Love diary books and stories free download online pdf in Marathi

प्यारवाली डायरी‍️‍

पावसाळी दिवस असल्याने आज काही मी कामावर नव्हतो.तसा वेळेचा मी काटेकोरपणे पालन करणारा मी आयुष्यात फक्त न जाणून फक्त एकदा आणि आज निसर्गाच्या या रूपामुळे माझा आणि माझ्या तत्वासोबत मी कधी समजोता केला नाही पण काही वेळा या निसर्गाच्या सुद्धा मनात काही वेगळेच असते .आणि फक्त हातावर हात ठेऊन बसण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.अरे मी एकटाच काय बडबडतोय...! तुम्ही चहा घेतला ना???
घेतलाच असेल...!

सकाळी सकाळी गार गुलाबी हवा सुटली होती.आणि पूर्वेला केशरी रंगाची उधळण करत तो सुर्य येत होता.कित्येक दिवसातून असा सोहळा पाहिला मिळाला होता.नाहीतर त्या काळात दोघांची भेट व्हायला फक्त हाच एक कारणीभूत असायचा.ते दिवस पुन्हा कसे डोळ्यात आनंद अश्रू घेऊन येतात.आणि अशा भल्या थंडीत सुद्धा नात्याची उबदार शाल अंगावर पांघरून जातात.

तोपर्यंत मी पेपर हातात घेणार तेवढ्यातच माझी छोटीशी परी म्हणजे मुलगी तिच्या इवल्याश्या पावलांनी धूडूधुडू फेर धरत एका हातात मोबाईल घेऊन धावत आली.तिच्या त्या बोबडे बोल मनी कसे सरळ पोहचतात.आणि तेव्हा का मुलगी बापाच्या जवळची वाटते.हे कळून चुकून जात.परी आणि माझं नातं खूप म्हणजे खूपच बोलके आहे.कारण मोठा मुलगा म्हणजे आमच्या परीचा दादा याच्यात आणि माझ्यात नातं आहे पण तितकसं खुलले नाही किंवा मी त्याला तेवढी स्पेस देत नसावा.कारण मुले जास्त स्पेस दिल्यानं कधी वाहतील सांगता येत नाही.पण माझी मात्र परी याला मात्र अपवाद असेल कारण तिच्यापाशी गेल्यानंतर माझा मलाच विसर पडून जातो.

अरे मी नुसतं माझ्या कन्येच कौतुक करत बसलो..!😊अगं...परी काय म्हणते...?तर तिनं तिच्या हातातला मोबाईल माझ्याकडे देण्यासाठी हात केला.मी घेतला आणि पाहिलं तर माझा मित्र अक्षय याचा फोन होता.

मी फोन उचलला तिकडून लवकर आवाज आला नाही.परत तो हळू आवाजात बोलला," राहुल बोलतोय ना...!"
मी म्हटलं,"काय अक्षय , विसरलं की काय मला...?"

तो म्हटला,"विसरलो असतो तर ...केला असता का फोन!!!"

मग दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली.आणि त्याला मी फोन करण्याचं कारण विचारलं तर तो म्हटला असं नाही सांगता येणार.तू मला फलटण मधील आपल्या दररोजच्या माझाई मंदीर येथे बागेत भेटूया.खुप महत्वाचं बोलायचं आहे आणि खुप मनातल बोलायचं आहे.मी म्हटलं आज सुट्टी पण आहे.आणि बाकी काही काम पण नाही तर येतो मी फलटणला मग आपण भेटूया..!

मी घरी सांगितलं आणि परीला काहीतरी खायला आणतो असे सांगून घर सोडलं आणि फलटणला रवाना झालो.मध्ये बऱ्याच शंका येत होत्या की, नक्की काय झाले असेल?आणि पण एका गोष्टीचा आनंद होता की, मित्र खुप दिवसांनी भेटत होता.कारण तो पुण्याला स्थाईक झाला होता.पाच वर्षे झाले त्याचा आणि माझा संपर्क झाला नव्हता.तस माझ्या सर्व कविता,कथा आणि आयुष्यातील बऱ्यापैकी आनंदी क्षण मी त्याच्याशी शेअर करायचो.त्यामुळे अगदी सगळ्यात जिकरीचा हा माझा मित्र काळजाचा तुकडा...!होता.

