Novel - Premaachi Jaadu Part 4 th books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -४ था

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- ४ था

--------------------------------------------------------

बापू-आजोबा आणि अम्मा –आज्जी यांना येऊन आता आठवडा झाला होता. गाव बदलले की

हवामान बदलते, पाणी बदलते ..हा बदल लगेच सहन होईल असे नसते .. मोठ्या –आणि

वयस्कर माणसाना काही न काही त्रास होतोच असतो ,

त्यात फारसे काळजी करण्या सारखे काही नसते ,

गोष्टी अशा सहजपणे घेण्याची सवय यशच्या घरातील सगळ्यांना होती. त्यामुळे ..

थोडाफार त्रास झाला तरी तो सहन करीत आजी –आजोबा म्हणत..

अरे पोरांनो ..तब्येतीच्या या सगळ्या कुरबुरी वयोमानानुसार होणार्या आहेत ..त्याचा गवगवा आणि

बागुलबुवा न करता .आपलं आपण सहन करीत ,आराम करीत काळजी घेत राहिलं की .आराम पडतो.

अगदी या प्रमाणे दोन चार दिवसात दोघे ही आता छान रुळून गेले होते.

सोमवार ते शुक्रवार –ऑफिस-आणि ऑफिस यामुळे इतर कामात इच्छा असून ही फारसा हातभार

लावू न शकणारी अंजलीवाहिनी ..

शनिवार –रविवार या दोन सुट्टीच्या दिवसात ..सुनबाई होऊन घराचा कारभार हातात घेत असते .

कामवाल्या बायकांना हे दोन्ही दिवस यशच्या आईच्या ऑर्डर न ऐकता फक्त अंजली –वहिनीनी

सांगितलेले ऐकावे लागते ..

सुधीरभाऊ अधून मधून म्हणत असतो ..

आपल्या घरात शनी –रवी ..हे दोन दिवस म्हणजे अंजालीज- वाक्यं प्रमाणम ,

आमच्या अंजली-सरकारची “राजवट “असते ..!

अर्थात ..हे सगळे कौतुकाचे आणि प्रेमाचे शब्द आहेत ..टोमणे नाहीत “

हे अंजलीला सवयीने माहिती झालेली गोष्ट आहे ..त्यामुळे “स्वतःचे कौतुक –ती मोठ्या आनंदाने

ऐकून घेत .एका पाठोपाठ कामाचा फडशा पाडीत असते.

हे सगळे पाहून अम्मा –आजी यशच्या आईला हळूच म्हणते ..

काही म्हण – अंजली आहेच एक चांगली व्यक्ती ..!

सगळ्या गोष्टीत एकदम परफेक्ट ..!

पण एकच मोठी वाईट सवय आहे या पोरीची -

स्वताच्या तोंडाने बोलून घालवते सगळ ..पण..हाताने दुप्पट कष्ट करून सारी कसर भरून काढते “,

या तिच्या स्वभावातील एक मोठ्च्या चांगल्या गुणाने ..समोरचा माणूस ..तिच्या फटकळ

बोलण्याकडे दुर्लक्ष करतो...

हे ऐकून यशची आई म्हणते –

अम्मा – मी जे काही शिकले आहे .ते तुमच्या सारख्या अनुभवी माणसांच्या बोलण्यातूनच ,

आणि मला जे कळले ,दिसले , अनुभवले ..त्यातून मी मला घडवीत गेले ..

आणि आता तर ..सेवा-निवृत्ती नंतर असे ठरवले आहे की ..

आपण स्वतहाला अलगदपणे बाजूला ठेवायचे .. पोरं छान आणि चांगलं करतात ‘हे दिसतंय ,

मग, त्यात ..”मी –मी “ करीत आपण लुडबुड नको करायला .

आणि अडले तिथे आहोतच की आपण..!

म्हणून आम्ही दोघांनी ठरवलंय ..सोमवार ते शुक्रवार ..घरात आपले राज्य मस्त चालू असतांना ,

फक्त –दोन-दिवस –आपण बाजूला राहायचे ..अगदी नामा-निराळे ..!

सगळ्या गोष्टीना फक्त ..हो हो आणि यस यस ..म्हणत सगळ्या गोष्टींचा आनंद घायचा .

यश देखील अगदी असेच वागतो ..

खरे सांगते अम्मा तुम्हाला – असे वागण्यात सगळ्यांना खूप आनंद आहे..हे मान्यच करायला हवे.

यशच्या आईचे आणि अम्मा –आजीचे ही खास बोलणे ..बापू आजोबांना स्पष्ट ऐकू येत असते ..

ते म्हणतात –

माणसांच्या आयुष्यात ..तडजोडीचे महत्व फार मोठे आहे ..फक्त फरक इतकाच आहे की ..

