Struggling is her struggle # 08 books and stories free download online pdf in Marathi

संघर्षमय ती ची धडपड #०८

 

शीतल आता बऱ्यापैकी सावरली होती..... आता महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तिची धडपड सुरू होती.... परिस्थिती बेताची होतीच.... कारण, आई - बाबांचां कॅफे होता........ नाही म्हटल तरी समाज, "ती" च्या घरच्यांना "ती" च्याबाबत प्रतिकूल विचार करण्यास भाग पडतोच.... नाही का! तर इथेही परिस्थिती काही वेगळी नव्हतीच......�

 

शितलसाठी लग्नाचे स्थळ आणायला नातेवाईकांनी सुरुवात केली...... हे बर असतं यांचं..��.... कुणाची मुलगी वयात आली का? हे शोधायला नातेवाईक स्वतः चे calculator घेऊनच बसले असतात..... मूर्ख माणसं......�� अरे तिला शिक्षण घेऊ द्या,, काही करू द्या..... पण, नाही..... चालले तुमची मुलगी आता काय करते..... ? अरे तुम्हाला काय घेणं त्याच..... आधी आपल्या घरचं बघावं..... पण, कोण ना पुढं येऊन बदल घडवणार...... एकदा सहज एक प्रश्न विचारला गेला, बदल कुणाला हवाय? यावर बऱ्यापैकी सर्वांनीच हात वर करून सांगितले..... प्रश्न विचारणारा खुश झाला..... त्याने दुसरा प्रश्न केला, बदल कोण करू इच्छितो? आता मात्र कुणीच हात वर केला नव्हता...... तर, हे असच असतं..... मला संत्री खायची आहेत पण, ती सोलून द्यायला कुणी हवंय..... ��

 

शीतलला शिकुन ऑडिटर व्हायचं होतं..... म्हणून ती कुणाच न ऐकता अकरावीत वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन आली.....

 

रात्री घरी......

 

आई : "मामींनी मुलगा शोधलाय.... चांगला कमावतो, एका कंपनीत कामाला आहे.... नंतर हातातून गेला की मिळणार नाही दुसरा.....��"

 

शीतल तिच्या कामात असते..... ती जाणून लक्ष देत नाही...... कारण, तिला माहित असतं, जर का ती काही बोलली की, तिचं आताच लग्न लाऊन दिलं जाईल..... तिचं लक्ष नसलेलं बघून आई रागात येते......

 

आई : "जाणून कशाला ग त्रास देतेस.... लग्न करायला इतकी का नाटकं तुझी..... तुझ्यापेक्षा त्या लहान आत्येबहिनीच लग्न होईल आणि तू कधी करतेस मग....��"

 

शीतल : "हे बघ आई मला शिकायचंय... आणि ज्यांच्याकडे काहीच प्लॅन्स नसतात त्या लग्न करतात... त्यांचं मला काहीही घेणं - देणं नाहीये.... मला माझा फोकस करू दे  काही वर्ष आणि मी काही इतकीही मोठी नाहीये..... लग्न करायला.... आता दहावी झालंय माझं..... तुमच्यावर बालविवाहाची केस लागेल..... समजल...� म्हणून, मला शिकू दे...."

 

आई : "शिकून काय मोठी साहेबीन होशील व्हय ग.....�  आणि तसही आपल्यात मुलींचं लग्न लवकर होतं....� मग तुला काय झालं....�"

 

शीतल : "होत असतील पण, मला आताच नाही करायचं आहे.... वाटल्यास मी तुम्हाला एक रुपयाही मागणार नाही...... पण, मला शिकू द्या.....�"

 

आई : "बघ तुझं तू काय करायचंय दोन वर्षांनी तुला काहीही करून लग्न करावच लागेल.... कळतंय......���"

 

शीतल : "बघू....��"

 

आता शीतल स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी घेते म्हटल्यावर तिला पार्ट टाईम जॉब शोधावा लागणार.... मग एका जागी तिला पार्लरमध्ये दुपारच्या वेळेस जॉब मिळाली..... त्यातून ती स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवणार होती..... ती आता कल्याणला असल्याची बातमी सुनीलने शोधून काढली आणि तो ही घरच्यांच्या परवानगी ने कल्याणला येऊन राहू लागला.....

 

त्यानेही तेच कॉलेज निवडून तिथे प्रवेश घेतला..... शीतलला रोज बघायचा तो.... पण, ती काही बोलत नव्हती म्हणून, तो ही शांत रहायचा..... त्याची बहीण आणि तो एकाच कॉलेजमध्ये सोबत शिकायचे....... त्याच्या बहिणीने शीतल सोबत मैत्री केली होती...... आणि तिचा नंबर ही मिळवला होता..... आपल्या बहिणीकडून नंबर घेऊन त्याने शीतलला एकदा ती पार्लरमध्ये असताना कॉल केला.......

 

शीतल : "हॅलो...... कोण बोलतंय....�?