आज रविवार असल्याने आणि तशी कामाला सोमवारी सुट्टी असते कारण रविवार हा कामाचा असायचा कारण ज्याला काम करायला हा दिवस महत्त्वाचा कारण सर्व टार्गेट याच काळात पुर्ण करायचे असा हट्ट नेहमी असायचा.

तसा फलटणचा आज बाजार होता. संपूर्ण गर्दीने सर्व रस्ते गलबजले होते.आणि त्यातही रस्ता काढत मी कसतरी हे मोठं अग्निदिव्य पार पाडत बाहेर पडलो.आणि सरळ आता माझाई मंदीर गाठलं.तेथील बागेत बऱ्यापैकी गर्दी होती.पण कमालीची शांतता तिथे होती.कोणीही तिथं आपलं दुःख विसरण्यासाठी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी नक्कीच येत असणार..!यात काही शंका नव्हती.आणि तेवढ्यातच मोगऱ्याच्या फुलांचा दरवळ आला.मंद वाऱ्याच्या झुळूकाने कसं सर्व प्रसन्न वातावरण केलं होतं.गेटपशीच म्हणजेच शेजारी पाण्याच्या फवारा छान होता.आत जावे तर हिरवळच सर्व बाजूंनी होती.एका कोपऱ्यात मुलांसाठी घसरगुंडी,पाळणे होते.ज्येष्ठांसाठी बसण्याची बाकडे होती.आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही तिथे येऊ शकत होतं.आणि मनसोक्त निसर्गाचा उपभोग घेऊ शकत होतं.मध्येच कधीतरी चिमण्यांच्या, पोपटाच्या,आणि कोकीळाच्या ओरडण्याचा आवाज कानी येत होता.मन कसं प्रफुल्लित होत होतं.एका क्षणाला मी माझ्या मित्राला भेटायला आलो आहे हेच तर विसरलो होतो.पण या भेटीमागील गुपित काही माहीत नव्हते.आताच आठवले की या बागेशी माझा खुप जुना संबंध आहे.कारण ही गोष्ट कॉलेजच्या दिवसांची असेल.आमच्या चार जणांचा ग्रुप होता.त्यामुळे हे ठिकाण आमच्या भेटीचं खुप जवळचा संबंध होता.

अक्षयला मी पाहिला तो एकदम तसा तो तसाच होता.त्याच्यात मात्र काही फरक पडला नव्हता.थोडा फक्त पोटाने वाढला एवढाच काय फरक जाणवत होता...! नाहीतर तो काळा चश्मा घालण्यापासून ते बूट , घड्याळ डाव्या हातात घालून सतत वर खाली करण्याची सवय अजूनही तशीच त्यानं जपली होती.त्यामुळे त्याला किती जरी लांबून पाहिलं तरी सहज ओळखता येत होतं.मी त्याच्याजवळ गेलो तर तो खुप कडाडून भेटलो.त्याच आयुष्य एकदम स्वप्नासारख होत.कारण त्यानं ज्या मुलीवर प्रेम केलं त्याचं मुलीशी लग्न केलं आणि ती पण आमच्या चौघांच्या ग्रुपमधील कोमलशी...! खूप छान जोडा आहे.सारखे भांडण करणे आणि मला आणि निशाला ते सोडवून दोघांना परत बोलत करणं हा आमच्या दोघांच नित्यनेमाच काम होत.कोमल आणि अक्षय आम्हा दोघांना खूप चिडवायचे की, तुम्हा दोघांची जोडी खुप छान जमेल.कारण आमच्यात दोघांमध्ये भांडण कधी झालीच नाही आणि शेवटचं भांडण तेवढंच...! आम्ही दोघे एकामेंकाना खुप समजून घ्यायचो शक्यतो कमी बोलायचो पण एकमेकांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून खुप काही समजून जायचो.

