग-३

Featured Books
  • ماسک

    نیا نیا شہر نئی امیدیں لے کر آیا ہے۔ دل کو سکون اور سکون ملا...

  • Wheshat he Wheshat - 5

    وحشت ہی وحشت (قسط نمبر 5)(بھیڑیے کا عروج: )​تیمور کاظمی صرف...

  • Wheshat he Wheshat - 4

         وحشت ہی وحشت(قسط نمبر( 4)جب تیمور گھر میں داخل ہوا، تو...

  • Wheshat he Wheshat - 3

    وحشت ہی وحشت( قسط نمبر (3)(منظر کشی :)رات کا وقت تھا، بارش ک...

  • Wheshat he Wheshat - 2

         وحشت ہی وحشت قسط نمبر (2)   تایا ابو جو کبھی اس کے لیے...

Categories
Share

सोबतीचा पाऊस - भाग-३

तोच अनय माझ्यासमोर बाईक घेऊन उभा राहीला. आधी मला राग आला की "हा कशाला आता माझा पिच्छा करतोय", पण मग तोच बोलला.

" मॅडम काही खाल्लं नाही ओ तुम्ही. चला हॉटेलमध्ये जाऊया. मलाही भूक लागलीये."

मग मी विचार केला एवढ्या मोठा पुण्यात कुठे शोधायचं हॉटेल जाऊ याच्या सोबतच. काही वाईट घडलंच तर गणु आहेच. आणि आपला पेपर स्प्रे देखील. मग जाऊन बसले बाईकवर. आधी आम्ही छान हॉटेलमध्ये दाबून खाल्ल. मग मीच काही तरी बोलायच म्हणुन विषय काढला,


"काय ओ मुंबईला परत जायची ट्रेन किती वाजताची आहे...?"


"मॅडम आता ट्रेन डायरेक्ट सहा वाजताची".. इकडे अशाच ट्रेन असतात.


मी मात्र काय करू एवढा वेळ याचा विचार करत बसले. मग तोच बोलला..., "मॅडम बघा हा म्हणजे तुमच्याकडे एवढा वेळ आहे. आता जाऊ देखील शकत नाहीत, तर तुम्हाला चालणार असेल तर मी तुम्हाला पुणे फिरवू शकतो. हा पण त्यात माझा काही वाईट हेतू नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तरच. कारण माझाही अर्धा दिवस गेलाच आहे. घरी जाऊन फक्त लोळण्यापेक्षा फिरून आलो असतो म्हणून विचारल. बघा विचार करा. नसेल पटत तर ठीक आहे. मला वाईट नाही वाटणार."




मग मी विचार केला की जर गेली तर फिरेन. पण त्याने आपल्याला काही त्रास दिला तर मग काय..?! पण तसही एवढा वेळ आपण करणार काय आहोत. तसा मुलगा काही वाईट वाटत नाहीये. मग मी मनाशी ठरवत हो म्हटलं. खर तर घाबरलेच होते पण देवावर विश्वास ठेवुन तय्यार झाले.


मग आम्ही आधी एकविरा आईच्या मंदिरात जाण्यासाठी निघलो. तिकडे जातानाचा रस्ता एव्हढा सुंदर होता. आजूबाजूला छोटे मोठे बंगले. मधेच एक कौलारु घर समोर अंगण. त्या अंगणात बकऱ्या, कोंबड्या तर कुठे गाई म्हशी चरत, फिरत होते.
पावसामुळे काही ठिकाणी तळे ही साठली होती.



मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पवना डॅमकडे निघालो. त्याची बडबड चालूच होती. खूप काही म्हाहित होत त्याला. मधेच मी बाईक थांबवायला सांगितली. माझ्या समोर मोकळं माळरान होत. दूरवर पसरलेली हिरवी शाल. चारी बाजूला नजर जाईल तेवढे डोंगररांगा आणि त्यावर कोसळणारे धबधबे. ते निसर्गरम्य नजरेत कैद करून ठेवावेसे वाटत होते. त्या माळरानात काही गुरे मज्जेत हिरव्या गवतावर ताव मारत होते, तर काही पक्षी सिहासनावर बसावे तसे त्यांच्या पाठीवर विराजमान होऊन फिरत होते.



अचानक आलेल्या त्या पावसाने आम्ही दोघेही पळत एका पडक्या झोपडीत शिरलो. त्याने स्वतःकडाचा रुमाल मला देऊ केला. समोरील टपरीच्या बाजूला एक आजोबा मके भाजून विकत होते. माझा लक्ष त्या मक्यावर गेलं आणि मला भुकेची जाणीव झाली. ते कदाचीत त्याला कळले की काय म्हणुन त्यानेच ,"मका खायचा का..?"विचारलं. मी मात्र मानेनेच होकार दिला.
पळत जाऊन त्याने मके आणले. बाहेर पाऊस आणि हातात मका म्हणे स्वर्गसुख. मका खाऊन आम्ही परत आमचा मोर्चा पवना डॅमकडे वळवला. रिमझिम पाऊस होताच आणि अनोळखी सोबत. छान वाटत होते. तो देखील अंतर ठेवून वागत होता. मग मी ही मनापासून त्याच्याशी गप्पा मारल्या.



पवना डॅम जवळ पोहोचताच मला एक मोर दिसला. आयुष्यात मोर फक्त चित्रात आणि टीव्ही वरच पाहिला होता. मग काय मी गेले पळत. तो मोर मस्त आपला पिसारा फुलवून नाचत आहे असाच वाटेल बघणाऱ्याला. पावासाने अजून एक गोष्ट मला देऊ केली होती. "पावसात नाचणारा मोर." मी हे सर्व डोळ्यात भरून घेत होते. अनय आणि मी मग डॅमवर गेलो त्या भरलेल्या डॅममध्ये मी थोडी जवळ उतरली. तिकडे खूप लोकं ही होतीच जी पावसात डॅमची मज्जा लुटत होते. तोच एक बदकांचा ग्रुप माझ्या जवळ येऊन पुढे गेला. मी त्यांच्यामागे धावली पण तोपर्यंत ते आत निघून गेले होते.




To be containing