kadambari jivlaga - 30 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा

कादंबरी – जिवलगा

भाग- ३० वा

---------------------------------------------------

रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपले ..सगळी कामे आटोपून तिघीजणी निवांत झाल्या .

ओप लागे पर्यंत गप्पा करीत पडायचे आणि त्या भरात एकेकजण झोपी जायची .

गाढ झोप लागण्यात नेहाचा पहिला नंबर . गावाकडे घरी बोलून झाले की ..नेहा गप्पा

करण्यात नावापुरती सहभागी असायची .आणि सगळ्यात अगोदर तिलाच झोप लागायची ,मग

अनिता आणि सर्वात शेवटी सिनियर –काळजी घेणारी सोनिया झोपी जात असे.

आज मात्र नेहाने गप्पांना सुरुवात केली ,असे अनिता आणि सोनिया आश्चर्याने म्हणाल्या ..

अरे वा ..नेहाराणी , तू कशी काय जागणार आमच्या सोबत ?

तुझी विकेट तर सगळ्यात आधी पडते .

झोप उडायला काय झाल ? काही खास कारण असेल तर सांग आम्हाला ..

आम्ही तुझ्या मदतीसाठीच तर आहोत ना !.

नेहा म्हणाली –

तुम्ही सगळ्यांनी मिळून मला उल्लू बनवायचे ठरवले आहे...

मधुरिमादिदींनी तुमचे काय कान भरलेत कुणास ठाऊक ..तुम्ही आणि तो ..हेमू पांडे “

मिळून खिचडी पकवता आहात ...

तुम्हाला काय वाटले ..मला कळणार नाही का ? तुमचा हा प्लान ?

सोनिया नेहाला थांबवीत म्हणाली ..

ए मुली ..जादा भाव नही खानेका , सम्झी क्या !

स्पष्ट शब्दात सांग..

आम्ही तुझ्यासाठी हेरून ठेवलेला तुझा हेमू पांडे – बॉस, तुला तुझ्यासाठीच बॉयफ्रेंड म्हणून आवडला

की नाही ? ते आधी सांग ..

आणि अजिबातच आवडला नसेल तर तसे पण सांग ..

उद्याच्या उद्या तू पुन्हा आमच्या सेक्शनल साभार परत ..

चालेल का तुला सांग ?

उगीच असा बळजबरीचा रामराम नको ना !

सोनियाचा हा फटका नेहाला अनपेक्षित होता ..

हो म्हणावे तर ..कबुली दिल्या सारखे होणार ,

नाही म्हणावे तर ?

हेमू पांडे पासून दुरावणार ..

आत्ता कुठे आपल्याला त्याच्या मनातले कळाले आहे ..आणि

या दोघी अजून आपल्याला त्रास देण्याच्या मूड मध्ये आहेत ..

काय करावे ? नेहाच्या मनात गोंधळ सुरु झाला होता .

अनिता आणि सोनिया दोघींना नेहाच्या मनात काय चालू आहे ,याचा अंदाज आला होताच

फक्त तिच्या तोंडून ऐकण्याची उत्सुकता होती ..त्यासाठी म्हणून

नेहाची फिरकी घेणे चालू होते ..

सोनिया म्हणाली ..

नेहा – सेमिनारला तुम्ही दोघेच होता दिवसभर ..

आम्हाला नाही सांगितले .. तू .वहा क्या क्या हुवा ..?

यावर नेहा म्हणाली ..

ते मीच कशाला सागांयला पाहिजे ..

हेमू पांडेने कधीच सांगितले असणार तुम्हाला ..त्याची झालेली नाराजी .

अनिता म्हणाली ..

नशीब आमचे ..तो नाराज झालाय ..हे तरी तुला कळले .

हे बघ नेहा ..

हेमू पांडे तुझ्यासाठी अगदी योग्य मुलगा आहे. हुशार , कर्तबगार , लहान वयात मोठ्या जबाबदारीने

ऑफिसच्या कामात स्वतःची छाप उमटवली आहे या मुलाने .

सर्वात महत्वाचे .. तो पोरींच्या मागे मागे लागणार भुंगा आणि , शौकीन फुलपाखरू नाही.

हे बघ नेहा ..रीमादीदीने ज्या अर्थी हेमू पांडेची निवड तुझ्यासाठी केली आहे ..त्याचा अर्थ तू समजून घ्यावा

असे आम्हाला वाटते .. तुम्ही दोघे जोडीदार झालात तर ..सर्वांना आनंद होईल.

तुम्हा दोघांच्या फमिली पण सेम कल्चरच्या आहेत . जुने असून नवे विचार असणारे परिवार आहेत तुमचे

अजून काय हवे असते ?