तो बोलू लागला...अरे खुप दिवसातून आपण भेटतोय ना!अरे काल कोमल ने तुझी खूप आठवण काढली.मग निशाची तर निघणारच ना!मी थोडं तिचं नाव ऐकता न ऐकल्या सारखे केले.हे त्याला समजलं असावं कारण तो लगेच म्हटला अरे तुम्हीच आम्हाला म्हणायचा की,जिथल तिथे विसरायचं आणि आता तुम्ही दोघे सुध्दा लहान मुलासारखे वागताय...!मी म्हटलं ते जाऊ दे...येथे कशाला बोलवलं आहे ते तरी नक्की सांग!
तो म्हटला चला तुला गरमागरम भजी सांगतो तेवढाच तुझा मुड बनून जाईल.आम्ही दोघे भजी खायला गेलो.

तो आता बोलू लागला.अरे आठवड्यापूर्वी कोमलला निशाचा फोन आला होता.आम्ही गेलो होतो तिला भेटायला.
मग मी म्हटलं अरे मुद्याचं बोलशील ना...!
बरं...अरे ते दिवस आठवतात ना तुला... जेव्हा आमच्या लग्नाच्या अगोदर तुम्ही लग्न करणार होता.मला त्याच बोलणं समजत नव्हतं पण रोख कळत होता.तो म्हटला अरे परी कशी आहे.मी म्हटलं बरी आहे...! त्यानं खिशातले पाचशे रूपायाची नोट काढली आणि म्हणाला तिला सांग मावशी आणि काका काही येऊ शकले नाही.पण तिला भेटवस्तू घेऊन जा.आणि आम्ही दिलंय असं सांग...!!!

अक्षय आता थोडं गंभीरपणे बोलू लागला.आमच्या लग्नात तुम्ही जेव्हा आला तेव्हा दोघे तुम्ही बोलत नव्हता.आम्ही दोघे पुर्वीचे राहुल,निशा शोधत होतो.आणि मला आठवतंय तेव्हा परी लहान असेल आणि निशा माहेराला राहायला गेली होती.मी म्हटलं मग काय याचा काय संबंध...!तो म्हटला ऐकून तर घेशील ना???
मी नजरेने हो म्हटलं.तो म्हटला आम्ही पर्वा तिच्या घरी म्हणजे माहेरला गेलो होतो.ती आम्हाला चहा करायला गेली आणि ती आणि कोमल बाहेर बोलत होत्या.त्यावेळी तिथे टेबलावर माझी नजर गेली तर खाली एक रोजनिशी दिसली.मला वाटलं ते नाही म्हटलं तर सात-आठ वर्षे ती रोजनिशी असावी.खुप जड होती.मी वाचायला घेतली तर त्यामध्ये आपल्या कॉलेजमधील प्रत्येक आठवणी त्यात होत्या आणि तुमच्या दोघांमधील प्रत्येक क्षण त्यात कैद होता.आणि मला वाटतंय ती ते दररोज नजरे खालून घालवत असावी.तिची तब्येत आता पहिल्यासारखी नव्हती राहिली.ती खुप एकटी एकटी पडली आहे.आणि मागेच तिची आई गेली.हे ऐकून मला वाईट वाटलं होतं.पण ज्या तिच्या आईमुळे हे नातं वेगळं झालं होतं त्यांच्याविषयी नक्की मला तरी काय वाटणार...!!!

तो म्हटला मी वाचताना ती आत आली आणि तिने लगेच माझ्याकडून ती हिसकावुन घेतली.मला काही समजेना तिने असे का केले असावे!पण हे समजण्याच्या पलीकडले होत.
मग मी विचारलं की तु रोजनिशी लिहते का?ती हो म्हटली पण माझी रोजनिशी कुणी वाचावी असं मला वाटतं.तिच ते म्हण्याचा उद्देश माझ्या लक्षात आला होता.पण मला जे पडलेलं कोड होत ते मात्र सुटलं होतं.पण तिला ती बहुतेक समजलं नसावं.मग मध्येच वातावरण बिघडू नये म्हणून कोमलने विषय बदलला आणि कॉलेजचा विषय काढला.पण तशी ती वरवरची बोलत होती.पण ती तुझ्या आणि परीमध्ये खोलवर गुंतलेली दिसलेली होती.

