Sparsh - Anokhe roop hai - 2 PDF free in Love Stories in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 2 )

बडी मुद्दतो से जाणा है
जिंदगी का सही मतलब
जिंदगी वो नही होती
जीसे हम सपणो मे देखते है ...

तिच्या वेदनांकडे त्याचे जराही लक्ष गेले नव्हते ..तो फक्त तिचा उपभोग घेण्यासाठी आतूर होता ..तिचे डोळे पाण्याने भरले होते याकडे सुद्धा त्याच लक्ष गेलं नव्हतं ..अचानक नित्याला त्याचा चेहरा अधिकच खुललेला जाणवू लागला आणि तिने त्याच्याकडे एकदा नजर टाकली आणि ते सर्व पाहून ती स्वतःच खचली ..रक्ताचे काही थेंब बाजूला पडले आहे हे दिसल्यावर त्याचा चेहरा खुलला होता ..म्हणजे तिच्या चारित्र्याची परीक्षा तो तिच्या क्रोमार्यावरून घेऊ पाहत होता आणि हा तिच्या मनावर आघातच होता ..तरीही ती त्याला एक शब्द बोलू शकली नव्हती ..काही वेळ तो शरीराचा खेळ चालला आणि तीच काम झाल्यावर त्याला आता तीच काही घेणं देणं नसल्याप्राने तोे बाजूलाच सरकून झोपी गेला.तर नित्याच मन मात्र अश्रूंनी भरून निघालं होत ..नित्याने स्वतःला सावरत स्वतःचे कपडे परिधान केले..तशी ती दिवसभर थकली असल्याने तिला झोप येन अपेक्षित होत पण जे झालं ते विचार करून आज तिला काही झोप येणार नव्हती ..ती आपल्या विचारातच हरवली होती आणि त्यात तीच अंगही दुखू लागलं होतं ..बऱ्याच वेळेपर्यंत वर छताकडे पाहताना तिला केव्हा झोप लागली याच तिला भान सुद्धा राहील नाही ..

दुसऱ्या दिवशीची ती पहाट होती ..नित्या गाढ झोपली होती ..थकव्याने तिला उठावस वाटत नव्हतं ..तर तिला पहाटे पहाटे कुणीतरी उठवल्यासारखं वाटत होतं ..तिने त्याचा हात बाजूला केला आणि पुन्हा अंगावर चादर घट्ट करत निद्राधीन झाली ..तिने बाजूला कलाटणी घेतलीच होती की एक मजबूत हात तिच्या गालावर येऊन पडला ..तो हात इतका भारी होता की ती खडबडून जागी झाली ..तिच्या डोळ्यांची अजूनही उगडझाप सुरूच होती त्यामुळे समोरच तिला स्पष्ट दिसत नव्हतं ..तिने आपले हात डोळ्यावर घेतले आणि तिला समोर मृन्मय दिसला ..ती त्याला काही विचारणार तेवढ्यातच तो पुन्हा सुरू झाला ..तिचा होकार न भरताच तो पुन्हा तिच्यावर अधीन झाला ..एक तर रात्रभर दुखत असलेलं अंग आणि न झालेली झोप यामुळे ती त्रासली होती त्यात तिला सकाळी सकाळी अस काही होईल याची कल्पना देखील नव्हती ..ती त्याला समजावत होती की मी खूप थकली आहे प्लिज आता नको करूया तरीही तो तीच काहीच एकूण घेणार नव्हता ..ती पुन्हा त्याच्या कामात व्यत्यय आणू नये म्हणून त्याने पुन्हा एकदा आपला हात घट्टपणे तिच्या तोंडावर धरला ..आणि खिन्न मनाने तिला ते सहन करण्यावाचून काहीच पर्याय उरला नाही ..पहाटेची वेळ होती मृन्मय आपल्या कामात व्यस्त होता तेव्हाच कुणीतरी बाहेरून दार ठोकत असल्याचा आवाज तिला आला ..तो तिचा रस शोषून घेण्यात इतका व्यस्त होता की त्याला त्या आवाजाच काही घेणं देणं नव्हत ..पुन्हा एकदा मृन्मय असा बाहेरून आवाज आला आणि त्याच्या लक्षात आलं की बाहेर आपली आई उभी आहे ..त्याच्या लक्षात येताच तो गडबडीने तिच्या दूर झाला ..कपडे परिधान करत तो पुन्हा झोपेच सोंग करू लागला ..तर नित्याला कपडे चढवायला वेळ लागत होता ..इकडे सासूबाई दार ठोठावतच होत्या त्यामुळे ती जास्तच गांगरली होती ..कशीतरी स्वतःला सावरत ती दारावर पोहोचली आणि तिने दार उघडलं ..झालेलं कमी होत की काय समोर सासूबाई बोलू लागल्या , " ए महाराणी किती आवाज द्यायचे आम्ही आणखी ? ..आम्ही वेडे दिसतो की काय तुला ? .मस्त उठली बापाच घर असल्यासारख ! ..इतक्या उशिरा उठणार आहेस तर काम कोण करणार आहे ..तुझा बाप येऊन करणार आहे की काय ? ..चल हो बाजूला आधी आत येऊ दे आणि आम्हा सर्वांसाठी चहा आन .."

