tu jane na - 1 in Marathi Love Stories by दिपशिखा books and stories PDF | तू जाने ना - भाग १

Featured Books
Categories
Share

तू जाने ना - भाग १

तू जाने ना

भाग - १

"सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... !! तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज " दि कबीर कपूर " आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही.... प्लिज जा आत, तो फुल्ल टेन्शन मध्ये त्याच्या व्हॅनिटीत बसलाय आणि काहीवेळातच त्याला स्टेजवर एन्ट्री घ्यायची आहे... कबीर साठी हा कॉन्सर्ट खूप महत्वाचा आहे... त्याच्या ह्या कॉन्सर्टवरून त्याला यूके चं कॉन्सर्ट साइन करायला मिळणार आहे... सुहानी ss...., अगं तू ऐकतेयस ना...! " पाठमोऱ्या सुहानीकडे बघत ती व्यक्ती बोलत होती...

सुहानी स्वतःला आरशात पाहून स्वतःची साडी नीट करत होती... आकाशी रंगाचं स्लीवलेस backless ब्लॉउज त्यावर पीच रंगाची जॉर्जेट स्टोन वर्क असलेली साडी तिच्या कमनीय बांध्याला खूपच सुरेख दिसत होती .... तिचे काळेभोर डोळे काजळ लावल्याने अजूनच रेखीव दिसत होते... सोनेरी काया तिची, नाकीडोळी एकदम आखीवरेखीव होती... हलकासा मेकअप करून ती आरशात जरी पाहत असली तरी तिचे कान मात्र कबीरबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीकडे लागून होते... ती पाठमोरी उभी होती... त्या व्यक्तीचं बोलणं संपताच ती मागे वळली तेव्हा कर्ल केलेल्या तिच्या लांबसडक केसांनी एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर हेलकावे घेत जागा घेतली.... समोरच्या व्यक्तीला तिने हलकीच स्माईल दिली आणि म्हणाली....

" इट्स ओके... डोन्ट बी पॅनिक.... मी बघते ..." ती हसतच कबीर च्या व्हॅनिटीत निघून गेली....

" आता सगळं ठीक होईल... सुहानी ही सब ठीक कर सकती है.... कबीरसाठी कोणी योग्य असेल ना तर ती सुहानीच आहे.... कबीर ला आणि त्याच्या रागाला तीच हँडल करू शकते बाबा, ये अपने बस की बात नहीं हैं....! " ती व्यक्ती देवाचे आभार मानून तिथून निघून गेली....

" कबीर, मी येऊ का आत...? " सुहानी कबीरच्या रूमचा दरवाजा ठोठावत म्हणाली...

" come सुहानी..." तिचा आवाज ऐकताच कबीरने तिला आत येऊ दिलं... तिच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच त्यावेळी तरी त्याने आत घेतलं नसतं.... त्याच्या आवाजावरून तो जरा वैतागलेलाच वाटत होता...

तिने आत जाऊन बघितलं तर कबीर सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला होता... तिच्या नजरेतून त्याचा उदास झालेला निरागस चेहरा काही लपला नव्हता... ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली... तिला जवळ आलेलं पाहताच त्याने वर पाहिलं... तो उदास हसला... त्याला पुन्हा लॉकेट बद्दल आठवताच त्याचा चेहरा उतरला व आपसूकच नजर जमीनवर खिळली... ती त्याच्या केसातून हात फिरवून त्याच्यासमोर बसली आणि त्याला म्हणाली...

" कबीर, काय झालं...? इतका का अपसेट होतोयस....?" तिने अलगद त्याचा चेहरा वर केला...

पाणावलेल्या डोळ्यांनी तो तिच्याकडे बघत म्हणाला... " जे नव्हतं व्हायला पाहिजे, तेच नेमकं झालं... तुला माहितीय ना ते किती लकी लॉकेट होतं माझं... " कबीरची नाराजी त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती...

