kadambari jivlaga Part 45 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ... भाग -४५ वा

कादंबरी –जिवलग

भाग-४५ वा

-------------------------------------------------------------

दुसरे दिवशी सकाळी बरोब्बर नऊ वाजता ..देसाईसाहेबांची गाडी वकीलसाहेबांच्या घरासमोर थांबली .

कारचा दरवाजा उघडीत देसाई साहेब उतरले , आणि त्यांनी मागचा दरवाजा उघडला , आतून मिसेस देसाईना उतरतांना पाहून ..

बाहेरच्या बैठकीत ..बसलेल्या ..आजोबांना आणि मोठ्या वकिलसाहेबांना खूपच आश्चर्य वाटले .

देसाईसाहेब –आणि बाईसाहेब जोडीने येतील अशी कल्पना केली नव्हती ..त्यामुळे आता सगळा

फेरबदल करावा लागणार आहे हे ओळखून ..भूषणदादू आधीच घरात गेला होता ..देसाई फमिली आली हे सांगण्यासाठी.

वाड्याच्या मोठ्या दरवाजातून ..मोठे वकीलसाहेब बाहेर आले ..

यावे ! यावे ! देसाई साहेब ..

चालावे आतच जाऊया आपण सगळे ,

बाहेरच्या बैठकीत असे फमिली सोबत बसने बरे दिसणार नाही.

अंगणातून वर ओसरीवर नव्याने बैठक टाकून ,बसण्याची व्यवस्था केलेली पाहून ..

आजोबा आणि मोठ्या वकिलसाहेबांना समाधान वाटले .

मोठ्या वकिलीणबाई – नेहाच्या आई, लगेच तयार होऊन बाहेर आल्या ,

त्यांनी देसाई –बाईसाहेबांचे स्वागत करीत ..समोरच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली.

आजोबां म्हणाले –अरे , आत सांगा बरे ..की -

आजीबाईंनी पण बाहेर येऊन सगळ्यांच्या सोबत बसावे , त्याप्रमाणे आजीबाई पण येऊन बसल्या.

समोर सगळे आलेले आहेत पाहून .

देसाईसाहेब ..आजोबांना हात जोडीत म्हणाले ..

बापूसाहेब – आज तुमच्या समोर मी बँक म्यानेजर देसाई म्हणून आलेलो नाही.

ही संपूर्णपणे पारिवारिक भेट आहे , कौटुंबिक विषयाची भेट आहे ..म्हणून आम्ही उभयता आलेलो आहोत.

बापूसाहेब – गेली दोन-अडीच वर्षे मी या शहरात आमच्या बँकेच्या शाखेची म्यानेजर म्हणून जबाबदारी

सांभाळत आहे , मी आलो त्यावेळी आमच्या या शाखेची परिस्थिती फारच बिघडलेली होती , यातून

बँकेला बाहेर काढण्याचे काम खूपच कठीण होते ..आणि यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला ,आमच्या बँक-

आमच्या शाखेला चांगल्या स्थितीत आणण्याच्या कामात मला ..मोठ्या वकील साहेबांनी खूप मोलाची मदत केली ,

प्रसंगी धीर दिला ..त्यांच्या मैत्रीचा लाभ झाला म्हणून तर माझ्यावरची फार कठीण वेळ निभावता आली.

बापूसाहेब – “ बेकार कंडीशनच्या शाखेचा म्यानेजर ..हा धब्बा लागणे कसे आणि किती अपमानास्पद असते ?

....तुम्हाला याची कल्पना आहेच. बापूसाहेब . तुम्ही माझी मन:स्थिती समजून घेऊ शकता .

आता आमची शाखा सगळ्या दृष्टीने प्लस पोझिशनला आहे. याचे श्रेय ..मोठ्या वकीलसाहेबांचे आहे.,

आणि सध्या आमच्या बँकेचे वकील असलेले ..हे धाकटे वकीलसाहेब ..भूषणराव यांचे आहे.

त्यांचे आभार तर मानायचे आहेत ..त्याही पेक्षा एक महत्वाचे काम आहे आज -

त्याच बरोबर एक इच्छा आणि एक विनंती तुमच्या समोर मांडायची आहे -

योग्य असेल तर जरूर विचार करावा , अयोग्य असेल तर ..मग नाईलाज होईल , वाईट वाटेल आम्हाला

देसाईसाहेबांच्या भावना बापुसाहेबंनी एकून घेत म्हटले ..

म्यानेजरसाहेब ..तुमच्या भावनांचा आम्ही सगळेच आदर करतो . आमच्या मुलांचे तुम्ही कौतुक केलेत ,

खूप छान वाटले ऐकून ,हे सांगायला नकोच .

आमची तिसरी पिढी ..भूषणच्या रूपाने समाजकार्यात आलेली पाहून ,

तुमच्या सारख्या मोठ्या माणसाकडून त्याच्या बद्दल ऐकणे “,

तुम्ही आज आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिलात म्यानेजर साहेब. असो ..

