Siddhanath - 2 books and stories free download online pdf in Marathi

सिद्धनाथ - 2

सिद्धनाथ 2 (परतफेड)
कडकडीत ऊन पडलेलं होत, रस्त्यावर वर्दळ अशी नव्हतीच, क्वचित एखादं दुसरी गाडी, बस, बाईक दिसे, सिद्धनाथ झप झप चालत होता, रस्ता चांगलाच तापलेला होता, "शिवगोरक्ष .. शिवगोरक्ष...."
अचानक एक गाडी येऊन सिध्दनाथा च्या थोडं पुढे जाऊन थांबली होती, गाडीतून चव्हाण साहेब खाली उतरले होते, गाडीजवळ च बूट उतरवत सिद्धनाथा जवळ ते पोहोचले, पायाला चटके बसत होते, हात जोडले,
"महाराज..मला ओळख ल का ..?"
"म..मी ..",
"इन्स्पेक्टर चव्हाण..!", सिद्धनाथा न त्यांचं वाक्य पूर्ण केलं
"आज इकडे...एकदम गुजरातमध्ये???"
"हो, जुनागड ला निघालो होतो, थोडं ऑफिस च काम"
"महाराज, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू का तुम्हाला जिथे कुठ जायचं आहे तिथे...?"
"चव्हाण साहेब , आता जेमतेम ५० ६० km राहिले जुनागड पुढे फार तर १५ km गिरनार साठी..."
"राग नसावा पण आपली संमती असल्यास मी गिरनार क्षेत्री आपल्याला सोडू शकेन..."
सिद्धनाथा न क्षणभर विचार केला
"ठीक आहे.."
चव्हाण साहेबांनी सिध्दनाथास नमस्कार केला , आदराने त्यांना आपल्या XUV मध्ये बसवलं,
खरेच इतक्या रखरखीत उन्हात पायी चालणं गरजेचे आहे आहे का असा विचार सहज चव्हाण साहेबांच्या मनात येऊन गेला
"चव्हाण साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, इतक्या रखरखीत उन्हात खरच पायी चालण्याची गरज नाही, पण ती देखील एक तपस्या आहे जीव ब्रम्हाच्या सेवे साठी", सिद्धनाथ हसत म्हणाला.
चव्हाण साहेबांना एकदम लाजल्या सारख झालं, "थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला एक झोपडी लागेल तिथे गाडी थांबावं", सिद्धनाथा न ड्रायव्हर ला सूचना केली.
झोपडी च्या जवळ ड्रायव्हर न गाडी उभी केली, सिद्धनाथ खाली उतरला, झोपडीच्या दरवाज्या पाशी आला
"अलख निरंजन, आदेश"
"आSदेशS", झोपडी तुन एक माणूस बाहेर आला, सिध्दनाथाच्या पायावर डोकं ठेवलं, सिद्धनाथा न प्रेमाने कांती ला उठवलं, "अरे असू दे असू दे"
"महाराज, सकाळीच तुमचा निरोप मिळाला होता" , छोटी शी पोटली त्यानं सिद्धनाथा पुढं केली
चव्हाण साहेब घ्या एक एक घास खाऊन, पोटली उघडली त्यात ज्वारी च्या ३ भाकऱ्या आणि सोबत ठेचा होता, लिंबाच्या फोडी, कांदा देखील होता व्यवस्थित कापलेला, सोबत चवीला उडदा चे वडे ते देखील ३ च होते
। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम: स्वाहा ।
म्हणत आपल्या सद्गुरूंना नैवेद्य दाखवत सिद्धनाथा बरोबर ड्रायव्हर, चव्हाण साहेब सगळ्यांनीच खाऊन घेतलं होतं, गाडीत थंडगार पाणी होतच, भूक लागलेली होतीच आणि साहेब कुठल्यातरी हॉटेल जवळ गाडी थांबवण्याच्या विचारात होतेच
बरोबर तीन च भाकऱ्या, तीन च उडदा चे वडे चव्हाण साहेबांना नवल वाटलं होतं, पण अवघ्या त्या थोड्याश्या जेवणात पोट भरलं होत.
कांती ला निरोप कसा मिळाला असेल...?, सहज चव्हाण साहेबांच्या मनात येऊन गेल, पण मग नाथ पंथी अवलीयाना काय अशक्य आहे असा विचार त्यांचे मनात येऊन गेला.
"कांती, दोन दिवसांनी गिरनार वर भेटू" , सांगत सिद्धनाथा न अलख निरंजन चा जय जय कर करत कांती चा निरोप घेतला, गाडी पुढे निघाली.
वृद्धेश्वराच्या मंदिरा बाहेर चव्हाण ह्यांनी पहिल्यांदा सिद्धनाथा स बघितलं होत, कुठल्या तरी एका गुन्ह्या च्या संदर्भात ते नगर ला आले होते, खूप दिवसां ची रेंगाळलेली केस, पण लीड मिळत नव्हता, सगळी कडून दबाव वाढत होता, चव्हाण जरा वैतागलेलेच होते परत जाता जाता पाथर्डी , वृद्धेश्वर करून ते मुंबईस निघालेले होते.

