Reshmi Nate - 21 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - 21

‌संगीत फंक्शन संपून सगळ्यांना एक दिड वाजले झोपायला...
पिहुला झोपच येत नव्हती.प्रांजल तर आल्या आल्याच झोपुन गेली.
विराट ‌ची ही दिवसभर ओढाताण झाल्याने त्याला ही झोप लागली.होती..पिहु ह्या कुशीवरुन त्या कुशीवरून होत विचार करत होती .विराट ला कॉल करु का,नको झोपले असतील...ती विचार करतच उठुन बसली....

विराट झोपला होता...अचानक दार दोन वेळा नॉक झाल्याने त्याने हुळ हुळ डोळे उघडझाप करत वॉच कडे बघितलं रात्रीचे तीन वाजले होते...परत दार नॉक झाले...तो दचकुन घाईतच उठुन दार उघडले...तर समोर पिहु होती...

पिहु,वॉट हॅप्पन.. का...य त्रास होतोय‌ ..का तो तिच्या कपाळावर गळ्यावर हात ठेवत घाबरून विचारु लागला....

पिहु त्याच्या कुशीत शिरुन डोळे झाकते..मला झोप येत नाहीये...ती पाठीवर हातांचा विळाखा घालत हळु आवाजात बोलते...

तेव्हा कुठे विराट नॉर्मल होतो...वेडी घाबरलो ना,मी..त्याने तिला थोड दुर करत चिडुन बोलला..

अहो,चिडु नका...ना ‌ss ती आळस देतच आत ‌येत बोलली...

मग,काय ही वेळ आहे चांगली झोप लागली होती...त्याने दार लावुन घेतलं...किती घाबरलो मी आत्ता कोण आलं

सॉरी मी जाते...ती बारीक चेहरा करत परत निघाली.त्याने तिला मागून दोन्ही हातावर उचलुन घेतलं ...पिहु पण,त्याच्या कुशीत बिलगली...झोप किती़ आहे...डोळ्यावर पण नखरे करायचे...
ती लाजुन चेहरा त्याच्या कुशीत लपवते...तो गालात हसत तिला बेडवर झोपवतो ब्लँकेट‌ घेऊन तिला कुशीत घेतो..

पिहु त्याच्याकडे बघते..अहो,मला उठायवाच नव्हतं ..पण...

झोप आता,उद्या बोलु त्याने तिच्या डोळ्यावरुन हात फिरवला.पिहु पण,त्याला बिलगुन झोपली. पाच -दहा मिनीटात पिहु झोपून सुध्दा गेली...विराटला ही झोप आली‌ होती तो हि झोपुन गेला
सात -साडे सात च्या दरम्यान विराटला जाग आली...त्यानें पिहुला बाजुला केले...आणि फ्रेश होऊन जिम मध्ये गेला.

सकाळी रेवती रूममध्ये आली. तर प्रांजल एकटीच झोपली होती...रेवतीने वॉशरुमचा डोर वाजवला.ओपन होता...पिहु नव्हती...

प्रांजु,...प्रांजु...उठsssरेवती तिला हलवत उठवु लागली..

प्रांजल डोळे चोळतच उठुन बसली,काय आहे गं...

अगं पिहु कुठे आहे.....रुममध्ये नाही वॉशरुम नाही त्या दचकतच बोलु लागल्या...

असेल इकडेतिकडे जीजु बरोबर फिरत असेल..

मी विराटला खाली बघितलं होते...एकटाच होता...त्या मोबाईल लावत बोलु लगल्या...पिहुचा फोन समोरच होता...

प्रांजल पण थोडी घाबरली...मम्मी मी बघुन आले असेल इथेच

पिहु झोपेतच उठुन गेली नाही,ना तु दार नीट लॉक होते ना...रेवती घाबरुन एक एक प्रश्न विचारत होती...

हो मम्मी मी स्वतः दार लावलं होते...प्रांजल खाली आली सगळीकडे बघत होती गार्डन चेक केलं‌.

पिहुची रुम उघडी असल्याने सूमन आत आली तर रेवती होती.

रेवती मी हळदीची तयारी करायलाच चालले होते...येतेस ना,परत संध्याकाळी गोंधळ होतो...सुमन गालात हसत बोलली...

रेवती वर वर हसत ह..हो आले मी....

हो ये..सुमन ने नजर फिरवली.पिहु कुठे आहे..आवरते का,

रेवती दचकलीच आता काय उत्तर द्यायच. पिहु आणि विराटच्या रुममध्ये दोन रुम होते.

विराट लिफ्ट मधुन बाहेर आला.प्रांजल पण दुसरया लिफ्टने वर आली...विराट प्रांजल बघुन गालात हसत गुड मॉर्निग बोलला...

प्रांजु वरवर हसत गुड मोर्निंग जीजु....

तो चाललाच होता.प्रांजलने थांबवले...जी...जु....ते तूम्ही कुठे होता...

मी जिम मध्ये का,

ते...जी...जु....प्रांजल घाबरूनच बोलू लागली.दि माहीत नाही कुठे गेली...मी सगळीकडे शोधुन आली...मोबाईल..

विराट कपाळालाच हात मारतो...पिहु माझ्या रूम मध्ये झोपली आहे...

काय,प्रांजल शॉक होत बोलते.

ते...प्रांजु....ते त्याला काय बोलाव कळतच नव्हते..

इट्स ओके जीजु...सकाळ सकाळ दि ने डोक उठवलं मम्मी किती घाबरली. झोपेतच उठुन गेली का...पहिले जाऊन सांगते...प्रांजल हसतच रुमकडे वळाली...

विराट हसत त्याच्या रुमकडे वळाला.

प्रांजल आत येतच बोलु लागली...मम्मी,दि जीजु रूममध्ये झोपली..ती सुमनला बघुन शांत रेवतीकडे नजर वळवते.

हहह.काय पिहु विराटच्या रुममध्ये सूमन कडे एकादा प्रांजलकडे बघत बोलते...रेवती बोलते

हहह ..ते..जीजु बोलले आत्ता प्रांजल चाचरतच बोलु लागली.

प्रांजल जा आवरुन ‌खाली ये....रेवती आणि सुमन बाहेर येतात..

ते सुमन मी बोलले होते...तिला..लग्नापर्यंत...

