prem - veda - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम - वेडा भाग ३

प्रेम - वेडा (भाग ३)

अनिरुद्ध ने त्या वेड्या व्यक्तीला बघितले त्याच्या बद्दल येवढं सगळ ऐकुन त्याला राहवलं नाही म्हणून तो त्याच्या दिशेने चालू लागला . तो त्याला निरखून बघू लागला . तो वेडा रस्त्यावर खडूने काहीतरी लिहत होता ...
अनिरुद्ध त्याच्या जवळ पोहोचला... त्याने त्या रस्त्यावर लिहलेले वाक्य वाचले तसा तो चक्रावला ...
त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता , त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती .
कारण त्या रस्त्यावर त्या वेड्याने लीहले होते
" happy birthday Ankita "


यावेळी अनिरुद्धच्या आयुष्यात नशिबाने नवीन धक्का दिला होता !!!!
त्याला समजतच नव्हते काय करावे आणि काय नाही . त्या वेड्या बद्दल जाणुन घेण्याची जिज्ञासा होतीच पण आता जिज्ञासा पेक्षा गरज जास्त वाटू लागली होती ...

त्या वेड्याला त्याने विचारले तु काय लिहितोयस इथे ???

तेव्हा त्या वेड्याने काहीच उत्तर दिले नाही , फक्त त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं . पण त्याचे ते हसू अनिरुद्धला जास्त त्रास देत होते .

अनिरुद्धला समजायला वेळ नाही लागला की अंकिता वर काळा जादू करणारा तसेच आत्महामत्या करण्याची धमकी देणारा दुसरा तिसरा कोण नसून हाच वेडा होता , पण हा मुलगा वेडा झाला तरी कसा ???
त्याची अवस्था अशी का झाली ??
अंकिता चार वर्षापासून अशी का वागतेय ???
तिचं माझ्यासोबत लग्न झाल्या नंतर सुद्धा ती का खुश नाही ???

असे खूप सारे प्रश्न अनिरुद्धला पडले होते ... अनिरुद्ध भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता न करून वर्तमानकाळात जगणारा होता त्याच कारणाने , त्याला लग्न करताना देखील अंकिताचा भूतकाळ जणायचे महत्वाचे वाटले नव्हते , मात्र आज त्याला अंकिता व या वेड्याचा भूतकाळ जाणायची गरज भासू लागली होती !!! .

त्याने जवळ पास असलेल्या दुकान मालकांना विचारले पण त्याला हवी तशी माहिती मिळाली नाही .
शेवटी तो जवळच असलेल्या अभिनव कॉलेजच्या समोरील चहाच्या टपरीजवळ पोचला .

तेथे त्याने त्या वेड्या बद्दल विचारपूस केली , तेव्हा चहा वाल्याने सांगितलं की या वेड्याच नाव ' नितीन देशमुख ' आहे ...

हा एक अनाथ मुलगा असल्याने त्याच्या बद्दल आम्हाला जास्त काही माहिती नाही पण तो समोर असलेल्या अभिनव कॉलेजमधून शिक्षण घेत होता आणि त्याच्या मित्रांसोबत तो इथे चहा पिण्यासाठी रोज यायचा ,... त्यामध्ये तीन मुल आणि एक मुलगी होती ...

अनिरुद्ध काय सुचलं काय माहिती त्याने लगेच अंकिताचा फोटो त्याला दाखवला व म्हणाला ती मुलगी ही तर नाही ???
तेव्हा तो फोटो बघून चहावाला म्हणाला " हा ही अंकिता ही त्यांच्या सोबत असायची .!!!"

आणि लगेच चहावाला उद्गारला पण तुम्ही कोण ????

यावर अनिरुद्ध म्हणाला

" मी अंकिताचा पती !!!
"या वेड्या बद्दल आणखी काही जण जाणायला मिळेल का ??? "

हे ऐकुन मात्र तो चहावाला थोडा चपचपला

" मला जेवढं माहिती होत तेवढं मी सांगितल याच्या व्यतिरिक्त मला अजुन काहीच माहिती नाही .

पण यांच्यासोबत एक मित्र असायचा त्याचा नंबर बहुतेक असेल माझ्या जवळ !!! "

त्या चहावाल्याने आपल्या जुन्या उधारीच्या बुक मधून खूप शोधून संतोषचा एक नंबर दिला... व म्हणाला हे त्या चौघा मित्रांपैकी हा एक , उधारी घेवून मुल फरार होतात म्हणून त्यांचे किमान नंबर तरी आम्ही घेतो !!!!!
तिथे लटकवलेल्या पाटी जवळ हात दाखवत तो चहावाला म्हणाला .

त्या चहाच्या टपरीवरील पाटीवर असे लिहिले होते की ...
" उधारी एक जादू आहे मी देणार आणि तुम्ही गायब होणार "

अनिरुद्ध ने जवळ असलेले शंभर रुपये त्या चहावाल्या दिले व आभार व्यक्त करून तिकडून निघाला !!

