Sparsh - Anokhe roop hai - 8 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 8 )

माना की थोडी बेबस हु
जी लेती हु तेरी छाव मे
पर ये ना सोचना की मैं बोझ हु तुझपर
मै तो वो हु जीससे तेरा दुनिया मे वजूद है

नित्या आतमध्ये पोहोचली नि सासूबाईनि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली..तर नित्याने किचनमध्ये जाऊन सरळ पाण्याचा ग्लास ओठी लावला..ती पटापट पाणी घशात ओतत होती आणि सासूबाई प्रश्न विचारत होत्या ...सासूबाई प्रश्न विचारत असल्याने शांत बसणं योग्य नव्हतं त्यामुळे नित्या मोजकच उत्तर देत होती ..त्यामुळे सासूबाई थोड्या रागावल्या पण नित्याच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं ..नित्या घरी पोहोचली तेव्हा घरातले सर्व काम आवरले होते ..नित्याला भूक लागली होती पण अलीकडे तिच्या पोटात काहीच पचत नसल्याने तिने जेवणाकडे पाहिलंसुद्धा नाही ..ती आपल्याच विचारात हरवली होती ..आपल्याला मुलगी होणार आहे हे ऐकून ती मनातून खुश झाली होती पण हे ऐकताच कुठे घरच्यांना ती नकोशी होऊ नये याची चिंता तिला अधिकच सतावत होती ..त्यामागे कारणही तसच होत ..नित्याचे बाबा मुंबईच्या बेस्टमध्ये चालक होते ..नित्याची आई गेल्यावर त्यांनी लगेच दुसर लग्न केलं आणि पुन्हा घरात लहान लहान मुलांचे आवाज येऊ लागले ..आईबाबा असो की कुणीही असो सर्वांनी फक्त मुलाची अपेक्षा ठेवली होती पण लग्नाचे 4- 5 वर्ष होऊनही त्यांना मुलगा झाला नव्हता उलट मुलाच्या प्रयत्नात नित्याच्या नंतर दोन मुली जन्माला आल्या..त्यांनाही थोडी फार त्याच दर्जाची वागणूक मिळाली होती पण त्या दोघी सख्या आईच्या मुली असल्याने त्यांना हवं ते मिळत होत..इतकं असूनही त्यांची मुलाची अपेक्षा काही संपली नव्हती ..कदाचित आपल्यावर देव कोपला असेल म्हणून त्यांनी देवाला नवस केले आणि साधारणतः वर्षभरानंतर त्यांना मुलगा झाला ..मुलगा झाल्याने संपूर्ण चाळीत त्यांनी जल्लोष केला होता ..मुलगा झाल्यानंतर त्याला हवं ते हातात मिळत होत पण वडिलांच नित्याकडे मात्र कधी लक्षच नसायच..मुलाच खान पिन यासाठी त्याला हवे तेवढे पैसे पुरवले जायचे पण नित्याच शिक्षण घेण देखील त्यांना मान्य नव्हत..विचार करता करता नित्याला आठवला तो शाळेत असतानाचा प्रसंग ..नित्या तशी हुशार ..नेहमीच प्रथम तीन मध्ये ती यायची पण त्यावर्षी ती तिमाही परीक्षेत काठावर पास झाली आणि तिला आपण पास होऊ की नाही याची भीती वाटू लागली ।.ती भीती तिने बाबाना बोलवून दाखवली आणि ट्युशन लावायची विनंती केली ..त्यादिवशी तिचे बाबा सरांकडे पोहोचले आणि म्हणाले , " सर मी एक साधा टेम्पो चालक आहे ..मला 4 मुले आहेत तेव्हा एवढा खर्च परवडणार नाही ..तुम्ही पैशात काही सूट देणार असाल तर मी तिला तुमच्याकडे पाठवू शकतो .." त्यावेळी सरांनी तिला पैशात सूट दिली पण नित्याने सरांपासून घरची स्थिती लपवली नव्हती त्यामुळे तिच्या वडिलांच एकूण सर खूप हसले आणि त्याक्षणी नित्याला सर्वांसमोर मान खाली घालावी लागली ...फक्त त्यांनी तिची शिक्षणाची जिद्द बघून तिच्याकडून पैसे घेतले नव्हते ..एकीकडे मुलावर पाण्यासारखा पैसे उडवणारा बाप मुलीच्या साधा गरजा पूर्ण करत नाही हे पाहून नित्याला फारच वाईट वाटत होतं आणि या काळापासूनच ती त्यांच्यापासून तुटत गेली ..कॉलेजची सहल असो की कुठे बाहेर फिरायला जाण यासाठी त्यांनी तिला कधीच पैसे दिले नाही पण मुलाचे हट्ट पुरवायला मात्र त्यांना कधीच पैशाची कमतरता पडत नव्हती .हा अन्याय तिने घरात पाहिला असल्याने तिला फार भीती वाटत होती ..ती बसल्या जागीच अश्रू गाळू लागली पण यावेळी तिला पाहणार कुणी नव्हतं ...

दुपारची सायंकाळ झाली ..नित्याची अशी अवस्था असतानाही तिला कामात कुणीच मदत करत नसे त्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाला ती लवकरच लागली ..मृन्मयदेखील आज लवकरच आला होता ..चहा घेऊन तो निवांत टीव्ही समोर बसला ..तर आज काय होईल या विचाराने नित्या मनातून फारच घाबरली होती पण एवढं मात्र की त्यांचा निर्णय विरुद्ध असेल तर आपल्या मुलीसाठी लढायची तिने तयारी ठेवली ..काही वेळातच स्वयंपाक पूर्ण होऊन ते जेवायला बसले ..नित्याने सर्वाना जेवण वाढलं आणि सर्वांचं झाल्यावर ती बसली ..पोटात जात नसतानाही थोडं फार तिने जेवण केलं होतं आणि हळूहळू आवरत ती बेडवर येऊन बसली ..घरात त्यावेळी सर्वच बसले होते ।.नित्याला काम करून घाम फुटला होता त्यामुळे ती तो पदराने पुसून घेत होती आणि तिने हिंमते एकवटून अनपेक्षितपणे मृन्मयने विचारले , " काय ग नित्या डॉक्टर बाई काय म्हणाल्या ? "

नित्या त्याच्या शब्दाने चकित झाली आणि थोडं थांबत म्हणाली , " काही नाही ..सर्व काही ठीक चाललं आहे ..काही औषधी दिल्या आहेत लिहून त्या वेळेवेर घे म्हणाल्या .."

थोडा वेळ लक्ष देऊन पुन्हा सर्वांनी आपले लक्ष टिव्हीकडे लावले ..नित्यालाही ती अचूक संधी होती त्यामुळे पुन्हा एकदा ती त्याच्याकडे पाहत म्हणाली , " मृण्मय डॉक्टर बाईंनी पुन्हा काहीतरी सांगितलं आहे .."
तसच मृन्मयने टीव्हीचा आवाज बंद केला आणि सर्व तीच्याकडे पाहू लागले ..नित्या पुन्हा एकदा घाबरली..घाबरत - घाबरतच पुढे म्हणाली , " त्या म्हणाल्या की आपल्याला सुंदरशी मुलगी होणार आहे ..."

शब्द ऐकताच सासूबाई कुनकुन करू लागल्या ..त्यांच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला होता तर नित्या आताही मृन्मयचे हावभाव न्याहाळत होती ..तो शांत झाला होता ..काही वेळ घेत तो म्हणाला , " मग प्रॉब्लेम काय आहे ? ती ठीक तर आहे ना की काही कॉम्प्लिकेशन आहेत.."

तो अस काही म्हणेल यावर तिला विश्वासच बसत नव्हता ..त्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ।.त्या आनंदात ती जोराने बोलून गेली , " हो ती ठीक आहे .आपल्या मुलीला काहीच झालं नाही ।.."

..तीच ओरडण बघून सर्व तिच्याकडे पाहत होते तर तिने लाजून मान खाली टाकली .काही क्षणात सर्व टीव्ही पाहण्यात व्यस्त झाले ..नित्या मृन्मयला न्याहाळत होती ..परंतु त्याच्या हावभावावरून नित्याला कुठलाच अंदाज बांधता येत नव्हता .. ती त्याला मुलगी होणार असल्यावरही काहीही प्रॉब्लेम नाही हे ऐकून खुश झाली ..तर इकडे सासूबाई हळूहळू काहीतरी बोलत होत्या ..त्यात त्यांची नाराजी दिसत होती ..बराच वेळ ऐकल्यावर मृन्मय आईवर जोराने ओरडला .., " काय ग आई किती ओरडतेस!!..एक दिवस पण घरी सुखाने राहू देत नाहीस .."

त्याच्या रागावण्याने आईचा चेहरा पडला आणि त्याच्याही ते लक्षात आलं ..त्याला स्वतःच्या वागण्याच वाईट वाटलं आणि स्वताला शांत करत तो म्हणाला , " आई मुलगी झाली तर काय झालं ..मलाही ताई आहेच ना ..जे व्हायचं असत तेच होत ..तेव्हा मुलगाच पाहिजे हा हट्ट सोडून दे ..शेवटी तु आजी होणार आहेस हेच खूप नाहीं का .."

आईला त्याच बोलणं पटलं नव्हतं पण त्याला वाईट वाटू नये म्हणून ती शांत झाली तर दुसरीकडे नित्याचा चेहरा आता पूर्णतः खुलला होता ..जणू तिने स्वर्गच गाठला होता

नित्याचा अलीकडे गोंधळ होऊ लागला होता ..मृन्मय कधी कधी आवाक्यांपेक्षा जास्त चांगला वागताना दिसे तर कधी कधी तिच्यावर हात उचलायला देखील मागे पाहत नव्हता..तिला विचार यायचा की पैसे दागिने कुठल्याच गोष्टीला कमी न होऊ देणारा मृन्मय शरीराच्या बाबतीत इतका कठोर कसा असू शकतो ..मग तिला त्याने दिलेला त्रास आठवला की तिचा गोंधळ दूर व्हायचा ..मृन्मय तिच्यासाठी एक खरच कोड बनत जाऊ लागला होता ..तो सर्वाना दिसतो तसाच आहे की आपण पाहिल तसा आहे यात ती नेहमीच गोंधळली जाऊ लागली ..

-----------------

नित्याला सातवा महिना लागला होता त्यामुळे घरात डोहाळे जेवणाची तयारी सुरू झाली होती ..मृन्मयच घर तस वेगळंच ..घरात माणसाला किंमत नसे पण जगासमोर मात्र आम्ही कुठेही कमी नाहीत हे दाखवायला ते कधीच मागे राहत नसत ..इतक्या दिवसात नित्याने ते अचूक हेरले होते ..ऑगस्ट च महिना होता ..उद्या नित्याच डोहाळे जेवण करायचं असल्याने घरचे सर्वच उत्सुक होते ..तर कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून खास लक्ष दिल्या जात होत.. .रात्रीच सर्वाना आमंत्रण पाठवून सर्व आपल्या तयारीत होते ..आपल्या मुलीच्या येण्याचा इतका सुंदर सोहळा साजरा होणार असल्याने नित्या देखील खुश होती .मृन्मयने जवळपास सर्व तयारी झाली होती की नाही ते पाहिलं आणि रात्री सर्व झोपी गेले ..

दुसरा दिवस उगवला ..नित्या साखर झोपेत असताना एक हात तिच्या गालावर येऊन पडला ..नित्या घाबरुनच उठली ..तिने समोर बघितलं तर समोर सासूबाई होत्या ।. नित्याचे डोळे उघडताच त्या म्हणाल्या , " ओ महाराणी आज काम करायचे आहेत की नाही ?..आणखी किती वेळ झोपायचा विचार आहे ..शिवाय जेवणाची सर्व तयारी आहे ..ती कोण करणार आहे तुझा बाप की तुझी माय .."

नित्या अवाक होऊन सर्व पाहत होती कारण कालची तयारी पाहून तिला वाटलं होतं की कमीत कमी आज तरी तिला यातलं काहीच करावं लागणार नाही ..पण प्रत्यक्षात तिलाच सर्व करावं लागणार होतं ..ती विचारात हरवली होती की सासूबाईनि पुन्हा आवाज दिला आणि नित्या लगेच बेडवरून उठत फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली ..तिने घरात पाणी भरलं तेंव्हापर्यंत सर्व उठले होते ..त्यामुळे सर्वाना चहा देऊन तिने घर नीटनेटकं केलं ..तिचा पोटाचा आकार वाढला असल्याने तिला काम पटापट करता येत नव्हतं पण तरीही तिला जमेल ती तस करत होती ..मृन्मयने आज पिण्याचं पाणी बाहेरून मागवल होत..त्यामुळे खालून आवाज येताच नित्या खाली गेली ..तिला पायर्या उतरत देखील नव्हत्या पण तरीही एक एक पावलं टाकत ती सावकाश चढू उतरू लागली ..तिला फार वेदना होत होत्या परंतु तिच्याकडे कुणीच पाहत होत ..तिने मृन्मयकडे लक्ष दिलं तर ती आपल्यावर ओरडणार म्हणून तो जाणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करत होता ..नित्यानेही त्याच्याकडून अपेक्षा केल्या नाहीत आणि जस सुरू आहे तस काम करू लागली ..वर ढग तयार झाले होते त्यामुळे पाऊस केव्हाही येईल अस वाटत होतं त्यामुळे नित्याने त्रास सहन करत सर्व पाणी घरात भरलं ..ती फारच थकली होती ..तिला थोडा वेळ निवांत बसायचं होत म्हणून बेडवर पडली पण तिचा तो क्षणभर आनंद सासूबाईंना आवडला नाही आणि स्वयंपाकाची तयारी करायला तिला जावं लागलं ..घरी आज पंच पक्वानाच जेवण बनवायचं होत ।.त्यात तिला स्वताचीही तयारी करायची असल्याने तिला ते काम लवकर आवरन गरजेचं होतं त्यामुळे ती लगेच कामाला लागली ..काहीच वेळात मृन्मयची ताई आणि वहिनी सजून धजून आल्या ..तशाच त्यांच्या गप्पा सुरु झाल्या ..नित्या सर्व स्वयंपाक एकटीच आवरत बसली होती पण हे पाहून सुद्धा त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं ..नित्याच्या डोळ्यात अश्रूंनी जागा घेतली होती पण तिला मदत करायला कुणीच आलं नाही ..नित्याने स्वतःच्या आई बाबाना बोलावून घेतले होते पण ते देखील अजून पर्यंत आले नव्हते ..नित्याला ते सर्व असह्य झालं होतं ..एक हात डोळ्यातील अश्रू पुसत ती काम करू लागली ..अचानक पाऊस सुरू झाल्याने बहुतेक नातेवाईकानी कार्यक्रमाला येण्याचे टाळले होते ..आजूबाजूच्या लोकांना नित्याची कीव येऊ लागली होती पण सासूबाईचा स्वभाव पाहून त्या कुणीच तिच्या मदतीला आल्या नव्हत्या ..स्वतःचे हाल करून घेत तिने संपूर्ण स्वयंपाक शेवटी एकटीनेच आवरला ..

सकाळची दुपार झाली होती ..आता हळूहळू पाहुणे येऊ लागले होते ..तेव्हा सुनेला अशा स्थितीत ठेवण म्हणजे आपला अपमान होईल म्हूणून त्यांनी तिला तिची तयारी करायला आपल्या मुलीच्या घरी पाठवले ..उरलेला सर्व पसारा त्यांनी आवरला ..मृन्मयच्या घरच्याना आपली इज्जत खूप प्यारी होती त्यामुळे तिला सजवण्यात , घर सजवण्यात कुठलीही कमतरता केली नव्हती ..कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती ..काही वेळ गेला आणि चाळीतल्या सर्व स्त्रिया घरी आल्या होत्या ..नित्याने आईला फोन केला तर त्या येणार नाहीत हे कळलं आणि नित्याला आणखीच वाईट वाटू लागलं ..पण आपलाच कार्यक्रम असल्याने ती माघार घेऊ शकत नव्हती ।.शेवटी मृन्मयच्या ताई आणि वहिनीने तिला उत्तम प्रकारे सजवून घरी आणले ..ती आली आणि बायांनी सर्व विधी पार पाडायला सुरुवात केली ..नित्याही आज खूप सुरेख दिसत होती ..आई होण्याचा तो सुंदर अनुभव ती डोळ्यात साठवू लागली पण तिची एक नजर आताही तिच्या वडीलाना शोधत होती ..ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील संपला होता पण तिचे बाबा काही आले नाही ..शेवटी सर्वांनी जेवणास सुरुवात केली ..बाहेर साऊंड बॉक्स वर सुरेल संगीत सुरू होत आणि वातावरण मनमोहक झालं होतं ..घरात आलेल्या पाहुण्यांना मृन्मय आणि त्याचा मोठा भाऊ आनंदाने वाढत होते . एक एक जेवणाची पंगत बसून उठत होती ..नित्याच आताही लक्ष दारावर होत .अस करता करता शेवटची पंगत देखील बसली पण तिचे बाबा आले नाही ..सायंकाळचे 7 वाजले होते ..तिला आता राहवलं नाही आणि स्वतःच फोन करत म्हणाली , " बाबा तुम्ही मला घेऊन जायला येणार होतात ना .." तिच्या बोलण्यात राग सहज जाणवत होता ..बाबाही शांतपणे म्हणाले , " खर तर येणार होतो पण पाऊस खूप येतोय ना म्हणून येऊ शकलो नाही आणि आता यायला जमेल अस वाटत नाही .."

त्यांच्या भावना तिला लगेच कळल्या आणि तिने रागातच फोन कट केला ..मृन्मयच्या घरच्यांनाही कळून चुकलं की ते आता येणार नाहीत ..परंतु प्रथेचा भाग म्हणून नित्याला घराबाहेरून एक चक्कर मारून तिला आणलं होत ..आपल्याच वडिलांना आपण नकोसे झाले आहोत म्हणून नित्याला फार राग आला होता ..तर बाकीचे सर्व तिच्यावर हसून आनंदाने जेवण करत होते ..नित्याने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं आणि आता तर तिने जाणूनच काही खाल्लं नाही ..सर्वांचं जेवण आटोपलं आणि सर्व आपापल्या घरी परतले ..

काल पाऊस असल्याने बाबा आले नाहीत पण आज नक्की येतील अशी आशा तिच्या मनात होती पण दुसऱ्याही दिवशी वाट पाहून ते आले नव्हते ..तर सासूबाईचे टोमणे सुरूच होते .आजपर्यंत सासूबाई टोमणे देत होत्या पण वडिलांनी न येऊन ते सिद्ध केलं होतं त्यामुळे ती अधिकच दुखावली होती ..रोज रोजचे टोमणे एकूण एक दिवस नित्या माहेरीही गेली परंतू प्रत्यक्षात तिला तिथे काहीच किंमत नाही हे तिला जानवंल त्यामुळे एक दिवस राहून ती परतली होती ..आता सासूबाईते टोमणे सहन करतच तिला सर्व दिवस काढायचे होते..

नित्याच्या आई बाबांनाच ती नकोशी झाली असल्याने नाईलाजाने तिला तिथेच थांबावं लागलं ..नित्याला माहेरी न नेन म्हणजे सासूबाईना नित्याला बोलण्याची आयती संधी मिळाली होती आणि ती प्रत्येक क्षणी तिला आठवण करून देत होती .आजपर्यंत आई वडिलांना बोलल्यावर काहीही एकूण न घेणारी नित्या आता मात्र शांत झाली होती ..पण तिला बोलायला शब्दच उरले नव्हते ...नित्याचे असेच दिवस जात होते ..

नित्याचा गर्भ वाढत असल्याने नित्याला काम करणं कठीण होऊ लागलं होतं ..तिला उठण देखील शक्य नव्हतं ..त्यामुळ घरातल सर्व काम सासूबाई करत होत्या ..पण त्या दिवसात त्यांनी नित्याला बोलून बोलून तीच जगणं मुश्किल करून टाकलं होतं ..नित्या बेडवर एका कोपर्याला बसून सर्व काही पाहत बसायची ..अलीकडे तिला आपल्या स्वर्गवासी आईचीच आठवण होऊ लागली होती ..कारण आज तिची आई असती तर कदाचित तिला हे सर्व सहन कराव लागलं नसत ..हे सर्व आठवलं की तिचे डोळे लगेच पाण्याने भरून यायचे आणि सासूबाई त्या क्षणी देखील तिला बोलायच सोडत नव्हत्या ..

क्रमशः .....