असु देत गं ....हेच तर दिवस असतात...उगाच बंधन लादायचे आत्ता ते आईंना पटत नाही लोक काही तरी बोलतील..ह्यासाठी मी ही शांत होते....

रेवती गालात हसली.

विराटने तिच्या वर नजर टाकली ती अंग चोरून ब्लँकेट छान ओढुन झोपली होती...त्याने ऐसी ऑफ केला. बाथ घेऊन त्याच आवरुन झालं .नऊ वाजुन गेले तरी ती अजुन झोपलीच होती...
तो तिच्या शेजारी बसुन एकटक तिला बघत तिच्या चेहरयावर आलेले केस मागे घेतले..काल खुपच ‌थकली असेल....रात्री आर्धी झोपेतेच होती...नशीब जागी होती...तो हसत विचार करत होता...पण नंतर हसू थोड गायब होत विचारात पडला..कधी मी जर नसलो आणि ही अशी कधी झोपेतुन चालत स्वतःला दु‌खपात करून घेईल...त्याच्या अंगाला भितीने काटाच आला...हसण्यासारखी गोष्ट असली तरी ती किती भितीदायक आहे...त्याला आता त्या गोष्टीच टेंशनच आले होते.तो विचारात मग्न होता....
पिहुने किलकिले करत हळूच डोळे उघडत आळस देताना तिचा हात विराटच्या चेहरयावर लागला. त्याची तंद्री तुटली पिहुचे डोळे ताट झाले ती खाडकन उठुन बसली....अहो...तु....म्ही इथे काय करताय...ती अडखळतच बोलु लागली.

विराट ने तिच्या कपाळावर किस करत गालात हसला...मॅडम ही माझी रुम आहे...
पिहु नजर फिरवुन सगळीकडे बघते..तिला काल रात्री ती स्वतः आलेले आठवत....ती नजर विराट कडे करत...ते....सॉरी माझ्यामूळे झोप मोड झाली तूमची....खरच सॉरी...मी ...ते...ती घाबरतच बोलु लागली...

शुशुुssss तो तिच्या ओठांवर बोट ठेवत बोलला..गुड मॉर्निंग माय सनशाईन...तो गालात हसत तिच्या गालावर किस करत बोलला...तशी तिची भिती कमी होऊन गालावर ‌खळी पडली....

पिहुने तिच्या अंगावरची ब्लँकेट बाजुला करत,त्याच्या गळ्यात हात गुंफवुन पालथी मांडी घालत त्याच्या मांडीवर बसली‌...त्याने तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालत जवळ घेतो....

ती त्याच्या डोळ्यात आरपार बघत...गुड मॉर्निंग ‌...अशी सकाळ मला रोज हवीये..तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले..त्याने अलगद डोळे झाकले.....तो तिच्या स्पर्शाने मनोमन सू‌खवला होता...एक ‌पॉजेटिव्ह ऐनर्जी असल्यासारखा तिचा स्पर्श होता..तिच्या निरागस बोलण्यात, स्पर्शात फक्त निस्वार्थ भाव होते.त्याच्यासाठी असणारी ओढ,प्रेम ,काळजी ती बोलुन जास्त दाखवत नसली तरी ते जाणवुन येत होते...आपल्यावर ही कोणी निस्वार्थ प्रेम करेल हे कधी त्याला अपेक्षाच नव्हती... .त्याने हळुच डोळे उघडले...त्याचे डोळे पाणवले होते...
पिहुची नजर डोळ्यावर टाकत अ.. हो काय झालं ...मी काही चुकीच...बोलले का...

तो गालात हसत मानेनचे नाही म्हणतो..अशी सकाळ आपल्या लाईफमध्ये दररोज येणार आहे...त्यानें‌ तिला मिठीत‌ घेतले.‌..😘😘😘

पिहु विराट च्या वॉचकडे बघत जोरातच किचांळत त्याच्या मांडीवरुन उतरुन उभी राहते....विराट ही दचकुन उभा राहतो....क..काय झालं...

अ...हो काय झालंं ,साडे नऊ वाजले आणि मी तुमच्या रुममध्ये कोणाला कळलं तर ती रडक्या स्वरातच बोलु लागली..

तुझ्या मम्मीला कळालं आहे विराट हसत बोलतो...

काय,‌sssआता किती ओरडेल...आणि तुम्ही मला उठावायच ना..ती त्याच्या हाताला मारतच चिडु‌न बोलते.

अगं,तु इतकी छान झोपली होती.मला उठवु वाटणार आहे का,तो तिच्या नाकावर टच करत बोलतो....

मला कोण काही बोललं ना,मी तूमचच नाव सांगणार आहे...ती चिडुनच बोलते....

वॉट माझ का,तु स्वतःहून आलीये तो भुवया ताणून बोलतो....

हुम्म,ती निघालीच होती तर त्याने मागुन तिला मिठीत घेतलं...पिहु एवढी कसली घाई,हहह.माझी काल झोप मोड केलीस...मग मला काही मिळणार नाही का,त्याच बोलण तिला समझलं होते...ती लाजून खाली बघु लागली....अ..हो सोडा ना...ती हळुच लाजुन बोलली...

त्याच्या फोन वाजतो....पिहु पटकन हात काढुन पळत दार उघडून निघुन जाते...विराट चिडतच फोन उचलतो...

मानव स्टाफला इंस्ट्रक्शन देत होता....त्याला मध्येच ठसका लागतो. भिमराव त्याच्यासोमर पाण्याचा ग्लास धरतात..मानव एकटक बघत गालात हसत ग्लास घेत पाणी पितो...थँक्स सर...मानव नम्रपणे म्हणतो..

सर नको बोलु काका म्हण छान वाटते..भिमराव हसत बोलतात...
मानव ही हसतो....

किती काम करतोस रे,कालपासुन बघतोय तुला इकडेतिकडे पळतच हसतो.

दोघेही चालत चालत बोलु लागतात.

काका,माझ काम आहे ...कराव लागतं...त्यात विराट च काम म्हटलं तर मागे पूढे बघायचच नाही...

काम आहे माहीत आहे...पिहु हॉस्पिटलमध्ये असताना तु ही किती धावपळ करत होता..बघितले मी कोणी करत नाही एवढं तेवढ तु करतोस...भिमराव त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणतात.
मानवचे डोळेच पाणवले...आनाथ असल्याने विराटच्या मॉमनंतर मायेचा स्पर्श कधी त्याला मिळालाच नव्हता...