अनिरुद्ध ने दिलेला नंबर आपल्या मोबाइलवर डायल केला व डायल करताच ट्रू कॉलर चे पॉप अप आले ...
" संतोष चव्हाण "

फोनची रिंग वाजत होती व समोरून फोन उचलला गेला ........
......... समोरून कोणीतरी महिला बोलत होती ,

मी लगेच विचारले " संतोष चव्हाण आहे का ????
" मी त्याचा मित्र बोलतोय .... अनिरुद्ध "

त्यावर समोरून उत्तर आले , हो हा संतोषचाच नंबर आहे . तो बेडरेस्ट वर आहे कालच त्याला डिस्चार्ज मिळाला ...

हे ऐकून अनिरुद्धला जरा धक्काच बसला त्याने विचारलं " काय झालं होतं संतोषला "???

त्याची आई म्हणाली " पैरालिसिस अटॅक आला होता त्याला , तू मित्र आहेस ना त्याचा तुला माहिती नाही का ?? !!!"

या संधीचा वापर करण्यासाठी अनिरुद्ध ने विचारले तुमचा पत्ता मिळेल का मला ??? संतोषला बघायचं आहे !!!
त्यावर त्याच्या आईने पत्ता दिला .... व अनिरुद्ध पत्ता विचारत विचारत अनिरुद्ध संतोषच्या घरी निघाला !!!

संतोषच्या घरी अनिरुद्ध पोहोचला !!
संतोषच्या आईने दरवाजा उघडला .... व विचारले " तुम्ही कोण "???

" थोड्यावेळा आगोदर फोनवर बोलणं झालं होत मी अनिरुद्ध संतोषला बघण्यासाठी आलो आहे !!! " येवढं बोलून बस स्थानका जवळून घेतलेले एक किलो सफरचंद देताना अनिरुद्ध म्हणाला ...

....... संतोष आतल्या खोलीत आहे , आतल्या खोलीकडे हात दाखवत तिची आई म्हणाली ,

मी आता संतोषच्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागलो होतो ...

संतोष एका बेडवर झोपला होता त्याचे अर्धे शरीर निकामी झाले होते ...

मला बघताच त्या चेहऱ्याचा रंग उडाला होता ...
त्याने मला विचारले ... " मी नाही ओळखलं तुम्हाला , कोण आपण ??? "

" ' मी अनिरुद्ध अंकिता चा पती ....
" नितीन व अंकिता बद्दल जाणून घ्यायचं होतं .... मला माहिती आहे की ही वेळ बरोबर नाहीये हे सर्व विचारण्यासाठी पण चार वर्षापासून मी ज्या अवस्थे मद्धे जगतोय तुम्हाला नाही सांगता येणार !!!

!!!! आपली बायको आपली असून सुद्धा जेव्हा आपली नसते तुम्हाला कसं समजवू !!!!

तुम्ही माझी अवस्था नाही समजू शकणार चार वर्षापासून मी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारलं पण ती नेहमी हेच सांगत राहिली की मी खुश आहे पण तिच्या चेहऱ्यावर मला कधीच नाही वाटल की ती खुश आहे ... जशी ती आधी खुश होती !!!

सांग ना संतोष अस काय झालं होत की नितीन वेडा झाला अंकिता जिवंत असून सुद्धा एखाद्या भावना नसलेल्या प्रेता प्रमाणे जगतेय ?????"


यावर संतोष जरा गहिवरला "

मला सुद्धा माझ मन हलक करायचं होतं , खूप काही बोलायच होतं , पण कोणाला बोलू कसं बोलू काही समजत नव्हतं ... बर झालं तुम्ही आलात मी सर्व सांगतो तुम्हाला .....

" आज ही जी माझी अवस्था झाली आहे यासाठी मीच कारणीभूत आहे ....
म्हणतात ना आपण केलेल्या चुकांची शिक्षा आपल्याला याच जन्मात मिळते आणि मला माझी शिक्षा मिळाली आहे अस वाटत !!!


४ वर्षापूर्वी अंकिता व नितीन यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होत . मी नितीनचा सर्वात जवळचा मित्र पण एके दिवशी मी अनकिताच्या घरी गेलो होतो ...
तेव्हा मी अंकीताच्या वडिलांना सांगितलं ...

" मी अंकिताचा मित्र आहे , तुम्हाला अंकीताच्या वागण्यावरून शंका आलीच असेल की अंकिता चे कुणावर तरी प्रेम आहे ... तो दुसरा तिसरा कोणी नसून माझाच मित्र नितीन , मुळात तो एक अनाथ मुलगा आहे !!!
नितीन ने एका बंगाली बाबाच्या मदतीने तिच्यावर काळा जादू केला... अंकिताचे नितीन वर प्रेम नाही बंगाली बाबाच्या काळया जादुमुळे अंकिता नितीनच्या प्रेमात पडली असावी ... हे खूप चुकीचं आहे व मला तिची काळजी सुद्धा वाटत होती ...
तिच्या जागी जर माझी बहिण असती तर माझी काय अवस्था झाली असती हे मी जाणतो , हा खूपच वेगळा प्रकार वाटला.....

