Spin books and stories free download online pdf in Marathi

फिरकी

"राशी....राशी.... अग चहा झाली का..?? अंशला दे माझ्याकडे.... त्याला घेऊन सगळी कामे करतेस.. रिकामाच बसलोय मी.. दे बर त्याला माझ्याकडे...."सुभाषराव हॉलमधील सोफ्यावर बसत म्हणाले...

"आले बाबा... हा घ्या तुमचा चहा.. आणि हा तुमचा अंश.. खूप मस्ती करतोय बर आजकाल आणि चिडचिडही..एका मिनिटासाठीही सोडत नाही बाबा हा मला.. मग त्याला घेऊनच सगळी कामे करावी लागतात.. तुम्हालाही किती त्रास देतो हा.. " छोट्याश्या अंशला राशीने सुभाषरावच्या बाजूला बसवत म्हणाली.. "अग.. चालायचंच ते.. दात येत आहे बाळराजेना..थोडी चिडचिड करणारच तो.. तुझा अभयही (सुभाषरावाचा मुलगा ) असाच त्रास द्यायचा त्याच्या आईला.. आज सुनंदा(अभय ची आई )असती तर तुला थोडासा आराम मिळाला असता...आवडीने केल असत आपल्या नातवाच.. दिवसभर घेऊन बसली असती अंशला.. "बोलता बोलता सुभाषरावाचे डोळे पाणावले.. राशीला आपल्या डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून त्यांनी लगबगीने चहाचा कप तोंडाला लावला..पण चहा गरम असल्यामुळे त्यांना चटाका लागला.. त्यांनी पटकन चहाचा कप टेबलावर ठेवून दिला..

"बाबा.. सावकाश.. गरम आहे चहा.. आईला खुप मिस करता ना तुम्ही.. "राशी सुभाषरावांच्या हातावर हात ठेवत म्हणाली.. "आठवण येते ग.. ती होती तेव्हा घ्या घराला घरपण होत..खूप केल तिने माझ्यासाठी... माझ्या घरच्या माणसासाठी... ह्या घरासाठी..पण तिला बदल्यात मी काहीच देऊ शकलो नाही.. आपल्यातच व्यस्त राहिलो...तिला तिच्या हक्काचा वेळही नाही दिला मी.. शेवटी गेली एकदिवस सोडून मला आणि अभयला..आणि मी एकटा पडलो... तिच्यासोबत ह्या घराचं घरपण गेल..मग तू आलीस ह्या घरची सून म्हणून... खर सांगू का राशी.. माझा विरोध होता तुमच्या लग्नाला....जेव्हा मला अभयने सांगितलं कि त्याच प्रेम आहे तुझ्यावर तेव्हा मी खूप रागावलो होतो.. कारण आमच्या घराण्यात कोणी आतापर्यंत लव्हमॅरेज केल नाही.. पण तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र खूप आनंदी झालो होतो.. माझ्या सुनंदाची सावली वाटलीस... आणि बघ तुझ्यामुळे आता हे घर पुन्हा हसायला लागलं.. किती करतेस माझं आणि अभयच.. बर मला सांग तुला आवडला कसा अभय...?? किती रागीट आहे माहिती आहे ना तुला..?? मग कस काय बुवा होकार दिलास त्याला..?? त्याचा असा रागीट स्वभाव बघून मला तर वाटत होत कि त्याला ह्या जन्मात तरी मुलगी भेटणार नाही.. "अस म्हणत सुभाषराव हसायला लागले...

"काय बाबा.. तुम्ही पण ना..अभय तसा रागीट आहे पण खूप प्रेम करतो माझ्यावर.. आणि माझ्या नवऱ्याबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही बर का.. "राशी खोटं खोटं रागवत म्हणाली.. "बर बाई.. काहीच नाही बोलणार तुझ्या त्या नालायक.. रागीट.. आणि गाढव नवऱ्यासाठी.. "सुभाषराव हसत म्हणाले.. आता राशीलासुद्धा हसायला आल..आपलं हसू आवरत ती पुढे म्हणाली.. "आता चहा घ्या बाबा.. गार होईल तो.. तोपर्यत मी कॉफी बनवते... अभय येतच असेल ऑफिसवरून.. आल्या-आल्या कॉफी मिळाली तर घर डोक्यावर घेईल.. हल्ली तोही खूप चिडचिड करतोय.. प्रोमोशन मिळाल तस जबाबदारी पण वाढली आहे त्याची..वोर्कलोड जास्त आहे अस म्हणत होता.. त्याच्या रागाची आता मला भीतीच वाटायला लागली आहे बाबा.. खूप रागवत असतो माझ्यावर आजकाल...मला ना बाबा खूप काळजी वाटते त्याची..खूप टेन्शनमध्ये असतो तो.. काही विचारयला गेल तर सांगतही नाही.. तुला नाही समजणार म्हणून टाळून देतो.... "राशी नाराज होत म्हणाली...

