Santshrestha Mahila Part 3 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग ३

संतश्रेष्ठ महिला भाग ३

यानंतर मात्र विसोबा खेचर संत ज्ञानेश्वर यांना आपला गुरु मानायला लागले .

ते म्हणत चांगदेव आणि मुक्ताबाईंनी मला कबूल केले आहे , आणि सोपानदेवाने माझ्यावर दया केलीआहे . विसोबा ज्ञानेश्वर आणि सोपानदेव दोघांनाही आपला गुरु मानत.

नंतर खुद्द नामदेवांनी त्यांना आपले गुरु करून घेतले .

त्यांनी गावोगावी 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' अशा ईर्षेने यात्रा केल्या.

त्यांच्या अभंगगाथा म्हणजे भावभक्तीचा नम्रमधुर ठेवा आहे.

त्यावर मुक्ताबाईंच्या वत्सल स्नेहाचा अवीट ठसा उमटलेला आहे.

मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील

आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे.

याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे.

संत नामदेव हे विठ्ठलाचे परम भक्त होते .

ते एकदा सहज ज्ञानदेवाच्या भावंडांना भेटले असता, निवृत्तीसह दोघा भावांनी नामदेवांना वंदन केले,

परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही, तर ते ताठ बसून राहिले.

मुक्ताबाईंनी नामदेवांचा हा “अहंकार” ओळखला .

मुक्ताबाईंनी नामदेवांना नमस्कार तर केला नाहीच , दर्शनही घेतले नाही.

उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत शब्दात त्यांनी नामदेवाची कानउघाडणी केली.

अखंड जयाला देवाचा शेजार l कारे अहंकार नाही गेला ll

मान अपमान वाढविसी हेवा l दिवस असता दिवा हाती घेसी l

परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l

कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l अद्यापि नरोटी राहिली का l

घरी कामधेनु ताक मागू जाय l ऐसा द्वाड आहे जगा माजी l
बालवयामुळे आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे, अजूनही गुरुकृपा झालेली नसल्यामुळे
आपण देवाचे अत्यंत लाडके भक्त आहोत, याचा संत नामदेवांना अभिमान वाटत होता.
हे चाणाक्ष मुक्ताईने अचूक हेरले होते.
निवृत्तीदादांसह आपल्या तीनही वडीलबंधूंनी संत नामदेवांना अतिशय विनम्रभावाने नमस्कार केला असतानाच
मुक्ताबाईंनी मात्र तो न करण्यामागे त्यांचा फार मोठा उदात्त हेतू होता.
नामदेवांसारख्या विठ्ठलाच्या परमभक्ताने अहंकार रहीत राहून “गुरुकृपा” प्राप्त करून घेतली,
तर आणि तरच त्यांच्या भक्तिभावाचे सर्वार्थाने सोने होईल, या आंतरिक जिव्हाळ्यानेच
मुक्ताबाईंनी संत गोरोबाकाकांकडून संत नामदेवांची परीक्षा करवून घेण्याचा प्रसंग घडवून आणला होता.
‘तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा’
गोरोबाकाकांनी जमलेल्या सर्व संतांच्या मांदियाळीतील प्रत्येकाच्या डोक्यावर
आपल्या थापटण्याने मारून त्यांची परीक्षा घेतली होती.
त्यावेळी संत नामदेव मात्र त्यांच्या दृष्टीने या परीक्षेत ‘कच्चे मडके’ ठरल्यावर
मुक्ताबाईंनी त्यांना सुयोग्य असा गुरुमार्ग दाखविला होता.
‘गुरुविण तुज नळेचिगा मोक्ष, होशील मुमूक्षू साधक तू’
असा उपदेश त्यांनी नामदेवांना केला होता.
नामदेवांचा अहंकार गेल्याशिवाय त्यांची आध्यात्मिक प्रगती होणार नाही, याची जाणीव असल्यामुळेच मुक्ताबाईंनी त्यांना विसोबा खेचर यांच्याकडे पाठविले होते.

म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l आधी अभिमाना दूर करा ll

संत मुक्ताबाईंनी केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला.

त्यांनी गुरु माउलीच्या आशीर्वादासाठी विसोबारायांकडे मार्गक्रमणा केली.
त्यानंतर नामदेव ज्ञानदेवादी भावंडांच्या सान्निध्यात राहू लागले.

चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते.
ते योगमार्गातील “अधिकारी” पुरुष होते.

योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे..
यांच्या गुरूचे नाव वटेश्वर होते म्हणून यांना चांगवटेश्वर असेही म्हणत.

काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप.

तापी-पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते.
त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले.

महाराष्ट्रातील सिद्ध आणि योगी संतांमध्ये
महात्मा चांगदेव महाराज यांचे नाव मोठ्या मानाने घेतले जात होते .

ते खूप जाणकार संत होते .
ते ब्रह्मज्ञान केंद्र चालवत असत .
त्याच्या शिष्यांची संख्या खूप मोठी होती. ते अनेक मठांचे राजा होते .
ते अनेक सिद्धिंचे गुरु होते.
ते ज्योतिष शास्त्राचे सर्वोच्च गुरु होते.
महात्मा चांगदेव यांचा आश्रम गोदावरीच्या काठावरील पुणतांबे भागात होता.
आत्मा ब्रह्मांडी नेण्याची विद्या त्यांना पूर्ण येत असल्यामुळे त्यांनी जगात चौदाशे वर्षे काढली.
ते स्वतःला सामर्थ्यवान समजत.
आपणासारखा दुसरा कोणी सद्गुरू नाही, असे ते आपल्या शिष्यांना सांगत.

महात्मा चांगदेव हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते.
त्यांनी ऐकले होते की ज्ञानेश्वर व त्यांचे बंधू व भगिनी यांना पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धिकरण पत्र प्राप्त झाले आहे .