तो पर्यंत दरवाजाची बेल वाजली अन् कोमलने दरवाजा उघडला तर पोस्टमन होता.त्याने निशाच्या आई आहेत का विचारलं तर कोमलने त्याचं निधन झाले आहे असं सांगितलं मग त्याच कोण मुलगा किंवा मुलगी आहे असं विचारलं तर निशा म्हटली मी आहे.कोमलने ते पत्र आत आणलं आणि निशा बाहेर सही करून आत गेली असावी.ते पत्र निशाने फोडलं ते आमच्यासमोर अन् ते वाचलं आणि तिच्या डोळ्यातून आता अश्रू थांबतच नव्हते.तिला कोमलने कसेतरी सावरलं आणि ते पत्र कोमलने वाचलं आणि ती पण स्तब्ध झाली होती.शेवटी मग मी तिच्या हातातून ते पत्र वाचलं तर मला पण धक्काच बसला कारण तो तुमच्या दोघांच्या घटस्फोटाचा आलेला कोर्टाचा संदेश होता.आणि अर्थात तो निशाच्या आईनेच फ्रॉम भरला असावा.निशा मात्र आता पुटपुटत होती की आता मात्र सगळ संपलं.कोमलने तिला खूप समजावलं आणि तिला फोनवर दररोज चौकशी करत असतो दोघेपण.हे ऐकताच मला पण धक्काच बसला होता कारण घटस्फोटासाठी अर्ज ही कल्पना मी कधी स्वप्नात सुद्धा केली नव्हती.पण निशाच्या आईने कित्येक वेळा अशी धमकी दिली होती.

थोडा वेळ दोघे खुप शांत बसलो होतो.परत मग मीच विचारलं त्या रोजनिशी म्हणजे डायरीत असं काय होतं की,जे तुला माझ्याशी बोलावं वाटलं???
तो म्हटला तोच तर तुमच्या दोघांच्या वेगळं होण्याचं कारण होतं.निशा असं लिहिलं होतं.

दिनांक,१७ एप्रिल,
समजलं की तिने तिच्या कोणत्या तरी चुलत भावाच्या मुलाशी माझं लग्न ठरवलं होतं.पण आमच्या दोघांच्या प्रेमापुढे आणि तेव्हा बाबा असल्याने ती तेव्हा काही न बोलता आमच्या लग्नाला तयार झाली.पण बाबा गेल्यानंतर तिनं मला गोड बोलून माहेराला आणून राहुलच्या विषयी चुकीच्या गोष्टी सांगून मला त्याच्या विरोधात उभं केलं.मग मला त्याच्या दुसऱ्याच कुणासंगे प्रेमप्रकरण आहे.अस सांगून त्याच्याशी असलेले संबंध तोडायला लावले आणि घटस्फोटासाठी अर्ज केला.

पण ही गोष्ट मला कळाली होती.पण तिने माझ्याकडून स्वतःहून न जाण्याची शपथ घेतली होती. त्या कारणाने ती काहीच बोलू,करू शकत नव्हती.

आयुष्यात मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.पण मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही.जसे दिवस जाईल तसं मी जगत राहीन...! मला विश्र्वास आहे की राहुल एके दिवशी या सर्व गोष्टी कळतील आणि जमलं तर माफ करशील ना...! अगं कसा माफ करेल.तू त्याला आयुष्यात परत तोंड सुद्धा दाखवू नको म्हटली आहेस.

शेवटी ती एवढी म्हटली मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे की नक्कीच राहुलला समजेल.पण मी आईने दिलेल्या शपथेत बंदिस्त आहे आणि स्वतःहून कोणाला सांगू शकत नाही.हीच फार मोठी शोकांतिका आहे.

