prem - veda - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम - वेडा भाग ५

प्रेम - वेडा (भाग ५)

अनिरुद्ध घरी आला होता .... आपल्या बायकोचे लग्ना आधी असलेल्या प्रेमप्रकरणा विषयी त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होते . या सर्व गोष्टीत त्याला आठवले की ज्या गोष्टीसाठी तो सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ गेला होता ती गोष्टीच बस मध्ये विसरला होता .
अंकितासाठी आणलेलं गिफ्ट बसमध्येच विसरल्याने त्याला नवीन प्रश्न पडला होता की आता अंकितला गिफ्ट मद्धे काय द्यायचं ???

तेवढ्यात अंकिता समोरून पाणी घेवून आली व म्हणाली " सकाळ पासून बाहेर होतात , थकला असाल जरा आराम करा आता " अस म्हणत हातातील ग्लास अनिरुद्ध ला दिला .

पाणी पीत अनिरुद्ध अंकिताला दपकत- दपकत विचारू लागला " तुम्ही नितीन देशमुख याला ओळखतात ???"

या प्रश्नाने अंकीताच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता ... तिला समजत नव्हतं की काय सांगावं , म्हणून तिने अनिरुद्ध लाच प्रश्न विचारणं सोप्प समजल !!
" आज चार वर्ष झाली आपल्या लग्नाला , तुम्ही आज का नितीन बद्दल विचारत आहात ?? "

अनिरुद्धला अंकिताचा भूतकाळ लवकरात लवकर जणायचेच होते . त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता म्हणून त्याने अंकिताला सांगितले " आज तुझा मित्र संतोष भेटला होता , त्याने तुझ्या आणि नितीन च्या प्रेमा विषयी सांगितल ते खरं आहे का ???"

अंकिता म्हणाली " तसं ही माझं लग्न तुमच्याशी झालं आहे , आणि त्याच नाव सुद्धा ऐकायचं नाही आहे मला , तो मेला आहे माझ्यासाठी !!

अनिरुद्ध ला हे सर्व ऐकुन धक्का बसला . त्याने विचारले येवढं प्रेम करून सुद्धा तुझ्यासाठी मेला ???
जर तुझ्या साठी तो मेलाच असेल तर का बर तुझ्या चेहऱ्यावर आधी सारखं हास्य नाही ?? का तू अजून त्याच्या विचारातून बाहेर नाही पडलीस ??? ४ वर्ष झाली लग्नाला का बरं एकदाही मला प्रेमाने मिठी मारली नाहीस ??? माझ्या खूप प्रश्नांची उत्तरे तुझ्या आणि नितीनच्या प्रेमातून मिळणार आहेत . माझं काही चुकल असेल तर माफ कर मी पहिल्यांदा तुझ्याशी अस उद्धट वागतोय पण , हात झोडून विनंती करतोय की सांग मला अस काय झालं होत , अजून नाही राहवत अस , सर्व जवळ असून काहीच नसल्या सारखं अजून नाही जगता येत मला !!!

अनिरुद्ध चार वर्षात पहिल्यांदाच तिच्यावर चिडला होता , त्याने कधीच तिच्या कडे कोणतीच मागणी ठेवली नव्हती . चार वर्षात त्यांना मुल नव्हत लोक अनिरुद्ध ला बर वाईट बोलू लागले होते मात्र , अंकिताच्य प्रेमा पोटी तो काहीच बोलला नाही . आणि आज हे सर्व ऐकुन अंकिता ला खूप वाईट वाटत होत . या सर्व गोष्टींना तीच जबाबदार होती . कारण लग्न होवून सुद्धा ती नितीनला विसरू शकत नव्हती .

अंकिताने आपली मान खाली घातली व तिच्या पहिल्या प्रेमा बद्दल सांगू लागली होती !!!

अभिनव कॉलेज घरा जवळच असल्याने m.com सुद्धा तिथूनच करायचे ठरवले .

घरातून वेळेवर कॉलेज मध्ये जायचं व कॉलेज नंतर वेळेवर घरी यायचं त्यात वडील मुख्याध्यापकांचे चांगले मित्र असल्याने मी b.com पर्यंत कधी प्रेमात पडायचा विचार सुद्धा केला नाही . मुळात मला प्रेमात पडण्या योग्य मुलगाच मिळाला नाही . M.com चे शिक्षण सुरू झाले . वडिलांचे मुख्याध्यापक मित्र सुद्धा आता रिटायर झाले होते . व येवढ्या वर्षा पासून कोणत्याच मुला सोबत जास्त बोलण नसल्याने आई वडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसल्याने मैत्रिणीच्या नावाचा वापर करून कधी अर्धा ते कधी एक तास उशिरा घरी जाण्यास परवानगी सुद्धा मिळाली होती .

