kadambari Premaachi jaadu Part 6 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ६ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग – ६ वा

--------------------------------------------------------------------

दिवसभराचे कामे आटोपली की.आजी-आजोबांच्या सोबत चहा-चे राउंड करीत करीत गप्पा

करण्याचा नवा टाईमटेबल घरात सुरु झालेला होता.

यशला या गप्पा-मैफिलीची आवड होतीच

अम्माआज्जी आणि बापूआजोबांच्या येण्याने यशच्या घराचे नाव – गोकुळ “अगदी सार्थ

आहे असे वाटत होते . घरातली मोठी माणसे मनमिळाऊ आणि अगत्यशील स्वभावाची असली की

भवताली असलेल्या लोकांच्या मनावर याचा खूप चांगला प्रभाव पडतो “. प्रत्येकाला आपलेपणाच्या

भावनेतून इथे यावे वाटते . आणि सतत माणसांचा राबता असलेले असे घर पाहून ..सहजतेने म्हटले जाते

अगदी नावाप्रमाणे आहे हो हे घर ..भरलेले “गोकुळ “.

यश मनाशी विचार करीत असे – खरेच ..प्रेम ही भावना इतकी जादूभरी कशी काय असते ?

या प्रेमातली शक्ती लोकांना चुम्बकासारखी आपल्याकडे खेचून घेत असते . याची प्रचीती

आपले आजी आजोबा इथे आल्याच्या दिवसापासून येण्यास सुरुवात होते.

तसे पहिले तर वर्षातून एकदा ,किंवा फार फार तर दोनदा ही दोघे ..आपल्या आई-बाबाकडे

राहण्यास येत असतात . पण राहतील तितक्या दिवसात ..यांच्या ओळखी इतक्या पक्क्या

कशा काय होतात ? याचे यशला फार आश्चर्य वाटत असते .

आजी आजोबांच्या सहवासात आलेला माणूस ..पुन्हा पुन्हा यांच्या भेटीसाठी येऊन जातो .

तसे पहिले तर आजी आजोबा कुणाला काही देत नव्हते ..की काही घेत नव्हते ..

तरी ही त्यांच्याकडे येणारा प्रत्येकजण खूप समाधानी होऊन जातो ..ते पुन्हा येण्यासाठी .

यशने एकदा ..आजी आजोबांशी गप्पा करतांना याबद्दल विचारले ..

बापूआजोबा – काही लोक ..त्यांच्याकडे लोकांनी येऊन बसावे , बोलावे ..यासाठी तरसत असतात ,

पण त्यांच्याकडे कुणी फिरकत नाही ..जो कुणी जाईल ..त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी दिल्या जातात ,

असे असून ही ..लोक अशा माणसांच्याकडे आपणहून का जात नसतील बरे ?

आणि आपल्याकडे ..उलटे आहे

..तुम्ही आल्याचे सांगावे लागत नाही ..आजूबाजूच्या लोकांना आपोआपच कसे

काय कळते ? मला या गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटत असते .

आजोबांच्या ऐवजी ..आजी सांगू लागल्या ..

यश ..मी माझ्या अनुभवातून मला जे समजले ते सांगते तुला ..

आमची पिढी ,त्या नंतरची पिढी .म्हंजे .तुझ्या आई-बाबांची पिढी ,आणि आताची तुझी तरुण पिढी ..

आमच्या पिढीची भावना अशी होती आणि ती अजून ही आहे ..

की आपण एकमेकाला धरून राहिले पाहिजे.

आनंद वाटून घेतला पाहिजे अगदी त्याच प्रमाणे ..दुखाचे ओझे आधाराच्या शब्दाने हलके केले पाहिजे .

अश प्रसंगी ..कित्येक वेळा आर्थिक आधारापेक्षा भावनिक आधार जास्त परिणामकारक असतो.

आमचाच हा वसा पुढच्या पिढीने घेतला आहे..पण तो पूर्णपणे नाही घेतला असे मी म्हणेन ..

कारण तुमच्या आधीच्या पिढीने अनेक गोष्टी करतांना पहिल्यांदा आर्थिक गोष्टींना महत्व दिले ,

आणि जे सक्षम होत गेले ..त्यांनी हळूहळू आपल्यातच आर्थिक वर्गवारी निर्माण करून टाकीत..

अंतरातली दरी वाढवली ..ती मिटवण्य ऐवजी ..त्यातले अंतर नेहमीच तसे राहील याची काळजी हे

लोक घेत राहिले .

म्हणून तू जरा आजूबाजूला बघ ..

तुझ्या आई-बाबांच्या मित्रात त्यांच्या वयोमानाप्रमाणे सगळेच सारखेच असतील ..पण, सगळ्यांची

परिस्थिती सारखी नाहीये ..मग, त्या प्रमाणे हे त्या त्या क्लास मध्ये “ विभागून गेले आणि एकमेकांना

दुरावले आहेत..

यांच्या मैत्रीतली जादू , मैत्रीच्या प्रेमातली जादू ..हरवून गेली “, या गोष्टी कुणाला जाणवत नसतील ?

असे कसे होईल ?

