Struggling she struggles # 06 books and stories free download online pdf in Marathi

संघर्षमय ती ची धडपड #०६

 

काही दिवस असेच निघून जातात..... आपल्या परीची पाठवणी मामाच्या गावी होणार असते...... शिवाजी जड मनाने तिला मामाकडे सोडून येतो..... आपली परी आता तिकडेच तिचे शिक्षण पूर्ण करणार असते......

 

असेच दिवस जात असतात..... काही दिवस परीचे आयुष्य एकदम मस्त मजेत जाते...... शीतल म्हणजेच आपली परी आता चांगलीच मोठी झालेली असते..... मावशीचे लग्न झाल्याने, घरच्या कामाची जबाबदारी तिच्यावर येते..... ती स्वतःचे शिक्षण आणि घरातील कामांची धुरा उत्तमरित्या पार पाडत असताच, तिच्या बाबतीत एक प्रसंग घडतो..... ज्याने तिच्या बालमनावर खोलवर परिणाम होतो..... तो प्रसंग ती पाचवीत असता घडतो..... त्यामुळे तिच्या नाजुक मनावर त्याचा आणखीच खोल परिणाम होतो.....

 

तिची लाडकी आजी तिला कायमची सोडून गेलेली असते...... तिच्या अशा अचानक जाण्याच्या घटनेने शीतल आतून पूर्ण तुटून गेलेली असते...... कारण, मामाकडे आल्यावर, एक आजीच असते जी तिची जवळची मैत्रीण असते....... तिलाच ती सगळ्या तिच्या गोष्टी सांगत असते, तिच्याशी खेळत असते....... एका नातीच आणि आजीच नातं काय असावं याच, त्या दोघी उत्तम उदाहरण असतात.......❤️ पण, आज एक नात, आपल्या आजिपासून कायमची दुरावली जाताना दुःख तर होणारच!....��

 

आजी गेल्यानंतर, लगेच तीन महिन्यांनी मामाच लग्न लावण्यात येतं..... शीतलची मामी अतिशय खडूस स्वभावाची असते.....� ती तिच्याकडून सगळी घरातली काम करून घेते...... त्यानंतर त्यांना मुल - बाळ होतात त्यांनाही सांभाळायचं काम शितलवर येतं..... पण, ती सगळं सहन करत - करत स्वतःचा अभ्यास देखील तितक्याच जोमाने सुरू ठेवते.... कारणही तेच तिला मोठं होऊन ऑडिटर व्हायचं असतं.....�

 

असेच दिवस जात असतात..... शाळेत शीतल उत्तम विद्यार्थिनी असतेच...... मग काय जळणाऱ्यांची कमी नसतेच ना.....� तसच होतं......

 

आपल्या शितलची हुशारी ही प्रत्येकच विषयात दिसायची...... त्यातच इंग्रजीत ती आणखीच हुशार....... कधीच स्पेलिंग मिस्टेक तिच्या लिखाणात नसायचे..... त्यामुळे, मग बारकुल सरांची ती आवडती विद्यार्थिनी......☺️☺️ तिचा राग यायचा वर्गतल्याच एका मुलीला, जीचं नाव होतं साक्षी.......

 

साक्षी रोज शीतलला रागात बघायची.....��� शीतल सुद्धा काही कमी नव्हती.....☺️� ती फुल टशनबाज......� कुणी काही बोलू दे लगेच....�� "काढ भाला, दे जो आला"......��� अशीच ती होती......

 

एकदा वर्ग सुरू असता, बारकुल सरांनी एक प्रश्न विचारला तो कुणालाच येत नव्हता........ पण, आपली शीतल मात्र हुशार..... तिला नसता आला तरच नवल.....�� गेली आणि सोडवून दाखवला.....

 

बारकुल सर : "अरे वाह..... खूप छान बेटा.... तू खूप हुशार आहेस..... नक्कीच तू काही तरी मिळवणार आयुष्यात.....�� Keep it up...☝️"

 

साक्षीला ते सहन होत नाही.... कारण, आजवर फक्त शीतलची स्तुती ऐकुन तिची सटकली असते..... (मग स्वतः हुशार व्हावं ना.... कशाला कुणाला जळाव)..... ती ताडकन उठते आणि भान नसल्यासारखी मोठमोठ्याने बोलू लागते......