केलेली तडजोड ..आपल्या मनाविरुद्ध करावी लागली आहे..”असे समजून वागणारी मनाने कायम

दुखी होऊन वावरत असतात ..त्यांना कितीही समजावून सांगा ..उपयोग नाही.कारण अशा माणसांची

“काही उपाय करण्याची –इछाच नसते “,

“माझ्या मनाला मारून मी जगतोय “ हे रडगाणे गाण्यात त्यांना जास्त आनंद मिळत असतो ..

ही त्यातली खरी गंमत असते ..

आणि ज्या माणसांना ..”तडजोड “करणे म्हणजे आपलेच जगणे सुसह्य करणे असते “ याचे भान

असते..म्हणून ..

”स्वतःकडे कमीपणा घेत तडजोड केली म्हणजे ही माणसे कधीच छोटी होत नसतात ,

उलट..”त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे हे “.!

बापू-आजोबांच्या बोलण्यातला अर्थ दोघींच्या मनाला स्पर्श करणारा होता .

तिघांचे बोलणे चालू असतांना डायनिंग टेबलावर ..सकाळच्या नाश्त्याची ..तयारी करीत

अंजलीने सर्वांना आवाज दिला ..

सगळ्यांना एकाचवेळी जमलेले पाहून ..

सुधीरभाऊ म्हणाला –

वा –क्या बात है..किती मस्त सुटीचा दिवस आहे न !

यशने त्याला दुजोरा देत म्हटले ..

यस ,मला असे खूप आवडते ..

अंजलीवहिनींची निगराणी – त्यांनी बनवलेला नाश्ता,

मस्त –गप्पा –टप्पा ..सोबत अम्मा –आजी – बापू-आजोबा ,आई-बाबा

आपुन तर जाम खुश है बाबा ..!

यशचे बोलणे ऐकून ..अंजली वाहिनी म्हणाली ..

सुनो ..देवर जी –

आता मीच तुमच्यासाठी वधू -संशोधन मोहीम सुरु करणार आहे .

फार लाड झाले तुमचे ..अब यह सब नही चलेगा ..!

अम्मा-आज्जी ,आणि बापू आजोबा ..तुम्हा सगळ्यांच्या समोर मी आज सांगते की ..

तुम्ही इथे असेपर्यंत ..या यशचे ..शुभ-मंगल सावधान “ साठी प्रयत्न करायचा .

मोठी वाहिनी म्हणून मी काही तरी केलेच पाहिजे की नाही ?

अंजलीवाहिनीच्या या बोलण्यावर ..यश सोडून सगळ्यांनी ..टाळ्या वाजवीत आनंद व्यक्त करीत

म्हटले ..

यस अंजली ..या उपक्रमासाठी ..आम्हा सर्वांचा तुला पूर्ण पाठींबा आहे.

हे ऐकून आनंदित झालेली अंजली म्हणाली –

आपण विवाह –मंडळात यशचे नाव नोंदवू या ..

आणि ..संपर्कसाठी ..यशच्या नंबर सोबत संपर्कासाठी म्हणून अजून दोन नंबर म्हणून ..

एक माझा आणि एक आईंचा संपर्क नं देऊ या .

आम्ही दोघी , आणि आजी मिळून ..चर्चा करू ..मुलींची लिस्ट करू..ती यश ला देऊ ..

त्यातून यशने त्या मुलीची समक्ष भेट घेऊन ..पुढचे ठरवायचे ..

ठीक आहे ना हे सर्व ?

आज्जी यशला म्हणाली -

काय रे यश ? आता तुला नो –नो .म्हणयचा चान्स देणार नाही ..

तू फक्त यस –यस .म्हणयचे ..

हो , हो अम्मा आज्जी ? असे म्हणत

अंजलीने आजीला आपल्या गोटात सामील करून घेतले .

आजी आणि आजोबांना तर कधीपासून “ यश च्या लग्नाची घाई लागली होती ..”

ते दोघे म्हणाले ..

यश , राजा ,आता उशीर नको करू रे बाबा ..

आम्ही पिकली पानं , काय भरवसा रे आमचा !

हे ऐकून .यशने दोघांना थांबवीत म्हटले ..

हे असे काही ही बोलू नका ना तुम्ही ..! मी तयार आहे..

लागा तयारीला ..!

हे ऐकून ..सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या ..

अंजलीवाहिनी यशला म्हणाली -

यश -तुला आम्ही फक्त मुली सुचवू ..बाकी सगळा निर्णय तुझा ..!

मग तर झाल ?

सुधीरभैय्या यशला म्हणाला –

यश – अजून किती सवलती हव्या तुला ..?

या अंजली –सरकार कडून ?

या सगळ्यांना कोऑपरेट करायचे आहे, समजले ना ?