" कबीर... तू खूप स्ट्रॉंग आहेस... तुझा स्वतःमधला आत्मविश्वासच सगळं काही आहे त्यासाठी तुला कोणत्याही लकी चार्म ची गरज नाहीए... आयुष्यात हे लॉकेट तेव्हा होतं का, जेव्हा तू सिंगिंग सुपरस्टार झालेलास...? नाही ना...! हे तुला गेल्या काही महिन्यांत मिळालेलं आणि त्यावेळेपासून बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडत आहेत इतकंच... तुझ्यामध्ये टॅलेंट आहे... तू आतापर्यंत तुझ्या टॅलेंटच्या जीवावर पुढे आलायस... तुला असल्या लॉकेट्स ची गरज कधीच नव्हती... सगळ्यांची मनं जिंकायला फक्त तुझा हा गोड गळा पुरेसा आहे समजलं... आणि हे बघ, मी काय कमी आहे का कोणत्या लकी चार्म पेक्षा...? आहे ना तुझ्यासोबत आणि कायम तुझ्यासोबत असेन... " सुहानने कबीरला एवढं छान पद्धतीने समजवलेलं की त्याच्या मनात आता कुठलाच किंतु परंतु उरला नव्हता... तिचा चेहरा पाहूनच त्याचा राग कुठल्या कुठे उडून गेला.... पण आज ज्या पॉवरची गरज त्याला होती ती सुहान ने सहजरित्या त्याला प्रदान केली होती...

ती तिच्या गुडघ्यांवर बसून त्याच्याकडे पाहत त्याला बराच वेळ समजावत होती आणि त्यालाही तिचं बोलणं पटत होतं... बघता बघता त्याचा कोमेजलेला चेहरा पुन्हा एखाद्या नवीन फुलणाऱ्या फुलाप्रमाणे ताजातवाना दिसू लागला... त्याने दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला उभं केलं आणि तिच्या डोळ्यात पाहत तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं... सुहानीने तो क्षण बंद डोळ्यांमध्ये साठवून घेतला... त्याने पुन्हा तिच्याकडे एक नजर पाहिलं आणि तिला म्हणाला...

" थँक्स डिअर... तुझ्या बोलण्याने मला आज एक नवीन ऊर्जा मिळाली, तू बघ आजचा शो कसला हिट करून दाखवतो..." त्याने तिला मिठीत घेतलं... सुहानीही त्या मिठीत सुखावली... तितक्यात बाहेरून कबीरला क्रु मेंबर्स आवाज देऊ लागले... पुढच्या दोन मिनिटात त्याची स्टेजवर एन्ट्री होती....

" कबीर चल लवकर तयार हो... अँड ऑल द वेरी वेरी बेस्ट... आय नो, यू विल रॉक द शॉ... लव्ह यू माय रॉकस्टार... स्टेज फाडके परफॉर्मन्स दे..." सुहानि त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली...

" लव्ह यू टू बेब... तूच माझा लकी चार्म आहेस मग परफॉर्मन्स फाडु होणारच ना ..." कबीरने त्याचे शूज पायात चढवून गिटार हातात घेतली आणि रूमच्या बाहेर पडणार इतक्यात त्याने त्याचा एक हात सुहानीच्या दिशेने पुढे केला... सुहानीने त्याच्याकडे आश्चर्यकारक पाहिलं...

" चल माझी लकी चार्म... तुझ्याशिवाय परफॉर्मन्स तर होणं शक्यच नाही..." त्याच्या ह्या वाक्यावर सुहानी चक्क लाजली... तिने तिचा हात त्याच्या हातात दिला आणि त्याच्यासोबत स्टेजपर्यंत गेली....

कार्यक्रम सुरू झाला.... कबीरने गिटार ची एक स्ट्रिंग ओढताच संपूर्ण स्टेडियम मध्ये जमलेल्या त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला... कssबीर.. कssबीर... त्याच्या नावाने स्टेडियम गजबजून गेला... त्याने गाण्याला सुरुवात करण्याआधी स्टेजच्या विंगेत उभ्या असणाऱ्या सुहानीकडे एक नजर टाकली... सुहानीनेही तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करून, दोन्ही हातांनी फ्लाईंग किस देत त्याला गाण्याची सुरुवात करायला परवानगी दिली... तो हसला आणि पुन्हा त्याने गिटार ची तार छेडली...

