prembhav aani aayushy books and stories free download online pdf in Marathi

प्रेमभाव आणि आयुष्य...

काही लोक भेटून बदलून जातात आणि
काही लोकांशी भेटून आयुष्य बदलुन जात...
काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि खूप साऱ्या आठवणी साठवून जातात. काही लोक आयुष्य घडवतात. आयुष्याची वाट दाखवतात. चांगले विचार देऊन जातात. समाजातील बऱ्याच गोष्टीचं भान आपल्याला करून देतात. आयुष्य म्हणजे काय? ते कसं जगायचं ?आयुष्यात नेमक करायचं तरी काय ? या गोष्टी ते सांगून जातात. आणि आपल्याला त्याची किंमत कळत नाय वेळ निघून जाते अन् त्या गोष्टीची आठवण करून देते. आणि सरतशेवटी आयुष्या ची बेरीज शून्य लागते. त्याचप्रमाणे खडतर लोकही असतात आपल्या आयुष्यात. परंतु ती खूप निर्मळ मनाची असतात. नेहमी आपलाच विचार करणारी, ती आपल्याला समजत नाहीत. काही येतात अन् खूप सार दुःखच देऊन जातात. काही रक्ताची असतात पण खूप सार दुःखच देतात तर काही परके नेहमी आनंद च देतात. तर काही अनुभव देऊन जातात. या सर्व गोष्टी च ओझ हालक करण्यासाठी आपल सुख, दुःख सांगण्यासाठी देवाने मित्र नावाचा प्राणी दिलाय बरका.. आयुष्यात.
-किती सुंदर गोष्टी आहेत या निसर्गा मध्ये आपण कधी त्याकडे बरकाई ने पाहतच नाही. त्या कधी आपण समजून घेतल्या च नाहीत. आणि ज्या कोणी घेतल्या त्यांना आयुष्य कळाल...बरेच लोक देवाकडे भरपूर गोष्टी मागतात. मला हे..दे, मला ते...दे परंतु आपण कधी विचार केलाय का की, या निसर्गामध्येच देवाने सर्व काही दिलेलं आहे. याचं निसर्गात शुद्ध हवा आहे, पाणी आहे. याचं निसर्गात काही गोष्टी पिकवल्या जातात. उगवल्या जातात. माणसाचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून बऱ्याचश्या वनस्पती आहेत. माणसाला आवडतील अशी फळ आहेत. फुलाचा सुगंध आहे. माणसाने जास्त थकून जाऊ नये योग्य त्या दिशेची वाट असावी म्हणून दिवसाची सुरवात आणि दिवसाचा शेवट सुद्धा आहे. अशा पद्धतीने विचार करण्यासारखा अजून खूप गोष्टी शिल्लक आहेत. तरी पण माणसाला एवढी हाव कशासाठी एवढं सर्वकाही असताना तरी सुद्धा तो देवाकडे मागतच राहतो. बरं..एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तो आनंदी का राहू शकत नाही. तर या पलीकड जाऊन लक्षात येत माणसाचं अज्ञान. माणूस किती ज्ञानी आहे. तो किती अहंकारी आहे. तो किती स्वार्थी आहे. असो
या गोष्टीचा आपण नंतर विचार करू आता आपण थोडे अध्यात्मिक विचारांकडे वळूया काही लोक म्हणतात या जगामध्ये देवच नाही. पण आपण कधी या गोष्टीचा विचार केलाय?..., पण या गोष्टीकडे आपण नकारात्मक दृष्टीने पाहतो त्यामुळे ही गोष्ट आपल्याला नकारात्मकच वाटायला लागते. तर आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला सर्व काही शिकवतात. माणसाला मेंदू आहे. मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमता कुठून येत असेल. प्रत्येक गोष्टीवर तो संशोधन करतो. मग जगातील कोणत्याही गोष्टी असू शकतात. मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमता, संशोधन करणारी बुद्धि सर्व कुठून येत असेल. कधी विचार केलाय का? यामागे कोणती शक्ती आहे. बर हे सर्व थोड्यावेळासाठी डोक्यातून काढून टाका. माणसाच्या शरीरामध्ये रक्त आहे. ते रक्त कसं तयार होतं हे माणूस कधी सांगू शकत नाही. जरी सांगितलं असेल किवा सांगितलं तरीही तो कृत्रिम रित्या रक्त तयार करू शकत नाही. या सर्व गोष्टींवर कोणत्या तरी शक्तीचा प्रभाव आहे. आपण हे सर्व मान्य करायला हवे. निसर्गाची रचना अशी का आहे यावर कधी आपण लक्ष दिलय. निसर्गाची रचना फार सुंदर आहे. या मागचे रहस्य आपण कधी जाणूनच घेतले नाही. हे आकाश हे ब्रह्मांड किती सुंदर आहे. तसेच या सर्व गोष्टी सुंदर आणि टिकून या राहव्यात म्हणून या सर्वांचा विनाशही