Live in Part - 14 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन भाग - 14

अमन मला मझ्या आयुष्यात लग्न नको रे, मला जबाबदाऱ्या नको ...कोणी मझ्यावर अवलंबून आहे ...हे च मला आवडत नाही ...आणि हे सगळ तुला माहीत आहे, तरी तुला अस का वाटल, आपल्या लग्ना विषयी घरी बोलाव ... आपण आहोत ना ...लिव्ह इन मधे ...खुश आहोत ....मग कशाला पहिजे लग्न .....एकत्र असणे, हे महत्वाचे....अमन ला रावीच बोलण ऐकून धक्काच बसला ...आपण काय विचार केला ...आणि काय जाहाले ....आपण सगळच गमावून बसलो . आई वडिलांना ही ....आणि कदचित रावी ला ही ....तिला समजवून ही काही उपयोग नाही ...ती शेवटी तिला जे पहिजे तेच करणार ....त्यामुळे अमन शांत च राहिला फार काही बोलला नाही ... दोघानी उरलेले जेवण केले .आणि दोघे झौपायाला गेले ....रावी तर अंथरुणावर पडल्या पडल्या झोपून गेली .. पण, अमन ला काही केल्या झौप येईना .... आपण सगळ गमावून बसलो ...आई वडिलांना ही ....त्याला आई वडिलांची खूप आठवण येऊ लागली ... आपण काय करून बसलो .गेली पाच वर्ष आपण रावी सोबत लिव इन मधे रहातोय ....आता आपण लग्नाच्या स्टेज पर्यंत गेलो म्हून मला अस वाटत होत की, आता लग्न करावे ....पण, हिला तर लग्नच नको, मुल नको, सासर नको, तिथली माणस नको .....फक्त करियर हवय, पैसा हवाय ....त्याने आयुष्य निघत ...... अमन ला आता फार एकट वाटत होत .कारण त्याला लग्न हवं होत, त्याला मुल हवी होती, त्याला माणस हवी होती ......करियर, पैसा ह्या गोष्टी ही त्याला तितक्याच हव्या होत्या .....पण त्याला लग्न हवे होतेच..........त्याने मनाशी निश्चय केला होता, की त्याला लग्न हवे होते ..........त्याने हळू हळू रावीला समजवू असे ठरवले ..... त्या दिवशी अमन ला जाणवले की, प्रेम किती वाईट असत, ते माणसाला जागू ही देत नाही, आणि मरू ही देत नाही .
नेहमी प्रमाणे सगळ चालू होत . अमन ई कडे आल्या पासून त्याच्या आई वडिलांचा त्याला विचारपूस साठी एक फोन ही आला नव्हता . अमनच्या ऑफीस मधे त्याच्या वारंवार चुका होऊ लागल्या होत्या .त्यामुळे त्याला बॉस्स ची बोलणी खावी लागत होती . त्यात आता रावी शूटिंग च्या नावा वर चार चार दिवस घरी येत नसे ..... अमन ला तीच हे वागण खट्कु लागले होते, पण, काहीच करू शकत नव्हता तो .....कारण ती पहिल्यापासून तशीच होती ...बिनधास्त ...... आपण च तिच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या .....आता तर ती किस्सिंग सीन सूध्हा शूट करू लागली होती ..... आणि अमन काही बोलला, तर ....तो तिचा कामाचा भाग आहे ....अमन ला त्यातले काही कळत नाही अस, ती म्हणू लागली . ह्याचा परिणाम दोघांची खूप भांडणे होऊ लागली ...आणि एक दिवस रावी ते घर सोडून गेली .....
