koni bolavel tyala ? - 3 books and stories free download online pdf in Marathi

कोणी बोलावले त्याला ? (भाग 3)

मागील भागावरून पुढे......


किशोर चीं सगळे जाणून घेण्याची तीव्र इच्छा बघून आजी पण जराशी खुश झाली. पण जराशीच... कारण सगळे ऐकल्यावर त्याची काय प्रतिक्रिया येईल हे तिला ही माहित नव्हते.

" बाबू... ! खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हातर तुझा जन्म पण झाला नव्हता. त्यात तुझे आजोबा पण अचानक गेले. पदरात चार लेकरं...घरची परिस्थिती बेताची मग काय करणार? शेवटी मी कंबर कसली आणी लागले कामाला... "
"'छोटीशी वाडी आणी लहानशे शेत होते. त्यात मी मरमर काम करायची... कसेबसे चालले होते. पण एकटी बाई आणी कर्ता पुरुष नाही. हे लोकांना बघवत नव्हते. त्यामुळे उगाचच कुरापती काढणे त्यांनी चालू केले. "
आजी किंचित दम खायला थांबली.

"'आपले शेत आणी जागा हडप करण्याचा त्यांचा डाव होता आणी त्यात त्यांना यश पण मिळाले असते. पण.... "

" पण ? ... पण काय ? " किशोरने विचारले.

" पण एके दिवशी एक मांत्रिक गावात आला. काही दिवस गावाच्या बाहेर जंगलात बसून काय काय अघोरीं विद्या करत होता. आपले शेत त्याच बाजूला असल्याने अधेमध्ये माझ्या नजरेस पडायचा. एकदा मी त्याला भाकरी पण दिली. ती खाऊन तो संतुष्ट झाला. माझ्या सगळ्या समस्या त्याने क्षणात ओळखल्या आणी त्या साठी त्याने एक विधी करायला सांगितला... त्या मांत्रिक विधी नंतर एक ' ब्रम्हसमंध ' आपल्या अधिकारात येते.. आणी आपल्या ज्या पण अडीअडचणी आहेत त्याचे निवारण करते. "

" हे ब्रम्हसमंध म्हणजे काय ? " किशोर ने विचारले.

" ब्रम्हसमंध म्हणजे एका ब्राम्हणाचे भूत... ह्याचा अधिकार खूप मोठा असतो. शिवाय ते खूप हुशार आणी ताकतवान असते. ते आपले सगळे हुकूम मानते. हवं नको ते बघते. "

" अरे मग चांगले आहे की... " किशोर पटकन म्हणाला.

" बाबू... ह्या जगात फुकट कोणी काहीही करत नाही. तसंच ते ब्रम्हसमंध पण फुकट आपली मदत करत नाही. दर अमावस्या , पौर्णिमेला त्याला चांगलंचुंगलं जेवायला दयावे लागते. त्यात जरा पण कसूर झाली तर तो खूप चिडतो. आणी मग आपल्याला त्याची शिक्षा मिळते...
पाहिले मी धडधाकट होती तेव्हा काही वाटायचे नाही. मी सगळे त्याला बनवूंन ठेवायची... पण आता वय झाले.
आता ते झेपत नाही. म्हणून हिला आणले. "

" ही कोण ? मी तुला विचारणारच होतो. आधी कधी तिला बघितल्याचे मला आठवत नाही. "

" तु हिला ओळखत नाहीस. मागे मी एकदा तालुक्याला वाण सामान आणायला गेले होते. तेव्हा येताना रात्र झाली. तेव्हा काही माणसानी हिला हिच्या गावातून पळवून आणली होती. हिच्यावर अती प्रसंग करण्याचा त्यांचा विचार होता. पण अचानक मी आले. मग मी ब्रम्हसमंधा च्या मदतीने त्यांना चांगलीच अद्दल घडवली. आणी तिला माझ्या बरोबर इथे घेऊन आली. तिला येण्यापूर्वी सगळी कल्पना दिली होती. तरीही ती यायला तयार झाली. तेव्हा पासून ती इथेच आहे. गावात कोणाची हिच्या कडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाही. "

