fathar..is my world books and stories free download online pdf in Marathi

वडील एक वटवृक्ष

. ❣️वडील एक वटवृक्ष ❣️
.
💞 तू पुढे चालत राहा मागे फिरून पाहू नकोस ..
नजरेसमोर रहा माझ्या ...पण
मी तुला दिसणार नाही
उडून इतक्याही दूर जाऊ नकोस...💞

असे म्हणणारे प्रत्येकाचे वडील डोळ्यासमोर ठेवून आजचा हा लेख माझ्या वडीलांसाठी समर्पित...
💞.माझ्या वडिलांचे नाव हरिश्चंद्र कडुबा पाटील ठोंबरे..💞
आम्ही आमच्या वडिलांना काका म्हणतो ❣️... गावातील सगळे जण त्यांना याच नावाने ओळखतात.. गावातील सगळ्यांना कोणतेही कुठलेही काम असो त्यासाठी सर्वांना काकाच हवी असतात.. अगदी एखाद्या लहान मुलाच्या पायाला लागलं जरी किंवा त्याचा पाय मुरगळला त्यासाठी किंवा एखाद्या गाई-बैलांच्या पायाला किंवा हाताला आतून जखम झाली असेल तेव्हाही 🤷
काका इतकी परिपूर्ण कसे असू शकतात हेच मला अजून समजत नाही . इतकी वर्ष झाली पण मी त्यांना समजू शकले नाही ..आम्ही तिघे भाऊ तिघांनाही काकांच्या रागाची खूप भीती वाटत होती ..तशी ताईला (अल्काताई)माझ्या मोठ्या बहिणीला वाटत नव्हती !!❣️
मी आणि सचिन मात्र खूप घाबरायचं म्हणजे अजूनही घाबरतो,😌😌.. आता तर वेदु रुद्र आणि श्याम न श्लोक ही घाबरायला लागलेत..ते खूप खडक शिस्तीचे आहेत त्यांना सगळ्या वस्तू अगदी जिथल्या तिथे आणि व्यवस्थितच पाहिजे आता लहान मुले म्हटल्यावर जरा इकडेतिकडे होणारच पण नाही मुलांनाही तसेच स्थित वागावं असं त्यांचं म्हणणं असतं त्याने मुलांनाही शिस्तप्रिय वळण लागतं..
काकाचा स्वभाव तसा थोडा रागीटच.पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांच्या इतकं प्रेम कुणी आमच्यावर केलं नाही..
त्यांनी आम्हाला नेहमी खरं बोलायचं शिकवलं..❣️
लहानपणापासूनच त्यांना खोटं बोलण्याचा खूप राग यायचा ते म्हणायची जेव्हा आपल्या जीवावर बेतेल किंवा एवढे खोटे बोलल्यानंतर आपण किंवा आपले प्राण वाचू शकतात तेव्हाच आपण खोटे बोलायला काही हरकत नाही...
आयुष्यात काही नसेल तरी चालेल..पण डोक्यावर मात्र वडिलांचा हात असावा.....
सगळेच नेहमी आईला प्राधान्य देत असतात पण आईला आई पण देणारे बाबा नेहमीच दूर असतात
..आईचा खरे आधार असणारी बाबा सगळ्यांच्या जीवनात काहीतरी स्पेशल असतच ना तसेच बाबाही प्रत्येकाला हवेच असतात... आजही काका आम्हाला म्हणजे मला आणि ताईला कोणताही निर्णय विचारूनच घेतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही ते आमचे मत विचारात घेतात.... भले ते कोणत्याही कामाचे असो व नसो...
काकाचे शिक्षण सहावी पर्यंतच झाले आहे पण तरीही ते इंग्रजी एवढी परफेक्ट वाचतात की त्यांना लगेच समजतं आमचं यामध्ये काय चुकलं आहे 😄😄बाकी संपूर्ण ग्रंथ वाचन ते दररोज करतात.. आडगावच्या सप्ताहाला ते दहा दिवस पारायण करतात... त्यांच्या विष्णुसहस्त्रनाम व पंच हरिपाठ मुखपाठ आहेत.. त्यांच्यापासूनच त्यांची विचार संजीवनी आम्ही घेऊन भगवद्गीतेचे पठण करतो.. त्यांना धर्म, संस्कार ,संस्कृती आणि समाजसेवा करायला ते नेहमी तत्पर असतात.. गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्षही आहेत.. म्हणूनच की काय त्यांना सगळ्यांच्या वेदनेची जाणीव असते 😔...
काका एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आहेत ..त्यांची सावली सदैव आमच्यावर राहो...आणि वटवृक्षाच्या पारंब्या प्रमाणे सुखमय जीवन सगळ्यांनी जगाव ...ते आमचे मूळ आहेत त्यांच्यावरच पुढचे कुळ आधारित आहे ...असे आमचे खूप प्रेमळ काका आहेत.