सर्व खूप छान चाललं होत . मला प्रेमात काही रस नव्हता मुळात मला प्रेमाचा अर्थच माहिती नव्हता .
माझ्या मते मुलींसाठी प्रेम म्हणजे फक्त एक आकर्षण . व मुलांनसाठी प्रेम म्हणजे फक्त टाईमपास ... हीच माझी समज होती .
म्हणून मला येणाऱ्या प्रत्येक एका प्रपोज ला मी नकार दिले . तसेही जर खर प्रेम झाल तरी माझे वडील माझं लग्न इतर जातीच्या किव्वा कोणत्याही मुलाशी करून देणार नाहीत हे माहिती होत .

म्हणतात ना आपण विचार करतो तस कधीच घडत नाही . पहिल्या सेमीस्टरचा परीक्षेचा वेळापत्रक बोर्ड वर लावला होता , तोच बघण्यासाठी मी बोर्ड जवळ गेले होते . वेळापत्रक च्या बाजूला काही दिवसांपूर्वी झालेल्या कवितेच्या स्पर्थेतील काही कविता लावल्या होत्या .

मला कविता कधीच आवडल्या नव्हत्या पण काय माहिती कसं ती कविता कुठे तरी मनात घर करून गेली . ती कविता जणू माझ्याच साठी लीहलि आहे अस मनात कुठे तरी वाटत होतं .
ती कविता मला आजही आठवते .

" कित्येकांना तू नाही म्हणालीस
आणि पुढेही नाही म्हणशील
जेव्हा कधी एकटी पडशील
माझी आठवण नक्की काढशील

प्रेम खूप पवित्र अनुभव आहे
या अनुभवाला नेहमी तू झुरशील
प्रेम शोधून थकलेल्या मनाला
आयुष्यभर कसे सांभाळशील
आयुष्यात एकदा तरी
माझी ही कविता आठवशील

तेव्हा ही कविता वाचू नकोस
शब्दात माझ्या हरवशील
प्रत्येकाला नाही म्हणता म्हणता
मग प्रेमात माझ्या पडशील
तू प्रेमात माझ्या पडशील "

त्या कवितेच्या शेवटी एक नाव होत ते म्हणजे " नितीन देशमुख "

मला त्याच्या आणखीन कविता वाचायची इच्छा झाली पण कुठेच त्याच्या कविता नव्हत्या .

तेव्हा खूप शोधल्या नंतर Facebook वर त्याच्या कविता मिळाल्या ...

तो दर एका आठवड्याला एक कविता पोस्ट करायचा ... हळू हळू मला याची सवय होवू लागली . मला अस वाटत होत तो फक्त माझ्याचसाठी कविता लिहतोय ... कविता आवडता आवडता कधी त्या कविते मद्धे रमले मलाच कळलं नाही ....
व शेवटी मी त्याच्या कवितेच्या प्रेमातच पडले .

त्याच्या कवितेच्या जगात वावरताना एक वर्ष कधी निघून गेला कळलंच नाही .
एके दिवशी सानिका माझ्या कडे एक पत्र घेवून आली . तिने सांगितल " नितीन ने हे पत्र तुला द्यायला सांगितलं आहे " ...

हे ऐकुन मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता .
मी वेळ न घालवता ते पत्र वाचू लागले . मला पण त्याच्या पत्राचे उत्तर द्यायचे होते पण मला पत्र - कविता लीहता येत नव्हत ...

दोन दिवस असेच गेले , ना तो पत्राच उत्तर मागायला आला आणि ना मी त्याला पत्राचे उत्तर दिले .

तिसऱ्या दिवशी मी सानिकाच्या घरी गेले होते .स्वतःच्या घरी परतत असताना उशीर झाला होता .

मी माझ्या स्कुटी वरुन घरी जात होते . थेंब थेंब पाऊस पडू लागला होता . हवामानात अचानक बदल होवू लागले . वातावरणात गारवा वाढू लागला होता . पाऊस वाढण्या आधी घरी पहचायचे होते म्हणून मी गाडीचा वेग वाढवला . मी वेग वाढवला होताच तोवर पावसाची गतीही वाढली .
थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचे रूपांतर आता धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये झाल होत. माझे कपडे अर्धे ओले झाले होते . मला पूर्ण भिजून घरी जायचं नव्हत . तेवढ्यात मला एका झाडाखाली भुट्टा वाला दिसला .
त्याने आपल्या गड्याच्या बाजूला छप्पर लावलं होत . लिंबू पिळून , मिर्ची मसाला लावलेल्या त्या मक्याच्या कणसांना बघून तोंडाला पाणी सुटलं होत .
म्हणून मी गाडी त्याच झाडाखाली लावली .