वडिलांचा उद्धार केल्याने नित्याचा पारा आणखीच वाढला होता पण मोठ्यासमोर लहान माणसाने बोलणं योग्य नाही म्हणून ती शांत राहिली होती ..

तिने रागाचा आवंढा गिळून आपलं मन शांत केलं ...घरात प्रथा परंपरा याना फारच महत्त्व होते त्यामुळे पहाटे अंघोळ केल्याशिवाय कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही असं सासूबाईंने सागितले होते ..त्यामुळे ब्रश करून ती सरळ अंघोळीला पोहोचली ..अंघोळ करत असतानासुद्धा सासू बाईच्या तोंडाचा पटरा काही थांबला नव्हता ..त्यामुळे अंघोळ करून ती लगेच बाहेर आली ..ती बाहेर येण्याची बहुदा सर्वच वाट पाहत होते ..तिच्या लक्षात आलं की सर्व चहाची वाट पाहत असतील त्यामुळे तिने सरळ किचनरूमचा ताबा घेतला ..एकीकडे नाश्त्यात काय करायचा हा विचार ती करत होती तर दुसरीकडे जेवणात काय बनवायचं हाही प्रश्न तिला सतावत होता ..विचारांनी तिला चारही बाजूनी वेढा घातला होता ..विचारात हरवलीच होती की चहा उतू जातोय हे तिच्या लक्षात आलं आणि गॅस बंद करन्याच्या घाईत उतलेला चहा तिच्या हातावर पडला ..चटका बसताच तिच्या तोंडून आई ग !! शब्द बाहेर आले ..चहा इतका गरम होता की ते चटके तिला नकोसे होऊ लागले ..तिच्या त्रासात आणखीच भर पडला होता ..ती आपल्या हाताकडे बघत होतीच तेव्हाच सासूबाई जोराने ओरडत म्हणाल्या , " आता काय दिवे लावत आहेस किचनरूम मध्ये .." तिच्या लक्षात आलं की इथे आपली कुणीच काळजी करणार नाही त्यामुळे भाजलेल्या हाताकडे दुर्लक्ष करत ती सर्वांसाठी चहा घेऊन आली ..सासूबाईंने चहाचा घोट घेतला आणि तिच्याकडे रागाने पाहू लागली ..तर नित्याच मन आणखीच घाबरू लागलं होतं ..सुदैवाने सासूबाई काही बोलल्या नाहीत आणि नित्या पून्हा किचन रूममध्ये परत आली ..

