Live in part - 16 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन भाग - 16

अमन मुलगी बघायला तयार जाहला .फक्त त्याचे एवढेच म्हणणे होते, की, अस सगळ्याच्या घोळक्यात त्याला मुलगी नव्हती पहायची ... एखद्या हॉटेल मधे वैगेरे तिने यावे ...अस अमन ला वाटत होत .तस त्यानी त्याच्या आई वडिलांना संगितल .त्यानी तस मुलिकड्च्या ना संगितले ...मुलीकड्चे तयार जाहाले . आता अमन आणि ती मुलगी एका कॉफी शॉप मधे भेटणार होते .
ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळात अमन त्या मुलीची वाट बघत कॉफी शॉप मधे बसला होता .पण, त्या मुली विषयी त्याला काहीच माहीत नव्हते . न तिचे नाव, ना तिचा फोटो ...आणि आई ला त्या विषयी विचारायला तो विसरून गेला होता . त्याने आई ला फोन केला ...आणि त्या मुलीचा फोटो मागवून घेतला . पण, इंटरनेट ला रेंज नसल्यामुळे त्याला तो फोटो काही केल्या दिसेना ....तो रेंज यायची वाट पाहत होता .थोड्या वेळाने रेंज आली .आणि पाहतो तो काय? त्या फोटो तील ती सुंदर मुलगी त्याच्या डोळ्या समोर उभी होती .त्याला विश्वास च पटेना ....तो मोठ्यांनी म्हनला, रीधीमा ....तू ....ती मुलगी आहेस? जिला मझ्या आई वडिलांनी मझ्या सठि पसंद केलय. त्याच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही दिसत होते ...त्याला खुर्ची वर बसवत रीधीमा म्हणाली ...हो, मीच ती मुलगी आहे ...जिला तूझ्या आई वडिलांनी सून म्हणून पसंद केली .आणि आता तुला बायको म्हणून पसंद आहे का? ते बघायला पाठवल आहे . तिच्या बोलण्यावर दोघे खळखळून हसले . अमनला रीधीमा ला पाहून एवढा आनंद झाला, होता ....की त्याला शब्दच नव्हते . तो रीधीमा ला म्हणला, पण ....हे कस जाहाले ? रीधीमा सांगू लागली .अरे, घरी मझ्या लग्नाच चालले होते .मी, अनेक मुलांना नकार दिला .खरतर मला लग्न च नव्हत करायच ...पण मग तुजा फोटो घेऊन आमचे काका घरी आले ....मझ्या आई वडिलांना तू खूप आवडलास .....मग तूझे आई वडील आमच्या घरी आले ....मग तूझ्या आई वडिलांना मी खूप आवडले. मग, काय दोघांच्या आई वडिलांनी ठरवल ...आणि आता आपण एथे अस भेटतोय ....ते ही ऐत्क्या दिवसानी ...एकमेकाना भेटून दोघांना ही खूप आनंद झाला होता, आणि तो त्याच्या डोळ्यात दिसत होता ... अमन रीधीमा ला म्हणला, तू बायको म्हणून मला पसंद आहेस ....पण, तू होकार देण्या अगोदर मला तुला काही सांगायचय . थोड थांबत अमन म्हणला ....रीधी मा तुला रावी विषयी सगळ माहीत आहे .पण जी गोष्ट मी तुला सांगणारे ....ती तुला नाही माहीत ....रावी आणि मी लिव इन मधे राहायचो....पाच वर्ष आह्मी एकत्र राहिलो .आणि मग अचानक ती मला सोडून गेली . हे सगळ बोलताना त्याचे डोळे भरून आले होते . एकदम शांतता पसरली. रीधीमा ला ही काय बोलावे .ते कळेना . मग अमन नीच परत बोलायला सुरवात केली .
रीधीमा तुला माहीत आहे, मी तुला एथे का बोलवले ते? कारण मला हे सगळ सांगायच होत? मग च तिने लग्नाचा डिसिशन घ्यावा ...अस वाटत होत .पण एथे येण्या आधी त्या मुलीला हे सगळ कस सांगावे ...तिला काय वाटेल? अस वाटल होत? पण, तू दिसल्यावर खरच खूप बर वाटल . तुला हे सांगताना मला खरच काही नाही वाटल .बाकी आता पुढील डिसिशन तूझा ....पण या पुढे काही ही जाहाले .तरी माझी एक चांगली मैत्रीण म्हणून रहा . अमन च बोलण ऐकून रीधीमा नेहमी प्रमाणे गालात हसली .अमन तुला माहीत आहे, तू माझा वीक पॉईंट आहे .खूप प्रेम करते रे तूझ्या वर म्हणून कोणत्या ही कारणांसाठी मी तुला नाही दूर करू शकत .... ह्या पाच वर्षात तुला विसरणे तर सोड, तूझ्यावर पहिल्या पेक्षा जास्त प्रेम करू लागले ...माझा लग्नाला होकार आहे . रीधीमा चा होकार ऐकून अमन खूपच खुश झाला .दोघेही आपपल्या घरी आले .आणि दोघांनीही आपपल्या घरी होकार कळवला.
