The definition of a happy life ... books and stories free download online pdf in Marathi

सुखी आयुष्याची व्याख्या...

अनु आणि तनु दोघी बालमैत्रिणी... तनुला लहान असल्यापासुन दागिन्यांची खूप आवड... तिला वाटे पैसा, दागिने असेल तर खर्या अर्था‌ने जीवन सुखी होते... अनु मात्र तिच्या उलट...तिला साधे राहणे जास्त आवडत असे....
श्रीमंतीच्या मोहाला बळी पडून तनुने एका श्रीमंत पण कमी शिकलेल्या मुलाशी लग्न केले..... फक्त खूप दागिने मिळतील, छान-छान साड्या मिळतील म्हणून..ती खुश होती सुरवातीला... पण नंतर मात्र तिचा अपेक्षाभंग झाला... त्या घरात तिला काही किंमत नव्हती.. बारावी झाल्यावर हे स्थळ आले म्हणून लग्नाला तयार झाली ती.. तेव्हा अनुने तिला खूप समजावलं होते... विचार कर परत... नंतर पस्तावशील पण तनु मात्र त्या भौतिक सुखाच्या विचारात होती त्यामुळे ती कोणाचे काही ऐकत नव्हती.. सुरवातीला खूप छान वाटले,पण हळू हळू घराणे.. आमचे प्रतिष्ठीत घराणे... ह्या बंधनात तीला इतके अडकवून ठेवण्यात आले की विचारू नका... तिच्या साठी तो सोन्याचा पिंजरा होता... सर्व सुख दाराशी.. पायाशी लोळणे घेत होती... पण मनासारखे जगता येत नव्हते... चेहर्यावर सतत खोटे हसु ठेवावे लागे... आता खूप उशीर झाला होता...तरी देखील माझे तें खरे हा तनुचा लहान असल्या पासूनचा स्वभाव मात्र काही जात नव्हता...घरात काही चालायचं नाही... पण माहेरी, गावात मात्र दागिने आणि साड्या घालून मिरवण्यात तिला वेगळेच कौतुक वाटायचे...

अनुने मात्र खूप शिकून छान शिक्षण घेतले स्वताची वेगळी अशी ओळख निर्मांण केली.... एका मैत्रिणीच्या लग्नात दोघी बऱ्याच वर्षांनी भेटल्या... पण तनु मात्र मोठ्या दिमाखात मी किती खुश आहे, सुखी आहे हे दाखवायचा प्रयत्न करत होती... खर तर ते साडी आणि नखशिंखात घातलेले दागिने यामुळे ती वया पेक्षा जरा जास्तच मोठी वाट्त होती... अनु मात्र एकदम साधी आली होती... हलकीशी नारायण पेठ साडी... गळ्यात ठुशी.. पण अगदी मोहक दिसत होती.. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आत्मिक समाधानाचे तेज दिसत होते... नेहमीं प्रमाणे ओठावर गोड हसु... तनुची स्वतःची अशी वेगळी ओळख काहीच नव्हती... तरी देखील तीने अनुला साडी आणि दागिने घालून कसा रूबाब दाखवता येतो हे दाखवून हिणवले... अनु मात्र काहीच बोलली नाही....


महिला दिनानिमित्त त्यांच्या गावात कार्यक्रम होता... कार्यक्रमात आलेल्या अनुला बघून तनुला खूप आनंद झाला... पण आपण तिच्या पेक्षा श्रीमंत आहोत.. घराणे हा शब्द आठवला आणि लांबून तिने ओळख दिली... सर्व छान चालू होते.. आणि या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्वांना यांच्या घराणे शाहीकडून बक्षिस होती... आणि काही खास सत्कार होते.... कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी म्हणून अनु ला बोलावलं आणि तनु मात्र बघत बसली....खर तर दोघी बरोबरच्या पण तनु आली होती ती जहागिरदारांची सून म्हणून... आणि अनु आली होती ती गावातली पहिली महिला एक अधिकारी झाली म्हणून.... तनु मुळातच दिसायला छान त्यात आता जहागिरदारांची सून...!!! मग् काय विचारता भरजरी साडी... नखशिंखात दागिने... तरी खरी सुंदरता दिसत होती ती अनु मध्ये.... स्वकर्तृत्वाचे एक वेगळेच तेज दिसत होते तिच्या चेहेऱ्यावर.....!!!