काका,विराट सारखा जावई मिळुन वहिनी खुप सुखात राहतील..

हो ते तर आहे...आणि तुझ्या सारख्या मुलगा,मिळणे म्हणजे भाग्यच लागतं..आईवडील कुठल्या गावाचे..

मी..आनाथ आहे तसे भिमरावांना वाईट वाटते..माफ कर हहह

माफी काय,खर आहे ते खर आहे मानव हसत बोलतो...
पण भिमरांवाना कसतरीच होते...आनाथ म्हणू नकोस..इतकी चांगली नाती आहेत आवतीभोवती त्यांनाच आपलं म्हणायच...
मानव गालात हसतो...

मानव पिहुला बहिण मानुन घे....आपोआप सगळी नाती मिळतील...मानव चालायचं थांबत एकटक भिमरांवाकडे बघतो...
भिमराव त्याच्या खांद्यावर हात ठेवत थोपटतात.आनाथ समजू नकोस..मी तुझ्या वडीलांसारखाच आहे...

मानव भावुक होत मिठी मारतो...भिमराव हसत पाठीवरुन हात फिरवतात...

भिमराव रेवतीला हाक मारतात...रेवती येते...

रेवती...आजपासुन मी मानवला माझा मुलगा मानलाय..पिहुसाठी हॉस्पिटल मध्ये किती काय केलं ...नात नसुन सुध्दा...मग आपलं ही कर्तव्य आहे त्याला प्रेम द्यायच हो ना....भिमराव हसत बोलतात....

रेवती भावुक होत हसत मानवच्या डोक्यावरुन हात फिरवत जवळ घेते..मानवचा आंनद गगनात मावत नव्हता.....

ओके आजपासुन आईबाबा म्हणेल मी...मानव हसत बोलतो...
दोघेही हसत हो म्हणतात..
.
.

.
.

पिहु आवरुन खाली येते...रेवती तिच्या कडे रागानेच बघत होती‌.पिहुने घाबरून नजरच खाली केली ..रेवती तिचा हात पकडून तिला बाजुला घेऊन जाते...पिहु,डोक आहे...तुला मी सांगितलं होत ना,पूजा झाल्याशिवाय...विराटच्या..रेवती बोलायच थांबते...

मम्मी,...किती चिडतेस..तस काही नाहीये...ती घाबरुनच बोलते.

रेवती इकडे तिकडे बघते..नक्की..का...

पिहु मानेनेच हो बोलते...

सुमन मागुन येते...रेवती अगं काय हे..उगाच काय तिला ओरडते...पिहु जा ब्रेकफास्ट कर....पिहु गाल फुगवुनच ब्रेकफास्ट करत होती...

दी काय झालं ,प्रांजल चिडवतच बोलते...

पिहु रागाने तिच्या कडे बघते...प्रांजु माझ डोक फिरवु नकोस..काही कामाची नाही....तु..

अरे,दि सांगुन तर जायच ना,मी पुर्ण हॅाटेल तुला शोधलं मी हुम्म..

विराट समोर येऊन बसला...

पिहु एक लुक देत खाली बघते..विराट ज्युस पित डोळ्यानेच प्रांजल काय झालं विचारतो..

मम्मी ओरडली...प्रांजल नाटकी रडत बोलत होती..

पिहु प्रांजल कडे रागाने बघुन उठुन निघुन जाते.विराट हसतच उठुन तिच्यामागे जातो..तो बोलणार कि त्याचे फ्रेंड्स येऊन त्याला ओढतच घेऊन जातात...पिहु पण तिच्या फ्रेड्समध्ये मशगुल होती.दुपारी सगळे एकत्र लंच करतात.

पिहु आणि विराट बोलत लॉन मध्ये फिरत होते...पिहु फोन मध्ये काहीतरी करत चालली होती. सोमरुन तिची टक्कर आदीला होते..आदी डोक चोळत सॉरी बोलुन फोन वर बोलत पुढे जातो..

पिहु त्याला थांबवत आदीच्या मागेच चालली होती विराट ने तिचा हात पकडला..अहो...काय आहे आलेच मी एक मिनीटात‌..‌

अंह..मला माहित आहे,कुठे चालली...परत टक्कर द्यायला चालली ना,तो नजर रोखुन बघत विचारतो.

हहं ती हसुन बोलते..

,सगळे हसतील..तस काही करायच नाही...इकडेतिकडे बघत म्हणतो.

अहो,ते मी कोणाला कळणार नाही..हळुच

शटअप..डोन्ट.

ती रागाने त्याच्याकडे गाल फुगवुन बघते.

तु मला मार बस्स,तो त्याचं कपाळ पुढे करत बोलतो..

तस नसते,ज्या बरोबर टक्कर होते त्यालाच मारायच असते...

अस ही असते...मी ऐकलं ‌.‌

तुम्ही कधी ऐकलं तुम्हाला तर मीच सांगितले होते...

ते....ते..कुठे तरी ऐकलं होते...तो तिच्या कपाळाला हळुच टक्कर देतो..

पिहु खुदकन हसुन पटकन जोरात त ट्क्कर देऊन पळतच जातेय..

विराट चिडुन डोक चोळतो, पिहुsss तो दात ओठ खातच तिच्या कडे बघतो...ती मागे वळुन त्याला ठेंगा दाखवुन निघुन जाते....रीषभ आणि नमन त्या दोघांच बघत होते..ते विराट जवळ येतात...

दादा,तु का मागे लागला होता...टक्कर दे टक्कर दे म्हणुन...ते ब्लँक होत विचारतात...

वेड लागलं होत बस्स का,तो रागात लुक देत निघून जातो.

दोघेही त्याच्या ब्लँक होत बघतात..

‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ हळद

संध्याकाळी हळदीसाठी झेडुंच्या- आंब्याच्या पानांनी लावुन गोल आकार देऊन पिवळ्या कलरचे जाळीचे पडदे सोडले होते दोघांसाठी बसायला दोन छोटे चेअर होते. झेडुच्या पाकळ्यांची पायघडी सगळीकडे सजवलेली होती.एका मोठ्या ताब्याच्या कुंड्यात पाणी तर एका पात्रात हळद होती....लॉन सजवलेले होते...