आहे. आणि सुंदर अशी सुरुवातही आहे. म्हणून तर हे सर्व टिकून आहे. या सर्वांवर भगवंताची कृपा आहे एका शक्तीचा प्रभाव आहे. हे आपण मान्य करायला हरकत नाही. या सर्व गोष्टींकडे आपण कधी लक्ष च देत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता असे ध्यानात येते की देवाचं अस्तित्व आहे. या जगामध्ये देव आहे. मानवाला मार्गदर्शन करणारी शक्ती आहे. प्रेम देणारी ऊर्जा आहे. एक न्याय देणारी शक्ती आहे. सुखदुःखात योग्य तो न्याय मार्ग दाखवणारी ऊर्जा आहे. आणि तोच परमात्मा म्हणजे भगवंत स्वरूप आहे. बऱ्याच वेळा माणूस हा खूप दुखी असतो. बऱ्याच संकटांचा सामना करत असतो. अशा स्थितीमध्ये तो एकटा पडतो. या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन तो एकांतात विचार करू लागतो. एकांतात विचार करतो म्हणजे तो नेमकं काय करतो. विचार करण्याची क्षमता म्हणजे ती एक साधना आहे. आणि तो ती साधना करतो. आणि त्याला त्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आणि ती साधना आपण कोणता विचार घेऊन करतो. त्या विचारा मागचा भाव कोणता आहे. चांगला आहे की वाईट आहे. त्यानुसार त्याला त्याच फळ मिळत. म्हणून चांगल्या प्रकारे चांगल्या विचारांची साधना करणे एकांतात विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच भगवंताच्या स्वरूपाची सुद्धा एक साधना आहे ती म्हणजे नामस्मरण आहे. आणि ते माणसांने करावे कधीतरी हा देह नाश पावणार आहे. म्हणून माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावा. एकमेकांना प्रेम द्यावे, वाद-विवाद करु नये स्वाभिमानी जीवन जगावे. यापाठीमागे कोणताही स्वार्थ असू नये. या जगामध्ये या विश्वामध्ये भरपूर दुःख आहे. असंख्य वेदना आहेत तसेच कठीण प्रसंगही आहेत. भरपूर दुःख आहे क्षणाचे सुख आहे. थोड्या वेळा पुरते संसारिक सुख आहे. आणि सांसारिक दुःख सुद्धा. हीच तर सर्व मोहमाया आहे. अशा या मायावी संसारातून बाहेर पडण्यासाठी ज्याने संसाराची निर्मिती केली या विश्वाची निर्मिती केली अशा या भगवंताशी एकजूट होणे अत्यावश्यक आहे . प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक प्राण्यांमध्ये भगवंताचा अंश असतो असं म्हणतात परंतु हे सत्य आहे का? याचाही विचार करूयात परंतु याचा विचार कसा करायचा माणसाला मन आहे. ती दोन प्रकारची मन आहेत आणि ते मन म्हणजे आत्मा आहे बुद्धी आहे एक मन चांगला विचार करत असत तर दुसर मन वाईट विचार करत असत. एक चांगलं विचार करणार मन वाईट विचार करणाऱ्या मनाला रोखत असतं ते सांगत असत की चांगलं काय आणि वाईट काय. परंतु हे आपल्या लक्षात येत नाही. ते चांगलं मन म्हणजेच भगवान परमात्म्याचा अंश आहे. अशा या मायावी दुःख रुपी संसारातून बाहेर पडण्यासाठी आपले मन भगवंताच्या मनाशी एकरूप करण्यासाठी, आपला आत्मा भगवंताच्या आत्म्याशी एकजूट करण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. चांगल्या लोकांची संगत आवश्यक असते. मनामध्ये प्रेमाची भावना असणे आवश्यक आहे. त्यासाठी माणसाने शक्य होईल तेवढे ज्ञान प्राप्त करावे. अशा या दुःख रुपी संसारातून बाहेर पडण्यासाठी, जीवन मुक्ती साठी भगवंताची साधना करावी. त्याचे नामस्मरण करावे. प्रत्येक गोष्टीमागे रहस्य दडलेले आहे. ते शोधा. जगामध्ये खूप विद्वान लोक आहेत खूप ज्ञानी लोक आहेत. काही लोक या अध्यात्मिक गोष्टींचा फायदा घेऊन जगावर राज्य करण्याचा विचार करतात किंवा ते आयुष्यात खूप श्रीमंत होतात काही लोकांनी विद्वत्तेच्या जोरावर मोठमोठे बंगले बांधले आहेत. काही लोक याच अध्यात्मिक तेचा फायदा घेऊन प्रेमामध्ये लाभ बघतात तर हा प्रेमा मधील एक प्रकारचा स्वार्थ आहे. जे प्रेम निस्वार्थ असतं. ते खरं प्रेम असतं. तर भगवंत काय करतात या संसारामध्ये प्रेम पाहतात ते म्हणजे निस्वार्थ प्रेम.