भाषण द्यायला जेव्हा अनु पुढे आली,तेव्हा तिचे ते सौंदर्य पाहून तनु भुतकाळात हरवली..... सावळी म्हणून किती हिणवायचो हिला, गरिब म्हणून कमी लेखले....कपडे, खेळणी सर्वांवरुन कायम तिला कमी लेखले... पण आता ती किती बदलली आहे, खरच... पैसा म्हणजे खरे सुख नाही... मला पैसा मिळाला, सर्व सुख मिळाले पण,मानसिक सुख त्याचे काय? मला अगदी कटपुतली बनवून ठेवली या लोकांनी... अनु खरच किती छान दिसते आता... एक वेगळेच तेज आहे तीच्या चेहऱ्यावर... खरच एक समाधानी आयुष्य जगते अनु... तेवढ्यात अनुला भाषण देण्यासाठी बोलावण्यात आले... आणि तिचे नाव ऐकताच तनु भानावर आली....

नमस्कार मी सौ. अनुराधा देशपांडे... मी आधी खूप साधी होते... घरची गरीबी... त्यात थोडीशी सावळी म्हणून सगळे अवहेलना करायचे... तेव्हा माझ्या आजोबांनी माझी समजूत काढली, त्यांनी मला जे सांगितले, तें तुम्हाला सगळ्यांना आता मी सांगते,
"रंग सावळा असला म्हणून काय झालं???
कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे.....
रंग गोरा असला म्हणून काय झालं??
मनावरील काळ्या सावळ्या विचारांची सावट काढता आली पाहिजे."
मला त्यांचे म्हणणे पटले, आणि मी स्वतःला अभ्यासात गुंतवुन घेतले, म्हणून मी आज एवढ्या मोठ्या पदावर पोहचले....तुम्हाला मी एवढेच सांगेन,

"कॊणी गोरा,कॊणी काळा तर कॊणी असे सावळा,बाहयरूपाने कधीच कोणाला लेखू नये कमी...
निर्मळ अंतर्मन आणि सुसंस्कारीत विचार नेहमीच देतात त्या व्यक्तीच्या कर्तॄत्वाची हमी....."

जोरात टाळ्या वाजतात... तनुला खूप अपराधी वाट्ते... कार्यक्रम संपला की माफी मागायची असे ती ठरवते...

अनु पुढे बोलत असते....

"कोणतीही व्यक्ती किंवा तिचे आयुष्य हे परीपूर्ण कधीच नसते,आपल्या मानण्याने आणि आत्मिक समाधानाने आयुष्यामध्ये परीपूर्णता येते आणि त्यासाठी गरज असते ती आत्मपरिक्षणाची...."

इथे बसलेल्या सर्व महिलांना मी एवढेच सांगेन, "कोणाच्या तरी ओळखीचे ओझं घेऊन नखशिखांत दागिने घालून नटलेली बाहुली होण्यापेक्षा, स्वाभिमान आणि स्वकर्तॄत्वावर स्वतः निर्मांण केलेली स्वतःची वेगळी ओळख हाच खरा 'दागिना....' आहे प्रत्येक स्त्री ने नक्की विचार करा....

जोरात टाळ्या वाजतात, आणि कार्यक्रम संपतो... तनु अनुची माफी मागते आणि आपली चूक कबुल करते... अनु मोठ्या मनाने तिला माफ करते...

तनुला खऱ्या अर्थाने सुखी आयुष्याची व्याख्या कळली...

कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..
अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


©® अनुजा धारिया शेठ