"हम्म.. दिसतय ग मला ते.. मी बोलतो त्याच्याशी ह्याबद्दल.. पण बोलायला तो घरी कुठं असतो.. ऑफिसवरून आल्यावर तो लॉपटॉप खोलून बसतो.. तू नको काळजी करुस.. मी बोलतो त्याच्याशी.. जा तूही चहा घे.. मी आणि अंश जरा फेरफटका मारून येतो गार्डनमध्ये... "अस म्हणत सुभाषरावनी छोटया वंशला कडेवर उचलून घेतलं...इतक्यात बेल वाजली.. राशी घड्याळावर नजर टाकत म्हणाली.. "अरे.. देवा.. अभय आला वाटत.. कॉफीपण नाही बनवली मी त्याच्यासाठी.. आता ओरडायला सुरवात करेल.. "

"जा.. तू घे बनवायला कॉफी.. मी उघडतो दरवाजा.."सुभाषरावनी दरवाजा उघडला आणि राशी किचन मध्ये लगबगीने निघून गेली.. छोटा अंश अजून कडेवर च होता सुभाषरावाच्या... सुभाषरावांनी दरवाजा उघडला समोर अभय उभा होता.. तो त्यांना काहीच न बोलता सरळ आत आला.. त्याच्या चेहऱ्यावरून सुभाषरावां कळून चुकले कि काहीतरी अभयच बिनसलं आहे.. घरात येताच अभयने आपली लॅपटॉपची बँग सोफ्यावर भिरकावून टाकली.. सुभाष राव काहीच न बोलता अंशला घेऊन बाहेर निघून गेले. जाताना त्यांनी दरवाजा फक्त ओढून घेतला.. सुभाषराव जाताच अभय राशीला जोरजोरात हाका मारू लागला.. "राशी.. राशी.. बाहेर ये आधी.. काय करत आहेस मध्ये.. बाहेर ये लवकर.. राशी.. राशी.. "

"हो.. हो.. आले.. काय झाल अभय..? का इतका ओरडत आहेस.. अरे कॉफी बनवत होते तुझ्यासाठी.. बोला आता.. ही कॉफी घे आधी.."राशी कॉफीचा मग टेबलवर ठेवत म्हणाली..

"नको मला तुझी कॉफी.. ठेव तुझ्याकडेच.. आजकाल तुझ्याकडून एक काम धड होत नाही.. "अभय रागाने म्हणाला.. "अभय.. अस का रागाने बोलत आहेस.. काय झालं.. चुकलं का काही माझं.."राशी अभयच्या हाताला हात लावून म्हणाली.. अभय तिचा हात झटकत टाकला आणि टिफिनची बँग हातात देत म्हणाला.. "तुला आज मी टिफिनमध्ये नॉनव्हेज द्यायला सांगितलं होत....तेही पाचजणांच.. तू काय दिलस...भेंडीची भाजी आणि चपाती तेही फक्त माझ्यापूर्ती.. चार दिवसाआधी तुला म्हणालो होतो ऑफिसचे फ्रेंड्स तुझ्या हातच चिकन खायच म्हणतं होते.. म्हणून मी त्यांना प्रॉमिस केल कि आज मी त्यांच्यासाठी तू बनवलेलं नॉनव्हेज आणीन टिफिनमध्ये..आणि तू काय केलंस भेंडीची भाजी दिलीस.. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या फ्रेंड्सनी आज टिफिन नाही आणला.. आज किती embarrass फील करत होतो माहिती आहे का तुला.. काहीजण तर हसत होते माझ्यावर.. किती तारिफ केली होती मी तुझ्या जेवणाची.. आज कस वाटलं मला तुला थोडीही कल्पना नाही त्याची.. आपल प्रॉमिस पाळण्यासाठी मला त्या सगळ्यांना हॉटेलमध्ये घेऊन जावं लागलं.. तुझ्यामुळे मी इतका embarrass तर झालोच पण माझ्या खिशाला चार हजाराचा खड्डा पण पडला तो वेगळाच..."अभयचा आवाज बराच वाढला होता..