खरं प्रेम असतं तर मला तेवढं वाईट वाटल नसत पण ....

नितीनच तुमच्या मुलीवर नाहीतर तुमच्या संपत्तीवर प्रेम आहे .... म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतोय !!!
जमेल तेवढं नितीनच्या दूर ठेवा अंकिताला ..."

ह्या सर्व गोष्टी तिच्या वडिलांनी फक्त ऐकल्याच नाहीत तर याउलट माझ्या या गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास सुद्धा ठेवला .!!!

कारण प्रत्येक वडिलांना हेच वाटल असत आपल रक्त खूप शुद्ध आहे आणि शेवटी नितीन होता अनाथ , कोणाचं रक्त कोणाचा वंश , कोणत्या धर्माचा त्यात त्याच संपत्तीवर प्रेम !!!
म्हणून तिच्या वडिलांनी तिला काही विचारण्याच्या आधीच तिचा मोबाईल घेतला व लग्ना साठी स्थळ शोधू लागले .

व तुमच्या लग्नाच्या एक दिवसा आधी अंकिता नितीनला भेटायला आली होती पण जर नितीन व अंकीताच्या वडीलाची भेट झाली असती तर माझं सर्व गोष्टी खोट्या ठरल्या असत्या म्हणून मीच तिच्या वडिलांसोबत मिळून नितीनला सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ येण्यापासून रोखण्यासाठी गुंड पाठवले होते .

मी त्या गुंडांना फक्त रोख्यासाठी सांगितले होते पण नितीनच्या सिध्दार्थ नगर ला जाण्याच्या झटापटीत त्या गुंडांसोबत त्याची हतापाई झाली व त्या मारामारीत नितीनच्या डोक्याला जोरदार मार बसला व तो वेडा झाला !!!
त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आले पण तिथून पण तो पळून आला !!!

त्याच्या एक महिन्या नंतर ..
काही समाज सेवकांनी त्याला पुन्हा वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले पण तेथे तो श्वास बंद करून स्वतःला मारायचा प्रयत्न करू लागला होता " डॉक्टरांच्या मते तो एक महिना सिद्धार्थ नगर मद्धे व्यवस्थित राहिला पण सिद्धार्थ नगर मधून बाहेर काढताच स्वतःचा श्वास बंद करून ठेवू लागला .
नितीन शिक्षित होता पण वेडा झाला होता तो रस्त्यावर खडूने काहीतरी सतत लिहायचा आपल्या प्रेमाच्या आठवणी , आपल्या जुन्या गोष्टी , अंकितासाठी बघत असलेली वाट ... सर्वच .

याच्या आधारावर लोकांना सुद्धा कळलं की हा प्रेम वेडा त्याच्या प्रियसिची वाट बघत आहे ...
डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर ती मुलगी याला भेटायला आली तर हा पुन्हा ठीक होवू शकतो !!!!

यामुळे त्याला सिद्धार्थ नगर मध्येच ठेवायचे त्या समाज सेवकांनी ठरवले . व अजून नितीन अंकीताची वाट बघतोय . दोन वर्षानंतर मला माझी चूक कळल्यानंतर मी अंकिताला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तीच लग्न तुमच्या सोबत झाल होत !! आणि काही महिन्यांनी माझी ही अवस्था झाली !!!
मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली असच मला वाटत !!!

हे सर्व ऐकुन अनिरुद्धला नवीनच धक्का बसला होता .
अश्या प्रकारच्या कथा त्याने सिनेमात वा एखाद्या कथेतच वाचले होते . त्याने अंकीताच्या वाढदिवसाची खूप स्वप्ने रंगवली होती तिला तो एक सरप्राइझ देणार होता पण आज त्यालाच नियतीने येवढं मोठं सरप्राइझ दिलं होत. .....

त्याला संतोषचा राग येवू लागला होता पण त्याला नशिबानेच शिक्षा दिली होती !

पण त्याच्या समोर आता एकच प्रश्न होता संतोषने असा का केलं ???

" तू का केलंस अस ??? तुझ्या अश्या वागण्यामुळे तीन जणांचे आयुष्य खराब केलंस तू !!!
अनिरुद्ध ने संतापून त्याला विचारले.

" तीन नाही चार "

" चार कशे काय ?? चौथी व्यक्ती कोण ??

" अर्जुन कुलकर्णी "

" आता हा कोण ??? अर्जूनशी याचा काय संबंध ?? अनिरुद्ध आता गोंधळला होता !!


---------- क्रमशः ----------