ओके बडे भाई ..! यशने मान झुक्वीत मान्य केले .

आज अंजलीवहिनीने यशच्या बाबतीत काही करून दाखवायचे फारच मनावर घेतले आहे

असे दिसते ..!

यशच्या बाबांनी याबद्दल समाधान व्यक्त करीत म्हटले ..

यशसाठी मुलगी शोधणार्या निवड-समितीने ..मोहीम सुरु करण्या आगोदर ..एकदा

खुद्द यशच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घ्यावे ..असे मला वाटते ..म्हणजे तुमची ही

वधू-संशोधन मोहीम “ दणक्यात सुरु करता येईल.

अंजली वाहिनी म्हणाली –

आई-बाबा , हो आपल्या यशचे नाव नोंदवले की बघा –

किती मुलींचे फटाफट इंटरेस्ट येण्यास सुरुवात होते ते..

- यश बद्दलची माहिती वाचून ..हर एक मुलीला आपल्या फैमिलीत येण्यास नक्कीच

आवडेल.

यशची आई म्हणाली .

.अंजली तुझे अगदी बरोबर आहे .

.माझे म्हणे फक्त इतकेच आहे की ..

आता यश ने आपल्या सर्वांना ..त्याच्या अपेक्षा सांगाव्या ..म्हणजे ..

त्याच्या अपेक्षानुरूप मुलींना शोधणे जास्त सोयीचे होईल.

यावर अंजली म्हणाली .. हो आई ,आपण असेच करू या ..

आणि ती यश ला म्हणाली ..

अरे ..यश , माझ्याही सर्कलमध्ये काही छान फैमिली आहेत ..त्यांच्या कडून इंटरेस्ट

आला तर .. तू सरळ .त्यांना ".नाही ..असे म्हणून तोडून टाकू नयेस ..

समक्ष भेट नि बोल ..मग ठरव ..पण ,

माझ्या रेफरन्स ने आलेल्या मुलींच्या कडे तू दुर्लक्ष करू नयेस ,

तुला ती मुलगी पसंत पडलीच पाहिजे ..असा माझा आग्रह मुळीच नसेल , मला काय वाटेल ?

याचे टेन्शन घेऊ नकोस ..! तुला फ्री वाटावे म्हणून इतके खुलासेवार सांगते बाबा !

अंजलीवाहिनी ..खूप खूप थांक्यू ..तू माझा मनातून इतका विचार करतेस .

.छान वाटले.

या घरातील माणसांची तू एक आवडती व्यक्ती आहेस ..त्याचे कारण तुझा हा छान स्वभाव

रियली ..ग्रेट यु आर.

यशचे बोलणे ऐकून ..साहजिकच सगळ्यांना आनंद झाला आहे.हे अंजलीवाहिनीला दिसत होते.

यशला ती म्हणाली ..

ओ हो – थांक्यू यश ..

इतका मस्का नको रे ..फिसल जायेगी तेरी बेचारी भाभी ..

नको काळजी करूस.. तुझ्यासाठी आम्ही अगदी छान ..मुलगी शोधू.

अम्माआजी यशला म्हणाल्या ..

आमचे झाले बोलून आणि सांगून ..आता तू सांग ..तुला कशी हवी आहे मुलगी ..

होणार्या बायको बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या ? त्या कळू दे

..म्हणजे आम्ही लागतो तयारीला ..

यश सांगू लागला ..

हे बघा .. आपल्या घराला आपले मानणारी , तुम्हा सर्वांना सांभाळून घेणारी ,

आणि जिला मी आवडेल , माझे काम आवडेल ..अशीच मुलगी मला हवी ..

असे नसेल तर मग काय होईल ..

घर चांगले , माणसे चांगली ..सुख-आनंद ,समाधान सगळ काही आहे ..

पण.

मी एक सामन्य म्याकेनिक –ग्यारेजवाला , मळकट ,तेलकट राहणारा .असा मी,

मला आमच्या कामाच्या ठिकाणी ..काम करतांना ..पाहून ..माझ्याबद्दल जिला वाटेल

हा यश ..इज ओके..

अशा मुली बरोबर मिटिंग ठरवा ..मी तिच्याशी बोलेन, आणि त्यातून बघू या ..

आमच्यात काही जुळून येण्या सारखे काही आहे का ?

या आहेत माझ्या अपेक्षा ..साध्या आणि सरळ ..

या अपेक्षा स्वप्नाळू ,अवाजवी आहेत असे मला तरी वाटत नाहीये.

बापू आजोबा आणि अम्मा आजी म्हणाल्या ..

यश ..तुझ्या अपेक्षे प्रमाणे नक्कीच होईल सगळे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी -पुढच्या भागात

भाग- ५ वा लवकरच येतो आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------