विराट ने यलो कलरचा कुर्ता घातला होता...तो आवरुन लॉनमध्ये आला....हळद बघुन तो मॉम ‍शेजारी आला..मॉम,

हहह.बोल

हळद जास्त वाटत नाही तुला...आणि कोण कोण लावणार आहे...तो आठ्या पाडतच बोलतो..

अरे आज एक दिवस लावुन घे....

मॉम डोन्ट यु थिंक धिस इज टु मच,माय चिक्स स्टारटेड इरेटींग...ते हळदीच पात्र बघुन त्याला चीड येत होती...

वेडा..जा जाऊन बस...सुमन हसत त्याला तिथे घेऊन जातात..

विराट आज सगळ वसुल करणार आहे आम्ही.. कधी कलर लावु देत नव्हता ना...आत्ता बघच तु...‌यश दात काढतच म्हणतो...सगळे हसतात...

विराट गाल फुगवुनच बसला होता.. वीरा वहिनी कुठे सुमन विचारते...

हा ते बघ आली...विराट ही पिहुकडे नजर वळवतो.

पिहु ने यलो कलरची प्लेन साडी घातली होती.. यलो‌ कलरचा स्लिवलेस ब्लाऊज...आर्टीफिशीयल,नाजुक फुलांची ज्वेलरी..हलकासा मेकअप...विराट एकटकच बघत राहीला..पिहुने त्याच्याकडे नजर टाकली तर तो तिला भान हरपुनच बघत होता..
पिहुने लाजुन नजर खाली घेतली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली..विराट अजुन तिलाच बघत होता...

विराट पुढे बघ आता मेघा चिडवत हसत बोलली तसा तो भानावर येत पुढे बघु लागला..

पहिले सग्ळयांनी विराटला हळद लावली.तो चिडत होता म्हणुन मुद्दाम त्याला जास्तच लावत होते..😂😂
मग त्याची उष्टी हळद पिहुला लावली...पिहुला हळद लावताना रेवतीचे डोळे भरुन आले..पिहुच्या ही डोळ्यातुन पाणी वाहतच होते..

हळदीने सजली गं काया
सासरची मिळेल गं माया
वेड लावी धन्याची गं भेट
डोळ्यातल्या काजळाची तीट
आठवांचे कुंचले…
रेखिती काटेकुटे
कोरडे तळहात हे…
मेंदीची वर जळमटे
मोकळ्या माथ्यावरी…
देवळाची पायरी
फितूर झाली दैवते…रीत ही कुठली
दैव मानी हार आली बंधनाला धार
भोवती निराशेचा उडे पाचोळा
शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी.....

चूकुन तिचा हात डोळ्याला लागला आणि हळद डोळ्यात गेली.विराट ने पटकन टीश्युने तिचे डोळे फुसले...रडु नकोस वेडाबाई ..तो हळूच तिच्या कानात बोलला.पिहु त्याच्या कडे बघून गालात हसली.

विराट आता तु लाव हळद ..तसा तो लगेच ‌खुश झाला.😁त्याने बसुनच तिच्या हाताला लावली पिहु‌च्या आंगाला गोड शहारा आला.. त्याने मागुन हात घेत तिच्या चेहरा पुर्ण रंगवला....ती किती वेळचा त्याच्या हात काढत‌ होती...तरी तो अजून घेऊन लावतच होता...पिहुने पण हळद ‌‌घेतली आणि पुर्ण चेहरा रंगवला दो‌‌घांनाच ‌खुप वेळ चालले होते...सगळे बघुन हसत होते...मग सगळे हळद एकमेंकानच्या अंगावर टाकत होळी असल्यासारखे खेळु लागले..विराटच्या मित्रांनी तर त्याला उचलुन स्विमींग पुलमध्ये टाकलं...त्याच्याबरोबर ते ही उतरले...सगळ्यांची मस्ती चालुच होती..
चुकुन प्रांजलचा हळदीचा हात नमनच्या चेह्रयावर लागला...तो एकदा तिला एकदा तिच्या हाताला बघत होता‌...सो...सो...सॉरी....ती पळतच बोलु लागली‌‌ नमनने पण पात्रातली हळद घेतली आणि तिच्या मागे हसतच पळत गेला..

नमन चुकुन लागल...प्रांजल हसतच पळत होती...

पण लागल ना...आता मी ही लावणा‌र..दोघे ही गोल फिरतच बोलत होते...नमन ने तिला पटकन तिचा हात पकडत पुर्ण चेहारयावर लावली...दोघांची मस्ती चालली होती.कि रोहिणीची नजर दोघांना पडते..तिचा पाराच चढतो...
ती पटकन जवळ येत नमनला जोरातच हाक मारते...

नमन आणि प्रांजल दुर होत रोहिणी कडे बघतात...

नमन ही कुठली पध्दत हह आणि हे काय अवातर केलाय..जा शॉवर घे बस झालं...ती चिडुन रागाताच बोलते...

तो एक नजर प्रांजल कडे बघतो..परत रोहिणी कडे बघत आई अजून सगळे खेळतच आहेत

तुझ लग्न नाहीये...मी बोलले तेवढे कर...जा ती रागातच बोलते.
तो रागानेच पाय आपटत निघुन जातो...

प्रांजल तर ब्लँक होतच बघते अस काय झालं एवढ चिडायला...

आणि तु गं सगळे तिकडे आहेत आणि इथे काय करते स...रोहिणी चिडुनच बोलते.

मी पण तिकडेच होते...आणि हा कुठला प्रश्न..इथे काय करते ...प्रांजल चिडुन बोलुन निघूनच जाते.

रोहिणी तर तिलाच बघत राहते.किती विचित्र मूलगी आहे..माझ्या मुलाला हात लावुन मला बोलते..ती पिहु बरी आवाज निघत नाही आणि ही...मिरची सारखी चुरुचुरु बोलते..

काय समझतात स्वतःला जस काय त्यांच्या मुलाला माझा हात लागला तर तो अशुध्दच होणार होता...जा जा शॉवर घे म्हणुन मागे लागल्या...हुम्म‌ मी काय लक्ष देते ती स्वतःशीच बडबड करत जात होती.

रीषभ अलिशाला घेऊन बाजुला येतो..