" पण आजी, माझे आई बाबा , काका काकी सगळे का गेले. "

" बाबू ! ब्रम्हसमंधा ला राग आला की त्याची शिक्षा सगळ्यांना मिळायची. म्हणून ते सगळे हे घर सोडून गेले. तुझे बाबा आणी तुझा लहान काका हुशार होते. त्यांनी चांगली प्रगती केली. दुसऱ्या भावाचे आणी बहिणीचे लग्न लावून दिले. त्यांचे बस्तान बसवून दिले. आणी सगळे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी ह्या गावाचे नावच टाकले... "

" मग तु पण त्यांच्या सोबत जायचे होते ना ? "

" मी कशी जाणार ? त्या समंधा ला मी बोलवले आहे. जर त्याला अमावस्या आणी पौर्णिमेला त्याला त्याचा घास मिळाला नाही तर तो माझा जीव घेईल... आणी ते पण मला चालले असते. पण तो तिथेच थांबणार नाही. माझ्या मागे मग तुमच्या सगळ्यांचे नंबर येणार... "

" काय ? " किशोर दचकला...

" हो. बाबू !... मी मेले की तो तुमच्या सगळ्यांच्या मागे लागणार... कारण तुमच्यात माझेच रक्त आहे. त्या शिवाय त्याचा सूड पुरा होणार नाही. "

" ओह.... मग ह्यावर काही उपाय नाही का ? "

" उपाय आहे.. पण तो खूप क्लिष्ट आणी वेळ खाऊ आहे. शिवाय त्यात माझ्या रक्ताचं कोणी हवे. त्याशिवाय तो विधी पूर्ण होऊ शकत नाही. पण सगळे गेले ते कोणी परत आलेच नाही. तुम्ही सगळे कुठे आहात. काय करत आहात मला त्या समंधा मुळे कळत होते. पण इथे येण्याची कोणाची इच्छा नव्हती. म्हणून मी एकटीच कशी बशी दिवस ढकलत होती. " आजी बोलायची थांबली.
किशोर पण विचारात पडला.

" चला आता जेवून घेऊ या... " मंदाकिनी ने सांगितले.

" जेवण झाले तरी कधी ? आल्या पासून तर तु आमच्या समोरच आहेस. " श्याम ने पहिल्यांदा तोंड उघडले. बोलण्याच्या नादात कोणाचे ही घड्याळाकडे लक्ष गेले नाही. आता एक वाजायला आला होता.

" मी सकाळीच सगळा स्वंयपाक करून ठेवला होता.
मला माहित होते की आज तुम्ही येणार आहात ते.. " ती हसून म्हणाली.

" बाबू जा जेवून घे... भूक लागली असेल ना ! गप्पा काय नंतर पण होतील." आजी म्हणाली.

दोघे जेवायला बसले. खरंतर श्याम ला तिथे जेवायचीं पण इच्छा नव्हती. पण नाईलाजाने त्याला किशोर समवेत बसावे लागले. मंदाकिनी ने दोघांना बसायला पाट दिले आणी हातपाय धुतल्यावर त्याच्या समोर मोठ्या पितळी ताटात जेवण वाढले. पानात दोन भाज्या , पोळ्या , कोशिंबीर , पापड , भात आणी डाळ होती. मंदाकिनी ने वाढून त्यांना इशाऱ्याने जेवायला सांगितले. त्यांनी सुरवात केली. जेवण अप्रतिम होते. साधे पण रुचकर. पहिल्या घासातच श्यामचा तिरस्कार , राग पळून गेला. पुढे तो अगदी आनंदाने जेवू लागला.
मंदाकिनी समोर चुलीजवळ बसून त्यांचे निरीक्षण करत होती.तिने ढोपर मोडून आपल्या हनुवटी खाली घेतले होते. दोन्ही हाताचा विळखा तिने पायाला घातला होता. तिचे सगळे लक्ष किशोर कडे होते. ती लक्षपूर्वक त्याच्या हालचाली आणी चेहऱ्यावरील भाव निरखत होती. श्यामचे तिच्या कडे लक्ष होतेच. सारखे किशोर कडे बघणे , त्याला काही हवं नको ते बघणे, सारखे त्याच्या पुढे पुढे करणे. हे सगळे बघून श्यामच्या लक्षात आले की ही त्याच्या प्रेमात पडली आहे. तसा किशोर दिसायला पण छान होता. एकदम मर्दानी... त्यात गोड हसरा चेहरा, भरदार छाती , भरलेले बाहू त्यामुळे तो एखाद्या रोमन योद्धया सारखा भासत होता.
मंदाकिनी पण काही कमी नव्हती. मोठे पाणीदार डोळे ,लांब पापण्या , वक्राकार भुवया , गोरापान वर्ण , शुभ्र एका ओळीत असणारे दात. रुपाला साजेसे शरीर अत्यंत प्रमाणबद्ध शरीराची वळणे.. कोणीही तिला पाहिलं तर नक्कीच तो तिला विसरू शकत नव्हता.

