Rajkumari Albeli - 1 books and stories free download online pdf in Marathi

राजकुमारी अलबेली..भाग १

एक शेतकरी असतो ..त्याला एक खूप सुंदर मुलगी असते.तिचं नाव त्याने ठेवलेले अलबेली.. अलबेली खूपच सुंदर फुलासारखी कोमल,निळ्या डोळ्यांची,गुलाबी ओठांची,नाजुकशी..एकदम परी सारखी..सर्वांना वाटायची ती खरंच परी आहे की काय ? खरंच ती शेतकऱ्याची मुलगी आहे अस कोणालाच वाटत नसे.
शेतकरी तिच्यावर खूप प्रेम करी.तिची आई ती लहान असतानाच वारली त्यामुळे..शेतकरी एकटाच तिला सांभाळी..तिचे खूप लाड करी ..प्रेमाने तो तिला आलू म्हणे.. आलू फार प्रेमळ होती ..ती सर्वांशी खूप नम्र पणे वागे.. तिचा तिच्या बाबांवर फार जीव..आलू घरातली सर्व कामे करी..शेतकरी शेतात जाऊन काम करी ..बाजारातून आलू ला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आणून देई.दोघे ही खुशीत जीवन जगत होते.
आलू च घर म्हणजे एक छोटीशी झोपडी ..त्यात ती आणि तिचे बाबा राहायचे.झोपडी शेजारी एक छोटेसे तळे होते..त्याच्या सर्व बाजूला रंगबेरंगी फुल होती .. आश्चर्य म्हणजे ती फुल कधीच सुकत नसत ..१२महिने ती फुल ताजी टवटवीत असायची ..आलू त्या तल्यातून पाणी भरून नेत असे ..बाबा नसले की ती ताळ्यावर जाऊन त्या फुलानजवळ जाऊन बसे..तिला तळे त्यातले छोटे छोटे मासे,फार आवडायचे .
एक दिवस आलू चे बाबा शेतात गेलेले असतात.आलू तळयातून पाणी आणण्या साठी तिथे गेली.ती काही वाकून पाणी भरणारच होती की पाण्यातून खूप आवाज येऊ लागला ..आलू घाबरून थोडीशी मागे झाली .. तळयातून एक विचित्र माणूस बाहेर आला ..त्याच्या हातात एक जादूची छडी होती ..त्याचे दांत रंगबेरंगी होते..तो हसत होता..आलू त्याला पाहून खूप घाबरली होती..तो आलू ला पाहून हसला आणि तुला म्हणाला ..आलू अजून फक्त ८ दिवस ..त्यानंतर मी तुला इथून घेऊन जाईन..आणि तो मोठ्याने हसू लागला.आलू खूप घाबरली तिथेच माठ टाकून ती झोपडीत पळून गेली ..त्यानंतर ती झोपडीत बाहेर आलीच नाही ..संध्याकाळी शेतकरी आला..बाबांना पाहून आलू ला खूप रडू आले..ती खूप रडू लागली ..शेतकरी ही घाबरला ..नेहमी हसणारी आलू आज इतकं रडत का आहे ? त्याने आलू ल शांत केलं ..काय झालं विचारलं? आलू ने तळयावर घडलेली गोष्ट त्याला सांगितली.
हे ऐकुन शेतकरी खूप चिंतित झाला.काय करावे हे त्याला सुचेना.आलू तू स्वप्नं पाहिलं असेल म्हणून तो तिला समजावून सांगू लागला .
खरं तर तो खूप घाबरला होता..काय करावे ते त्याला कळेना..तो सकाळी उ ठून.. जंगला पलीकडे असणाऱ्या राजवाडया कडे निघाला ..तो राजवाड्यात पोहचला.. इकडे राजा ही खूप चिंतित होता..
