aaradhy daivat shri viththal books and stories free download online pdf in Marathi

आराध्य दैवत श्री विठ्ठल

💞महायोगपीठे तठे भीमराठ्यां
वरम पुंद्रिकाय दातुं मुनिंद्रे
समा गाम तिष्टांथमनंदकंदम्
परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम्💞... महातिर्थ असलेले,सर्व पिठं मधील सर्व योगपिठ,जेथे साक्षात परब्रम्ह श्री विठ्ठल आपल्या भक्तचाय पुंडलिकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन , भीमेच्या तटावर वसलेले पंढरपूर हे माझे आराध्य दैवत.... अश्या या पांडुरंगाला माझा साष्टांग दंडवत प्रणाम. .

श्रीक्षेत्र ,भूवैकुंठ असलेले पंढरपूर, येथे वास्तव्यास असलेले पंढरीनाथ म्हणजेच श्री विठ्ठल रुक्मिणी..
.. साधुसंत चे माहेरघर.. पुंडलिकाचे पंढरपूर..
🌹जेव्वं नव्हते चराचर
तेव्हा होते पंढरपूर...🌹
ज्यावेळी ह्या चरचारा च उगाम झाला नव्हता त्यावेळी देखील पंढरपूर श्री धाम अस्तित्वात होते..असे आजही तम्प्रपटत उल्लेख आढलतो....
भगवंताचा साक्षात निवास असलेले वैकुंठ नगरी देखील देवाने पंढरपूर स्थापित केल्यानंतर केली असे म्हणतात.
🌹आधी वसवली पंढरी...
मग वैकुठ्नगरी....👣

संतांच्या कार्याने गौरवांवित ही भूमी पवित्र व पूजनीय आहे.. म्हणूनच भगवंता ला देखील इथेच पुनः पुनः अवतार धारण करावासा वाटतो...या च भूमीतील संतासाठी देवाने वेगवेगळे अवतार धारण केले.

🌹ज्या सुखाकरणे..
देव वेडावला..
वैकुंठ सोडून
संतासदनी राहिला..

धन्य धन्य संतसदन ..
जेथे लक्ष्मी सहित...
शोभे नारायण....

सर्व सुखाची सुख रासी
संतचरणी भक्ती मुक्ती दासी..

एका जनार्दनी..
पार नाही सुखा..
देव भुलले देखो देखा..🌹

असे म्हणतात ते काही उगाच नाही...देव आपल्या भक्ता शिवाय राहू शकत नाही . आपले वैकुंठ सूख सोडून संताचे काम करण्यात तो स्वतः ला कृतार्थ मानतो....
खरंच... संतासिवय देवाला देवपण नाही असे म्हणतात ते काही उगाच नाही. वाद ही संतांनी देवासी केले... न सवांद ही त्याच भगवंताशी.
. देव भवभक्तिचा भुकेला आहे.. आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार होणारा श्रीविठ्ठल, त्याच्यासाठी धावत जाणारा मायबाप.. भक्ताची विठाबाई ... पंढरीचा पंढरीनाथ... असे अनेक नावं आपल्या भक्तांनी प्रेमाने ठेवली आहेत.

🌹मनात भरली पंढरी...
जाईन म्हणते माहेरी..
पांडुरंगाच्या दरबारी..
बाई हासत नाचत....

चंद्रभागेचे वाळवंट ...
तेच आमचे वैकुंठ...
आनंद भरला घनदाट ......

पांडुरंगाचा दरबार मिळावे ...
संत मेळावे अपार ...
हरिनामाचा गजर....

डोळ्यात भरला तुकोबा....
मनात भरला ज्ञानोबा...
मुखात भरला विठोबा...🌹

आपण सगळे जाऊया...
गोपाळपूर पाहूया...
हरीच्या लाह्या खवूया...

अमृतवाणी खरोखरी..
दास-दासी वारकरी...
विठ्ठल उभा विटेवरी....,🌹

वारकऱ्यांच्या मनातील हे बोल अगदीच आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात नाही का वरील अभंगातील ओळी मध्ये काय तो भावस्पर्श लपलेला आहे त्यामध्ये भगवंताचे दर्शन भक्ताच्या चरित्रातून होताना दिसत आहे..
वारकरी पंढरी ला जावून संतचाया चरणरज आपल्या कपाळी लावून संताची अनुभूती घेतात . . वारीचा हा वसा त्यांनी आजतागायत कायम चालू आहे..

पंढरपूर मधील श्री विठ्ठल मंदिर 16 खांबावर उभा आहे... त्यातलच एक गरुडखांब... त्या पाषाण वर चांदीचे कोरीव काम आहे . इथेच भक्त मंडळी खांबाला आलिंगन देतात..असे म्हणतात की गरुड खांबा ला आलिंगन दिल्याने विठ्ठल ला च आपण साक्षात भेट घेत आहोत,असे वाटते.. भाविक व्रंद याच खांबाला आपली व्यथा सांगतात. ..

इतर सर्व ठीकणी मंदिरात आपल्याला जोडीने देव देवता दिसतात पण,पंढरपूरमध्ये गेल्यावर आपणास फक्त श्री विठलाची मुर्ती दिसते..त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडत असेल की देवसोबत रुक्मिणी का नाही??? तर याची एक आख्यिका आहे..
ते तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल तुम्ही या कथेचे मनापा वाचन करून आनंद घ्या धन्यवाद...

.....💞Archu💞✍️✍️✍️

(पंढरपूरमध्ये भगवंत दंडकारण्य मध्ये रुसलेल्या रुक्मिणीला मंवण्यासाठी जातात . पंढरपूर मध्ये अनेक साक्षात्कार झाली आहेत त्यापैकीच हे एक माझ्या आजी भोळे मला हे सगळे अनुभवण्याचे मौल्यवान असे शिक्षण मिळाली तरी मी प्रत्येक वेळेस नवनवीन कथेमध्ये दृष्टांत आहे देत असते आणि स्वतःही त्याचा अनुभव घेत असते खरंच अकल्पनीय व अवर्णनीय असे हे धार्मिक दृष्टांत आहेत माझा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न आणखीही नवनवीन गोष्टी मी कधी स्वरूपात तुमच्यासमोर मांडणार आहे आणि हे सर्व.हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोतच... तोपर्यंत काळजी घ्या..take care 😘 byy byy....)
Share

NEW REALESED