"सॉरी अभि.. अरे खरच सॉरी.. माझ्या लक्षातुन गेल.. पण नेक्स्ट टाइम मी नक्की बनवून देईन.. सॉरी.. "राशी खाली मान घालून म्हणाली.. "त्याची काहीच गरज नाही आता.. आणि कस लक्षात नाही राहत ग तुझ्या.. मला तर वाटत मुदामून करतेस तू.."अभय आणखीनच रागात म्हणाला..

"अभय.. काय बोलत आहेस.. मुदामून का करू बर.... खरच नाही लक्षात राहील माझ्या.. दिवसभर खूप काम असतात रे.. त्यात अंशही सोडत नाही मला.. सारखा चिडचिड करत असतो.... सॉरी ना.. पुन्हा नाही करणार मी.. "राशी त्याची समजूत काढू लागली..

"काय काम असतात ग तुला दिवसभर...अस कोणतं मोठं काम करतेस.... स्वयंपाक करण्याला मोठं काम म्हणतात का..??कपडे..भांडीसाठी तर काकू येतात ना...? आणि अंशच नावच घेऊ नकोस त्याच पोट भरलं कि तो आपला खेळत असतो.... दिवसभर आराम करतेस घरी आणि म्हणतेस खूप काम असत.. जरा ऑफिसमध्ये जाऊन काम कर मनजे समजेल.. "अभय रागातच बोलत होता.. आता राशीलाही राग येऊ लागला..ती रागातच म्हणाली.. "अभय.. काकू गेले एक महिना कामाला येत नाहीत.. कपडे, भांडी, लादी हे सगळ मीच करत आहे गेल्या एका महिन्यापासून.. दिवसभार आराम करत नाही रे मी.. उलट मला आराम मिळतच नाही.. तुला माहिती तरी आहे का अंशचे दात येत आहेत.. त्यामुळे किती चिडचिड करतो तो.. रात्री रात्री रडत असतो.. तुझी झोप मोड होऊ नये म्हणून मी त्याला घेऊन हॉलमध्ये बसून असते..राहील ऑफिसच.. तर मीही जातच होते ऑफिसला.. अंशसाठी जॉब सोडावा लागला मला..तेव्हाही जॉब करत मी घर सांभाळत होते अभय.. हवं ते बोलून जातोस तू मला.. आधी विचार तरी कर काय बोलत आहेस ते... चुक मान्य केली कि मी.. सॉरीही म्हणाले.. आता अजून काय करू बर.. हवं असेल तर तुझ्या फ्रेंड्सलाही सॉरी म्हणते.. "

"ह्ह्ह्ह.. सॉरी बोलून काही होणार आहे का आता.. जाऊदे तुला बोलून काही फायदा नाही.. मला तुझ्याशी बोलायचच नाही.. "अस म्हणत अभय बेडरूममध्ये निघून गेला आणि जोरात बेडरूमचा दरवाजा आपटला.. त्याच्या अश्या वागण्याने राशी मात्र रडवेली झाली.. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.. सुभाषराव कधीच ह्या दोघंच भांडण दरवाजाच्या बाहेर उभ राहून ऐकत होते..त्यांनी काही मनाशी ठरवले आणि अंशला घेऊन खाली गार्डन मध्ये निघून गेले..

चार दिवस झाले होते तरी अभय काही राशीशी बोलला नाही.. राशी खूप प्रयत्न करत होती त्याच्याशी बोलण्याचा त्याला मनवण्याचा.. पण सगळ व्यर्थ... तिने केलेला टिफिनही तो घेऊन जातं नव्हता.. आणि रात्रीही मुदामून बाहेर जेवून यायचा.. राशीला अभयच्या अस वागण्याच खूप वाईट वाटत होतो....पण ती होईल तेवढा त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करीत होती...