अलिशा अजुन फुगुनच होती...ऑले..बेबी किती चिडतेस...तो तिच्या नाकावर ,गालावर हळद लावत बोलतो...

चिडु नको तर काय करु घरी कधी सांगणार आहे ती रागानेच त्याच्या हात झटकत बोलते..

घरी...का...ते तो इकडे तिकडे बघत अडखळत बोलतो...

ती त्याचा कॉलर पकडत...तु जर टाईमपास केला ना,बघ मग...सरळ विराट दादाला जाऊन सांगेन..मग तुला माहितच आहे दादा काय करेल तुझ्यासोबत...ती कुचक हसत बोलते.

हे...हे अस काही करु नकोस..मला,वेळ तरी दे ...आणि दादाला कळालं ना माझा जीव घेईल...प्लिज

हं..मग लवकर घरी सांग...

अगं हो ,मला सेटल तरी होऊ दे नीट...मग मी बोलणारच आहे. आता तरी राग सोड तो क्युट फेस करत बोलतो..

अलिशा हसत त्याला,मिठी मारत गालावर गाल घासते...तो ही हसत मिठी घट्ट करतो.

अंधार पडला तरी अजून सगळ्यांच हळद खेळण चालुच होते.

पिहु जा शॉवर घे...ह्यांच चालुच राहणार मेघा,जा तिच्यासोबत.. सुमन बोलते...

पिहु आणि मेघा निघाल्या..तसा विराट ही सगळ्यांना नजर चुकवून तिथुन सटकला....

मेघा आणि पिहु बोलत चालल्या होत्या..मेघाची साडी ओली असल्याने तिच्या पायात सारखीच साडी अडकत होती....

पिहु,मी चेंज करते...तु जातेस का...

पिहु हो म्हणुन पुढे येते.

पिहु लिफ्टच्या दिशेने चाललीच होती..तर मागुन विराटने तिला पकडुन मिठीत घेतलं तशी पिहु गोंधळून बघु लागली....

अहोss किती दचकले मी ती चिडुनच आठ्या पाडत बोलली...

दचकायला काय,झालं...तो तिला दोन्ही हातांवर उचलुन घेत लॉनच्या साईडला जातो.

अहो...तुम्ही कुठे घेऊन चालला आणि कोणी तरी बघेल सोडा खाली...ती चिडतच इकडेतिकडे घाबरतच बोलु लागली..

तो हसतच तिला खाली सोडतो...

पिहु बाजुला सरकत इकडे का आलोत आपण..ती बारीक डोळे करतच विचारते...त्याच्या स्माईल वरुन तिला कळलं होते..विराट च्या डोक्यात काही तरी शिजत असणारच...

विराट हसतच तिच्या जवळ एक एक पाऊल टाकत येतो...पिहु एक एक पाऊल मागे जात..अ...हो ती पळण्याचा प्रयत्न करते...तो पटकन तिचा रस्ता आडवतो..त्याची नजर फक्त तिच्यावरच रोखली होती...तिला त्याच्या नजरेला नजर द्यायला ही जड झाले होते...इकडे तिकडे बघत बोलते..

अ..हो जाऊ द्या..कोणी बघितलं तर ...ती क्युटसा फेस करतच बोलते.

अहं...कोणीही येणार नाहीये इ‌थे...तो गालात हसत समोरचा चेअरव‌रचा बाऊल उचलतो.

पिहु डोळे ताट करतच त्या बाऊल एकदा तर विराटला एकदा बघते...

अहो,किती लावलं अधीच...आणि परत...ती हळदीचा बाऊल बघनुच वैतागत बोलली...

विराट हळद हातात घेत...मी फक्त हाताला आणि चेहरयावर लावलं...अजून लावायच मला तो तिच्या उघड्या पोटावर नजर टाकत बोलतो...तशी पिहु दचकत साडी ओढत लाजुन ‌खाली बघते...

पिहु हळुच मान वर करते तर समोर विराट नसतो ती इकडे तिकडे बघत असते.तिच्या पोटाला गार हाताचा स्पर्श लागताच ती शहरुन जाते..पिहुने पटकन त्याच्या हात धरला.मागे,वळुन डोळ्यानेच त्याला नाही म्हणु लागली.

त्याने तिला स्वतःकडे वळवले...तिने अलगद डोळे झाकून त्याच्या हात सोडला... विराटने हळदीचा हात तिच्या गळ्यावरुन अलगद फिरवला...त्याच्या स्पर्श हा मोरपिस फिरवल्यासारखा वाटत होता..
तिच अंंग अंग मोहरुन गेेले होते...त्याने तिला मिठीत घेतले..पिहु पण त्याला बिलगली...त्याने मागे अंग सोडुन देत दोघे पुल मध्ये पडले तशी पिहु भानावर येत त्याला घाबरुन अजून घट्ट बिलगली.

विराट जोरात हसत तिला नीट उभ करतो..

ती अजुन घट्ट पकडुन उभी होती..

पिहू, हाईट कमी आहे,उभी आहेस तु...तो तिला घाबरलेले बघुन तिच्या डोक्यावरुन हात फिरवत शांत करतो.पिहु पण उभी राहिल्याने तोंडावरच पाणी पुसत इकडेतिकडे बघते...ती बाजुला होत..अहो ‌काय हे..अस अचानक किती घाबरले...ती रागानेच चिडुन बोलत बाजुला होते...तिची साडी अडकल्याने ती परत पाण्यात पडते...विराट पटकन तिला नीट पकडत जवळ घेतो.अरे सॉरी...सॉरी..बस का...तो एक हात कानाला लावत हसत बोलतो.

पिहु चेहरा फिरवते...मला सोडा आता जाऊ द्या ...दरवेळसच आहे तूमच कोणी बघितलं काय म्हणतील ह्याचा विचार पण करत नाही...

तो तिला सोडतो...

ती परत त्याच्या दंडाला पकडते..मुद्दाम करता ना..मला चालता येत नाही आणि तुम्ही ....

तो चिडुनच तिला जवळ ओढतो..एवढ का चिडतेस...त्याच्या राग बघुन पिहु दचकलीच.

विराट लगेच स्वतःला आवर घालतो.तो तिला उचलून पुलाच्या काठावर बसवतो.जा चेंज कर तो शांत होत तिच्या चेहरयावरुन हात फिरवतो...तिच्या चिडचीडीने त्याच्या सगळा मुड स्पाॅईल झाला होता..