I love you all..
दोस्तों, ना कोई मंजिल है, ना कोई साथी है
फिर भी निकल पड़ा हूँ घर से
शायद जिसकी तलाश है
वही साथी है, वही मंज़िल है
hit it
आ आ जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना
सपनों में रोज़ आये, आ ज़िन्दगी में आना

कबीरच्या सर्व चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याच्या गाण्याची सुरुवात एन्जॉय केली... स्टेजवरील वादक त्याला योग्यप्रकारे साथ देत होते... त्याच्या गाण्यावर बॅकग्राऊंड डान्सर्स ने देखील चांगलाच ठेका धरला... गाण्याच्या रोमँटिक ओळींवर त्याचं बऱ्याचदा लक्ष सुहानीकडे जात होतं... तिही त्याच्याकडे बघून ते सगळं एन्जॉय करत होती... कबीर ने सुरांशी मेळ घातलाच होता, आता त्याला थांबवणं कठीण होतं... एकामागोमाग एक बरीच गाणी कबीर गायला लागला...


पानी दा रंग वेख के
अंखिया चो हंजो रोड़ दे
★★★★

तुम ही हो,
जिंदगी अब तुम ही हो
★★★★

मेरी रूह का परींदा फड़फडाये
लेकिन सुकून का जज़ीरा मिल न पाए
वे की करां
वे की करां
★★★★


एकसोएक सुपरहिट गाणी तो गात होता... गाता गाताही त्याने बरेच डान्स परफॉर्मन्स केले... त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगणित, अद्वितीय होता... प्रत्येक गाण्यासोबत त्याचा वाढणारा आत्मविश्वास त्याच्या गाण्यातून बाहेर डोकावत होता... त्याच्या चाहत्यांनी तर त्याला डोक्यावर घेतलेलं... अखेर कार्यक्रमाची सांगता त्याने ह्या गाण्याने केली...

चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया बेलिया
ओ पिया
★★★★

स्टेज च्या खाली उतरताना त्याने पुन्हा सुहानचा हात धरला आणि पायऱ्या उतरू लागला... बॉडिगार्ड्सने चारही बाजुंनी त्याला कव्हर केलं होतं... त्याच्या चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी तुफान गर्दी केली होती... नेमका त्याच गर्दीत सुहानीचा हात त्याच्या हातातून सुटला... त्याचं लक्ष नसल्याने तो पुढे पुढे जात होता आणि त्या लोकांच्या गर्दीत उभी असलेली सुहानी त्याला बेंबीच्या देठापासून जोरजोरात हाका मारत होती...

कबीरss
.
.
कबीssर....कबीरss....

" कबीर... माझा हाssत , माझा हात...."
:
:
:
:
"सुहानीs... सुहानीss .... अगं उठ..." सुहानीची मैत्रीण रितू तिला झोपेतून उठवत होती...

पण इतक्या सुंदर स्वप्नात हरवून गेलेली ती उठायला कसली मागतेय... तिच्या डोळ्यासमोर फक्त कबीर दिसत होता... पण इथे प्रत्यक्षात रितू तिच्यासमोर उभी राहून तिला गदागदा हलवून उठवत होती... दोन तीन वेळा आवाज देऊनही सुहानी काही स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर येत नव्हती... तोंडावर पाण्याचा हबका बसताच ती स्वप्नाच्या दुनियेतून वर्तमानात आली... समोर रितूला बघून ती खूप वैतागली...

" ओह शीट, पुन्हा स्वप्नात होते मी...? "😣 सुहानी हळूच पुटपुटली... आणि तिने रागातच रितूवर एक कटाक्ष टाकला...

" व्हॉट द हेल...? ही काय उठवण्याची पद्धत झाली का...? " सुहानी चेहऱ्यावरचं पाणी पुसत रितूवर ओरडली...

" मग काय करायला हवं होतं मी...? दिवसरात्र त्या कबीरची स्वप्न बघत असतेस... त्यात मला पण झोपू देत नाहीस..." तिही तिच्यावर चिडून बोलत होती...

" काही काय बोलतेयस...? कss कss कबीरचं स्वप्न मी का बघू...? मss मला काय धाड भरलीय...? " ती रितूशी नजर चोरत बेडवरून उठली...

" मग कबीर.. कबीर माझा हात... काय भुताला बोलत होतीस...??" रितूच्या तोंडाचा पट्टा आता काही केल्या थांबायला मागत नव्हता...

" गप्प बस हा रितू, तुला कितीवेळा सांगितलंय की कबिरचं नाव आता माझ्यासमोर काढायचं नाही म्हणजे नाही..." सुहानी चिडली होती...

त्यांच्यातला हा वाद आता रोजचाच होता...