वृद्धेश्वर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. वृद्धेश्वर हे वृद्धा नदीकाठी वसले आहे. अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे नवनाथ भक्तीसार ह्या ग्रंथात ह्याचा उल्लेख आढळतो, शंकरमहाराज देखील ह्या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते, पूर्वी मच्छींद्रनाथांच्या समाधानासाठी गुरू आज्ञा म्हणून येथे खूप मोठा भंडारा झाला होता. त्या निमित्ताने मच्छींद्रनाथ व गोरक्षनाथांनी नाथ पंथाचा मेळा जमवला आणि गहिनीनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथांनी


(गर्भगिरी, वृद्धेश्वरा जवळ जिथे छोट्या गहनी नाथास गुरू गोरक्ष नाथांनी सनाथ केलं, व मोठा यज्ञ गोरक्ष नाथांनी गुरू आज्ञेने केला ज्याला सर्व देव देवता उपस्थित होत्या स्थळ अहमदनगर)


गहिनीनाथास अनुग्रह दिला, त्यावेळी त्रिभुवनातील सर्व देवता ऋषीमुनी, संन्यासी सर्व एकत्र जमले. या ठिकाणी गर्भगिरी पर्वत आहे. गोरक्षनाथांनी सुर्वण सिद्ध मंत्राचा वापर करत संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. गुरू मच्छीद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्‍धेश्वर येथे ३३ कोटी देव साधू, संत-महंत. ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव-पार्वतीने ब्राम्हण वेषात प्रकट होऊन पंगती वाढल्या. देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्‍थानाला देवराई हे नाव पडले देवाच्या पंगतीत महादेव वृद्ध म्हताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवानी विनंती केली की, हे महादेवा आता हे रूप घेतले, आम्हाला याच रुपात दर्शन दिले; तुंम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विंनती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहीले म्हणून त्यांना म्हतारदेव (वृद्धेश्वर) म्हणू लागले. वृद्धेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ १२ ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्‍याचे म्हटले जाते, असो, चव्हाण साहेब ह्यांना बाबा बुवा बैरागी ह्यांची मनस्वी चीड होती त्या मुळे अर्थात त्यांनी सिद्धनाथा कडे लक्ष दिलं नव्हतं, अर्थात सिद्धनाथा ला असल्या गोष्टीत रस ही नव्हता,
"साहेब एक बोलू का?", हवालदार म्हणाला
"बोल, नुसतं दर्शन तर घ्या त्या बैराग्याच, इतरा पेक्षा वेगळा वाटतोय"
"तुला हवं तर घेऊन ये दर्शन...", चव्हाण जरा रागात च म्हणाले
हवालदार न जाऊन सिद्धनाथा ला नमस्कार केला
"अरे, तुझ्या साहेबाला सांग, ह्या दोन गावी तपास कर", अस म्हणत दोन गावांची नाव सांगत झोळीतून थोडीशी विभूती काढून त्यानं हवालदाराच्या हाती ठेवली.
हवालदाराने परत एकदा नमस्कार केला , परत आला, सिद्धनाथा न सांगितलेली नाव , चव्हाणांना सांगितली,
चव्हाणांना एकदम आठवलं, अहमदनगर ला येण्या आधी त्यांचं हे discussion झालेलं होत पण ही दोन गाव खंगाळायची ते साफ विसरले होते.
शेवटी लीड सापडला होता, गुन्हेगार पकडले गेले होते, केस ही सुटली होती, मग चव्हाणांना एकदम वृद्धेश्वर ची घटना आठवली, ते परत नगर ला आले होते पण सिद्धनाथ तिथून केव्हाच निघून गेला होता
