Struggling is her struggle # 03 books and stories free download online pdf in Marathi

संघर्षमय ती ची धडपड #०३

 

काहीच दिवसांनी हॉस्पिटल मधून परी घरी येणार असते.....� तिच्या बारश्याची तयारी जोरात सुरू असते.....����

 

यशवंत तर वेडाच होऊन जातो... सगळी अरेंजमेंट तोच  करतो..... जिकडे - तिकडे बलून्स....... आणि काय - काय ते सगळच....��

 

सगळी पाहुणे मंडळी जमते..... मावशी, मामा, आजी अजून परीचे बाकीचे नातेवाईक.... परीचा नामकरण सोहळा पार पडतो...... जो - तो आज खुश असतो..... आपल्या कथेतील नायिकेचे नाव शितल ठेवण्यात येते......

 

आजीची लाडकी असते ती जास्त..... आजी तिला आपल्या कुशीत घेते.....

 

आजी : "अग माझं छोटू पिल्लू....... ओ.... ओ.... ओ.... मामाच्या गावाला येणार..... लवकरच..... आम्ही वाट बघतोय..... काय जावई बापू घेऊन जाऊ ना तुमच्या परिला....☺️☺️"

 

शिवाजी : "हो ना तिच्या मामांनी तर तिला आधीच बुक केलं होतं की..... जा घेऊन.... ☺️☺️ पण, त्याआधी तिला यशवंत आणि वहिनिजवळ काही दिवस राहू देत..... त्यांनाही तिचं लाड करू देत.... नाही का.....☺️☺️"

 

अवंती : "हो ना परी.....ये ये...... अले... ले.... माझी पिटूशी...... पिल्लुशी..... परी..... येणार ना अवू मम्माकडे..... आपण खूप - खूप मज्जा करू.......� तुला एकदम परी म्हणून खेळवेन हा मी..... ये हा माझ्या घरी.....☺️☺️☺️"

 

सविता : "कुणाला माहीत असेल ही इतके नशीब घेऊन येईल...... इतकी सगळी तिची माणसं तिला आपलं समजून प्रेम देतील.... नाही का हो....☺️"

 

शिवाजी : "यश खरंच तू माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल तुझे मनापासून आभार....�☺️"

 

यशवंत : "अरे तूच तर, माझी लाईफ आहेस रे..... तुझ्यामुळेच मी आज जिवंत आहे..... नाही का....☺️☺️"

 

सगळे घरात असताना तिकडून कुणाच्या तरी जोर - जोरात ओरडण्याचा आवाज येतो..... रामची बायको मोठ्याने ओरडत, ओक्षिबोक्षी रडत असते..... राम आणि शिवाजी एकाच ठिकाणी रहायला असल्याने, ते मित्र आणि शेजारी असतात..... सगळे तिच्या आवाजाने बाहेर येतात.... आणि समोरच दृश्य पाहून सगळ्यांचीच पायाखालून जमीन निसटते....

 

दृश्य असतं रामच्या शवाचं......��� राम...... त्याला घेऊन आलेले काही लोक नेमकं काय घडलं हे सगळं पुढे सांगतात......

 

राकेश : "मी राकेश.... रोज राम आमच्याच सोबत असतो.... आजही आलेला..... पण, आजपासून तो पिण सोडून देईल म्हणून खूप खुश होता..... कारण, आज त्याची परी घरी येणार....... अस तो सगळ्यांना सांगत होता... आणि खुश असल्याने सगळ्यांना फुकट पाजणार होता.... पण,......��"

 

सगळे : "पण काय...����"

 

राकेश : "पण, दगडू भाईंनी त्याला मारून टाकला..����..."

 

यशवंत : "कोण हा दगडू भाई....����"

 

राकेश : "तो आमच्या ठेक्यावर असतो.... सगळ्यांना घाबरवत असतो तो..... स्वतःचा नेहमी धाक दाखवून, इतरांचे पैसे काढून घेतो.... आणि दुसऱ्यांना वाईट संगतही तोच लावतो..... पण, राम त्याचं कधीच ऐकत नव्हता..... म्हणून, आज रामचा काटा काढायचा त्याने प्लॅन केला.... आणि जाणून रामशी तो भांडला.... राम जराही मूडमध्ये नव्हता..... तरीही, तो त्याचा रस्ता अडवून त्याला भांडायला मजबूर करत होता..... शेवटी त्याने रामला ढकलून दिले आणि रामला राग आला..... तो ही त्याच्यावर धावून गेला.... आणि ह्या सगळ्यात त्याने रामला लोखंडी पत्रावर ढकलून दिले.... त्यातच त्याचा लोखंडी पत्रा आत घुसून खून झाला...... दगडू भाई तिथून पडून गेला.... आम्ही पोलिसांना कल्पना देत पर्यंत तो तिथून पसार झाला होता..... मी तातडीने पोलिसांसोबत सगळं पार पाडून, त्यांना घरच्या पत्त्यावर इकडे घेऊन आलो.....��� खूप चांगला होता साहेब राम..... जरी पित असला पण, कुणाच वाईट कधीच केलं नाही त्याने....�����"

 

सगळे : "...���������"

 

रामची बायको : ".....���������"

 

सविता : "अहो वहिनी सावरा स्वतःला.....�����"

 

रामची बायको : "तुझीच ही लेक ना हिनेच गिळलं त्याला..... अपशकुनी कुठली.... आजच आली आणि आजच गिळलं नवऱ्याला माझ्या....�"

 

ती शीतलला जाऊन स्वतः कडे रागात घेणार इतक्यात यशवंतने तिला एका हाताने धरून मागे ओढले.... ती जाम रागात होती.... चवताळली होती ती..... तिला आता तिची शत्रू फक्त आपली शितलच वाटत होती...... यशवंत तिला शांत करत समजवू लागला......