राजवाड्यात पोहचताच त्याला द्वारपलाने अडवले ..त्याने आपले नाव सांगितले व आपल्याला राजाला भेटायचं आहे अशी विनंती केली..द्वारपाल आत मध्ये गेला त्याने राजाला नाव सांगताच राजा तडक उठून त्या शेतकऱ्याला भेटायला बाहेरच आला ..द्वारपाल खूप आशचर्य वाटले ..तो परत बाहेर जाऊन उभा राहिला..राजाने शेतकऱ्याला पाहतच त्याला मिठी मारली ..राजाला आनंद झाला .
राजाने त्याला येण्याचे कारण विचारले ..तेव्हा त्याने सांगितले ..की जादूगार शनं पुन्हा आला आहे ..त्याने घडलेली सर्व कहाणी राजाला सांगितली.
राजा खूपच चिंतित होता ..काय करावे त्याला ही सुचेना.?
जादूगार शंन हा खूपच दुष्ट होता. ..जगातील सर्व सुदंर गोष्टी फक्त आपल्याला मिळाव्या असा त्याचा हट्ट होता ..त्यामुळे ..जे जे सुंदर असेल तो ते आपल्या जादूने मिळवायचा..जगातील सर्वात सुंदर हिरे ,दागिने,कपडे,सर्व काही त्याच्या कडे होते ..इतकंच काय ..ज्या ज्या सुंदर राजकुमारी असत तो त्यांना आपल्या जादूने कैद करून ठेवी..तरी त्याची इच्छा त्याला अधुऱ्या वाटायच्या..त्यात त्याच्या गुरूने त्याला सांगितले होते की ..महाराजा चित्र सेन ला नुकतीच एक खूप सुंदर मुलगी झाली आहे .. जर तू त्या मुली सोबत लग्न केलस तर तू चिरतरुण राहशील.
हे ऐकुन जादूगार शन खूपच खुश होतो.तो चित्रसेन च्या राजवाड्यात पोहचला ...त्याने चित्रसैन ची मुलगी पहिली ..नुकतीच जन्मलेली नाजूक कळी राणी शेजारी .गाढ झोपली होती ..राजाने त्याला पाहिले ..त्याने सैनिक बोलावलं ....तेवढयात जादूगार म्हणाला ..राजा मी आता तर जात आहे पण मी पुन्हा येईन जेव्हा राजकुमारी १८ वर्षाची होईल..मी तिला माझ्या सोबत घेऊन जाईन ..कायमची ..ती मला चिरतरुण करणार आहे ..राजाचे सैनिक त्याला पकडण्यासाठी .. धावले पण सर्व व्यर्थ ..जादूगार मोठ्याने हसून गायब झाला..राणी जे जेव्हा हे सर्व ऐकले तेव्हा तिने जागीच प्राण सोडले ..राज्यावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला होता..राजकुमारी ला पाहून राजा खूपच खुश होता ..सर्व राज्यात आनंदी आनंद होता..पण जेव्हा जादूगार येऊन गेला ..सर्व काही नष्ट झालं होत ..राजाला राणी सोडून गेली होती पण आता आपली अलबेली सुरक्षित राहिली पाहिजे या विचाराने राजा चिंतेत बुडून गेला होता ..अचानक त्याला आपल्या मित्राची आठवण झाली ..त्याने निरोप पाठवून मित्राला बोलावून घेतलं ..त्याला सर्व कहाणी सांगितली..
राजचा मित्र राजा साठी काही ही करायला तयार होता ..एकदा राजाने त्याचे प्राण वाचवले होते ..मग दोघे ही खुप विचार करून ठरवतात..की राजकुमारी राजवाड्यात सुरक्षित नाही..त्यामुळे तो आलबेली ला मित्रा कडे सोपावतो ..त्याचा मित्र म्हणजेच तो शेतकरी ..तो आलू ला घेऊन जगला पलीकडे असणाऱ्या गावात शेतकरी म्हणून राहू लागतो ..पण जे होऊ नये वाटत होत तेच झाल.. जादूगार ने आलू ला शोधून काढलं..आता फक्त ८ दिवसात आलू १८ वर्षाची होणार होती..
राजा आणि त्याचा मित्र खूपच चिंतेत होते ..
क्रमशः