"कुठे गेला असेल तो बाबा?"
त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याला विचारलं
"साहेब, आता ह्या साधू, बाबा, बैरागी ह्यांच ठावठिकाणा काय सांगणार?", "आये मन मे तो चले तपोवन मे अशी ह्यांची वृत्ती !!!"
चव्हाणांना, अधून मधून ही खंत जरूर वाटे, आणि आज अचानक जुनागड कडे जाणाऱ्या रस्त्या वर गाठ पडली होती, त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं अस काही घडू शकेल.
"महाराज चुकलं माझं, तेव्हा मी तुम्हाला साधा नमस्कार तर केला नाहीच उलट नाव ठेवली"
"त्यात तुमची तरी काय चूक, सध्याचा काळ च विचित्र आहे, बुवाबाजी, फसवे साधू, अघोरी, तांत्रिक, मांत्रिक मग साहजिक च सर्व जण ह्या पासून लांब रहाण्याचा प्रयत्न करणारच", सिद्धनाथ म्हणाला.
"केदार लंबे हनुमानजी मंदिरा पाशी मी उतरेन", सिद्धनाथ केदार ला ड्रायव्हींग करताना सूचना पण देत होता,
लंबे हनुमानजी मंदिर आलं, सिद्धनाथ खाली उतरला, आता संध्याकाळ होऊन गेलेली होती, चव्हाण साहेबांना वाटलं होतं संध्याकाळी सिद्धनाथा बरोबर जेवण्याचा योग्य येईल पण अर्थात सिद्धनाथान त्याला स्पष्ट नकार दिला होता.
गाडीतून उतरताना , झोळीतून एक अगदी करंगळी एवढ्या लहानश्या गदा काढून मारुतीच्या पायी लावून केदार व चव्हाणांच्या हातात ठेवल्या होत्या, "जवळ ठेवा, गळ्यात घाला, जमेल तसं करा, तुमची सर्विस crime ब्रँच त्या मुळे कुठे धाड, छापे, कधी एन्काऊंटर त्या मुळे कुठल्याही अश्या कामावर जाताना व एरवी दर शनिवारी मारुतीचं दर्शन घेऊन जात जा, येतो मी"
"परत भेट..?"
"चव्हाण साहेब, अशीच केव्हातरी भेट होईल, येतो मी", म्हणत सिद्धनाथ अंधारात नाहीसा झाला
उजाडल होत, आकाशात डोकं खुपसून बसलेला गिरनार, सिद्धनाथान भराभर सगळं आवरलं,
"अलख", म्हणत पायऱ्या चढायला सुरुवात केली, गुरू शिखरावर दत्त महाराजांचं दर्शन घेऊन तो गोरक्ष शिखरावर परत आला, अखंड पेटलेल्या धुनी समोर सिद्धनाथान आसन घातलं आणि काही क्षणात तो समाधीलिन झाला,


गोरक्षधुनी


आजूबाचू च भान गेलं होतं
"अलख निरंजन", सद्गुरूंचा अलख!!!!
"आदेश"
"आलास तू..?"
"होय महाराज", म्हणत सिद्धनाथान आपल्या सद्गुरुंच्या चरणावर मस्तक ठेवलं.
"पुढील कार्या साठी, काली खप्पर इथे साधनेला बस"
"जशी आज्ञा गुरुदेव", येतो आम्ही.


गुरू गोरक्षनाथ अदृश्य झाले, सिद्धनाथ देहभाना वर आला. जवळच थोड्या अंतरावर बसलेला अघोरी मेघनाथ बारकाईने सिद्धनाथा च्या हालचाली बघत होता, ही "संधी सोडू नको", कर्णपिशचिनी मेघनाथ च्या कानात फुसफूसली.
"कोनो आखाडा...?", मेघनाथ आता सिद्धनाथा च्या जवळ आला होता
सिध्दनाथान उत्तर दिलंच नव्हतं, मेघनाथा कडे बघत तो कमंडलू तीर्था कडे निघाला होता तिथून च एक वाट काली खप्पर कडे जात होती, ते स्थान अत्यंत दुर्गम ठिकाणी होत,


(काली खप्पर च्या अलीकडे जगन्माता एक गुहेत अधिष्ठित आहे)


चढण्यास कठीण, वन्य जीवांचा वावर, पाय घसरला तर हजारो फूट खाली दरी, लोक लांबूनच दर्शन घेत, वन्यपशूंची भीती असे, ह्या ठिकाणी बसून साधना करणारे क्वचित दृष्टीस पडत.