आज सकाली अभय उठला तेव्हा त्याच्या बाजूला राशी आणि अंश त्याला दिसलें नाहीत.... आज राशीने ना त्याला कॉफी दिली होती.. ना त्याचे ऑफिसचे कपडे काढून दिले होते.. ना गाडीच्या चाव्या.. रुमाल.. वोलेट काहीच नाही.. नाहीतर ती रोज सगळ त्याच्या हातात आणून द्यायची.. तो अंघोळ करून बाहेर आला तरी काहीच जागेवर नव्हतं..त्याला थोडस विचत्र वाटलं.. तो स्वतःच आपली तयारी करून बाहेर आला तरी राशी आणि अंश त्याला दिसलें नाहीत.. किचनमध्ये ही राशी नव्हती.. हॉलमध्ये सुभाषराव बसून पेपर वाचत होते.. तो त्यांच्याकडे बघत म्हणाला.. "बाबा.. राशी कुठे आहे.. अंशपण दिसत नाही कुठे.. बाहेर गेली आहे का..?? "

"तुला नाही सांगितलं का तिने.. ती आज आपल्या आईकडे गेली आहे.. मला तर असच म्हणाली जाताना.."सुभाषराव पेपरच पान पलटत म्हणाले.. "काय.. मला काहीच म्हणाली नाही ती.. "अभय जवळजवळ ओरडलाच... यावर सुभाषराव चिडून म्हणाले.. "काय म्हणालास.. तुला विचारून नाही गेली ती.. तू फोन लाव तिला आधी.. आजकाल ना जास्तच करत आहे ती.. बघ गेली ते गेली पण जाताना तुझ्यासाठी आणि माझसाठी जाताना जेवणसुद्धा बनवून नाही गेली.. मीच चहा बनवला.. आणि नास्ता बाहेरून मागवला आहे.. मला वाटलं तुला विचारलं असेल तिने..म्हणून मीही जा म्हणालो.."अभयने फोन लावला पण राशी फोन उचलत नव्हती.... अभय वारंवार फोन करत होता.. पण राशी काही कॉल उचलत नव्हती...

"बाबा फोन नाही उचलत आहे ती.. मी तिच्या आईला फोन लावतो.. थांबा "... तो फोन लावणारच होता कि सुभाषरावांनी त्याच्या हातातून फोन काढून घेतला.. फोन कट करत ते म्हणाले.. "कशाला लावतोयस फोन..तिच्या घरच्यांना कळेल ना कि, तुम्हा दोघंच काहीतरी बिनसलं आहे अस.. काय विचार करतील ते.. त्यापेक्षा जाऊदे तिला.. ती गेली एक -दोन दिवस तर काय फरक पडणार आहे आपल्याला.. तसही करतेच काय ती दिवसभर.. नुसता स्वयंपाक करते.. तो करू आपण दोघे.. "

"पण बाबा... राशी अशी अचानक कशी गेली.. तेही मला न सांगता.. मला साधं विचारण गरजेच वाटलं नाही का तिला.. "अभय नाराज होत म्हणाला.. "अरे मग काय झालं.. गेली तर जाऊदे...आपण दोघे राहू आरामात.."सुभाषराव अभयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले..अभयने फक्त मान हालवली... तो ऑफिसला जाण्यासाठी दरवाजाच्या दिशेला वळला... तस सुभाषराव डोक्याला हात लावत म्हणाले.."देवा.. आता मी काय करू मी तर विसरूनच गेलो.. पंचायत झाली माझी.. आता हसतील माझ्यावर सगळे माझे मित्र.. "अभयने लगेच आपली ब्याग खाली ठेवली आणि सुभाषरावांच्या जवळ जात म्हणाला.. "काय झालं बाबा.. कसली पंचायत.. काय म्हणत आहात.."

"अरे अभय.. सुनबाईच्या भरोश्यावर मी आज माझ्या मित्रांना घरी बोलावलं होत जेवायला.. आता तीच नाही तर काय देऊ त्यांना जेवायला.. "सुभाषराव अभयकडे बघत म्हणाले.. "बाबा अस कस बोलावलं तुम्ही त्यांना जेवलायला.. राशीला एकदा विचारयच तरी.. तिला माहिती तरी आहे का ह्याबद्दल.."अभय पटकन बोलून गेला..