 

साक्षी : "काय हो सर तुम्हाला तिच दिसते का??.. इतकं नवल करायला...... इतकी हुशार नाहीये ती....�"

 

बारकुल सर : "स्वतःच्या जागेवर बस आधी..... आणि शिस्त नसल्यासारखं वागणं कुणी शिकवलं तुला..... आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आहात कुणी चांगलं करत असला, त्याला अॅप्रिशियेट केलं पाहिजे...... पण, नाही इथे तर एकमेकांचे पाय ओढण सुरू आहे.... नाही का....!!� आश्चर्य वाटतं...... यानंतर शीतल बद्दल कुणीही काहीही बोलणार नाही कळतंय..... चला सगळे नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवा........ आणि साक्षी आता तू दाखवणार आहेस...... आधी..... सगळे असे का बघताय सोडवा दहा मिनिटांत..... जा बेटा शीतल तू जाऊन बस.....☺️☺️"

 

शीतल तिच्या बेंच वर येऊन बसते..... साक्षी तिला रागात बघते, ती सुद्धा तिला रागात बघते आणि आपला प्रॉब्लेम सोडवत बसते......� सगळ्यात आधी शितलचा प्रॉब्लेम सोडवून होतो.... पण, सर तिला खुणेने नको थांब अस सांगतात..... कारण, त्यांना बघायचं असतं, शीतल व्यतिरिक्त आधी कोण तो प्रॉब्लेम सोडवेल.... काही वेळ जातो..... दहा मिनिट दिलेली असतात..... कुणीच तो प्रॉब्लेम सोडवलेला नसतो....

 

बारकुल सर : "कुणा - कुणाचा झालाय सोडवून....??�� साक्षी...... झाला का..... घेऊन ये वही.....��"

 

साक्षी घाबरत उठते......

 

साक्षी : "नाही सर थोडा बाकी आहे....�"

 

सर तिच्या बेंच जवळ येऊन थांबतात.....

 

बारकुल सर : "सोडव मी आहे..... आणि दाखव मला...�"

 

ती खूप जास्त घाबरली असते..... थरथर करत असते..... काही वेळाने आपली वही सरांच्या समोर धरते......

 

साक्षी : "सर झालं....�"

 

बारकुल सर : "साक्षी आता तू एक गोष्ट लक्षात ठेव.....�� खूप प्रेमाने समजवून सांगतोय...... या नंतर शीतलला काहीही बोललीस तर, कधीच खपवून घेतलं जाणार नाही..... ती बिचारी घरची कामं करून शिक्षण पूर्ण करतेय.... तिच्या परिस्थितीची जाणिव ठेऊन, तुम्ही सर्वांनी तिला मदत करावी...... तर, तिच तुम्हा सर्वांना मदत करूनही, तुम्ही तिला त्रास देता....� हे कधीच खपवून घेतलं जाणार नाही.... कळतंय..... आणि साक्षी आपल्याकडून काही होत नसलं साध्य.... तर, दुसऱ्यांच्या स्तुतीला जळू नये...... मुलांनो तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा..... दुसऱ्याचं यश दिसतं फक्त तुम्हाला पण, त्यामागील त्याची मेहनत नाही...... शीतल खरंच खूप गुणाची आहे आणि नेहमीच ती हे सिद्ध करते,  तिच्या रिझल्ट वरून..... मल वाटतं तिच्या विषयी वाईट विचार मनात आणून राग करण्यापेक्षा तिच्याकडून तुम्ही सर्वांनी काही शिकाव....  ते गुण म्हणजे जिद्द, सहिष्णू वृत्ती, आणि मेहनत...... आपल्या वर्गात कुणीच कधी मला स्वतःहून स्पर्धेत नाव देताना दिसत नाही...... त्यांना जबरदस्ती करावी लागते... पण, अस शीतलच्या बाबतीत मात्र कधीच झालेलं नाही..... ती स्वतःहून प्रत्येक स्पर्धेसाठी नाव नोंदवते..... आणि आपल्या वर्गाचे नाव झळकवते.... त्यामुळे, आजपासून तिला कधी कुणी काहीही बोललं, त्याला मी बघून घेईल.... कळतंय बसा साक्षी मॅडम.....� बाकीच्यांनी लक्षात घ्या आजपासून विनाकारण कुणी - कुणालाही त्रास दिलेला आपल्या वर्गात खपवून घेतला जाणार नाही.....��"

 

शीतल सरांजवळ तिची वही घेऊन जाते..... तिचे उत्तर आलेले असते......

 

बारकुल सर : "शिका काही शीतल कडून....�"

 

सर साक्षी कडे बघून बोलत असतात.... ती रागात अगदी लाल झालेली असते...... तिला आता शीतलचा खूप जास्त राग येतो..... पण, ती काहीच करू शकत नाही..... मधली सुट्टी होते, सर वर्गाबाहेर जातात...... शीतल जागेवर बसून पाणी पीत असते.... साक्षी येऊन तिच्या बॉटलला हाताने मारून तिला पूर्ण ओली करते..... युनिफॉर्म पूर्ण ओलं झालेलं असतं....... शीतल जागेवरून तशीच उठते.....