दोघांची जेवणे झाली. आणी दोघे एका ठिकाणी बसले. काही वेळातच मंदाकिनी ने आजीला जेवायला भरवले. आणी स्वतः पण जेवून त्यांच्या समोर बसली.

" आजी ? "

" जरा झोपली आहे. तिला आजकल एव्हडी दगदग सहन होत नाही... ती केव्हाची तुमची कोणाची तरी वाट पाहत आहे. त्या शिवाय तिची ह्या सगळ्यातून सुटका नाही. "

" हे सगळे माहित असताना पण तु कशी इथे यायला तयार झालीस ? तुला भीती नाही वाटली ? " किशोर ला तिचे आश्चर्य वाटत होते.

" मला माझे असे कोणी नाही . आई वडील वारले. ना जमीन ना जुमला... त्यात मी दिसायला अशी.. कधीनाकधी अतिप्रसंग येण्याची शक्यता जास्त.. म्हणून मी आजी सोबत इथे आले. किमान अब्रू सुरक्षित राहील. खायला प्यायला मिळेल..." मंदाकिनी आपली कहाणी सांगत होती.

किशोर ने आज तिच्या कडे नीट पाहिले. तसा तो फारसा मुली समोर गोंडा हलवत फिरणारा नव्हता. त्यामुळे ह्या आधीपण त्याने तिच्या कडे फार लक्ष दिले नव्हते. पण ती खरोखर खूप सुंदर होती. आणी आजी बरोबर राहून तिच्यात पण कमालीचे धाडस आले होते. ती न घाबरता स्थिर नजरेने किशोरच्या नजरेत नजर टाकून त्याच्या मनाचा अंदाज घेत होती.

" मला वाटत की आता आलाच आहेस तर तु सगळे घर नीट फिरून बघ. मंदाकिनी तुला सगळे घर दाखवेल." श्याम म्हणाला.

" तु पण चल..." किशोर म्हणाला. त्याला पण आपले सगळे घर फिरून बघायचे होते. ह्या घरात त्याच्या किती तरी आठवणी होत्या.

" नको. तुम्ही दोघेच जा.. मी तो पर्यंत मी संपत ला भेटून येतो. नाहीतर तो आपण आलो नाही म्हणून आपल्या घरी कळवून टाकेल..." श्यामने त्याला आठवण करून दिली.

" ह्म्म्म... मग मी पण येऊ सोबत ? "

" कशाला ? मी त्याला सगळे समजावून सांगीन.. काळजी करू नकोस." श्याम म्हणाला.

" बरं ठीक आहे. " किशोर म्हणाला आणी श्याम निघून गेला. आता त्या घरात फक्त मंदाकिनी आणी किशोर दोघेच होते. आजी होती पण ती झोपली होती. शिवाय कोणाच्या आधाराशिवाय ती बाहेर येऊ शकत नव्हती.

" चल मला सगळे घर दाखव... " किशोर म्हणाला. आणी मंदाकिनी आनंदाने उठली. दोघे सगळे घर फिरू लागले. घर कसला मोठा वाडा होता तो... पिढीजात माने घराण्याचा. अजून मजबूत उभा होता. ती त्याला सगळा वाडा दाखवत होती. आणी तो तिला त्या भागातील काही आठवणी सांगत होत्या. बघता बघता तासभर झाला..