आता बोला ..तुमच्या मनातील इच्छा ..विनासंकोच सांगावे.

आजोबांच्या शब्दांनी देसाई साहेबंना खूप धीर आलेला आहे..हे सगळ्यांना जाणवले.

देसाईसाहेब बोलू लागले..

बापूसाहेब -इथे येऊन मला दोन –अडीच वर्षे झालीत ..येत्या काही महिन्यात ..फार फार तर नव्या वर्षात

एप्रिल –नंतर माझी या शाखेतून बदली होणार ..मिळणारे हे प्रमोशन ..आणि ही होणारी बदली

माझी अखेरची असेल ..

नोकरीत उरलेले १५ महिने आणि त्यातले दिवस मोजीत ..नोकरी करायची आहे.

बापूसाहेब – माझी एकुलती एक कन्या विवाह योग्य झाली आहे . गेले वर्षभर ती माझ्याकडे

इथेच राहते आहे. एम सी ए झाली आहे ती .. नोकरी करीन तर ती शिक्षकाची –प्राध्यापकाची

असे तिने ठरवले आहे . कंपनी जोब करयचा नाही असा तिचा निश्चय आहे.

सध्या ती आपल्या शहरातील एका ज्युनियर कॉलेजमध्ये ..काम्पुटर सायन्स “शिकवायला जाते .

माझी इच्छा अशी आहे की ..

आपण आपल्या छोट्या वकील साहेबांसाठी .भूषणराव यांचे साठी आमच्या कन्येचा “स्थळ “

म्हणून विचार करावा “

ही विनंती करण्यासाठी आज आम्ही दोघे आलो आहोत ,..तुम्ही आमच्या विनंतीचा विचार करावा .

.आणि अनुकूल विचार असेल तर..लगेच कळवावे ..म्हणजे ..आमच्या कन्येला पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी

आमच्या घरी कधी येता ते कळवावे ..

आणि एक ..आमची कन्या तुम्हाला सर्वाथाने योग्य वाटली तरच

पुढचे ठरवू ..नाही तर ..

रूढ निरोप ..योग नाही “ असे कळवले तरी राग येणार नाही.

देसाइबाईंनी पर्समधून ..काही फोटो काढून ..वकीलीनबाईंच्या हातात देत म्हटले ..

आमच्या भारतीचे फोटो ..आणि ही तिची पत्रिका ..दोन्ही बघा ,

चहा –फराळ करतांना देसाई साहेबांचे लक्ष घड्याळाकडेच होते . दहाच्या पुढे काटा सरकू लागलाय

हे पाहून ..ते म्हणाले ..

बापूसाहेब ..परवानगी द्यावी ..बँकेची पण वेळ झाली आहे.

फोटो आणि पत्रिका दिली आहे ..ठरवा आणि कळवा ..

हा योग जुळून आला तर ..खूप आनंद होईल आम्हाला .

देसाईसाहेब निरोप घेऊन परतले ..

आणि वकीलसाहेबांच्या घरात ..एकच गोंधळ सुरु झाला ..

भूषणचे लग्न ? याचा तर आपण अजून विचारच केला नाहीये ,

आधी मुलीचे , मग, मुलाचे, ..,आधी बहिणीचे ..मग भावाचे ..अशी पद्धत आहे ..

निदान बहिण-भावांचे पाठोपाठ लग्न करणे “ हा एक रास्त उपाय आहे.

बापूसाहेब म्हणाले ..ते बघू .नंतर

.अगोदर ..देसाई साहेबांच्या कन्येला बघून घेऊ ..

पत्रिका ..जुजुबी पहायची ..जास्त कीस नाही पडायचा .

येत्या रविवारी दुपारी चार वाजता ..आपण देसाई साहेबांच्या मुलीला पाहण्यास येतोआहोत

असा निरोप द्या .

बापूसाहेब , आज्जीबाई ,मोठ्या वाकीलीनबाई यांच्या हातात .आणि नजरे समोर . देसाईसाहेबांच्या मुलीचे

फोटो होते ..

हसर्या चेहेर्याची ..टपोर्या डोळ्याची ..स्मार्ट भारती “फोटोवरून सर्वांना आवडली आहे,

हे मोठ्या वकीलसाहेबांनी ओळखले .

त्यांनी भूषणला आवाज देत बोलावले ..

तुमचे काय मत आहे चिरंजीव ?

पप्पा – तुम्ही सगळे ठरवा ..मी आहे तुमच्या सोबत .

ते ठीक आहे हो ..पण, तुम्ही पाहिलंय का देसाईसाहेबांच्या मुलीला ?

नाही हो पापा ..कधी तसा योग आला नाही .

ठीक आहे भूषण , आपण जाऊ या देसाईसाहेबांच्याकडे ..मुलगी पाहू , मग चर्चा

करून ठरवू , तुझा विचार –निर्णय याला पण महत्व आहे बरे का .

ओके पापा ..असे म्हणून भूषण कोर्टात जाण्यास निघाला .

********

२.