(चढण्यास अत्यंत कठीण व दुर्गम, एक बाजूस खोल खाई, ह्या ठिकाणी साधना केली जाते)


मेघनाथा न आपल्या गुरुच स्मरण केलं,
"कशाला बोलवलंस?"
मेघनाथान सिद्धनाथाच्या दिशेने खूण केली.
"मूर्ख आहेस...?"
"त्या नाथपंथी बैराग्याच्या नादी लागू नकोस, मिळवलंय ते ही जाईल"
"म्हणजे तुमची मदत मला मिळणार नाही तर...""नाही"
"बसा तुम्ही असेच, पहा हा मेघनाथ काय करतो ते.....", दात ओठ खात मेघनाथ म्हणाला
गुरू अदृश्य झाले.
सिद्धनाथा न कमंडलू तीर्थावर स्नान केले सगळं आवरून तो निघाला,
मेघनाथान स्वतः चा झोपडीत येऊन आसन घालून बसला होता, खप्पर हातात घेऊन त्यानं शक्ती ला आवाहन केलं होतं, माया उत्पन्न केली होती, असंख्य सौदर्यवान युवती चा समूह खप्परातून बाहेर आला होता, ती सगळी स्त्रीपिशाचगण , शकिनी, डाकीनी, लासवट, हडळी व इतर असंख्य प्रकार होते, हवस, भोग, क्रूरता, निर्दय पणा, वासना ह्यांचा ह्या जगात व इतर पारलौकिक जगात वावरणारा शक्तिशाली प्रवाह हवेच्या झोता बरोबर काली खप्पर च्या दिशेने निघाला होता, मेघनाथा ने आता यक्षिणी, सुदारी, नायका आदी सिद्ध केलेले जप करून पुढचा प्रयोग केला होता ते देखील खप्पर चा दिशेने अदृश्य झाले, संध्याकाळ होऊन गेली होती, काली खप्पर च्या अलीकडेच असलेल्या एका शिळाखंड खालील गुफेत कालीची स्थापन केलेली मूर्ती होती, सिद्धनाथान तिथे काली ची प्रार्थना केली हात जोडले, गुरू गोरक्षनाथांनी शिकवलेलं स्तवन त्यानं म्हणायला सुरुवात केली
हे आई, हे लहानस बाळ तुझी वाट बघतय, तेव्हा आईरूपात प्रकट हो, आणि सौदर्यवान कामिनी किंवा छळ रुपात प्रकट न होता मातृरूपात प्रकट हो, वासनारुप त्याग कर, वात्सल्य रुप धारण कर, सर्व प्रकारच्या तुझ्या मायिक कुचेष्टा थांबवून आईच्या रुपात माझ्या साधनेसाठी मदत करणारी हो, देवलोकातील अप्सरा, मृत्युलोका तील स्त्रिया, भुवरलोकतील पिशाचीनी, पाताल लोकातील नागकन्या, तर दिव्य लोकांतील अष्टनायिका, अष्टसुंदरी, ६४ योगिनी, ३६ यक्षिणी, २७ महापिशाचीनी ह्या सगळ्यांनीच माझे गुरू गोरखनाथ ह्याच्या महिम्याच नवल करत त्याना त्रास न देता त्या तुझ्यात विलीन झाल्या आणि मग माझे गुरू सनाथ झाले, "अलख निरंजन आदेश" , गुरू गोरक्ष नाथ जी को आदेश....!!!!"
वातावरण बदललं होत, भवानी प्रत्यक्ष झाली होती
"काय हवं...?"
"आई साधना निर्विघ्न पणे पार पडेल असा आशीर्वाद"
"सिद्धनाथा, बाळा, तू देखील त्या गोरक्षा सारखाच हट्टी", मंजुळ आवाजात हसत भवानी म्हणाली, "तसच होईल", मंद स्मितहास्य करत भवानी आशीर्वाद देत नाहीशी झाली
सिद्धनाथा वर चालून आलेला सगळा प्रवाह मूर्तीत समाविष्ट होऊन नाहीसा झाला होता.
मेघनाथ जेव्हा उशिरा रात्री काली खप्पराच्या दिशेने निघालं तेव्हा एक अप्रतिम लावण्यवती खडकावर बसलेली होती, मेघनाथ सावध झाला, तिच्या वरची नजर हटता हटत नव्हती,