"तिला काय विचारयच ह्यात.. तू तरी त्या दिवशी विचारलं होतंस का..??तिच्याच भरवश्यावर नॉनव्हेज पार्टी देणार म्हणाला होतास ना आपल्या मित्राना.. तसच मीही बोलावलं आपल्या मित्रांना.. विचार केला शेवटी दिवसभर आरामच करते घरात.... तर बनवले एक्सट्रा जेवण माझ्या मित्रासाठी.. याआधीही तिने बनवलं होत त्यांच्यासाठी.. पण आता मी काय करू.. त्यांना तुझ्यासारखं हॉटेलमध्येही नाही घेऊन जाऊ शकत.. घरचंच जेवण हवं त्यांना.. "सुभाषराव अभयचे हावभाव न्याहाळात म्हणाले.. अभय एकदम शांत होता त्याला काय बोलू हेच समजत नव्हते.. त्याला अस शांत राहिलेलं बघून सुभाषराव पुढे म्हणाले.. "अभय.. बेटा आज तू सुट्टी घे ऑफिसची.. आणि मला जरा जेवण बनवायला मदत कर.. तूसुद्धा छान स्वयंपाक करतोस..नाही म्हणू नकोस बेटा.. आपल्या बाबासाठी इतक करू शकतोस ना तू... plz बेटा..नाहीतर हसतील सगळे माझ्यावर.. plz बेटा.."सुभाषराव त्याला विनंती करत होते.. हो नाही म्हणत शेवटी अभय तयार झाला..

अभय कपडे बदलून किचनमध्ये आला तेव्हा सगळ किचन घाण झालं होत.. त्याने आधी ते सगळ साफ करून घेतल.. सुभाषरावांनी भला मोठा मेनू दिला होता.. ते बनवता बनवता अभयच्या नाकी नऊ आले.. बिचार्या घामाने भिजला होता.. सुभाषराव फक्त सांगत होते..मदत करण तर दूरच राहील ते फक्त त्याला ऑर्डर देत होते आणि अभय बिचारा सगळ गप्पगुमाने करत होता.. जेवण झालं एकदाच बनवून अभयने सूटकेचा निःश्वास टाकला तस सुभाषरावांनी त्याच्याकडून घर घाण झालंय अस बोलून सगळ घरी झाडून घेतल.. अगदी जाळ्यापण साफ करून घेतल्या... घर झाडून घेतल्यावर फरशी पुसून घेतली.. फरशी पुसून झाल्यावर बाथरूममध्ये कपडे भिजत घातले होते ते दाखवत सुभाषराव अभयला म्हणाले.. "अभय. इतक काम केलंस हे कपडेही आहेत थोडे ते धुवून टाक.. मी नंतर वाळत टाकतो.. मला कंबरेने बसवत नाही रे.. नाहीतर मीच धुवून टाकले असते.. "

"बाबा.. हाताने कशाला धुवायला हवयं.. मशीनमध्ये लावू या ना आपन.. "