 

सुनील : "सुनील बोलतोय.... ओळखलं का..... शाळेत सोबत होतो आपण.... आता तुझ्याच कॉलेजमध्ये शिकतोय पण, तुझं लक्ष नसेल बहुतेक...... ती नीलम जी आता तुझी मैत्रीण आहे ती माझीच बहीण आहे.....☺️☺️"

 

शीतल : "काय काम होतं बोल..... उगाच माझ्याकडे वेळ नाहीये.... नसेल काम तर तसं सांग.... आणि हो नंबर आहे म्हणून कधीही कॉल करून त्रास द्यायचा हा विचार नको करुस...... कळतंय... बाय....�"

 

ती फोन ठेऊन, तिच्या कामात व्यस्त होते..... हा इकडे तिचाच विचार करतो...... काहीच दिवसांनी कॉलेज विझिट जाणार असते..... तेव्हा सुनीलच्या बहिणीला सुद्धा जायचे असते मात्र, तो तिला नकार देतो..... पण, ती सांगते की, शितलही येणार.... तेव्हा तो शीतलला कॉल करून विचारतो.....

 

शीतल : "हॅलो..... हा बोल.... काय काम..?"

 

सुनील : "ते कॉलेज मधून कुठं जात आहेत का?? तुमच्या बॅच चे.... कारण, आमच्या बॅचला अजूनही काही सांगितलेलं नाहीये..... नीलम बोलली मला....... तू ही असणार आहेस..??"

 

शीतल : "हो ती विझिट आहे.... मी ही असणार आहे...."

 

सुनील : "मग माझ्या बहिणीची काळजी घेशील का? पाठवू तिला....�"

 

शीतल : "हो घेईल ना.... डोन्ट बी वरी...."

 

सुनील : "थँक्यू...☺️"

 

शीतल : "इतकंच आहे का अजून काही.... �"

 

सुनील : "बस इतकंच होतं....☺️☺️"

 

शीतल : "ठेव फोन मग.....� काम आहेत मला...."

 

सुनील : "आ......� हो......��"

 

ही पटकन फोन ठेऊन आपल्या कामाला लागते...... काहीच दिवसात सगळे शीतलच्या बॅचचे विझिटला जाणार असतात..... सगळे जमतात आणि जायला निघतात......

तिथे पोहचल्यावर सगळे विझिट संपवून परतण्याच्या मार्गावर असतात..... सूनीलची बहीण, शीतल शेजारीच बसलेली असते.....

 

नीलम : "तुझा फोन देतेस का..... जरा मला काम आहे....�"

 

शीतल : "हा एकच मिनिट......☝️"

 

ती फोन बॅगमध्ये ठेवत असते...... जास्त फोनचा वापर करत नाही म्हणून, तो बॅगमध्ये ठेवलेला असतो..... तो फोन काढून ती नीलमला देते......

 

शीतल : "हा घे.....�"

 

नीलम : "..☺️☺️"

 

शीतल डोळे बंद करून सिटला मागे डोके टेकून बसते..... नीलम तिच्या फोनमध्ये स्वतःच्या भावाचा नंबर कुठल्या नावाने सेव्ह केलाय हे बघते..... सुनीलचा नंबर त्याच्याच नावाने सेव्ह केला असतो...... नीलम थोडी उदास होऊन बसते.....

 

नीलम : "घे फोन....��"

 

शीतल : "का ग काय झालं....��"

 

नीलम : "काही नाही...�"

 

शीतल : "अग सांग ना....�"

 

नीलम : "तो माझा दादा......�"

 

शीतल : "तुझ्या दादाचं काय..��"

 

नीलम : "तो तुला पसंत करतो...... पण, तुझ्याकडून अस काहीच मला जाणवलं नाही..... म्हणून, वाईट वाटलं.....��"

 

शीतल : "मी त्याचा तर काय कुणाचाच विचार करत नाही..... आणि हो त्याला सांग अपेक्षाही ठेऊ नकोस..... आता इथून तो विषय नको मला.... ओके...."

 

शीतल परत फोन बॅगमध्ये टाकून मागे टेकून, डोळे बंद करून बसते..... निलमला कळून चुकतं की, ही काही आपल्या भावाच्या प्रेमात पडणारी नाही.... म्हणून, ती पुढे काहीही बोलत नाही..... सगळे परत येतात..... नीलम आणि शीतल ही एकमेकींशी न बोलता घरी येतात...... इकडे शीतल ती गोष्ट कधीच डोक्यातून बाहेर काढून विसरून गेलेली असते..... मात्र नीलम आता तिच्या भावाला सांगणार असते..... म्हणून, ती सूनिलकडे जाते.......

 

नीलम : "दादा काही बोलायचय...�"

 

सुनील : "बोल....�"

 

नीलम : "दादा तू शितलचा विचार करून आलास ना कल्याणला...... पण, अरे तिला तुझ्याविषयी त्या भावनाच नाहीत....�"

 

सुनील : "माहितीये मला..... पण, एक दिवस येईल जेव्हा ती हो म्हणेल.....�☺️ म्हणून, मी वाट बघेन.... जा तू झोपून जा.... काळजी नको करुस....."

 

ती जाऊन झोपून जाते.... मात्र सुनीलच विचारचक्र सुरू होतं......

 

सुनील : "ती आपल्याला खरंच नाही बोलली तर! पण, ती नकार देऊच शकते...... जर मी तिला नसेल आवडत.....� हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल.... मग मला तो मान्य करावाच लागेल..... ती खुश राहो फक्त मला काही नकोय...... असो... मी आता जास्त विचार करत नाही या विषयाचा.... कारण, जितका विचार केला... डोकं जड होत.... चला झोपुया....��"

 

तोही झोपायला निघून जातो.......

 

क्रमशः