पिहुला ही कळालं तो चिडला आहे..पिहु त्याच्या गळ्यात हात गुंफवुन कपाळाला कपाळ टेकवते...जा पिहु... तो आवाज चढवतच हात काढत लांब होत पाठ फिरवुन पाण्यातच हात मारत उभा राहतो...

पिहु हळुच पाण्यात उतरत त्याला मागुन मिठी मारत त्याच्या पाठीवर ओठ टेकवते...

पिहु,कोणीतरी बघेल‌.आणि ह्या़‌ुढे तुझी ऑपयमेंट घेऊन प्रेम करत जाईल.. जा आता तो चिडुन तिचा हात काढतो...

ती परत बिलगते ..अहह..बघु देत.किती राग आहे... ..ती त्याला हळुच गुदगुल्या करत हसत होती...

पिहु स्टॉप...तो तिचा हात काढतच बोलत होता..

अहं...पहिले इकडे बघा...मगच..ती अजुन गु‌दुगदल्या करत हसते.त्याने तिचा हात ओढत पुढे घेत मागुन केस पुढे घेत मानेवर ओठ टेकवले..पोटावरची पकड घट्ट झाली..पिहु ही त्याच्या स्पर्शात विरघळु लागली....त्याने तिला स्वतःकडे वळवुन तिच्या डोळ्यात आरपार बघत रागानेच तिच्या ओठांवर ओठ ठेवले.ही शांत त्याला साथ देत होती...त्याचे हात तिच्या उघड्या पाठीवर फिरत होते.कितीतरी क्षणांनी त्याने तिला मिठीत‌ घेत पाठीवरुन हात फिरवत तिचा पदर पाठीवर ओढला..पिहु त्याच्या छातीवर डोक घेऊन जोरात श्वास घेत होती..

झाला का,राग शांत पिहु श्वास घेतच बोलते..

तो तिचा चेहरा वर करत कपाळावर अलगद ओठ ठेकवतो...

आच्छी‌sssपिहु शिंकते...

ओहह शीट,
(खुप वेळ पाण्यात असल्याने पिहु पुर्ण गार पडली होती विराट दचकुन तिला बाहेर आणतो..)पिहु च्या शिंका चालुच असतात..ती साडी ‌चा पदर नीट गुंडाळुन घेते..विराट तिला रुममध्ये आणतो..पिहु पहिले चेंज...

हो क..रते...तुम्ही जावा..ती थरथरतच बोलु लागते..

आ‌य‌ अम नॉट गोइंग ऐन्हीवेअर जस्ट चेंज इट राईट नाऊ...,तो तिला ओरडूनच बोलतो..ती ही चेहरा बारीक करत आत जाते...तो बाहेरुन ओरडुन बोलत होता... दरवेळेसच आहे तुझ..हे येईल‌‌‌ते येेई इकडे जा तिकडे जा..पिहु बाहेर येते...आणि त्याच्या समोर उभी राहत त्याच्या डोळ्यात बघत टॉवेलने त्याच डोक पुसयाला जाते...तो हात झटकत शांत होतो...

पिहु बारीक चेहरा करत टॉवेल शी चाळा करत त्याच्याकडे बघते..
तो चेंज करायला जातो....पिहु नाराज होऊन बाहेर गॅलेरीत जाऊन थांबते...विराट चेंज करुन तिच्या समोर येऊन तिचा हातात टॉवेल देतो...हह.तो गालात हसत डोक खाली घेतो..पिहुपण खुश होत डोक पुसते...आता बोलायच नाही का,ती काहीच बोलत नाहीये म्ह़णून तो तिच्याकडे नजर टाकत बोलतो...

पिहु हसते...अ..हो बोलायच आहे पण तूम्ही बोलायला लागला तर सगळ विसरुन जाते...नॉनस्टॉप ओरडायच चालु असते..मग काय बोलु...त्यापेक्षा शांत राहीलेले बेटर ऑप्शन आहे...

विराट गालात हसत तिच्या चेहरयावरुन कपाळाला कपाळ टेकवतो...खुप बोलतो ना,मी ती त्याच्याकडे नजर वळवत गाल फुगवुनच मानेनेच हो बोलते.

राग येतो माझा..तो लाडातच बोलतो..

हो खुप...खुप...

मग माझ्यासारखा राग काढायचा ना,तो खट्याळ हसत तिला बोलतो.

काही काय तुमच... ती लाजुन दुसरीकडे चेहरा फिरवते... विराट हसत तिला मिठीत घेतो.

डोर नॉक होते.त्याने तिच्या साठी सुप मागवले...

हे धर पी बर वाटेल ..आलोच मी मोबाईल घेऊन.

हम्म...पिहु सुप पिते तेव्हा कुठे तिच्या अंगातली थंडी कमी झाली होती.

रेवती पिहुला फोन करते...

हा मम्मी...

जेवण करायला आली नाही..ये लवकर

हा..येते पिहु फोन ठेवते.

विराट रुममध्ये येतो...कुठे चालली...

खाली ....चला,

तो मॉमला फोन करतो मॉम मी आणि पिहु रुममध्येच डीनर करणार आहोत..

पिहु एकटकच त्याला बघत राहते...

काही बोलायच तो भुवया ताणुनच बोलतो..

पिहु मानेनेच नाही म्हणते...

विराट हसत तिचे गाल ओढतो...गुड‌ ...मला वाटलं अजुन आरग्युमेंट करायची ..अहो...खाली चला ना,कोण काय ..लाबलाब ..विराट पिहुचे केस कोरडे आहेत का बघत बोलतो...

.मी ड्राय केले...ती लटक्या रागातच बोलते..

ह..हो चेक करत होतो तो केस विसकटून हसत बोलतो.दार नॉक झाल्याने विराट दार उघडतो...

वेटर जेवण टेबलावर लावुन निघुन जातो .जेवण कर आणि झोप लवकर.. उद्या आपल्या लाईफचा सर्वात मोठा दिवस आहे फ्रेश दिसायला हवीस..पिहू हसुन त्याच्या जवळ येऊन बसते.दोघेही गप्पा मारत जेवण करतात.विराट ला त्याच्या मित्रांचा फोन येत होता..

