ghunghru - 9 books and stories free download online pdf in Marathi

घुंगरू - 9

#@ घुंगरू@#भाग 9
सौ. वनिता स. भोगील
गाडी आलेली पाहून मालती वाड्याच्या दाराशी आली,
रत्ना उतरली, मागे बापू पण बैलगाडीतून उतरले,
बापुच्या हातातली पिशवी घेत मालती म्हणाली....
लय येळ लावलासा?
भर ऊन डोईवर घेतलं,
दुखणी येत्याल अशान ,
आवाज ऐकून माई जपमाळ गुंडाळत बाहेर आल्या,
आला का बाप लेकीचा बाजार?
दिस घालीवला,
काय बाकी न्हाय ठेवल वाटत आणायचं??
....
त्यावर बापू म्हणाले..
माई रत्नाचा बाजार काय संपणा,,,,
कसतरी घेऊन आलो बघ .....
... तोवर तर रत्नानं पिशवीतून सगळं समान बाहेर काढायला सुरवात केली,
आई बघ म्या काय काय आणलं,
ही बघ रिबीनी, हय नकपालिस...
आण हय बघ अजून काय आणलं ते.......
...
पिशवीतून चाळ काढत रत्ना म्हणाली,
घुंगराचा आवाज ऐकून मालती ने वळून पहिल,,,
,,, चाळ बघून मालतीच्या काळजाच पाणी झालं,
रत्नाकडे डोळे मोठे करून मालती ओरडली.....
.. रत्ने काय ग हे?
आता हे करणार हायस?
त्यावर रत्ना म्हणाली बापू व्हत की संग......
.. तसा मालातीचा मोर्चा बापूकडे वळला,,, काय व तुमाला बी कळत नाय व्हय?
असलं काय बाय आणायचं व्हत मनुन हिला घिऊन गेलता व्हय,,,,,
त्यावर रत्ना म्हणाली, आय काय हुत आणल तर पैंजण घालून नाचल्यावर आवाज नाय व्हत मनून आणल....
... मालती अजूनच संतापली......
.... आग रत्ने एवढी मोठी झालीस तुला कस काय बी कळत नाय,
आपल्या घराला सोबत का असलं??
घरंदाज घराण हाय आपलं, हे पाला वरल्या बायांच साज असत्यात , आपलं नाय,
...त्याला प्रतिउत्तर म्हणून रत्ना विचारते,,,, आय पालावरल्या बाया मनजी कशा ग??
???
मालती बापूकडे बघून आत जाते,
रत्नाला उत्तर न भेटल्याने ती माईकड चाळ हातात घेऊन जाते,
माई.. आय मनली पालावरल्या बाया मनजी कोण ग,,,,,,,
,, माई म्हणल्या,
रत्ना तू आणिक बारीक हायस ,, हे असलं समजाय येळ हाय आणिक, तू नग इचार करू, तुझी आय कायबी बोलत असती....

.माईंनी विषय कसतरी टाळला,,
पण रत्नमालेच आता रोजचंच झालं,,,
सकाळ संध्याकाळ पायात चाळ बांधून नाचण्यात मग्न होई.....
....मालतीला जमत नव्हतं हे सगळं,
पण पोरीच्या हट्टापुढ काहीच चालत नव्हतं....
.... रत्ना पंधरा वर्षाची झाली, आता माई बी थकल्या व्हत्या,,,
...
मालती नेहमी काळजीत असायची,
अधून मधून बापू नेहमी विचारत, मालू काय ईचार करीत असतीस??
काय कमी हाय का?
तस सांग मला,,,, मालती नुसती म्हणत असे नाय व काय बी कमी नाय मला,
आन अस बी तुमि असल्यावर मला काय कमी पडायचं....
पण मालतीच मन स्थिर नसे.....
.... रत्ना पायात घुंगरू बांधून नाचू लागली की मालतीच काळीज फडफडत असे....
..
तिला काही समजत नव्हतं काय करावं ते,
एक दिवस माई अन मालती परसदारी बसल्या होत्या, तेव्हा मालती माई ला म्हणाली....
माई तुम्हानी एक बोलायच होत, बोलू का??
त्यावर माई म्हणाल्या...
. आग ईचारती काय ?
बोल की काय असल ते...
..
मालती म्हणते..
माई आपली रत्ना मोठी झाली हाय..
तवा ती आस पायात चाळ बांधून नाचती हे बर नाय..
कुणी बघितल तर लोक काय म्हणत्याल...
..
माई म्हणाल्या पर ती कुठ बाह्यर जाती वाड्याच्या?
मालती....
व्हय नाय जात बाह्यर पर लोकसनी कळाय येळ लागतो व्हय?
भीतीला बी कान असत्यात, आन असबी पोरीच्या जातीन अस काय बाय केलेलं चालत व्हय आपल्यात..
त्यावर माई म्हणाल्या ,, व्हय ग तू मनतीस ते बी खर हाय, पर ती कूट आईकती...
. मालती म्हणते, व्हय नाय ऐकत पर तुमाला भीती रत्ना, आन तिज बा बी तुमचं ऐकत्यात तवा तुमि बोलून बगा.....
...
माई म्हणतात, व्हय म्या बोलते बापूला तू नग लई इचार करू....
..
माई बापूला म्हणाल्या पण बापू नि काही ही गोष्ट मनावर घेतली नाही,
मग रत्ना तर लाडाची ती काय ऐकणार.......
...
बापू बाहेरून आले की रत्ना कुणासमोरपन चाळ पायात बांधून बापूकड जायची....
...
बापू म्हणायचे ,, असूंदे, माझी लाडकी पोर हाय, तीन काय बी केलं तरी काय बी बोलायचं नाय...
मालतीला यातलं काहीही पटत नसे....क्रमशः..