रावी घर सोडून गेली, आणि सोबत अमनच सुख, आनंद सोबत घेऊन गेली .परिणाम, अमन च्या ऑफीस मधे पहिल्या पेक्षा जास्त चूक्या होऊ लागल्या .म्हणून, त्याला कामावरून काढून टाकले .... आता अमन घरी एकटाच असे .दिवस दिवस एकटा असे .... हळू हळू आता तो दारू च्या आहारी जाऊ लागला, सिगरेट पिऊ लागला .सगळे पैसे हळू हळू संपून गेले . आता घर भाड द्याला ही त्याच्या जवळ पैसे नव्हते .का खायला? त्याला त्यच्या घर मालकाने घरातून काढून टाकले .....आता अमन जवळ ना घर होते, ना खायला काही? दोन दिवस तो असा वणवण भटकत होता .शेवटी आता त्याला भूक कंट्रोल होत नाव्ह्ती .त्याने रावीला फोन केला .आणि तिला सगळी हकीकत सांगितली .तिने ती ऐकून घेतली . थोड्या वेळाने एक माणूस पैसे घेऊन आला , ते पैसे रावीने पाठवले होते .त्याला वाटले, रावी सूध्हा आली . पण, रावी नव्हती आली .अमन नी पैसे साठी रावी ला फोन नव्हता केला . त्याला मायेच, प्रेमाच माणूस हवं होत . त्याला आधार हवा होता . रावी जे वागली ते अमन ला अजिबात आवडल नाही . त्याने रावी ला तर त्याच्या आयुष्यातून काढून टाकले होते, तिच्या आठवणी ही तो विसरण्याचा प्रयत्न करत होता . पण, आज त्याने ते शहर सोडण्याचा ही निर्णय घेतला .आपल्या वडिलांनी प्रेमाने दिलेले घड्याळ त्याने विकले .त्यातून मिळणारे पैसे घेतले ...आणि तडक पुणे गाठले. मनात अनेक विचार येत होते .जाऊन कुठे तरी जीव द्यावा, अस ही वाटत होते ...पण रावी चा चेहरा आणि तिने दिलेले पैसे अमन ला आठवले ....आणि त्याच्या डोक्यात एकच विचार आला ....आता हार नाही मानायची ...आता फक्त जिंकण्याची तयारी करायची. आता घरी जायचे ...आई बाबाच्या पायावर डोक ठेवायचे, त्याची माफी मागायची . पण, ते माफ करतील ...का, ते ही रावी सारखे च वागतील . अमनच्या मनात पाल चुक्चुक्ली .चार पावल्या वर घर होते .आता एथून परत जाणे ...अमन ला मान्य नव्हते . जे होईल ते होईल अस म्हणून त्याने घराकडे पाऊल टाकली . मनात भीती आणि घरच्यांना भेटायची ओढ दोन्ही ही अमन च्या मनात होते . तो घराजवळ येताच थम्ब्क्ला ....त्याने हळु हळु घरात पाऊले टाकली . त्याने दारात पाऊल ठेव्ताच आमटी चा वास सुटला होता . आई सुंदर अशी आमटी बनवली होती .त्याची बहीण हॉल मधे अभ्यास करत बसली होती . अचानक तिचे लक्ष दाराकडे गेले .पाहते तो काय? दादा ....ती मोठ्याने ओरडली .आणि पळत अमन कडे जाऊन त्याला मिठी मारली . तिचा आरडाओरड ऐकून तिची आई ही हातातले काम ठेवून बाहेर आली .पाहतो तो काय? अमन .....तिला ही फार आनंद जाहला .पण, त्याला अस अचानक पाहून, ती ला थोड आश्चर्य वाटल . आणि अमन ची अवस्था पाहून कहितरि झल्य .अस ही तिला वाटल .पण, काहीही विचारायच आधी त्याला जेवायला घालावे, म्हणून, ती म्हणाली ....अमन, निशा दोघेही चला जेवायला..... आई च्या तोंडून त्याच नाव ऐकून त्याला खूप आनंद जाहला . त्याने आई ची माफी मागितली . आईने त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला, ती त्याला जेवायला वाढत म्हणली, अमन तुझी चुकी जाहली, तुला कबूल आहे ना ....मग, माझी नको माफी मागू, तूझ्या बाबांची माफी माग . जे काही जाहाले, ते त्यांना सगळ सांग ...., वडील आहेत तूझे ....माफ करतील तुला ....शेवटी आह्मी ही नाही ....रे ....राहू शकत तुझ्याशीवाय ....तू गेल्या पासून .....आह्मी ही नाही खुश ....सारखी तुझी आठवण येत होती .तुला येऊन भेटावे ....अस वाटत होत ..पण, जर आह्मी अस केल असत, तर तुला तुझी चुकी कशी समजली असती ...म्हणून ...मनावर दगड ठेवला .पण, बरं च जाहाले .... देवाने तुला चांगली बुध्ही दिली ...आणि तू परत आलास..., अमन ला आई चे विशेष च वाटले .न सांगता, ही ला आपल्या मनातले कस समजल ? मग, गालातल्या गालात हसत त्याने विचार केला .... म्हणून, तर ती आई आहे ..... तिची तुलना साक्षात देवाशी असते . अमन नी ऐत्क्या दिवसानी पोटभर जेवण केले .त्याचा आत्मा त्रूप्त झाला होता ,आणि मन प्रसन्न .... आपण ह्या आधीच घरी परत यायला पहिजे होते .अस ....अमन ला वाटले .