पिहु तु झोप आता मी चाललो तो मोबाईल मध्ये मेसेज करतच बोलु
लागला.सगळे फ्रेंड्स वाट बघत आहे.

पिहु त्याच्या मिठीत शिरते...विराट गालात हसत तिला घट्ट मिठी करतो... हह काय विचार आहे का,तो हळूच त्याचे ओठ तिच्या कानाजवळ घेत बोलतो...

पिहु लाजुन चेहरा त्याच्या कुशीत लपवते.

ओन्लि टु डेज नंतर आपलीच रात्र आहे तो हुळच तिच्या कानाला ओठ घासत बोलला तशी शहारुन घट्ट बिलगली.

सोडायच नसेल तर मी आणि तु...तो बोलतच होता कि पिहुने पटकन मिठी सोडवली आणि बाजुला झाली..

❤❤❤❤❤❤❤लग्नसोहळा❤❤❤❤❤❤❤

रेड कलरची नववारी,गोल्डनकलरची काठेवर प्युअर जरी वर्क साडीला बारीक जरीचे बुटे,पुर्ण जरी वर्क केलेला बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज ...ग्रीन कलरचा शेला,..केसांची हेअरस्टाईल करुन अंबाडा घातला होता..त्याला गोलं गजरे लावले होते.
चंद्रकोर टीकली,हातात हिरवा चुडा त्यात गेरु फिंनीशींगच्या मिनाव‌र्क केलेले तीन सेटचे कंगन,गळ्यात भरीव चोकर त्याच्या वर राणीहार, डाळींबी स्टोन असलेली मोतीची नथ ,कानात झुमके त्याला मण्यांचे वेल लावुन कानामागून केसांत हुक अडकवले होते.कमेरला मेखला , तिला सुट होईल तसा मेकअप....नाजुक मण्याचे मुंडावळ्या ...पिहु मिरर मध्ये बघुन लाजुन हसते...पिहुच लक्ष टेबलावरच्या मंगळसुत्राकडे जाते...ती हातात घेत घालु लागते...
पिहु आज नको घालु मेघा तिच्या हातातुन घेतच असते का पिहु मुठ‌ घट्ट करते...ताई नको..हे लग्न एक सगळ्यांचा आंनद म्हणुन करतोय...पण माझ्यासाठी हेच मंगळसुत्र अनमोल आहे...रेवती रुममध्ये येतात.
मेघा दे तिला, घाल पिहु ...रेवती गालात हसत. बोलतात. लग्नसोहळा आंनदासाठी करतोय... पण लग्नाचा तोच मुहर्त तोच दिवस दोघांसाठी खरा आहे...तेव्हाच त्यांच्या सात जन्माची गाठ बांधली गेली ..मेघा हसून हात काढते...पिहु खुश होत परत तिच मंगळसूत्र घालुन चोकरच्या खाली लपवते.

विराटने क्रिम कलरचा पेशवाई कुर्ता रेड कलरची धोती त्यावर सोनेरी काठ ,रेड कलरचा दुप्पटा डोक्यावर रेड कलरची पेशवाई पगडी, कपाळला नाजुक मोत्यांची मुंडावळ्या ,गळ्यात एकासाईडने ब्रोच त्याला तीन लेअर असलेला मोत्यांचा हार पायात मोजडी...आधीच तो राजबिंडा सारखा दिसत होता आणि आज तर पेशवाई लुक,मध्ये राजकुमार दिसत होता....सुमन त्याला डोळे भरुन,बघत होती..त्याच्या कानामागे तीट लावते...विराट सुमनच्या डोळ्याच्या कडा हलकेच पुसतो..मॉम सारख रडायचच असते का,

त्याला ही सुमनच्या डोळ्यातले पाणी बघुन जाणवुन आले ...मॉम डॅडाल मिस करते ना,तो सुमनचा चेहरा ओंजळीत घेत विचारतो.

किती स्वप्न बघितली तुझ्या लग्नाची आणि तेच नाही तुला इतक,खुश बघुन किती नाचले असते लग्नात सुमन रडतच हसून बोलते...

विराट सुमनला मिठीत घेत डोळ्यातलं पाणी लपवत मोठा श्वास घेतो..शेवटी त्याला त्याच दुख दाखवता येतच नाही...मॉम छान दिसतेस अशी रडली की डॅडला आवडणार आहे का....

सूमन डोळे पुसते आणि हसते...बस का..तु खुश आहेस हे म्हत्वाच आहे...

रोहिणी आत येते....विराट झालं का..चल. रोहिणी विराट चा हात धरते .....

दोघेही वेगवेगळी गणपती पूजा करतात त्यांच्या कुल देवतंची पूजा करतात...

ढोल ताशे नगाडे वाजतच होते...

हॉलच्या मध्यभागी चार पिलरला लाल गुलाबाच्या फुलांनी - पाकळ्यांनी सजवुन चारही बाजुनी नेटचे गोल्डन परदे सोडले होते...त्यावर गॅप गॅपने लाईट्स होती... मेण डोरला बाजुने आर्टीफिशयल मोर ठेवले होते...ते खूपच आकर्षक दिसत होते...एका साईडला वरमाला साठी स्टेज होता.मंडप सजवलेला होता...
गेस्टसाठी बसायाला सोफे होते...तर मागे चेअर्स होते...मेण डोर पासुन ते स्टेजपर्यंतचा रस्ता पूर्ण रेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता..
सगळीकडे रोशानाई गजबजून गेले होते...राजेशाही पध्दतीने सगळा हॉल सजवला होता.


विराटची वरात काढतात ..सगळे नाचत येत होते...मेण डोरला
रेवतीने त्याच औक्षण केले....

दोघांसमोर अंतरपाठ धरतात.दोघांनाच्या मनात बघायची अनामिक हुरहुर लागली होती....मगंलअष्टके चालु होतात. तांदूळ -फुलांच्या रुपाने सगळे आशिर्वाद देतात.... अंतरपाठ काढतात..दोघांची नजरानजर होती.विराट तिच रुप बघुन भान हरपुच बघत राहतो..तिच रुप डोळ्यात साठवुन घेत होता...नवरीच्या रूपात खुपच सुंदर दिसत होती....विराट ची नजर हटता हटत नव्हती..
पिहुने एक नजर त्याच्यावर टाकुन लाजुन पटकन खाली घेतली.