 

शीतल : "काय हा मूर्ख बाजार...� मी तुला काय केलं आता.... का मागे लागते माझ्या??��"

 

साक्षी : "काय केलं..... इतका अपमान आजवर झाला नव्हता माझा..... तू आल्यापासुन सगळे टीचर्स, तुलाच चांगलं बोलतात.... अजून म्हणतेस काय केलं मी.....��"

 

शीतल : "तू वेडी आहेस का..� स्वतःची वागणूक बघ आधी आणि ठरव तू खरंच चांगलं म्हणण्या लायक आहेस का ते.....��"

 

साक्षी तिच्यावर हात उगरणार, इतक्यात एक मुलगा मधात येऊन सक्षीचा हात मोडतो........ सुनील प्रजापती.... सगळ्यात हुशार मुलगा......�� तो आपल्या शीतलला पसंत करतो...... मात्र, या सगळ्यात तिचं काहीही मन नसतं.... कारण, तिची परिस्थिती आता फार कष्टाची असते आणि तिला खूप शिकून, परिस्थिती बदलायची असते, तिचं स्वप्न पूर्ण करायचं असतं....�☝️ साक्षी जास्तच ओरडते तेव्हा तो तिचा हात सोडून बाजूला होता......

 

साक्षी : "ये मूर्खा.... तुला कुणी काय बोललं मधात पडलास....��"

 

सुनील : "मूर्ख....��� आधी स्वतःच थोबाळ बघून घे.... दुसऱ्यांना विनाकारण त्रास देणारे असतात मूर्ख...... तुझ्यासारखे....�"

 

साक्षी : "...�������"

 

सुनील : "चल शीतल.....�"

 

तो साक्षिकडे रागात बघून, शीतलचा हात पकडतो आणि तिला तिच्या बेंचवर घेऊन जातो....

 

सुनील : "तिच्याशी आजपासून तू बोलू नकोस..... हवं तर माझ्याशी बोलत जा...... ती खूप वाईट आहे... तुला तर माहित आहे ना अग..... मग कशाला...??��"

 

शीतल काहीही बोलत नाही.... काही वेळ सुनील तसाच उभा रहातो..... आणि ती काहीच बोलत नाही हे बघून तिथून तोंड पाडून निघून जातो.....�� (बिचारा)

 

इकडे शीतल विचार करते, हा का तिच्याबद्दल इतका विचार करतोय...?? काहीच वेळात ती सगळं विसरून, आवरून दुसऱ्या पिरेडसाठी पुस्तक काढून बसते........

 

असेच दिवस जातात...... साक्षी तिचा दिवसेंदिस राग करत असते..... त्यामुळे साक्षी कमी मार्कांनी पास होते..... हे तर, असच आहे ना..... स्वतःच्या घरी अंधार असून, तुम्ही दुसऱ्यांना लाईट लावा अस सांगता.....��� काही लोक असतातच अशी...... त्यांना आमच्या नागपुरी भाषेत काय म्हणतात हे इथे सांगून माझी कथा मला दूषित करायची नाहीये....����☝️☝️

 

तर, आता शीतल चंगालीच मोठी झालीय आणि ती सगळ्या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावते...... आता इथे येतो शाळेतील ग्यादरिंग चा महिना..�☺️☺️����

 

मला नाही वाटत हा क्षण कुणाच्याही आयुष्यात बोअरिंग राहिला असेल...... कारण, आपल्याला बॅग वगैरे नसतेच घेऊन जायची आणि अभ्यासाला चांगलीच सुट्टी.... मस्ती तर इतकी करायचो आम्ही.... नुसत्या हाणामाऱ्या...�� आणि परत मग सगळे कार्यक्रम संपल्याचा शेवटच्या दिवशी जेवण असायचे...... काय दिवस राव ते....��. पुढच्या पिढीला हे दिवस बघायला मिळतील की नाही..! हा खरं तर, माझ्यासाठी संशोधनाचा विषय....!! कारण, आपण सर्वांनाच परिस्थितीची जाणिव खूप चांगल्या प्रकारे झालीय..... त्यामुळे आता एका जागी गोळा होऊन, ही सगळी मज्जा करणं...... याला काय माहित अजून किती वेळ लागू शकतो..... असो..... �� काळजी असू द्या भावांनो.....

 

क्रमशः