काका एक परिपूर्ण व्यक्ती आहे त्यांच्याविषयी मी अजून काय लिहू... त्यांनी आम्हाला आईची माया दिली आहे🤗... कधीच कशाची कमी भासू दिली नाही... आपली गरिबी आहे ही कधीच त्यांनी ओळखू येऊ दिलं नाही किंवा कुणासमोर दाखवली नाही... त्यांनी दिवस रात्र काम केलं .त्यांना जोड धंदे याविषयी नेहमीच अप्रूप वाटतं ...पहिले ते अगोदर त्यांनी बरेच दिवस मशीन चालवणे.. बोरवेल चालवली.. कधीकधी गाया घेतल्या आजही त्यांच्याकडे भरपूर गायी असतात... त्यांना एक प्रकारचे छंदच आहे आणि हो एक तर सांगायचं राहूनच गेलं ते लहानपणापासूनच एक नावाजलेले मल्ल आहेत... खूप छान पहिलवान आहेत ..त्यांच्याकडून आजही गावातील मुले मल्लविद्येचे शिक्षण घेतात...त्यांचा व्यायामाकडे आणि आरोग्याकडे नेहमीच लक्ष असतं ...
आज त्यांच्यासमवेत आडगाव मध्ये जत्रा च्या दुसऱ्या दिवशी मोठ्या कुस्तीचे आयोजन केले जाते ते तिथले प्रमुख अध्यक्ष देखील आहे ..जत्रा चे सगळे दिग्दर्शन तेच करतात ..नाटक बसवतात ,कलाकारांकडून ते करूनही घेतात ..त्यांना प्रत्येक कामाचा खुप उल्हास आहे कोणतेही काम असो ते हसतमुखाने सामोरे जातात.
मला तर आठवतही नाही की त्यांनी कधीही कोणत्याही कामात माघार घेतली असेल त्यांच्याविषयी आणखी काय सांगू ते काही काव्य नाहीत की त्यांच्याविषयी काव्यामध्ये लिहू...काही ओळी लिहून त्यांची सर कोणत्याही कथेला येणार नाही की त्यांची लेखिका मी होऊ शकत नाही.. 😌😌 खरंच ना🥰

स्पेशल देवाने पाठवलेले गोड आणि अप्रतिम असा उपहार म्हणून देवमाणूस भेटले...😌..

💞💞💞थोडसं थांब जाण्याआधी तुला एक क्षण पाहून घेऊ दे..
जमलं तर त्या एका क्षणात तुझं संपूर्ण बालपणाच आयुष्य जगून घेऊ दे..💞💞💞💞💞

माझे लग्न झाल्यावर मला काकांनी सांगितले की लोकं काहीही म्हणू देत आपण मात्र आपलं काम करत राहायचं ज्यावेळी आपल्याला असे वाटेल की हे योग्य नाही किंवा असे काम केल्यामुळे आपल्या मनात भीती वाटेल.. त्यावेळेस ते काम करायचं नाही....नाही म्हणजे नाहीच🌝

माझ्या सासरी, आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धत आहे त्यांना वाटायचं कि ही सांभाळून घेईल ना. पण आज मात्र त्यांना माझा सार्थ अभिमान आहे की किती पटकन हे एवढ्या मोठ्या घरातही रुळली आहे.
.माझे सासरे (अण्णा.) ही खूप प्रेमळ आहेत...त्यांनी मला नेहमीच वडीलाची माया दिली... देवभक्तची त्यांनाही वेड.. स्वामीजींचे प्रवचन कीव्व कुठलाही कार्यक्रम असला की ते आम्हाला हमखास आग्रहाने घेवून जातात...

काकांना सांगावसं असं वाटतं की तुम्ही मला संस्कारांनी परिपूर्ण बनवून एक भावनाशील व्यक्ती म्हणून जगण्यास संस्कारांनी बनवले आहे ❣️...आजही मी माझ्या मुलांना तुम्ही मला बालपणी शिकवलेले धडे गिरवत आहे ...काका तुम्हाला मला एकदा मनातून सल्यूट करावासा वाटतोय ...🌹
प्रत्येक हलाखीच्या परिस्थितीतही तुम्ही तेच धीरगंभीर आणि सदैव तुम्ही आमच्या सोबत असल्याची जाणीव करून देतात...
त्यांना शब्दात मांडणे मला कधीच जमणार नाही..😇
..मला आज या लिखाणाद्वारे मला एक संधी प्राप्त झाली आहे की मी काकाची अभिवादन करू शकते तसंही मी त्यांच्या समोर गेल्यावर त्यांना बोलू शकणार नाही .. पण काकांना आज सांगावसं वाटतंय की आम्ही तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो तुमच्या प्रेमाच्या सावलीत आम्हाला असेच राहू द्या...जेव्हा ती हा लेख वाचतील माहित नाही कसे रीअॅक्ट होतील ्..यांना खूप आनंद होईल आणि चेहर्‍यावर हसू येईल ही वेडी आहे आणि नी वेडीच राहणार असे ते मला लाडाने म्हणतील, 🌝🌝

💞जीवना तू पण माझ्या वडीलासरखा हो न..
मला जे जे हवं ते ते मला दे...
माझे सगळे लाड पुरव...
माझे वडील जपतात तसे जप ना....💞

ईश्वरा चरणी मी तुम्हाला दीर्घायुष्य मागून स्वस्त आणि सुखमय जीवन मागते तुमचीच लाडकी💞 अर्चना...💞