भूट्टा घेण्यासाठी मी बॅग मद्धे हात टाकला तर माझे पाकीट बॅगेत नव्हते . मला नंतर लक्षात आलं की बॅग बदलताना पाकीट घरीच राहील होत .

माझ्या पँट च्या खिशात १० रुपयेच होते . पण भूट्टा २० रुपयांचा होता . काकांना अर्धा भूट्टा तर मागू शकत नव्हते . म्हणून तशीच पावसांच्या थेंबांना बघत उभी होते .
मला थांबून काहीच सेकंद झाले होते तेवढ्यात बाईक वर नितीन देशमुख याच भूट्टया वाल्या जवळ येवू लागला होता .

त्याला माझ्याच दिशेने येताना बघून मनाची धडधड वाढली होती . जेवढा सुंदर तो फेसबुक मधील फोटोंमध्ये दिसत होता तेवढाच सुंदर तो प्रत्येक्षात दिसत होता .

तो माझ्याच बाजूला उभा राहिला . मला त्याच्याशी बोलाव अस वाटत होत , त्याच्या पत्राचं उत्तर द्यायचं होत . मला त्याच्या कवितेची प्रशंसा करायची होती . पण तो माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता .

मला भूट्टा घेण्यासाठी १० रुपये कमी पडत होते . म्हणून बोलायची सुरुवात म्हणून मीच त्याला बोलले .
" नितीन तुझ्या कडे १० रुपये आहेत का ? मी कॉलेज मद्धे देते तुला . काय आहे ना , माझे पाकीट मी घरीच विसरले आणि मला भूट्टा खायचं खूप मन झाल आहे .

मला बघून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता ,
" अंकिता तू इथे ??? खरंच मी तुला बघितल नाही . बर एक मिनिट थांब आलोच " अस बोलून तो काकांजळून दोन भुट्टे घेवून आला व एक मला दिला ...

अंकिता - " तुझी कविता छान होती , आवडली मला !! "

नितीन - " कोणती कविता ?? "

अंकिता - " तीच जी तू पत्रात लिहली होतीस !! "

नितीन -" तुला कसं माहिती ती कविता मी लिहलि आहे अस ??"

अंकिता -" अरे असा काय म्हणतोय ??? पत्र तू दिलंस तर कवितापण तूच लिहिली असशील ना !!! "

नितीन -" कोणत पत्र ?? मी नाही लीहल कोणत पत्र !!"

अंकिता -" अरे तेच पत्र जे तू सानिका जवळ दिलं होतस . " अंकिता आता पूर्ण पणे गोंधळून गेली होती ...

नितीन - " एक मिनिट .... काही तरी गैरसमज होत आहे ... ते पत्र मी नाही लिहल , ते पत्र अर्जुनने तुझ्या साठी लिहल होत .!!! "

अंकिता - " पत्र तू लीहल नाहीस म्हणजे तू प्रेम नाही करत ??? मला वाटल तू सर्व कविता मला उद्देशून लिहत आहेस ... मला वाटल तुझं प्रेम आहे माझ्यावर , सकाळ पर्यंत खूप खुश होते मी कारण मी तुझ्या कवितांच्या प्रेमात पडले होते आणि पत्रामुळे मला कळू लागलं की तू माझ्याचसाठी कविता लिहतो आहेस पण माझच चुकल !!! "

नितीन - " अख्खं कॉलेज तुझ्या प्रेमात पडलय , माझ्या प्रेम करण्या व न करण्याने काय फरक पडतो , प्रेमात असलो तरी तुला सांगावस वाटल नसत कारण अर्जुन च प्रेम आहे तुझ्यावर आणि मी अर्जुनला दगा नाही देवू शकत .!!! "

अंकिता - " मी अर्जुनला एक वर्षा पासून बघतेय . एका वर्षात तो मला हे सुद्धा सांगू शकला नाही की त्याचं प्रेम आहे माझ्यावर . जरी सांगितल असत तर मी नकारच दिला असता !!! कारण माझ्या मनात फक्त तूच आहेस ... सर्व मुलांच्या प्रेमाला नकार फक्त तुझ्याच मुळे दिला आहे ."

नितीन - " प्रेम तर माझं ही आहे पण नाही होकार देता येत तुला !!! आणि हे खरं आहे की त्या कविता फक्त तुझ्याच साठी लीहतोय व नेहमी लिहत राहीन !!! "

अंकिता - " जर हाच प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्या ग्रुप मध्ये येइन , याच बहाण्याने तुझ्या सोबत राहायला मिळेल व एक महिना वाट बघुयात जर अर्जुनने मला पत्राच्या उत्तराबद्दल नाही विचरल तर तुला माझं प्रेम मान्य करावं लागेल ... "

नितीन - " जर त्याने एक महिना आधीच विचारल तर ??"