लोग प्रेम में लाभ ढूंढते हैं
और भगवान संसार भर में प्रेम
तीच लोक देवाला प्रिय असतात. जे काहीही न मागता निस्वार्थ देवावर प्रेम करतात. म्हणून देवाकडे काहीही मागू नये मागायचं असेल तर माझ्यातील अहंकार दूर व्हावा. माझ्यामधील असणारा क्रोध दूर व्हावा. हे मागा.दुसऱ्यासाठी काही तरी मागा. तुम्हाला सुद्धा काही कमी पडणार नाही. आणि आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिका. आयुष्य खूप सुंदर होईल. आता आपल्याला एक प्रश्न पडतो की आयुष्यामध्ये मोठे व्हायचं नाही का? पैसा कमवायचा नाही का? हो पैसा कमवायचा तो आपल्या जीवनाचा पुरुषार्थ आहे. तो योग्य रीतीने योग्य त्या नीतीमत्ते ने कमवावा. सर्वांना सोबत घेऊन कमवावा. त्यामध्ये कोणाचीही तळमळ नसावी. माणसाने नेहमी दानशूर असायला हवे. अशा पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन हे जीवन जगता येतं ते आयुष्य खूप सुंदर .. जगामध्ये खूप लोक आहेत खूप लोक आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात खूप लोक आपल्याला सांगतात आयुष्य असं जगावं.. आयुष्य तसं जगावं.. तसेच या विश्वामध्ये खूप लेखक सुद्धा आहेत किंवा होऊन गेलेले आहेत. अनंत अशी पुस्तके आहेत. अनंत काळाचं भंडार आपल्याकडे आहे. काही लेखक विद्वान असतात काही लेखक विद्वान असूनही अशिक्षित असतात. काही लेखक समाज घडवण्याचं काम करतात. तर काही समाज बिघडवण्याच अंधश्रद्धा पसरवण्याच काम करता. असो हे ज्याचं त्याचं कर्म आहे. तशी त्यांना ती फळ मिळतात.
काही लेखक अनंत काळ लोकांच्या लक्षात राहतात ते डोळ्यापुढे राहतात. आणि जे लोक जगाचे हित पाहतात. जगाला आयुष्याचं महत्त्व समजून सांगतात. कोणत्याही अंधश्रद्धेला ते बळी पडत नाहीत. नेहमी दानधर्म करतात. अत्यंत त्यांच्याकडे प्रेमाची भावना असते. अत्यंत ते प्रेम देतात एकमेकांना. आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर नेहमी प्रेम आणि आनंदच मिळतो. ते लोक म्हणजे साधुसंत असतात.
आजकालचे लोक साधुसंत कोणाला म्हणतात ते थोडक्यात समजून घेऊया. जे लोक आज तुरुंगवास भोगत आहेत त्यांना ते साधुसंत म्हणतात. हे संत आहेत का तर हे संत नाहीत. संत कोणाला म्हणायचं जे लोक स्वतःच हित न पाहता दुसऱ्या च हित पाहतात. दुसऱ्याचं चांगलं व्हाव यासाठी ते प्रयत्न करतात. पुढचा व्यक्ती कितीही वाईट असला तरीही त्याला चांगल्या मार्गाला लावतात. ते स्वतःसाठी देवाकडे कधीच कोणत्याही गोष्टी मागत नाहीत फक्त इतरांसाठी सर्व काही मागतात. अशा महान पुरुषांना संत म्हणतात जो व्यक्ती आपला कोणताही स्वार्थ न पाहता इतरांचा विचार करतो. निस्वार्थ होऊन भगवंताची सेवा करतो. त्याचा सर्व भार भगवंत उचलतात. त्यांच्यावर भगवंताची कृपादृष्टी असते. आणि तेच लोक भगवंताशी एकरूप होऊन जातात आणि त्यांचा आत्मा भगवंताच्या आत्म्याशी एकजूट होतात. असे महान साधून संत आपल्या समाजामध्ये आहेत. ते होऊन गेले म्हणजे भगवंताच्या आत्म्याशी एकरूप झाले. आणि आजही त्यांचे नाव आपण जपतो. हेच खरं आयुष्य आणि लोक आयुष्याच्या शोधामध्ये भटकतात. म्हणून माणसाने चांगल्या लोकांच्या सानिध्यात रहावे. एकमेकांना प्रेम द्यावे आणि या सर्व गोष्टी खूप कठीण नाहीत. आयुष्यातील दुःख घालवायचा असेल तर दररोज भगवंताचे नित्य नामस्मरण करने आवश्यक आहे. म्हणजे माणसांमधील हळूहळू विकार दूर निघून जातील. आणि सर्वांकडे प्रेमाने पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि हे आयुष्य सुंदर होईल.तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख उरणार नाही. म्हणून तर म्हणतात प्रेमात खुप ताकत असते. हीच साधी गोष्ट आहे आणि हेच आयुष्यातील मर्म आहे. या विश्वातील विज्ञान हेच सांगत की हे विश्व कसं निर्माण झालं आणि अध्यात्म हे सांगत की हे विश्व का निर्माण झालं. हीच आयुष्यातील प्रेम भावना आहे आणि हेच आयुष्य असावे/आहे. त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहत नाही.
तर इथेच पूर्णविराम देतो. अशा पद्धतीने माझ्या लेखनामध्ये माझी काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी.
मी आपला सदैव आभारी आहे. धन्यवाद.