नेहा म्हणाली ..

सोनिया आणि अनिता ..माझ्याबद्दल तुमच्या मनातल्या आपलेपणाच्या भावना मला माहिती आहेत ,

त्याबद्दल मला कधीच शंका नव्हती आणि यापुढे ही कधी नसेल.

सेमिनारच्या निमित्ताने ..हेमू पांडे आणि मी ..पहिल्यांदा एकमेकांच्या सोबत होतो .

त्यांनी त्यांच्या

भावना धीटपणे व्यक्त केल्यात ...

मला अनपेक्षित होते ..पण..खरे सांगते ,,

त्याक्षणी ..माझ्या दिसण्याबद्दल त्यांनी केलेले माझे कौतुक ..मला खूप आवडले ..

माझ्याबद्दल असे कुणी बोलणारे आहे.. हे मी पहिल्यांदा अनुभवले ..

दिवसभर माझ्या कानात त्यांचे शब्द गुंजत होते ..

“नेहा ..यु आर चार्मिंग ..ब्युटीफुल ..!

सेमिनारमध्ये काय झाले ,काय माहिती ..मी मात्र माझ्याच धुंदीत होते .

अनिताने नेहाला मिठीच मारली ..

अग्गो बाई ..इतके काही घडले त्यादिवशी ..हेम्याने नाही सांगितले हे ..

आणि तू तर जणू काही तोंडात बर्फाचा गोळा गिळून बसलेली असतेस नेहमी .

सोनिया म्हणाली ..

बघ अनिता ..आपल्या कोकिळेला कस कंठ फुटलाय आज..!

प्यार का गीत गा रही ही आज ये तो ...!

नेहाला ..दोघीजणी करीत असलेली हे गोड मस्करी मनापासून आवडत होती.

अनिता म्हणाली ..

हे बघ नेहा ..

हेमू पांडे ..तुझा बॉस आहे ..पण तो फक्त ऑफिसच्या वेळेत ..त्यावेळेत तू त्याचा नक्कीच

बॉस म्हणून रिस्पेक्ट कर आमचे काही म्हणणे नाही .

या वेळेत तू फक्त याची एक सहकारी आहे ..अशा पद्धतीने वागणे योग्यच आहे.

पण.. ऑफिस संपल्यावर , ऑफिसच्या बाहेर पडल्य्वर तर ..तू त्याची मैत्रीण होण्यास तयारी

दाखव . आम्ही काही तुला डायरेक्ट..त्याच्या प्रेमात पड असे नाही म्हणत ..

तुम्ही अगोदर छान मित्र व्हा , तुमच्या मैत्रीचे नाते खुलवा ,फुलवा ..सहवासात रहा ..

म्हणजे एकमेकास जाणून घेता येईल तुम्हाला .. मग एकमेकाला द्या ..प्रेमाचा होकार .

घाई नका करू .. आणि

अधिक फ्री होऊ लागाल तेव्हा काही आगाऊ गडबड तर मुळीच करायची नाही बरे

का ?

अनिता आणि सोनियाला त्यांचे पूर्णपणे सांगू दिले ..मगच नेहा म्हणाली ..

बाप रे ..म्हणजे ..तुम्ही सगळ्यांनी पेपर वर्क तर अगदी झकास करून ठेवलाय की ..

मला यात पास व्हावे लागेल ? कठीणच आहे रे हे सगळं.

सोनिया म्हणाली ..

काही कठीण नाही नेहा ..

तू आणि हेमू पांडे मनाने जवळ आलात की ..मग बघा ..तुमची दुनिया कशी रंगी बेरंगी

होऊन जाईल ते .

नेहा – प्रेमाची जादू विलक्षण असते. ते सांगून नाही कळायचे ..

त्यासाठी प्रेमात पडावे कुणाच्या ..मगच कळते .. प्यार जिंदगी है..!

सोनियांने ..अनिता आणि नेहाला भिंतीवरले घड्याळ दाखवत म्हंटले ..

ए बायांनो ..बघा ..रात्रीचे दो वाजत आहे ..

उद्या आपल्याला ऑफिस आहे म्हटले.

अनिता ..तू कुठे या नेहाला ..प्यार की बाते समजावते आहेस ..

काही नको सांगूस तिला ..

ती आणि तिचा तो हेमू पांडे ..दे सोडून त्यांना .बघून घेतील त्यांचे ते ...

सोनिया म्हणाली ..अनिता ते तर आहेच ..पण

या नेहाला ..स्टेप बाय स्टेप .अनुभवू दे..तिच्या पहिल्या प्रेमाची कोवळी अनुभूती ..