"अरे तुला कुठे आवडतात मशीनमध्ये धुतलेल कपडे.. म्हणून तर राशी तुझे कपडे हातानेच धुवते... हे सगळे कपडे तुझेच आहेत.. आमचे मी मशीन मध्ये कधीच धुवून काढले.. दिवसातून किती कपडे होतात तुझे.. जिमचे.. ऑफिसचे वरून रात्री वेगळे घालतोस त्याचे.. चल चल वास येईल कपड्याचा घे धुवून पटकन.. माझे मित्र येतच असतील.. "अस म्हणत सुभाषराव हॉलमध्ये येउन टीव्ही बघत बसले.. अभयने एक दीर्घ श्वास घेत सगळे कपडे धुवून काढले.. त्याची कंबर पूर्ण कामातून गेली होती आता.. कपड्याच काम संपलं तसेच सुभाषरावांचे मित्र आले जेवायला.. त्यांचा सगळा पाहुणचार.. त्यांना काय हवं नको बघण्यातच अभय पूर्णपणे थकून गेला..पुन्हा एकदा अभयला घाण झालेलं किचन आवरायला लागल.. जेवणाची भांडी घासायलाच त्याला पाच वाजले.. जेवण झाल तरी सुभाषरावाचे मित्र काही जायला तयारच नव्हते.. हॉलमध्ये सगळ्याच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या... अभयच्या पोटात मात्र आता कावळे ओरडू लागले होते.. त्याने स्वतः साठी पेल्ट वाढली आणि तो बेडरूममध्ये येऊन बसला.. त्याची नजर राशी आणि त्याच्या लग्नाच्या फोटोवर पडली.. आता तो राशीला मिस करत होता.. त्याने फोन चेक केला.. राशीचा मिस कॉल होता ना msg.. त्याला कसतरीच झालं.. मनातच विचार करू लागला.. "जास्तच बोलून गेलो तुला..आज एक दिवस काम केल घरातल तर इतका थकलो.. तू तर रोज करतेस.. कदाचित यापेक्षापण जास्त.. त्यात अंशला सांभाळून करणं तुला सोपं होत नसेल.. सॉरी राशी... फार बोलून गेलो ग तुला.. बस तू लवकर ये.. मग कान पकडून माफी मागीन तुझी मी.. "तो आपल्या विचारातच होता कि, सुभाषरावांनी त्याला सगळ्यासाठी चहा बनवायला सांगितली....अभयने हातातली पेल्ट तशीच ठेवून दिली आणि चहा बनवला.. सुभाषरावांचे मित्र चहा वैगरे घेऊन निघून गेले.. सुभाषराव दरवाजा बंद करून मागे वळले तसे त्यांना हसायला आल.. अभय सोफ्यावर बसल्याजागीच झोपी गेला होता.. सुभाषराव त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.. "आज खूप काम केलंय ना मग झोप तर लागणारच ना.. झोप तू आता शांत नंतर बोलू मग आपण.. "

रात्री जवळपास आठ वाजले असतील तेव्हा अभयला जाग आली.. सुभाषराव कॉफीचा मग घेऊन त्याच्यासमोर बसलेच होते.. तो मग त्याच्या हातात देत ते म्हणाले.. "काय मग अभयराव कळलं का तुम्हाला माझी सुनबाई किती काम करते दिवसभर ते.. आज एक दिवस काम केलंस तर लगेच आडवा झालास.. राशीं यावेळीस रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते.. हे ती कॉफी घे.. म्हणजे तरतरी येईल जरा.."अभय काहीच बोलत नव्हता.. तो शांतपने कॉफी पीत होता.. सुभाषराव सुनंदाताईच्या फोटोसमोर दिवा लावू लागले...कॉफी संपताच तो सुभाषरावना म्हणाला.. "बाबा.. मी घेऊन येतो राशीला घरी.. खूप मिस करतोय तिला आणि अंशला सकाळपासून.... चुकलं माझं.. तिला रागात बरच काही बोलून गेलो....तिच्याशिवाय हे घर घर वाटतच नाही.. आज इतकी माणसं होती घरात (सुभाषरावांचे मित्र) इतका गोंधळ होता आजूबाजूला.. पण तरीही माझं मन लागत नव्हतं.. सारखी तिची आठवण येत होती बाबा.. मी आताच निघतो.. "त्याच बोलण ऐकून सुभाषरावानी दिवा लावता लावता मागे वळून पाहिले.. अभय खाली मान घालून उभा होता.. सुभाषराव त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.. "राहू दे तिला तिच्या आईकडे काही दिवस.. मीच जबरदस्ती पाठवलं तिला आज.. ती तर जायला तयारच नव्हती.. आज जाणूनबुजून मी माझ्या मित्रांना घरी बोलावलं होत दुपारी जेवायला.. तुलाही आज मुदामून घरी थांबवून घेतल.. आणि घरातली सगळी काम करायला लावली.."अभयने चमकुन सुभाषरावानकडे पाहिले.. त्याच्याकडे बघत सुभाषराव पुढे हसत म्हणाले.. "अस बघू नकोस.. हा सगळा ड्रामा मीच क्रियेट केला..तुझी फिरकी घायच ठरवलं... तुलाही कळायला हवं कि राशी तुझ्यासाठी आणि ह्या घरासाठी काय आहे ती.. आपण पुरुष ना नेहमी आपल्या बायकांना गृहीत धरतो.... ती घरात असते म्हणून ती काहीच काम करत नाही अस नाही ना.. "

"बाबा.. अस नका बोलू.. त्यादिवशी मी रागाच्या भरात बोलून गेलो.. पण माझं खरच खूप प्रेम आहे तिच्यावर.. आधीही तेवढं होत आणि आताही तेवढंच आहे.. "अभय पटकन बोलून गेला..