ऑफिस संपवून ..अनिता –सोनिया ,नेहा तिघीजणी .घरी आलेल्या होत्या . नेहाने मस्त

चहा करीत ..मध्ये आणून ठेवला ..चहा घेत घेत तिघी बोलत बसल्या ..आणि सोनियाच्या

फोन मधला मेसेज बॉक्स बीप बीप वाजून गेला ..तसे सोनियाला हेमूच्या आई-बाबांच्या

येण्याची आठवण झाली .. तेणे धडपडत मेसेज वाचला ..

हेमू आणि त्याचे आई बाबा ..जवळच्या सिग्नल जवळ येऊन थांबले आहेत ..त्यांना येऊन घेऊन

जाणे “

सोनिया ..अनिताला म्हणाली ..चला बाई ..आपले पाहुणे आलेत ..चाल ,त्यांना घेऊन येउत .

नेहा –तू तोप्रयंत चहा टाकून ठेव ..सगळ्यांसाठी ..म्हणजे आपण तीन प्लस ,दोन पाहुणे .

नेहा किचन मध्ये गेली ...

हेमू वाटच पाहत होता .... मधुरिमादीदीच्या प्लैन प्रमाणे ..सोनियाचे पाहुणे म्हणून दोन दिवस

तिच्या रूमवर राहण्यास सांगितले होते ,आणि नेहाच्या सहवासात तिच्याबद्दल जाणून घायचे “असे

ठरवले होते.

अनिता आणि सोनिया सोबत हेमुचे आई-बाबा ..घरात आले . दिवसभराच्या प्रवासाने नाही म्हटले

तरी थकवा आला होता .

आत आल्यावर समान वगरे ठेवून ..फ्रेश होऊन झाल्यावर ..ते सगळे हॉलमध्ये बसले .

नेहा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली.

हेमूच्या आई-बाबांशी ओळख करून देत सोनिया म्हणाली ..

मामा .. मामी ..ही आमच्या दोघींची मैत्रीण ..सोबत राहणारी ..नेहा ..

ऑफिसमधून आम्ही आलो की किचन ड्युटी हिच्याकडे असते ..फार आवड आहे हिला .

मग अनिता नेहाला म्हणाली –

या मामांचा सोमवारी एक संस्थेत सत्कार आहे , त्यासाठी हे दोघे आले आहेत ..

यांना बाहेरचे काही चालत नाही ..तेव्हा ..दोन-तीन दिवस यांच्या खाण्याच्या वेळा तुला

सांभाळणे आहे नेहा .

तुला हे खूप छान जमते ..तेव्हा तूच कर प्लीज.

सोनिया आणि अनिताच्या या बोलण्याला थांबवीत नेहा म्हणाली –

यात एवढे प्लीज वगेरे म्हण्यासारखे काय आहे ? मला आवडत नाही असे .

सोनिया ..तुझे पाहुणे ..हे माझे ही पाहुणेच आहेत ..

त्यांना त्रास होईल असे कसे वागेन मी ?

सोनियाने लगेच स्वतःचे कान पकडले आणि सॉरी म्हणत सुटका करून घेतली.

नेहा म्हणाली ..

या दोघीन्सारखे मी पण तुम्हाला मामा ,मामी म्हटले तर चालेल ना ?

हेमूच्या आईला ..नेहाच्या बोलण्यातला गोडवा खूप आवडला ..तिला वाटले ..

या मुलीला मोठ्या माणसांशी वागायची ,बोलायची रीत माहिती आहे . हिच्या घरचे वातावरण

नक्कीच खूप चांगले असणार.

नेहाने विचारले –

मामी ..तुम्ही खूप लहान गावात रहाणार्या ..तिथल्या सारखे साधेच जेवण तुम्हाला आवडत असणार ,

मी मस्त गरम भाकरी आणि ताकातले पिठलं करू का ..?

हेमूच्या बाबंनी आश्चर्याने विचारले ..

तुला येतात भाकरी करायला ? आणि पिठलं पण येतं ?

सोनिया म्हणाली ..अहो मामा –मामी ..हे पोरगी चुकून या मोठ्या शहरात आलीय ,

तिला काय येतं ..दिसेलच तुम्हाला ..

नेहाच्या हाताचा उरक पाहून ..,कामाचा झपाटा पाहून ..हेमूच्या आई-बाबंना खरे वाटेना

इथल्या वातवरणात अशी गावाकडची वाटावी अशी मुलगी भेटेल ..

इथे येण्या अगोदर काळजी वाटत होती ..या सोनिया आणि अनिता बरोबर हॉटेल मधले

काय काय खावे लागणार आहे कुणास ठाऊक ?

पण..या नेहाने ज्या वेळी म्हटले

गरम भाकरी ..आणि ताकाचं पिठलं आत्ता करते “

या पोरीचे शब्द ऐकूनच मन भरलं , आता खाल्यावर पोट पण भरेल.

सारे मिळून नेहाच्या चवदार स्वयपाकाची वाट पाहत बसले ..

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढील भागात ..

भाग ..४६ वा लवकरच येतो आहे .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------