नित्या लहान असतानाच तिची आई वारली ..तिला तर आईचा चेहरा पण आठवत नव्हता ..आई गेल्यानंतर आजी तिला स्वतःकडे राहायला घेऊन गेली ..नित्याला तिथे थोडा फार आनंद मिळाला होता ..काहीच दिवसात बाबांनी दुसर लग्न केलं आणि नित्यालाही आपल्या सावत्र आईकडे परत यावं लागलं ...नित्या इकडे परत आली तर होती पण मुलगी म्हणून हक्क आणि सुख तिला तिथे मिळालं नाही ।। ..तेही फक्त आपल्या बायकोकडे लक्ष देऊन असायचे .बायकोला काय हवं नको त्याकडे लक्ष देताना नित्याकडे मात्र जाणून दुर्लक्ष केलं जायचं। ...सावत्र आई असल्याने आई नित्याकडे फार लक्ष द्यायची नाही आणि घरात दोघांमध्ये फार खटके उडायचे आणि त्यातही बाबा नित्यावर हात उचलायला मागे पुढे पाहत नव्हते ..आई आणि नित्यामध्ये वाद इतके विकोपाला जायचे की त्यांच्याशी बोलण्यात देखील नित्याला आता रस नव्हता ..ती आता मोठी होऊ लागली आणि स्वतःहूनच स्वयंपाकाच थोडं फार शिकली होती .थोडं फार तिला नक्कीच यायचं पण तेवढच मात्र सासरमध्ये पूरेस ठरणार नव्हतं त्यामुळे आता तिला विषाची परिक्षा द्यावी लागणार होती ..नित्याने नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि स्वयंपाकाला लागली होती ..एक तर तिला सर्व आवरताना नाकी नऊ येत होते ..आणि दुसर म्हणजे रात्रभर झोप नाही.. त्यात रात्रीच्या प्रकाराने ती थकली होती आणि सकाळपासून तिला कामात फुरसद नव्हती त्यामुळे जीवावर येत ती काम करत होती ..मृन्मयदेखील ब्रश करून किचन मध्ये पोहोचला होता ..त्याला चहा हवा असल्याने तो सरळ किचन मध्ये पोहोचला .किचनकडे कुणाचं लक्ष नाही हे पाहून त्याने नित्याच्या नितंबावरून हात फेरायला सुरुवात केली ..तिला त्याचा फार राग आला आणि तिने त्याचा हात बाजूला केला ..तर तो रागात म्हणाला , " आता नवऱ्याला चहा पाजनार आहेस की असच ठेवणार आहेस .." एक तर तिला कामात वेळ भेटत नव्हता आणि त्यात तो एखाद्या राजासारखं फर्मान ठोकत असल्याने तिला फार वाईट वाटलं ..कमीत कमी त्याने तरी तिला समजून घ्याव अशी माफक अपेक्षा तिची होती पण तीही अपेक्षा क्षणात फोल ठरली ..आणि नाईलाजाने बाकी काम बाजूला सारून तिने त्याला चहा ठेवला ..चहा घेताच तो टीव्ही पाहण्यात व्यस्त झाला तर नित्या पुन्हा जेवण बनविण्यात व्यस्त झाली ...

लग्नानंतर मृन्मय आज पहिल्यांदाच ऑफिसला जाणार होता ..एक तर उठायला उशीर वरून उठताच टीव्ही पाहण्यात मग्न झाला ..ह्या सर्व नादात त्याच वेळेकडे लक्ष नव्हतं ..त्यामुळे साहजिकच त्याला उशीर झाला ..आई त्याच्यावर ओरडल्यावर मात्र त्याने तयारी करायला धाव घेतली ।.अंघोळ करून तो तयार झाला होता तर आई त्याच्या नावाने ओरडत होती आणि तोच राग नित्यावर काढण्यासाठी तो किचनमध्ये पोहोचला ..." अशी कशी वेंधळट आहेस ग तू !!.तुला कळत नाही का माझी ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे तरीही अजून मला टिफिन मिळाला नाही ..सकाळी जरा लवकर उठून सर्व आवरून घ्यावं हे पण कळत नाही का तुला ", मृन्मय म्हणाला ..

नित्याचे डोळे आधीच लाल झाले होते ।.तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले ...ती मनातल्या मनात म्हणत होती .." उशीर कुणामुळे झाला ? ..एकतर रात्रभर स्वतःच जागवायचं आणि सकाळी झोप पण होऊ द्यायची नाही ..मीही माणूसच आहे थकत नाही की काय !!.." ते सर्व बोल बहुदा त्याला लक्षात आले आणि तिचे ते धारदार डोळे पाहून तो बाजूला सरकू लागला ..तेव्हाच आई मागून म्हणाली , " आणलीस ना लाडाची बायको मग कर सहन !!.."