"अरे मी कुठे म्हणालो कि तुझ प्रेम नाही तिच्यावर.. आहे रे खूप आहे.. पण थोडासा आदरही दे तिला.. तिच्या कामाला.. अरे अभय, कामवालीबाईला ही आपण तिच्या कामाचे पैसे देतो.. मग जी स्त्री आयुष्यभार आपल्यासाठी घरात काम करत असते तिला आपण प्रेमासोबत थोडासा मान-सम्मान.. थोडीशी इज्जत दिली तर कुठे बिघडत रे.. आपल्या कडून आपल्या बायका कधीच कसली अपेक्षा करत नाहीत.... आपल्यासाठी स्वतःच घर सोडून येतात.. आई वडिलांना सोडून येतात.... पूर्ण आयुष्य त्यांच आपल्या मुलाचं.. आपल्या घरातल्या माणसांच आणि घराचं करण्यात घालवून देतात.. आपल्या आवडीनिवडी समजून घेतात.. मग आपल्या कर्तव्य नाही का त्यांना जरा समजून घ्यावं..त्यांना काय हवयं ते नको बघावं..... "अभय शांत होता एकदम..

"अभय.. तू तर प्रेमविवाह केला आहेस.. मग तू तर राशीला किती समजून घेतल पाहिजे.. त्यादिवशी सरळ म्हणालास कि ती सगळ मुदामून करते.. मी दारातून ऐकलं नसतं तर काहीच माहिती झालं नसतं आणि राशीही मला काहीच म्हणाली नसती याबद्दल.. अभय... बेटा मान्य आहे तुला ऑफिसमध्ये खूप काम असत.. जबाबदारी वाढली आहे तुझी.. तुझी चिडचिडही होत असेल पण त्याचा राग तू राशीवर काढणं कितपत योग्य आहे बर.. आजकाल खूप रागवतोस तू तिला.. छोट्या-छोट्या कारनावरून भडकतोस तिच्यावर.. हे चुकीचं आहे ना अभय.. तिनेही जॉब केला आहे म्हणून ती तुला समजून घेते..पण तिला काही त्यातलं कळणारच नाही अस नाही ना.. सगळ कळतं रे बायकांना पण आपल्यासाठी शांत राहतात.. मला सांग कितीदिवस झाले तुला आणि तिला एकत्र असा वेळ सोबत घालवून कि अंशशी लास्ट केव्हा खेळालास.." सुभाषराव सगळ बोलून गेले आणि अभय विचारात पडला.. त्याच्याकडे उत्तरच नव्हतं.. त्याला बघत ते पुढे म्हणाले.. "आठवत नाही ना तुला.. बाळा.. मी ज्या चुका केल्यात तू त्या नको करुस.. मीही तुझ्या आईला काहीच देऊ शकलो नाही.. सतत कामात राहिलो.. तिला आणि तुला वेळ देता आला नाही याची जाणीव मला तुझी आई गेल्यावर झाली.. वेळ भराभर निघून जातो रे अभय.. काही गोष्टी योग्य वेळातच झाल्या तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो.. आताच वेळ आहे सुंदर सुंदर आठवणी बनव.. ह्या आठवणीच असतात ज्या म्हातारंपनी ओठांवर हसू आणतात.. माझं दुर्भाग्य कि तुझ्या आईसोबत त्या मला बनवता आल्या नाहीत.. पण तू राशीसोबत बनव..तिला आपला वेळ दे.. प्रेम भरपूर आहे रे थोडासा मानही दे.. काम जेवढं गरजेच आहे तेवढीच आपली माणसंही महत्वाची आहेत अभय.. ही गोष्ट लक्षात ठेव... चल आता काहीतरी खाऊन घे.. सकाळपासून काहीच नाही खाल्ल आहेस.. चल उठ मी पान वाढतो.. "

"बाबा.. पण जेवण कुठे बनवलं आहे.. मी बनवतो काहीतरी"... अभय सोफ्यावरून उठत म्हनाला.."अरे.. दुपारीच इतक बनवलं आहेस तेच बस झालं दोघांना..मला तर वाटत उद्या दुपारीही तेच खावं लागेल.. "सुभाषराव हसायला लागेल.. अभयच्याही ओठांवर हसू आल.. दोघांनी जेवण करून सगळ किचन आटपलं.. अभय झोपण्याचा प्रयत्न करत होता तरी त्याला झोप येत नव्हती.. तो सारखा फोन चेक करत होता.. राशीने समोरून एकही msg किंवा कॉल अजून केला नव्हता.. त्याने तिची माफी मागत एक लांब लचक msg तिला पाठवला.. आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागला.. खूप वेळ झाला तरी काहीच रिप्लाय आला नाही.. रिप्लायची वाट बघतच तो झोपी गेला...

सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा अंश त्याच्या बाजूला बसून त्याच्या पोटावर हाताने मारत होता.. त्याला वाटलं तो स्वप्नच बघत आहे.. डोळे चोळूत पटकन तो उठून बसला.. अंशला आपल्याजवळ घेऊन त्याने त्याची पापी घ्यायला सुरवात केली.. राशी वोडरॉब मधून अभयचे कपडे काढत म्हणाली.. "लाड झाले असतील मुलाचे करून तर अंघोळीला जाल का आता.. उशीर झाला तर माझ्या नावाने मग ओरडत बसाल महाशय.." अभयने अंशला उचलून घेतले आणि पटकन बेडवरून उठत राशीला आपल्या मिठीत घेतले....एका हाताने आपली मिठी घट्ट करत म्हणाला.. "मला वाटलं तू आता परत येणारच नाहीस.. खूप घाबरलो होतो मी राशी.. सॉरी.. पुन्हा नाही करणार अस.. कान धरतो मी.. पण plz अस मला सोडून नको जाऊस पुन्हा. तुझ्या आणि अंशशिवाय मी राहूच नाही शकत.. खूप मिस केल तुम्हा दोघांना कालपासून.. खूप मिस केल.. "अभयचा आवाज जड झाला होता.. राशीच्यापासून वेगळी होत म्हणाली.. "कुठ जाऊ बर तुला सोडून.. आणि किती सॉरी म्हणणार आहेस.. काल इतका मोठा msg पाठ्वलास तेच पुरेसं आहे.. बर जा आता अंघोळीला.. उशीर होतोय ऑफिस ला.. "

"नको.. आज राहू दे ऑफिस.. नाही जातं मी.. आज तुझ्या आणि अंशसोबत राहायचं आहे मला.. "अभय राशीला एका हाताने पुन्हा आपल्या मिठीत घेत म्हणाला.. "ह्म्म्म.... आम्ही आहोत घरीच .. कुठे जाणार नाही आहोत.. कालही सुट्टी झाली.. आज पुन्हा नको.. जावं लागेल ऑफिसला.. बहाणा नाही चालणार आता.. चल.. चल.. उशीर होईल.. "राशीने त्याला जवळजवळ धकलत बाथरूममध्ये पाठवलं.. अंशला घेऊन आपल्या कामाला लागली.. रोजसारखंच घरातल वातावरण होत.. पण आज अभयने आपल्या सोबत राशीलासुद्धा नास्ता करायला बसवले.. आज तो तिची काळजी करतांना दिसत होता... सुभाषराव मनातून खुश होते आज.. अभय ऑफिसला निघाला आणि ते पेपर वाचत बसले.. राशी आणि अंश अभयला बाय करायला दरवाज्यापर्यत गेले तस अभयने इकडे तिकडे बघत राशीच्या गालावर किस केली आणि तिला हसत म्हणाला.. "i love you so much राशी.... आज रात्रीच जेवण मी बनवीन..फक्त तयारी करून ठेव.. ओके.. बाय.. "अस म्हणत त्याने अंशच्याही माथ्यावर किस केली आणि पटकन निघून गेला.. राशी त्याला बघतच राहिली.. त्याच्या अश्या वागण्याने मात्र राशी लाजली.. गाल लाल झाले होते तिचे.....आजूबाजूला नजर टाकत तिने दरवाजा बंद केला..आणि हसत आपल्या रूममध्ये निघून गेली.. सुभाषरावांनी हसत एकदा तिच्याकडे पाहिले आणि एकदा सुनंदाताईच्या फोटोवर....फोटोला एकटक बघून त्यांनी पुन्हा आपलं लक्ष पेपर वाचण्यात केंद्रित केल...



***************** समाप्त ********************