हा मजकूर तुला सांगावा म्हणुन तुला मी इथे बोलवलं होत.तरी मी म्हणत होतो.निशा कधीच असं करू शकत नाही.चल आपण लगेच तिला आणायला जाऊ माझ्या परीला सर्वात मोठं गिफ्ट द्यायचं आहे.थांब असं करतो.मी कोमलला फोन करतो.आणि आपण मोठी गाडी करून जाऊया.फक्त याची निशाला काय सांगू नको.तसच आम्ही दोघं अक्षयच्या घरून निघालो.मध्ये गाडी थांबवली आणि राहुल बाहेर जाऊन काहीतरी घेऊन आला होता.ते दाखवलं नाही.आता आम्ही निशाच्या घरासमोर होतो.मी त्या दोघांच्या मागे उभा होतो कारण तिला दिसायला नको म्हणुन कोमलने बेल वाजवली आणि निशाने दार उघडले .आणि म्हटली तुम्ही पुन्हा आला.अरे...काय राहिलं आहे का तुमचं...!अक्षय म्हटला काही नाही.आमची निशा पुर्वीची शोधतोय.आणि ते दोघे बाजूला झाले आणि मी दिसलो.जसे पहिल्या भेटीविषयी जे झालंय ते मनातून वाटत होतं.पण तिने भावना आवरत मला नाही भेटायचं त्याला म्हणावं तू जाऊ शकतोस...!
मग मी म्हटलं,"तुला नसेलही भेटायचं पण मला माझ्या निशाला भेटायचंय...!"
तसं निशाच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते.दोघे खुप कडाडून भेटले.खुप दिवसांनी अशी भेट झाली होती.मी तुला न्यायला आलोय.अस मी म्हटलं तेव्हा ती नको म्हणत होती.पण मी म्हटलं बस्स झालं आता हे तुझा अजून गैरसमज दूर नाही का झाला...
तिला सर्व माहित होतं.पण काय करणार...!
मग कोमल बोलली निशा तिला सर्व काही माहित झालं आहे.चल त्यानं तुला कधीच माफ केलय.आणि मला पण माहीत आहे की तुझा एक क्षण असा जात नाही त्याची तु आठवण काढत नसशील.तिला आनंद झाला होता.ती चहा करेपर्यंत कोमल व अक्षयने तिचं सर्व सामान घेऊन गाडीत ठेवलं होतं आणि शेजारील काकांना जवळ तिच्या घराची चावी देण्याची सोय करून झाली होती...

गाडीत जाताना खुप पहिले दिवस ते जगत होते.पण आता कोमल आणि अक्षय खोटं खोटं भांडण करत होते.आणि ते दोघांना समजल्याने दोघेही नुसता आनंद घेत होते.

घरी पोहचल्यावर परी पळत राहुल कडे गेली.निशाला वाईट वाटलं की मुलांची आईसारखी काळजी मी नसताना राहुलने घेतली होती.माझी काहीच कमी पडू दिली नव्हती.
राहुल म्हटलं बघ कोण आलंय तुझी आई आली आहे.तिच्याजवळ जा....परी पण तिच्याकडे गेली आणि मुलगा तिच्या पायाजवळ होता .तिने त्या दोघांना घट्ट मिठी मारली आणि खुप गहिवरून येऊन ती रडू लागली होती.

आता सर्व झाल्यावर निशाने विचारले हे कसं झालं यावरती माझा अजून खरंच विश्वास बसत नाही.मग अक्षय म्हटला त्यादिवशी मी तुझी रोजनिशी वाचली.निशा म्हटली म्हणजे तू सर्वच वाचून काढलं की काय..???
अक्षय म्हटला सर्व नाही पण जेवढं पुर होत तेवढ मात्र हाती नक्कीच लागलं होतं...
मग मी सर्व राहुलला सांगितले आणि हे सर्व असं घडलं.

तशी निशा म्हटली खरंच आयुष्यातल्या एका चांगल्या सवयीने माझं आयुष्य वाचवलं ...!खरंच शब्द नाहीत..

मग वाचताय ना!!!तुम्ही केव्हापासून लिहतात रोजनिशी मग...!!!!
‌. लेखक:-राहुल पिसाळ (रांच)