पण, ही बदलती सोसायटी , अप्पर क्लास –या गोष्टीच्या नादात आपण अशा किरकोळ गोष्टींना

महत्व द्यायचे नसते “ हे सोयीचे वाटणारे व्यावहारिक ज्ञान सगळ्यात अगोदर शिकून घेतो.

आजीच्या बोलण्याला दुजोरा देत बापुआजोबा बोलू लागले ..

यश , कोणत्या समारंभातले दृश्य तू तुझ्या डोळ्यासमोर आणून बघ –

स्वतःच्या कोशात रममाण असलेली माणसे –आपापला इगो “कुरवाळीत वावरत असतात .आपल्या

बरोबरीचा ग्रुप असला की चटकन त्यात मिसळून जाणार.

आपल्यापेक्षा हायर क्लासची मंडळी असतात त्यात हे पण मिक्स होऊन .असे भासवतात की “अशा ठिकाणी

पण माझ्या ओळखी आहेत.”

पण, आपल्या जुन्या ओळखीच्या साधारण लोकांना जाणून बुजून दुर्लक्षित करण्यात “

यांना फार धन्यता वाटत असते.

आजोबांची हे शब्द ऐकत असतांना ..यशच्या नजरे समोर किती तरी फंक्शन तरळून गेले ..

मोठ्या माणसाचे काय बोलायचे ? आपल्या तरुण पिढीत हा क्लास –इगो “ अगदी भरपूर आहे.

बोलण्यातून –वागण्यातून कमालीची तुच्छता दाखवीत हे सगळे वावरत असतात .

तो म्हणाला –

अगदी बरोबर आहे तुमचे आजोबा – कोणत्याही वयाचे असतो, माणसे प्रय्तेय्क ठिकाणी वेगवेगळी

वागतात . हे सगळे चमत्कारिक आहे.

आजोबा म्हणाले – आमच्या परीने आम्ही यावर एक उपाय शोधलाय ..त्या प्रमाणे आम्ही सगळीकडे

एकाच पद्धतीने वावरतो ,वागतो आणि बोलतो.

इतरांशी बोलतांना ..आम्ही आमच्या बद्दल काही सांगत नाही ,की काही बोलत नाही ..

कारण आम्हाला माहिती झाले आहे आता की-

एकटे पडलेल्या माणसाला ..आपल्या मनातले कुणला सांगावे , मनात कोंडून ठेवलेले मोकळे करावे

असे खूप वाटत असते ..

त्याची या भावनेतून आपण सुटका करू शकलो तर .किती छान ना !

समोरच्याचे ऐकून घेतल्याने काही बिघडत नाही. तो रोज रोज थोडाच येऊन सांगणार त्याची कहाणी ?

आम्ही अगदी मनापासून ऐकून घेतो .आणि..त्याला धीर देतो ..की बाबारे , तुझे सगळे बरोबर आहे ,

फक्त ,तू यापुढे जे काही करणार असशील ..त्यात तुझे काही नुकसान होणार नाही “याची काळजी घेत रहा.

यश –आता तूच ठरव ..आणि सांग ..हे खूप बरोबर आहे असे आमचे म्हणणे मुळीच नाहीये ,

पण, हे बिलकुलच चूक आहे ,असे मात्र कुणाला म्हणू देणार नाही.

हे ऐकून यश म्हणाला -

आजोबा आणि आजी तुमच्या जीवन-अनुभवाबद्दल मी काय बोलणार , माझ्याबद्दल मी सांगेन ..

की ..माझ्या सहवासातील सगळ्या लोकांना मी सदैव मदत करतो , त्यांनी कधी ही हक्काने मला

आवाज द्यावा , मी मदतीसाठी हजार असेन. आज शहरात लहान-थोर सगळेजन मला त्यांचा मित्र

मानतात याचा मला आनंद वाटतो.

आणि आजी –

जी खरेच गरजू माणसे आहेत , ज्यांना कुणी मदत करीत नाहीत ,सगळ्या ठिकाणी निराशाच त्यांच्या

पदरी पडत असते , अशा गरीब व्यक्तींना मी सगळ्यात आधी मदत करतो ,

यशच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवीत आजी म्हणाली –

यश तुझ्या या कार्याबद्दल ..तू आपणहून सांगायची गरजच नाहीये. कारण, आमच्याशी बोलणारे

लोकच तुझ्याबद्दल आमच्याजवळ कौतुकाने सांगतात .

हे ऐकून आमचे मन अभिमानाने भरून येत. आमच्या नातवाने आमच्याकडून काही चांगले असे नक्कीच

घेतल्याचा आनंद आम्हाला खूप समाधान देतो.

यश आजोबांना सांगू लागला –

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे

लोकसेवा ,जनसेवा ..यासाठी पदरचे पैसे खर्च करावेच लागतात असे नाही , उलट ..ज्यांची ऐपत आहे,

ज्यांची इच्छा आहे, असे सेवा कार्य करण्याची , अशा मित्रांना ,त्याच्या परिवारातील लोकांना मी माझ्या

कार्यात सहभागी करून घेत असतो.