प्रेमाची वाटचाल , धडपड , साथ सोबत ..एक अनामिक हुरहूर लागली पाहिजे तिच्या मनाला ..

किती छान न ..

या नेहाच्या जीवनात ..हेमू पांडे सारखा ..अनुरूप असा जिवलग आला आहे..

अनिताने नेहाकडे प्रेमाच्या नजरेने पाहत म्हटले ..

यस सोनिया खरेच .

आपली .नेहा नशीबवानच आहे.. ये तो सही बात है.

अनिता आणि सोनिया दोघींना लगेच झोप लागली आहे हे नेहाने पाहिले ..

पण..आज तिच्या डोळ्यातली झोप पार उडून लावली होती .

कुणी ? अनिताने आणि सोनियाने ?

या प्रश्नाचे उत्तर नेहाच्या मनाने तिला दिले ..

छे..छे...!

माझी झोप तर ..हेमू पांडेने उडवली आहे.. “माय बॉस..!

नेहाला काही केल्या झोप येईना ..तिच्या मनात विचार येत होते ..

हेमू पांडेला या सगळ्यांनी आपल्याबद्दल ,आपल्या घरातील माणसांच्या बद्दल नक्कीच

सगळे काही सांगितले असणार ..म्हणजे हे माहिती झाल्यावर सुद्धा हेमू पांडे आपल्यात

इंटरेस्ट दाखवतो आहे.

त्याला प्रतिसाद दिला तर ?

नको नको ..इतक्या लवकर ..असे प्रतिसाद आहे असे दाखवत गेलो तर ..त्याच्या स्वभावबद्दल

जाणून घेता येणार नाही.. त्याचे विचार ,त्याच्या आवडी निवडी ..आपल्या मनाशी जुळतात

की नाही ..हे तर जाणून घेणे गरजेचे आहे..

कारण एकदा प्रेमात गाडी बुडाली की ..मग ..पुढे काही बिघडू लागले तर आपल्याला आपल्या

मनाच्या विरुध्द तडजोड करायला लागू नये.

अशा विचारातच नेहाला झोप लागून गेली .

सकाळ झाली ..अनिता आणि सोनिया ..ऑफिसला जाण्याची तयारी करू लागल्या ,

अनिताने नेहाला आवाज देत उठवले ..

उठा ..नेहा राणी ..

रात्री झोप नाही आली ना ? असेच होणार आता ..

सोनिया म्हणाली ..नेहा ..आता पासून ..ऑफिसमध्ये ,,हेमू पांडेला ..तू उघड उघड जरी

बोलली नाहीस तरी ..सूचकपणे , तुझ्या दिसण्यातून ,बोलण्यातून ,वागण्यातून ..त्याला

जाणवत राहिले पाहिजे ..की ..

त्याची काळजी घेणारी ,त्याच्या विषयी अधिक काही वाटणारी ..ती तूच आहेस..

मग बघ .. तुझा बॉस “ किती खुश होऊन जाईल .

नेहा म्हणाली ..

हे बरे नवे काम लावले तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे..

अनिता म्हणाली ..

ए मुली ..हे आम्ही नाही काही केले हं.. ते तुझ्या दीदीला विचार ..

आम्ही नाही ऐकून घेणार तुझे असले काही ..

प्रेमात तो हेम्या पडलाय तुझ्या ..त्याला आम्ही काय करणार ..!

त्याच्यावर तू पण प्रेम कर ना , कुणी रोक्लाय तुला ?

वेळ वाया घालू नको ..जा .छान तयार हो ..तुझ्या बॉसला ग्रीन कलर पण खूप आवडतो .

आज ऑफिस ड्रेस डे नाहीये .. मस्त ग्रीन कलर ड्रेस मध्ये जा.

आणि बघ कशी जादू होते ..तुझ्या सुंदर असण्याची .

तयार झालेल्या नेहाकडे पहात ..सोनिया म्हणाली ..

अनिता ..बघ ना ..कसली क्युट दिसतीय आज ही नेहा ..!

ओएम्जी ..त्या हेमू पांडेच काही खरे नाही रे बाबा ..!

नेहा ने आरशात स्वतःला पहिले ..

आणि मनाशीच म्हणाले ..

अय्या ..मी छान दिसते ?

मलाच माहिती नव्हते इतके दिवस....!

तिघीजनी रोजच्या प्रमाणे ऑफिसमध्ये आल्या ..

नेहाला म्हणाल्या ..

नेहा राणी ..बेस्ट लक ..आज से प्यार का सफर सुरु ..

तुझ्या जिवलगास जाणून घे ..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग ..३१ वा लवकरच येतो आहे

------------------------------------------------------------------------

कादंबरी - जिवलगा

ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Share

NEW REALESED