होकार कळवताच अमन आणि रीधीमा च्या घरच्यांनी लग्नाची तयारी करयला सुरवात केली .पत्रिका छापल्या, नवनवीन कपडे खरेदी केले, लग्नाचा हॉल बुक केला ....बऱ्या पैकी तयारी आटपली होती .लग्न आता आठ दिवसांवर येऊन ठेपले होते ... पाहुणे यायची पण, सुरवात जाहाली होती ...लग्न ब्राह्मण पध्तीने होणार असल्यामुळे ...लग्न रीधीमा च्या घरी होणार होते .लग्न दारा पुढे व्हावे, अशी तिच्या आई वडिलांची खूप ऐछा होती . जाहाले, तो लग्नाचा दिवस उजाडला .रीधीमा खूप सुंदर नटुन मंडपात येऊन बसली .सगळ्या विधी ना सुरवात जाहाली .एका मागून एक विधी होत होते ..... शेवटी अमन आणि रीधीमा ने सप्त पदी घेतल्या आणि विवाह संपन्न झाला. रीधीमा आता अमन ची बायको जाहली . दोघांच्या आई वडिलांनी सुखाने संसार करा म्हणून, आशीर्वाद दिला . अमन शी लग्न झल्यामूले रीधीमा चा आनंद गगनात मावत नव्हता . जणू काही तिला स्वर्ग च मिळाला . आणि तिचा तो आनंद बघून अमन ला खूप आनंद जाहला . आपण कोणावर प्रेम करण्यापेक्षा , जो आपल्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करावे. आयुष्य सुखी होत . आयुष्यभर जीवनात फक्त प्रेमच राहत. याचा हळु हळु अनुभव अमन ला येऊ लागला होता .
रीधीमा च लग्न झल्यापासून तिने घरची सगळी जबाबदारी उचलली. कोणाला काय पहिजे? कोणाला काय नको? सगळ मायेने प्रेमाने पाहात होती .त्या बरोबर स्वतहाची नोकरी ही संभाळत होती .घर आणि नोकरी दोन्ही सांभाळताना तिची दमछाक होत होती .पण, तरीही ती सगळ निभावून नेत होती . आणि अमन ला ही तिचा वेळ देत होती . तीच सगळ त्याच्यासाठिच तर होत .अमन नी रीधीमा साठी एक सर्प्राइज़ प्लान केल होत . लग्न झल्यापसून ते दोघे कुठेच फिरायला गेले नव्हते . म्हणून अमन तिला कश्मीर ला फिरायला घेऊन जाणार होता.
दोघानी कश्मीर ला खूप एन्जॉय केल .दोघे ही खूप भटकत होते .एक दिवशी अस भटकून रीधीमा खूप दम्ली होती . सकाळी ती काय लवकर उठली नाही .मग अमन एकटाच सकाळी लवकर उठून आंघोळ वैगेरे उरकून खाली हॉटेल च्या कँटीन मधे नाश्ता करण्यसाठी आला . कंदापोहे, चहा, आणि वर्तमानपत्र अस कॉंबिनेशन जुळून आल होत .अमन ह्या कॉम्बिनेशन चा आनंद घेत होता .तेच त्याच लक्ष एका बातमी वर गेल . ती बातमी वाचून तर अमन चे डोळे च पांढरे जाहाले. ती बातमी दुसरी तिसरी कोणाची नसून ....रावी ची होती .एक पंजाबी मुली ने एका पंजाबी फिल्म मधे नूड सीन दिला .ती बातमी फोटो सहित छापून आली होती .ती बातमी वाचून अमन ला खूप दुख जाहाले होते .काय करते ही रावी? तिच्यासाठी पैसा आणि यश ऐत्क महत्वाचे आहे, की ती अशी वागते . तिला कोणाचीच परवा नाही ........निदान स्वतःच्या भविष्याचा तरी विचार करावा ना .....अमन खूप दुखी होता . पण, हे सगळ रीधीमा ला कळता कामा नये . आणि तिच्या समोर असा चेहरा पडून ही बसता कामा नये. आपण तिला खूप त्रस्स दिलाय .तिला खूप रड्व्ल .पण तिने आपल्याला फक्त आनंद च दिल .सुखच दिल . आता तिला कोणत्याही प्रकाराचा त्रस्स जाहला नाही पहिजे .अस, अमन नी ठरवल .