नित्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रूंनी धाव घेतली पण तिने ते लगेच पदराणे पुसून घेतले ..बहुदा तिला रडण्याचा अधिकार देखील या समाजाने दिला नव्हता ..तरीही तो दिवसभर उपाशी राहू नये म्हणून तिने लगेच टिफिन बनवून त्याला सोपविला आणि तो एकही शब्द तिच्याशी न बोलता घाई घाईतच बाहेर पडला ..तिला वाटत होतं की त्याने आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोलावे म्हणजे आपला हा थकवादेखील नाहीसा होईल पण अस काहीच झालं नाही ..ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत होती ..पण तो तिच्याकडे न पाहताच निघून गेला ..नित्याला खूप वाईट वाटलं पण तरीही ती काहीच करू शकली नाही ..स्वयंपाक बनवून झाला तेव्हा दुपार उलटून गेली होती ...सासूबाई या टोचून बोलणाऱ्या ..त्यामुळे स्वयंपाकामध्ये त्या काही दोष काढनार नाहीत हे शक्यच नव्हतं ..पुनः एकदा स्वयंपाकवारून त्यांनी तिच्या आईचा उद्धार करण्यास सुरुवात केली ..तरीही तिने एक शब्द तोंडातून बाहेर काढला नव्हता ..सर्व काही आवरून सुमारे अडीच वाजले होते ..सकाळी झोप पूर्ण झाली नसल्याने ती बाजूला असलेल्या बेडवर जाऊन पडली आणि तिला क्षणातच झोप लागली ..झोप इतकी गाढ होती की तिला बाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष नव्हतं ..काहीच वेळ झाला असेल तर समोरून आवाज आला .." ए महाराणी इथे झोपायला आली आहेस की काय ..बघ 4 वाजले आहेत घड्याळात ..तुझ्या सासर्याना रोज 4 वाजता चहा लागतो ..तेव्हा उठ आणि बनव आम्हाला चहा ..तिचा हात खेचतच सासूबाईंने तिला बेडवरून बाजूला केले..तिनेही क्षणाचा विलंब न करता किचनकडे धाव घेतली .सासरे थोडे नाजूक स्वभावाचे ..नित्या त्यांचीच पसंद असल्याने ते तिला फार काही बोलत नव्हते ..पण आपल्या बायकोसमोर एक शब्ददेखील काढणं त्यांनाही जमत नव्हतं त्यामुळे तिचा होणारा छळ पाहण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ..तीही ते सर्व काही विसरून कामात लक्ष लावत होती ..

चहा बणवून झाला होता .थोड्याच वेळात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागणार होती त्यामुळे थोडा वेळ आराम म्हणून ती बेडवर पडली होती ..2007 - 8 मधली ही घटना होती ..त्यावेळी शक्यतो सर्वांकडे साधे फोन होते ..ती पडलेली असतानाच बाजूला फोनवर मॅसेज येऊन धडकला ..त्यावर मृन्मयचे नाव असल्याने तिने घाईतच फोनकडे लक्ष घातले ..आणि ती मॅसेज वाचू लागली ...

📱नित्या सॉरी मला आज यायला थोडा उशीर होणार आहे ..म्हटलं तुला आधी कळवाव..( हे पाहून तिचा चेहरा खुलला ) ..एक ना कालची रात्र खरच खूप सुंदर होती सो शक्य झालं तर लवकर काम आटोपून घे .।म्हणजे त्यांना क्षणांना पुन्हा खास बनवता येईल ..मी आतुर आहे त्यासाठी .माझी वाट पहा ..मी येतोय लवकर ..!!

नित्याने मॅसेज बघितला नि स्वतःवरच हसू लागली ..ती मनात म्हणून गेली , " काय आयुष्य आहे ..नवऱ्याने कशी आहेस हे विचारावं म्हणून त्याचा मॅसेज उघडून बघितला तर त्याला फक्त शरीराची भूकच सुचते आहे ..यासाठीच त्याने लग्न केलं का ? ..बायकोच्या फक्त शरीराच्याच गरजा असतात का ? की तिला मनाने समजून घेणारा पती हवा असतो .केव्हा कळणार हे सर्व मृन्मयला की आयुष्यभर कळणारच नाही ..आणि नाहीच कळले तर ? .."

नित्या आता रडण्याऐवजी स्वतःच्याच विचारांवर हसत होती ..तेवढयात त्याचा दुसरा मॅसेज आला आणि तिनेही नम्रपणे उत्तर दिले ..

📱 हो ये मी तयार असेल त्यासाठी ..

त्यानेही नंतर दोन चार मॅसेज केले जे फक्त रात्रीच्या प्रसंगावर होते तर नित्या आताही स्वतःच्या स्त्रीपणावर हसत होती ..अशी स्त्री जी माहेरी वडिलांवर ओझं असते तर सासरी उपभोगाची वस्तू...

क्रमशः ...

Share

NEW REALESED