" वरती माळा पण होता ना... आम्ही लहानपणी माळ्यावर खेळायचो. " किशोर ने विचारले.

" आहे.. पण आता तो वापरात नाही... "

" ठीक आहे आपण एक नजर टाकू.. काय वाटते ?"

" माझे काय? घर तुमचे आहे. तुम्ही मालक आहात. जिथे हवे तिथे जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. "

" जरी घर माझे असले तरी सध्या त्याची काळजी तु घेतेस म्हणून तुझा अधिकार मोठा आहे." किशोर म्हणाला. आणी मंदाकिनीचे डोळे भरून आले. पण आपले डोळे लपवत ती जिन्याच्या दिशेने वळली... हळू हळू ती माळ्यावर चढत होती. आणी चढताना दिसणाऱ्या तिच्या गोऱ्यापान पोटऱ्या बघून उगाचच किशोरच्या मनात धकधक वाढली. सावकाश चढत दोघे माळ्यावर पोचले. माळ्यावर सगळी कडे धूळ होती. मोठमोठी पातेली , डब्बे , निरर्थक सामान तिथे भरून पडले होते. सगळी कडे कोळिष्टकं पसरली होती. छपराच्या काही काचेच्या तावदानातून अंधुक प्रकाश येत होता.
किशोरच्या लहानपणी हा माळा मोठा प्रशस्थ वाटत असे. पण आता इथे सामानाची गर्दी झाली होती. तो काही वेळ उभा राहून सगळे आठवायचा प्रयत्न करत होता.
अचानक एक लहानसा उंदीर चींचीं करत त्याच्या पायावरून धावत गेला. आणी तो दचकला... उंदराला बघताच मंदाकिनी घाबरून किशोरला बिलगली.... तिने डोळे घट्ट बंद केले होते. तिची छाती भीतीने वर खाली होत होती. तिने किशोरला घट्ट मिठी मारली होती. तिच्या अंगाच्या स्पर्शाने किशोरचीं पण गात्र उचंबळून आली. तिचा मादक , धुंद करणारा सुगंध. शरीराला झालेला शरीराचा स्पर्श किशोरचे अंग पण गरम झाले. आपसुख त्याचे हात पण तिच्या पाठीवर आले. तिच्या पाठीवरून त्याने सावकाश हात फिरवत तिला धीर दिला. हळूहळू मंदाकिनीने डोळे उघडले. तिचा श्वास अजून पण वेगात धावत होता. ती अजून पण त्याच्या मिठीत होती. त्याच्या कुशीत तिला सुरक्षित वाटत होते.

" मंदाकिनी... ! अग गेला उंदीर." तो हळुवार आवाजात म्हणाला. पण तो म्हणायला आणी उंदराने पुन्हा चींचीं केले. तशी ती आणखीन त्याला घट्ट बिलगली. तिच्या पृष्ठ उरोजाच्या स्पर्शाने किशोर कमालीचा उत्तेजित झाला. तिने त्याच्या छातीवर आपले डोके ठेवले होते. दोन्ही हाताने त्याला घट्ट आलिंगन मारले होते. त्याचा हात हळुवार तिच्या पाठीवरून फिरत होता. त्याच्या मिठीत आज तिला कमालीचे सुख गवसले होते. आणी किशोरचीं अवस्था काही वेगळी नव्हती. काही वेळ दोघे मंत्रमुग्ध होऊन त्या क्षणांचा आस्वाद भरभरून घेत होते. दोघात कोणालाही बाजूला व्हावे असे अजिबात वाटले नाही.

" आता खाली जाऊया... कदाचित आजी उठली असेल." त्याने तिची हनुवटी अलगद उचलत तिच्या नजरेत नजर मिसळली. नजरेने नजरेचे इशारे ओळखले. आणी लाजून तिची नजर आपोआप खाली गेली. आणी ती लाजत हळूच त्याच्या मिठीतुन बाहेर पडली. दोघांच्याही आयुष्यातला हा पहिला स्पर्श होता. त्या मुळे दोघे कमालीचे उत्तेजित झाले होते. पण त्याबरोबरच दोघांना काळ वेळेचे पण भान होते. पण पुन्हा जर वेळ आली तर दोघे नीसंशय एकमेकांच्या मिठीत येणार होते ह्यात कोणतीही शंका नव्हती. खाली उतरताना किशोर ने आधाराला तिचा हात हातात पकडला होता . आणी आता त्याच्या हातात हात देऊन ती निर्धास्त होती.