 

यशवंत : "वहिनी हे बघा....... आमची बेबी अजून लहान आहे..... अहो तिचा काय दोष..... निरागस जीव तो..... आपण ना हाच घाण विचार करतो नेहमी..... कुणी जन्मला आणि त्याच क्षणी आपल्यातला कुणी गेला..... की, झालं मग.... त्याच्या मृत्यूचे कारण, ते छोटूसे जीव होऊन बसते...... काय ती गलिच्छ मानसिकता......! आपण कधी हा विचार केलाय का की, जेव्हा आपल्या घरी कुणी जन्मतो तेव्हा कुणाच्या तरी घरी कुणी मेलाच असेल..... नाही... आपण ना दुसऱ्यांना नेहमी दोष देत बसतो..... अरे एका तासात अशा कितीतरी परी जन्मतात आणि कितीतरी राम मृत्युमुखी पडतात... तो एक सृष्टी चक्र असतो.... त्याला कितपत आपण आपल्या जीवनात लागू करून आपलंच नुकसान करवून घेतोय हे सर्वस्वी आपल्यावर आहे.....� आणि वहिनी याउपर मी तुमचे माझ्या परिविषयी एकही शब्द ऐकून घेणार नाही...... म्हणून, तुम्ही न बोललेलच बर....��"

 

रामची बायको तणतणत तिथून घरात निघून जाते...... यशवंत आणि शिवाजी त्याच्या अंत्यविधीची तयारी करण्यात मग्न होतात.... तिकडे सगळी मंडळी जमलेली असते.... अंत्यसंस्कार पार पाडतो..... शिवाजी आणि यशवंत दोघेही एकमेकांना गळे मिळून रडतात......

 

शिवाजी : "काय रे राम अस अर्ध्यावर टाकून गेलास आम्हाला.... साथ देईल ना रे भावा अस नेहमी बोलायचा आणि आज गेलास सोडून.....�"

 

यशवंत : "बघ ना आजवर पिऊन असायचा तेव्हा कुणालाच तो वाईट करतोय, याची जाणीव देखील झाली नव्हती आणि आज जेव्हा तो काही चांगलं करणार होता तेव्हा त्याच्याच चांगुलपणाचा अंत करण्यात आला.....�����"

 

शिवाजी : "त्याची परी तिला काय सांगू मी कुठे गेला तिचा काका.....��"

 

यशवंत : "सांभाळ स्वतःला शिवा..... तो आपल्यातच असेल नेहमी.....�����"

 

दोघेही स्वतःला सावरतात....... सगळी मंडळी जायला निघते..... तिकडे रामची बायको आपल्या मुलांना घेऊन निघते...... यशवंत तिला थांबवतो.....

 

यशवंत : "वहिनी थांबा, कुठे निघालाय दोन लहान मुलांना घेऊन.....�"

 

रामची बायको : "चालले मी माझ्या बापाच्या घरी..... तुम्ही सगळ्यांनी माझा वाटोळा केला..... या अपशकूनिला घरात आणली आणि माझा नवरा गेला.... माझी पोरं पोरकी झाली......�� आता आमचं कोण बघणार..... म्हणून, इथून जाणार आता मी.... मला अडवू नका.....��"

 

यशवंत : "थांबा वहिनी...... काही द्यायचंय...... विष्णु गाडीतून चेक बुक घेऊन ये.....��"

 

चेक बुकचे नाव ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावरचा राग कुठच्या - कुठ निघून गेला.... आणि एक हाव पूर्ण भाव त्यांच्या चाहऱ्यावर आला.....� यशवंतने त्यांना पाच लाखांचा चेक देऊ केला......

 

यशवंत : "ही माझ्या मित्राने कमावून ठेवलेली पत..... आज त्याचे ऋण फेडण्याचे भाग मला मिळाले हे केवळ तुमच्यामुळे वहिनी..... तो सांगायचा दारूचे कारण, तुम्ही होता त्याचे..... सगळं करून देखील तुम्ही बोलायचा ना त्याला.....� लाज वाटते तुमच्यासारख्या बायकांची ज्या कधीच कुणाची कदर करत नाहीत..... माझा मित्र दारुडा असला ना तरी मनाचा मोठा होता..... त्याच्या परीला कधीच कुणी आडव्या नजरेने बघितले तर त्याला आवडले नसते.... आज तो असता तर तुमचा हात तोडला असता..... मी हे सर्व जाणीवपूर्वक बोलतोय..... पण, तुम्हाला कसला याचा फरक पडतोय......�� पैसे मिळाले झालं काम..... इकडे नवरा मेलाय याचही भान नाही तुमच्या डोक्यात..... तुम्हाला चेक मिळाल्यापासून बघतोय...... माणुसकी विकलीत आज तुम्ही.... या आता... आम्हाला परत तोंड दाखवू नका आणि माझ्या परिकडे वाकड्या नजरेने बघू नका.... कळतंय.....���."

 

वहिनींना चेक मिळाला....... आता त्यांना या लोकांचं काहीच घेणं - देणं नसतं..... त्या तिथून पटकन काढता पाय घेतात.....

 

इकडे सगळे निराश असतात...... सगळे घरात जाऊन बसतात......

 

यशवंत : "वहिनी तुम्ही चला आणि शिवा तू ही चल काही दिवस तिकडे थांबा..... अवांतीला सुद्धा सोबत होईल.... तीचही मन रमेल..... ��"

 

शिवाजी आणि सविता एकमेकांकडे बघतात..... आणि होकार कळवतात..... आलेले पाहुणे, गेलेले असतात.... आणि आता सगळे यशवंत कडे जातात......

 

क्रमशः