" अच्छा, म्हणजे तू त्याची स्वप्न बघतेयस ते चालतं... चोर तो चोर वर शिरजोरss...! तुला माहितीय ना, तुझ्या ह्या प्रेमाला काहीच अर्थ नाहीए ते...? " रितू पटकन बोलून गेली... ह्याने सुहानी दुखावली जाणार हेही तिला माहीत होतं पण तिच्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता...

सुहानीने पुन्हा तिच्याकडे रागाने पाहिलं... रितूही तिच्यावर नजर रोखून बघत होती... सुहानीने शेजारच्या टेबलावर ठेवलेला रितूचा मोबाईल आणि तिची पर्स तिच्या हातात दिली आणि तिला आपल्या बेडरूममधून बाहेर काढत म्हणाली... " निघायचं आता...? मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीए... निघ, जा इथून...! " 😡

आता इतका अपमान झाल्यावर कोण थांबेल...? रितू गप्पपणे तिथून निघून गेली...

सकाळ सकाळ मूड तर खराब झाला होताच... आता तोच राग आज संपूर्ण घरात आणि ऑफिसच्या लोकांवर निघणार होता... थोडीशी वैतागतच ती अंघोळीला गेली... डोळ्यात दाटलेलं पाणी शॉवरच्या पाण्यासोबत वाहून गेलं... फ्रेश होऊन ती बाहेर आली... क्रीम कलरची प्लाझो पॅन्ट त्यावर ब्ल्यू टॅन्क टॉप आणि वर क्रीम कोट चढवून ती ऑफिसला जायला तयार झाली...

" रेखा मावशी... माझा ब्रेकफास्ट लागलाय का...? " ( रेखा मावशी ह्या तिच्या घरी घरकाम करणाऱ्या बाई) त्यांच्या नावाने ओरडतच ती बेडरूमच्या बाहेर पडली...

" हो हो ताईसाहेब... " मावशी थरथरतच तिचं डाएट फूड डायनिंग टेबलावर मांडत म्हणाल्या...

ती एकटीच आपला ब्रेकफास्ट करत होती... कबिरचं पडलेलं स्वप्न त्यावरून रितूशी सकाळ सकाळ झालेलं भांडण, ते आठवून तिला वाईट वाटत होतं... त्या विचारात दोन घासही तिच्या घशाखाली उतरत नव्हते... विचारात गढून गेलेल्या तिच्या डोक्यावर जेव्हा मायेने कोणीतरी हात फिरवला तेव्हा ती भानावर आली... तिने मागे वळून पाहिलं...

" आज्जी तू...😊 " ती थोडं हसूनच म्हणाली...

" कोणत्या विचारात आहेस मग आज...? " खाणं कमी आणि विचार जास्त, हे आता नेहमीचंच होतं... आजीला बऱ्याच गोष्टी नजरेत होत्या...

" काही नाही गं... तू बसना इथे...! " तिने आजीला हाताला धरून बसवलं...

आजी आणि तिच्या काहीवेळ गप्पा झाल्या... आजकाल आजीला तिची जास्त काळजी वाटत होती... तिचं सतत चिडचिड करणं, इतकं मोठं कुटूंब असूनदेखील कोणाशीही जास्त न बोलणं, हे असं एकटंच बसून खाणं, रात्री सगळे झोपल्यानंतरच घरी येणं, सतत काहीना काही विचार करत राहणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे साहजिकच त्यांना तिची चिंता वाटत होती...