"कोण तू...!"
"सोमा...तुझी भैरवी, विसरलास एवढ्यात...?"
तिच्या श्वासाला सुगंध होता, मेघनाथा ला ती घट्ट बिलगली होती
"त..तू इथे..?"
"xहxली च्या वेळेस तुझा अंत झाला होता ना ????"
"झाला असता....", सोमा न वाक्य पूर करत मेघनाथाच्या ओठावर ओठ टेकले, आपल्या सगळ्या शरीरातून काहीतरी ओढलं जातंय एवढं मेघनाथ ला समजत होत, पण तिच्या कामचेष्टाचा मध्ये तो इतका रंगला की युगल साधनेतील मुद्रा, भाव , लक्षण सगळ्याची जणू विस्मृती झाली होती, देहपातळीच्या पलीकडील subtle सहवासा करण्या साठी मोठी साधना असावी लागते, इथेच मेघनाथ त्याने निर्माण केलेल्या मायेत फसला होता, भानावर आला तेव्हा क्षरण होऊन विझलेल्या कोळश्या सारखी त्याची अवस्था झाली होती, सोमा अदृश्य झाली होती, घाई घाई ने तो स्वतः च्या कुटीत आला खप्पर हातात घेऊन मंत्रोच्चार केले पण सगळंच संपलेलं होत, गुरुदेवांना हाक मारली
"मुर्खां तुला सांगितलं होतं त्याच्या भानगडीत पडू नकोस..."
"पण तुम्ही असताना...?"
"मी होतोच आणि तुला धोक्याची सूचना देखील दिली होती......"
"ह्या वर उपाय....."
"मेघनाथ ...त्यानं तुला काही मदत केली तरच"
"तुम्ही बोला..."
"ज्याचा गुन्हा त्यानं बोलणं योग्य नाही का"
पहाट झाली होती, मेघनाथ जवळ जवळ पळत कमंडलू तीर्थ मग काली खप्पर कडे जाऊन आला
"तो बैरागी दिसला का...?"
"११ दिवस होता, आता कुठे माहीत नाही"
मेघनाथ चक्रावला होता, ११ दिवस तो astral plane वर किंवा अलौकिक जगतात होता , ज्या सोमा च्या सगळ्या सिद्धी त्यानं व्रxलीx मुद्रा वापरून काढून स्वतःच सिद्ध झाला होता, व ज्यात सोमा चा अंत झाला अशी त्याची समजूत होती त्याच सोमा न त्याची वसुली xहxली मुद्रेत subtle लेव्हल वर व्याजा सकट केली होती. आता गिरनार तलेठीजवळ महा शिवरात्रीस मृगी कुंडात सिद्ध महात्मे स्नाना साठी येतात तेव्हा तो येईल असं त्याचे गुरू म्हणाले होते पण महाशिवत्रीसी अजून खूप अवकाश होता....!!!!

"अविनाश"
@स्वामी@


श्री क्षेत्र गिरनार येथील दत्त महाराजांच्या पादुका


गिरनार किंवा रेवतक हे एक अद्भुत क्षेत्रे आहे, संपूर्ण गिरनार दृश्य अदृश्य सिध्द महात्मे ह्याच्या वास्तव्याने पावन अस तीर्थ क्षेत्र, सेवा करणार्यांना इथे काही न काही आध्यत्मिक अनुभूती येते, इथे विविध पातळी वर अनेक देव देवता सिद्ध यांचं वास्तव्य तर आहेच आणि जसे लौकिक आश्रम आहेत तसेच अलौकिक
parallel universe चा अनुभव तुम्हाला गिरनार येथे नक्की येऊ शकतो, तुम्ही १०००० पायऱ्या चढायला हव्या अस नव्हे तर गिरनार क्षेत्रात रहाण्यास मिळालं , एखाद्या वाहनाने गिरनार ची परिक्रमा कराव्यास मिळाली तरी दत्तमहाराजांचे दिव्य अनुभव तुम्हाला आल्या शिवाय रहाणार नाही हे माझं नव्हे तर गिरनार क्षेत्र महात्म्य ह्यातील वचन