दोघे पुन्हा खाली आले. आजी अजून झोपली होती. म्हणून दोघे अश्याच गप्पा मारत बसले. पण आता दोघे एकमेकांना नजरेतून सगळे सांगत होते. पहिल्यांदा किशोरच्या मनात कोणी इतक्या खोलवर जागा बनवली होती. मंदाकिनी पण त्याला योग्य तो प्रतिसाद देत होती. म्हणून त्यात आणखीन मज्जा येत होती.

संध्याकाळी श्याम परत आला. आणी सगळ्यांची पुन्हा एकदा बैठक जमली.

"'आजी ह्या सगळ्यातून कसे बाहेर पडायचे त्या बद्दल सांग... " जास्त वेळ न लावता किशोर ने विचारले.

" बाबू ! ' ब्रम्हसमंध ' पासून मुक्ती हवी असल्यास आपल्याला त्याला मुक्ती दयावी लागेल. पण तो तसें करू देणार नाही. "

" मग ? "

" आपण त्याला फसवून अडकवायचे... "

" पण कसे ? "

" पौर्णिमेला त्याला घास ठेवतो नां. तेव्हा तो आला की , त्याचे बाहेर जायचे सगळे रस्ते मंत्रांनी बंद करायचे. एकदा का तो इथे अडकला की त्याला मंत्राग्नी द्यायचा. "

" ह्म्म्म... ठीक आहे. "

" पण हे काम सोपे नाही... तो इथे आला की पटकन वाड्या भोंवती मंत्रांनी भरलेला तांदूळ टाकावा लागेल. घरातून बाहेर जायचे सगळे रस्ते बंद करावे लागतील. एकही रस्ता त्याला सापडला तर तो पळून जाईल आणी मग आपला सूड घेईल... म्हणून त्याला एकही संधी मिळता कामा नये. "

" ठीक आहे... काय काय सामान लागणार आहे ते मला सांग... मी लगेचच घेऊन येतो. ह्या येणाऱ्या अमावस्येला आपण त्याचा बंदोबस्त करू... "

" अमावस्येला नको.... तेव्हा तो खूप ताकतवान आणी क्रूर असतो... आपण हा विधी पौर्णिमेला करू... तेव्हा तो जरा शांत असतो... "

" ह्म्म्म..." विचार करत किशोर ने मान डोलवली. एखाद्या ब्रम्हसमंधा बरोबर सामना करण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती . स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा जीव धोक्यात नसता तर तो ह्या भानगडीत पडलाच नसता.

" तु एक काम कर.मी सामान सांगते. मंदाकिनीला सोबत घेऊन जा... तिला सगळी माहिती आहे. ती तुला मदत करेल. सगळे सामान घेऊन तुम्ही पौर्णिमेच्या आधी चार दिवस परत या... "

" पण आजी ह्या आमावस्येला त्याला घास ठेवायचा आहे तो...." मंदाकिनी म्हणाली. कारण मागील काही वर्ष आजीने काहीच केले नव्हते. तिला आता फारस जमत पण नव्हते. म्हणून मंदाकिनीला तिची काळजी वाटत होती.

" ते मी बघते.. मी बनवीन .. मी एका दिवसाचा तर प्रश्न आहे. " आजी म्हणाली. त्यावर बराच वेळ वाद प्रतिवाद झाले पण शेवटी सगळ्यांना आजीच्या बोलण्याला मान्यता दयावीच लागली. कारण सामान आणण्यात कोणतीही चूक परवडणार नव्हती.
शेवटी दुसऱ्या दिवशी.. मंदाकिनी , श्याम आणी किशोरने गाव सोडले. आणी तडक मुंबई गाठली.


पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित...