Hallusiniation..? in Marathi Thriller by Prathmesh Kate books and stories PDF | भास..की ?

भास..की ?

आज एकटाच असणार होतो मी घरी. आईला आमचे दूरचे कुणीतरी नातेवाईक आजारी होते त्यांना भेटायला जायचं होतं. मी मनात दिवसभराचे प्लॅन्स ठरवत होतो. मला कधीकधी असं एकट्याने राहायला आवडत. आई तिचं आवरत होती. आवरता आवरता तिचं माझ्याकडे लक्ष गेलं.
" मग, आज आईची कटकट नसेल दिवसभर, म्हणून खूश दिसतोय एक मुलगा." आई.
" नाही गं आयडु तुझी कटकट नसेल तर दिवसभर काय तासभरही नाही करमणार मला." मी तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडिकपणे म्हणालो.
" बरं बरं, मस्का नको मारू. आवरायला मदत कर मला." माझ्या गालावर एक हलकी चापट मारत आई म्हणाली. मी तिला आवरायला मदत केली. थोड्या वेळात आवरून आई निघाली.
" चल येते मी, आणि सारखं सारखं बाहेरून ऑर्डर नको करू. मी करून ठेवलय, ते गरम करून खा‌. मी संध्याकाळपर्यंत येईल."
" हो नको काळजी करू" मी तिला मिठी मारत म्हणालो. आई गेली.
" हं, राघव लेले, आज पूर्ण घरावर आपलं राज्य." आरामात सोफ्यावर बसत मी म्हणालो.‌ " अरे, शलाकाला कॉल करायचाय" लक्षातच आलं नाही." मी पटकन खिशातून मोबाईल काढून शलाकाला कॉल केला, आणि तिला बोलावून घेतले.
शलाका. माझी बेस्ट फ्रेंड. तीन वर्षांपूर्वी कॉलेजला आल्यावर आमची ओळख झाली, आणि फारच कमी वेळात अगदी घट्ट मैत्री झाली. शलाका खूप बडबडी, खेळकर आणि बिनधास्त. तितकीच mature. तिच्या मनात कधी काय सुरू असेल सांगता येत नाही. तिला फारसा कुणाचा राग येत नाही. पण आलाच तर ती लवकर विसरत नाही. आम्हा दोघांनाही पिझ्झा आवडतो म्हणून ऑर्डर केला, आणि टीव्ही ऑन करून बघायला लागलो. तसंही एकदा ती आल्यावर मला बघायला मिळणार नव्हती.
पंचवीस तीस मिनिटांनंतर डोअर बेल वाजली. मी दार उघडले. दरवाजात शलाका उभी होती.
" Hii" ती स्माइल करत म्हणाली.
"hii ये आत ये" मी. पण सांगायची गरज नव्हती. माझ वाक्य पूर्ण होण्याआधीच ती आत येऊन सोफ्यावर बसलीसुद्धा होती."
" काय रे, येना तुझंच घर आहे. खट्याळपणे हसत ती म्हणाली.
" मी सुधरणार नाही."मी हसून खांदे उडवत मनात म्हणालो, आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो.
" किती बोअर आहेस रे, न्यूज कसल्या बघतोयस." ती चॅनल बदलत म्हणाली आणि तिने एक हॉरर मूव्ही लावली.
" प्लीज शलाका, हे असं काही नको लावूस तुला माहितीये ना मला भीती वाटते."
" रिलॅक्स काही होत नाही मी आहे ना." ती.
मूव्ही जसा पुढे जाऊ लागला तसे एक एक हॉरर सीन्स येऊ लागले. मला भीती वाटू लागली. तिकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी खिशातून मोबाईल काढून गेम्स खेळायला लागलो. पण मूव्हीच्या भयानक बॅकग्राऊंड साउंड मुळे सारखं तिकडे लक्ष जात होत. तेवढ्यात पुन्हा डोअर बेल वाजली. मी दार उघडले. पिझ्झाची डिलीव्हरी आली होती.
" सर, पिझ्झा."
" थांबा मी पैसे आणतो." मी वॉलेट घेण्यासाठी माझ्या बेडरूममध्ये आलो. ड्रॉवर उघडताना कुणी तरी पाहतंय असे मला वाटलं. माझ्या विचारांच मलाच हसू आलं. मी वॉलेट घेऊन बाहेर आलो. पाकीटातून पैसे काढून मोजताना तो डिलीव्हरी बॉयसुद्धा आपल्या कडे रागात पाहतोय असं वाटलं.मगाशी हॉरर मूव्ही बघितल्यामुळे भलतेसलते विचार मनात येत होते. मी पैसे दिले. आणि पिझ्झा घेऊन शलाका जवळ आलो. मग आम्ही पिझ्झा संपवला.


शलाका :


मूव्ही अगदी फालतू होता. हॉरर असं काहीच नव्हतं. पिझ्झा खाऊन झाल्यावर मी टीव्ही बंद केला.

" का गं, काय झालं ?" राघवनं विचारले.

" काही खास नाहीये. ते जाऊदेत चल आपण एक गेम खेळूयात. मी तुझ्या रूममध्ये जाते. मी आवाज दिल्यावर तू ये." असं म्हणून मी राघवच्या रूममध्ये आले. सर्व खिडक्या बंद करून पडदे लावून घेतले. आणि त्याला बोलावले. तो आतमध्ये आला, आणि बावळटासारखा बघू लागला. मला हसू आलं.

" काय हे सगळ ?" तो.

" अरे किती छान आहे रे तुझी रूम, मला फार आवडते. आणि.. " मी बोलत होते. त्याचं लक्ष तरी होते कि नाही माहित नाही. मी त्याच्या कडे पाहीले. तो इकडे तिकडे बघत होता

" काय पाहतोयेस ?" मी विचारल

" माझ्या खांद्यावर कुणी तरी हात ठेवला, असं वाटल मला." तो म्हणाला.

" अच्छा." तो मला घाबरवण्यासाठी करतोय हे माझ्या लक्षात आलं. मी त्याच्या कडे दुर्लक्ष केल.

अचानक तो जोरात ओरडला. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्या पाठीमागे पाहत होता. आता मात्र तो खरंच घाबरला होता. त्याला घाम फुटला होता.

" मला नाही खेळायचय, चल बाहेर. तो चाचरत म्हणाला. आणि बाहेर जाऊन सोफ्यावर बसला.

" काय झालं राघव ?" मी त्याच्या जवळ जाऊन विचारले. तो थरथरत होता. " थांब मी पाणी आणते." असं म्हणून मी किचनमध्ये आले. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढताना जवळच्या टोमॅटो सॉसच्या बाटलीला धक्का लागला. झाकण loos होत. सॉस माझ्या ड्रेसवर सांडला. मी अचानक काहीतरी सांडल्यामुळे दचकून ओरडले. सॉस आहे हे लक्षात येताच मी त्याला झाकण लावल. माझ्या ओरडण्याच्या आवाजामुळे राघव धावत किचनमध्ये आला. माझ्या ड्रेसला लागलेला सॉसमुळे त्याचा गैरसमज झाला. मी त्याला काही सांगणार तेवढ्यात त्याच्या छातीत दुखू लागले. तो जागेवरचच कोसळला, मी जवळ जाऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. पण.. तोपर्यंत उशीर झाला होता.


" त्याच हृदय कमजोर होतं. अंधारातच काय पण थोडासा मंद उजेड असलेल्या जागीही तो दोन मिनिटेही थांबू शकत नव्हता. हॉरर मूव्ही पाहिली की त्याला भलतेसलते भास व्हायचे." राघवच्या आई पोलिसांना सांगत होत्या. त्यांना आणि मला इतर थोडे प्रश्न‌ विचारून पोलिस गेले. इतकावेळ पोलिस असल्यामुळे शांत असलेल्या काकू आता मात्र हमसून हमसून रडू लागल्या. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारली. मला त्यांच्या साठी खूप वाईट वाटत होत. पण राघवला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी होती.सहा महिन्यांपूर्वी मीत्याला आमच्या सर्व फ्रेंड्स समोर प्रपोज केलं होतं. पण तो मला नाही म्हणाला. त्याला ती अनन्या आवडत होती. त्या ... मध्ये काय आहे अ विचारल तर चक्क मला सर्वांसमोर कानाखाली मारली. तेव्हाच त्याला सोडायचं नाही असे ठरवल होत मी. त्याच्या समोर मुद्दाम हॉरर मूव्ही लावण्यापासून ड्रेसवर सॉस ओतून त्याला घाबरवण्यापर्यंत सर्व व्यवस्थित झालं, आणि..


- समाप्त

@ प्रथमेश काटे


Rate & Review

uttam parit

uttam parit 2 years ago

Vidya Chavan

Vidya Chavan 3 years ago

Jitendra Tapkire

Jitendra Tapkire 3 years ago

Kavya

Kavya 3 years ago

Amit

Amit 3 years ago

Share