संत ज्ञानेश्वरांच्या म्हशीच्या तोंडून वेदांचे पठण केल्याच्या चमत्कारिक घटना त्यांनी ऐकल्या होत्या .
ते माझे गुरु होतील, असा विचार महात्मा चांगदेव यांनी केला.
त्यांना गुरु मानण्या साठी त्यांची भेट घ्यायचे त्यांनी ठरवले .
परंतु महात्मा चांगदेव अनेक सिद्धी व तपशिलांचे गुरु असल्यामुळे ते देखील “गर्विष्ठ” होते.

ज्ञानेश्वरांविषयी त्यांना कळल्यानंतर त्यांना पत्र लिहावे, असा विचार चांगदेवांनी केला.

ते पत्र लिहू लागले. पत्रारंभी ‘तीर्थरूप’ लिहावे तर ज्ञानेश्वर वयाने लहान आहेत.

‘चिरंजीव’ लिहावे तर त्यांच्यापासून आपणाला आत्म-ज्ञान घेणे आहे.

अखेर त्यांनी कोरा कागदच ज्ञानेश्वरांना पाठवून दिला.

जेव्हा शिष्यांनी तो कोरा कागद ज्ञानेश्वरांसमोर ठेवला तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या -

'इतकी परिपूर्णता प्राप्त करून आणि ध्यान करूनही ते कोरेच्या कोरे राहिलेले दिसतात '
तो कोरा कागद पाहून ज्ञानेश्वर म्हणाले की, ”गुरु न केल्यामुळे चांगदेव चौदाशे वर्षे कोराच राहिला.”

ज्ञानेश्वरांनी हे पत्र मोठे भाऊ निवृत्तीनाथांच्या पायाजवळ ठेवले.

निवृत्तीनाथ म्हणाले - 'ज्ञानदेवा ! शुध्द अशा महान सिद्धाचे हे मूक पत्र आहे.

त्याच्या पत्राचे अचूक उत्तर लिहा.

गुरुंच्या सूचनेवरून ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर पासष्ठ ओव्यांमध्ये लिहिले.

या पासष्ठ ओव्यांना 'चांगदेव पासष्ठी ' म्हणतात.

ज्ञानेश्वरांनी लिहिले -

'तुम्ही मुके आहात, यावरून आपणास हे जाणून घ्यायचे आहे की वेदशास्त्रांत वर्णन केलेले ब्राह्मण चांगदेव मलाही माहित आहेत, जे मनाने आणि बोलण्याला अव्यवहार्य आहेत .
”संपूर्ण विश्वाचा चालक तुमच्यापाशी आहे.
त्याच्याजवळ लहान-थोर असा भेद नाही.”

.जर आपण ते अपरिहार्य घटक लिहून व्यक्त करण्यास सक्षम असाल तर या कागदावर लिहा.

जर त्याने माझे निवारण झाले तर मला कळेल की तुम्ही माझे गुरु आहात .

अन्यथा, हा कागद कोरा असल्यासारखा आहे.

मी रिक्त आहे हे मला समजून घेईन. “
ज्ञानेश्वरांचे उत्तर त्या शिष्याने चांगदेवास नेऊन दिले
महात्मा चांगदेव यांनी उत्तर वाचले. पण त्याचा अर्थ कळला नाही.

त्यांना असं वाटलं की ज्ञानेश्वर माझे सद्गुरु आहेत .
म्हणून ते आपल्या चौदाशे शिष्यांसह ज्ञानेश्वराकडे 'पासष्ठी ' चा अर्थ जाणून घेण्यासाठी निघाले .
चांगदेवांनी शिष्य-समुदाय बरोबर घेतला व स्वतः एका वाघावर बसून सर्पाचा चाबूक हातात धरला.

त्या वेळी ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई एका भिंतीवर बसले होते.

त्यांना चांगदेवांच्या आगमनाची गोष्ट समजली तेव्हा ज्ञानेश्वरांनी भिंतीला आज्ञा केली,

संत भेटण्यास येत आहेत.

आपण त्यांना सामोरे गेले पाहिजे.

ती निर्जीव भिंत त्यांना घेऊन चालू लागली.

ते दृश्य पाहून चांगदेवांचा अभिमान नाहीसा झाला.

त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरण धरले. नंतर उपदेश घेतला.

त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली.

यानंतर एकदा असेच ज्ञानदेवादी भावंडे त्र्यंबकेश्वरावरून पुनःश्च परतीच्या अलंकापुरीच्या वाटेवर असताना पुण्यस्तंभ पुणतांबे येथे पोहोचली.
त्या ठिकाणी गोदातटावर महातपस्वी चांगदेवाचा निवास होता.

त्यांची त्यावेळी समाधी लागलेली होती.

गुहेच्या भोवती काही मृत शरीरे लिंबाच्या पाचोळ्याखाली झाकून ठेवलेली या भावंडांना दिसली.

समाधी उतरल्यानंतर चांगदेव महाराज त्या प्रेतांना जिवंत करणार
अशा आशेने मंडळी वाट पाहत बसलेली होती.
ज्ञानदेवांनी त्या मंडळीची तितिक्षा पाहून कृपावंत होऊन मुक्ताबाईस संजीवनी मंत्र कथन केला.

हे “सिद्धीसामर्थ्य” पाहून चांगदेव चकित झाले व ज्ञानदेवांना शरण आले.

त्यांनी चांगदेवांना मुक्ताबाईकडे गुरुपदेश मागण्यास सांगितले.
चांगदेवांनी मुक्ताबाईंना सुद्धा आपले गुरू मानले.
मुक्ताबाईंनी शिष्य म्हणून चांगदेवाचा स्वीकार केला.

क्रमशः