अंकिता - " तो मला नाही विचारणार , जर विचारलच तर मी विसरून जाईन की मी तुला आजच्या दिवशी भेटले होते . व तुमच्या मैत्रीच्या नात्यात नाही येणार !!! "

नितीन ने या गोष्टीला होकार दिला ... एक महिना संपला पण अर्जून ने कधी त्या पत्रा बद्दल विचारलच नाही !! मी आणि नितीन प्रेमाच्या रेशमी बंधनात एक झालो !!! त्या नंतर अर्जून अचानक कॉलेज मधून गायब झाला . व कॉलेज मध्ये दिसला सुद्धा नाही . आम्ही आमच्यात इतके गुंतलो की त्याची कधी आठवण सुद्धा झाली नाही .

सर्व खूप छान होत ... मी खूप आनंदी होते . पण सहा महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी मद्धे आमच्या नात्याला काय माहिती कोणाची नजर लागली , माझ्या वडिलांना आमच्या प्रेमा विषयी कळलं .
त्याच्या डोक्यात काय माहिती कोणी हे टाकल होत की माझ्यावर नितीन ने काळा जादू केला व आपल्या प्रेमात फसवले आहे .

वडील रोज नवीन मांत्रिक नवीन बाबा बघू लागले होते . मला काहीच समजत नव्हत . मी त्यांना कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला की अस काही नाही पण त्यांना हेच वाटू लागलं की मी नाही तर काळा जादू माझ्या तोंडून हे बोलवून घेतय !!

यात मोठी भर ढोंगी बाबांनी टाकली त्याच्या मते माझ्यावर काळा जादू एका मुलाने केला आहे !!
त्याचा आता ठाम विश्वास झाला होता पण हे सर्व खोटं होतं .

माझा मोबाईल त्यांनी घेतला होता , मला सर्वच गोष्टींची बंदी होती .

माझ्या वाढदिवसाच्या वेळी नितीन ने संतोषला माझ्या घरी मला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलं होत . तेव्हा त्याने मला सांगितल . की ६ तारखेला संध्याकाळी सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ नितीन तुला पळवून घेवून जाण्यासाठी येणार आहे , कोणत्याही परिस्थितीत तू तिथे पोहोच !!!

मी खूप खुश होते ...

२ मार्च ला आई वडिलांची लग्नाची २८ वी ऍनिव्हर्सरी होती , तेथे मी तुम्हाला ( अनिरुद्ध ला) पहिल्यांदा पाहिलं !!

घरातल्यांना संशय होवू नये म्हणून मी लग्नाला होकार दिला . जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा सर्व काही सांगावस वाटत होत मात्र मनात एक वेगळीच भीती होती .
तुम्ही मला खूप चांगले वाटलात , तुम्हाला मला फसवायचं नव्हत म्हणून लग्नाला नकार द्यायला सागंत होते . मात्र तुम्हीच माझ्या वडिलांशी बोलून लग्न करण्यास मंजुरी दिली .

जेव्हा ६ मार्च ला म्हणजे आपल्या लग्नाच्या एक दिवसा आधी मी पळून जाणार होते तेव्हा मी एकटीच सिद्धार्थ नगर ला जाण्यास निघाले होते पण काय माहिती कसे वडिलांना आमच्या बद्दल कळलं असं वाटत होतं मला !!! कारण वडील सुद्धा माझ्या सोबत येण्याचा हट्ट करू लागले होते . व मी ही त्यांना नाकारू शकत नव्हते .
जेव्हा मी सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ पोहोचले . मी ३ तास नितीन ची वाट बघितली पण तो आला नाही . मी माझं सर्व सोडून त्याच्या सोबत यायला तय्यार होते पण तो आला नाही . म्हणून मी तुमच्या सोबत लग्न करायचं ठरवलं . त्याच दिवसा पासून माझं प्रेम मेल आणि माझ्या साठी नितीन सुद्धा मेला !!!! ""

अनिरुद्ध ने अंकिताची सर्व हकीकत ऐकली , त्याला त्याच्या सर्व गोष्टीची उत्तर मिळाली होती .

त्याने अंकिता ला काहीच म्हटले नाही . चेहऱ्यावर एक हास्य आणत तिला म्हणाला .

तय्यार हो आपण बाहेर जातोय !!!

अंकिता - "कुठे ??? "

नितीन - " एक धक्का आहे तुझ्यासाठी !!! "

" धक्का म्हणजे ??? मला नाही समजल , स्पष्ट बोलाल का ?? " अंकिता ला काहीच कळत नव्हत ..

" ते कळेल तुला , तय्यार होवून ये ! एक सरप्राईज आहे ." अनिरुद्ध वेगळ्याच हास्यात म्हणाला .

---------- क्रमशः ----------