पंधरा वर्षापूर्वी सुहानीच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता... तेव्हापासून तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आज्जी आणि आईनेच केला... बाबांनी आईला एका दुसऱ्या बाईसाठी सोडलं होतं... कालांतराने आईची मनस्थिती खालावत गेली... हळूहळू त्यांनी सर्वांशी बोलणंही कमी केलं आणि आजारपणाला कवटाळलं होतं... त्यावेळेस मात्र आज्जी आणि लहान भावाची जबाबदारी इतक्या लहान वयात सुहानीने पेलली ... बाबांनी महिन्याला दिलेल्या पैशातून घर कसंबसं चालत होतं पण जगणं होत नव्हतं... कधी कोणती गोष्ट आवडली का मूठ गिळून गप्प बसावं लागत होतं... प्रत्येक वेळी फक्त निराशा... वडिलांचा पैसा तिला नकोसाच होता पण परिस्थिती हालाखीची असल्याने ती तेव्हा शांत बसली... एक द्वंद्व मात्र त्या बालमनावर तेव्हाच पेटून उठलं होतं... ती नेहमी तिच्या भावाला म्हणायची... " राहुल, आपलेही दिवस येतील रे...! " तेव्हापासून तिने आणि राहुलने कधी मागे वळून पाहिलंच नव्हतं... दोघांनी खूप मेहनतीने हे घर उभं केलं होतं... गरीब परिस्थितीतून वर येताना तिने इतर कोणत्या गोष्टींना जास्त महत्वही दिलं नव्हतं... ती फक्त कष्ट करत राहिली... तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर ती आज एका ख्यातनाम " दीक्षित प्रॉडक्शन लिमिटेड ची (एम.डी) मॅनेजिंग डायरेक्टर मिस. सुहानी दीक्षित होती... सुपर क्रिएटिव्ह वुमन ह्या नावानेच पूर्ण फिल्म इंडस्ट्री तिला संबोधायची... हे नाव तिला सहज मिळालंच नव्हतं त्यासाठी तिने खूप परिश्रम आणि मेहनत घेतली होती... मुंबईतल्या सर्वात महागड्या एरियात म्हणजेच जुहू मध्ये प्रशस्थ मोठा बंगला, अंधेरीत स्वतःचं तीन मजली (ऑफिस) प्रॉडक्शन हाऊस आणि दोन महागड्या बी एम डब्लू कार... वयाचे अठ्ठावीस वर्ष तिने प्रचंड निष्ठेने काम केलं... वय सरत होतं तशी कामात चतुराईही वाढत होती... नव नवीन मालिका, सिनेमे, वेब सिरीज सगळ्यांवरच तिने आपली घट्ट पकड बसवली होती... हे प्रशस्थ एम्पायर उभं करण्यात आणि त्यावर तग धरून ठेवण्यात तिला सगळ्यात मोठी साथ जर कोणाची होती तर राहुल आणि तिची बाल मैत्रीण रितूची...

रितू तिची खूप जवळची मैत्रीण होती... राहुलसोबत शिक्षण घेतलं जरी असलं तरी तिची जास्तीत जास्त गट्टी होती ती सुहानीसोबत... वयाने लहान पण अकलेने महान... चांगल्या वाईट गोष्टींची खूप जास्त समज होती तिला... हुशार आणि हळवेपणा ह्या दोघांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे रितू... स्वतःपेक्षा जास्त जपायची ती सुहानीला... सुहानीचा तापट स्वभाव जर कोणी झेलू शकत होतं, तर ती रितूच... जेवढं त्या दोघींचं बिघडायचं त्याच्या दुप्पटीने जमायचंदेखील... त्यामुळे रितूचं स्वतःचं घर आणि कुटुंब जरी असलं तरीही ती जास्तीत जास्त वेळ सुहानीच्या घरी आश्रित असायची... पडत्या काळात बऱ्याचदा रितूच तिच्या मदतीला धावून गेलीय...

आणि राहुलचं म्हणाल तर त्याच्याबद्दल जाणू तेवढं कमीच... सुहानीप्रमाणेच तोही तल्लख बुद्धिमत्तेचा, स्मार्ट, आणि तेवढाच प्रभावशाली... सुहानीपेक्षा लहान असल्यामुळे खेळकर-खोडकरही पण कंपनीत सगळे त्याच्या एका नजरेला घाबरत असत... कंपनीचा मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम तो चुटकीसरशी सोडवायचा... सुहानीला बऱ्याच गोष्टींसाठी त्याचा भरपूर पाठिंबा होता... सुहानीला खूप सांभाळून घेणाऱ्या ह्या दोन व्यक्ती तिच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या...आयुष्यात जे काही चांगले वाईट क्षण होते, ते तिने त्यांच्यासोबतच घालवले होते... आजी, आजारी असणारी आई , राहुल आणि, रितू हाच तिचा काय तो परिवार...
पण त्या परिवारात अनावधानाने शामिल व्हायला आलेला तो कबीर... तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग, तिचं न भूतो न भविष्यति असणारा तिचा एकेकाळीचा प्रियकर... हो प्रियकर... जो आपल्याला प्रिय असतो त्यालाच प्रियकर बोलतो ना आपण...!

क्रमशः-----------◆