शारीरिक परिश्रम , अशा कार्यासाठी द्यावा लागणारा वेळ ..या गोष्टी मी करतो ,

आणि ज्या वेळी आर्थिक स्वरुपाची मदत करायची असते ..तेव्हा अनेकांचा यात हातभार असेल “याची काळजी मी घेतो.

यशचे ऐकून घेतल्यावर आजोबा म्हणाले –

एकदम योग्य पद्धतीने तुझे कार्य चालू आहे. आणि तुझा व्यवसाय –उद्योग स्वरूप देखील

तुझ्या सामाजिक सेवा कार्याला खूप उपुक्त असेच आहे .

आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव.तुझ्या पाठीशी आहेत.

एकदम काही तरी महत्वाचे आठवले “ असे दाखवीत आजी म्हणाल्या ..

अरे यश ..

तुझ्या अंजलीवहिनीने तुझ्यासाठी वधू –शोध मोहीम सुरु केली आहे , त्याचे काय ?

तिच्या ओळखीने जर एखादी आली .आणि तिने तुला तुझ्या कार-शॉपच्या मालकाच्या खुर्ची ऐवजी

मागच्या बाजूला असलेल्या ग्यारेजमध्ये तुला पण तुझ्या माकेनिक सोबत गाडी दुरुस्तीच्या कामात पाहिले तर ?

तेलकट –मळकट , ड्रेस मधल्या यशला

कशी पसंद करील रे कुणी हाय –फाय पोरगी ?

हे ऐकून यश म्हाणाला –

आजी , मी त्यादिवशी सगळ्यांना सांगितले आहे –

"मी जसा आहे तसा “ जिला पसंत असेल ..तिलाच मी पसंत करेल..

विषय संपला .

आजीची समजूत घालीत आजोबा म्हणाले –

हे बघा – आपली भूमिका ..फक्त काय होते हे पाहण्याची .

तू हे कर ,तू असे कर , तू तसे कर ..

या सुचना अजिबात द्यायच्या नाही.

आणि यश ..एक लक्षात असू दे ..

तुझी पत्नी ,तुझी बायको म्हणून जी कुणी या घरात येणार आहे , तिला पारिवारिक जीवनाची

आवड असावी ? याबद्दल तू थोडा आग्रही रहा .

यश म्हणाला -

हो आजोबा – माझी बायको ..ही माझ्या एकट्याच्या आयुष्याचा भाग असेल “ हे मलाच मान्य नाही.

कारण मी समाजिक जीवनात रमणारा माणूस आहे, माझ्या बायकोला या गोष्टीची आवड असेल तर

उत्तमच ..नसेल तर आपल्या सगळ्यांच्या सहवासात ती नक्कीच शिकेल .

रोजच्या प्रमाणे यश आपल्या कार-शॉपकडे निघाला , जातांना त्याच्या डोक्यात .आजी-आजोबा

बोललेले शब्द घुमत होते ..

हाय –फाय पोरी ..कशा पसंत करतील तुला ?

आजीचे शब्द ऐकून ..यशला हसू आले ..

त्याच्या दोस्त कंपनीतल्या मुलींना पाहून आजी काय म्हणेल ?

एका पेक्षा एक भारी पोरी ..,आपल्यामागे हात धुऊन लागलेल्या आहेत , पण, आपण कुणालाच दाद

दिली नाही, हे एकदा आजीबाईंना सांगावे लागेल .

जाऊ द्या ..आपल्या नशिबात जी कुणी असेल ..ती कधी न कधी भेटेलच ..

न भेटून ..जाईल कुठे ?

शो-रूम समोर गाडी पार्क करीत यश ऑफिसमध्ये येऊन खुर्चीत बसला . दिवसाचा आरंभ एकदा

सगळ्यांना सुरु करून दिला की ..मग, दिवसभर ..पुन्हा कोण काय करते आहे ? हे पाहण्याची

गरज नाही .

यश बँकेची कामे करण्यास मोकळा , नतर दिवसभर कस्टमर येतच राहतात ,त्यांच्या एक न अनेक

चौकशा , शंका -कुशंका ,

असे पण खूप कस्टमर येतात ..कार कुठे ही खरेदी करा , तिची सजावट यशच्या शो-रूम मध्येच होणार,

अशा कस्टमर बरोबरच्या चर्चा ,आणि कार कशी सजवून हवी ..यात दिवस कधी संपतो काळात पण नाही.

अशाच समोरच्या एका कस्टमर बरोबर यश बोलत होता ,

आणि काचेतून त्याला बाहेर दिसले ..एक भारी कार येऊन थांबली आहे,

आणि आतून उतरलेली एक देखणी –स्मार्त तरुणी ..यशच्या शो रूमकडे येत आहे असे दिसले .

एखादी आकर्षक मॉडेल येते आहे "वोव , ब्युटीफुल ..!

अशा नजरेने सगळे तिच्याकडे पाहत आहे "हे जणू त्या सुंदरीला सवयीचे असावे.

कोण असेल बरे ?

काय काम असावे आपल्याकडे ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या ..पुढील भागात ..

भाग -७ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------