दोघांच्या हातात हार देतात...पहिले पिहु घालणा‌र होती....पिहुने घालण्यासाठी हात वर केला तर पटकन त्याच्या मित्रांनी त्याला उचलेले...सगळे जोरातच हसु लागले...
भाभी अस सहजच थोडी विराटला हाती लागुन देणार आहे...

मानव पिहुच्या शेजारी येऊन थांबतो...रितेश मी आहे पिहुच्या टीममध्ये....

सगळे शॉक होतच बघतात..पिहु मानव कडे नजर वळवुन गालात हसते....

हे...हे..कधी पासुन झाले..तु तर...

हो..हो मी आधी वहिनी बोलत होतो...पण आता तिच्या आईवडीलांना मी माझे आईवडील मानतो...मग पिहु माझी बहिण झाली...आणि मी मोठा आहे तर ती माझी छोटी बहीण झाली ना...ह..हो विराट कान पिळणी,पण मीच करणार आहे मानव रुबाबदारपणे म्हणतो...

विराट तर चकित होतच बघतो....त्याला ही आत्ताच कळालं होते..तशी त्याच्या चेहरयावर स्माईल येते.

मानव पिहुला उचलुन घेतो...तसे मित्र अजुन त्याला वर धरतात.नंतर विराटच खाली उतरत पिहुच्या शेजारी येऊन थांबतो..

मानव पिहुला खाली सोडतो..दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतात..विराट तिच्यासमोर झुकतो..तशी ती गालात हसून वरमाला घालते....
सगळे एकसाथ कल्ला करतात..विराट ही तिच्या गळ्यात वरमाला घालत असताना त्याच लक्ष मंगळसूत्राकडे गेलं...त्याने हळुच ‌ ते वर घेतलं.दोघेही एकमेंकडे बघत स्मितहस्य करतात..

साज सोन्याचा, हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
बंध न्यारा हा कळेना तुजला
उभी बाजूला मी सावरून स्वप्ने सारी
होऊ दे जीव जरा कावरा बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा
साज सोन्याचा, हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई
जोडला कुणी दुवा रेशमी धागा नवा
हा जीवनाचा हात हाती बिलगला
वाट हि वेगळी देउनी जाते मनाला
छंद वेडा ना तुला कळला
होऊ दे जीव जरा कावरा बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा
साज सोन्याचा, हार मोत्यांचा
गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई...

सप्तपदी साठी दोघ मंडपात येतात... पवित्र अग्नी समोर दोघेही बसतात...रेवती भिमराव कन्यादान करुन विराट च्या़ हातात पिहुचा हात देतात....दोघांचे ही मन भरुन आले होते. दोघेही एकमेकांनाचा हात धरून सप्तपदी चालतात....
विराट समोरच मंगळसुत्र हातात घेतो.ब्राम्हाणाने त्याला उलट दिलं होते...विराट ते सरळ करतच होता..कि सुमन ने थांबवलं विराट असच घालतात..

मॉम उलट तो वाट्यांकडे बघत ब्लँक होत विचारतो..तिथे असणारे सगळे हसू लागले...

तु घाल किती प्रश्न असतात...पिहू स्वतःच हसू लपवत खाली बघते..

तो सुमनकडे आट्या पाडतच बघतो..सुमन डोळ्यानेच दाटवत घाल म्हणते.

त्याने पिहुच्या डोळ्यात बघत मंगळसुत्र घातले.पिहु डोळे भरुन विराट कडे बघते मागच्या वेळेस त्याने तिच्याकडे न बघताच मंगळसूत्र घातलेले आणि आज त्याच डोळ्यात आयूष्यभराची साथ दिसत होती..विराटने थोडस बोटांमध्ये कुंकु घेऊन भांगेत भरले...
टाळ्यांच्या कडकडाट होतो .पिहु विराट भारावुन एकमेंकानाकडे बघत होते....जोरजोरात ढोल ताशे नगाडे वाजु लागले.

(सगळ्यांच्या प्रथा वेगळ्या असतात.)

मानव विराट चा कान पिळुन रसम पुर्ण करतो.

दोघांसमोर एक ताट वाढतात...दोघेही एकमेंकाना एक एक घास भरवतात...

पाठवणीची वेळ झाली होती....

पिहु तिच्या आईवडींलाच्या गळ्यात पडुन रडू लागली...
पिहु नवीन आयुष्याच्या वाटेवर विराट सारख जोडीदार असला ना,आईवडीलांची कमी भरुन येते....भिमराव तिला समजावुन सांगत होते.प्रांजलपिहुच्या गळ्यात पडुन रडू लागली..दी आय मिस यु...काळजी घे...पिहुला तर बोलता सुध्दा येत नव्हते..वीरा विराटच्या हाताला विळखा घालते...तो ही तिला जवळ घेतो..कधी ना कधी त्याच्यासाठी ही तो दिवस येणार होता...

पिहु निघायच सुमन तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलतात..

भिमराव विराटच्या हातात हात देतात विराट काळजी घे ..सुमन ताई काही चूकलं तर माफ करा...

विराट पिहुच्या आईवडीलांच्या पाया पडतो...आणि डोळ्यांनचे दिलासा देतो...दोघेही गाडीत बसतात...

नमन प्रांजल जवळ येतो..ह्या दिवसात दोघांची छान फ्रेंडशीप झाली होती....

बाय प्रांजल...टेक केयर आता परत कधी भेट होईल माहीत नाही पण हे टेन डेज मस्त एन्जाॅय केले ...‌आपली फ्रेंडशीप अशीच राहू देत..नमन हसून बोलतो..

प्रांजल हसत त्याच्या समोर हात धरते..तो ही हसत शेक हॅड करतो...

मानव पिहुच्या आईवडीलाच्या पाया पडतो...आईबाबा,खूप छान वाटले तूमच्या सोबत राहुन खरच आईवडीलांची कमी पुर्ण झाली....रेवती मायेने हात फिरवते...

काळजी घे कधी पुण्याला आला तर भेटायाला ये..भिमराव अलिगंन देत बोलतात..

हो नक्की ते काय सांगायची गरज नाही हक्काच घर आहे आता माझ मानव हसत बोलतो.
.
.

.
गाडीत पिहु अजुन मुसमुस करत रडत होती...
तो पिहुला पाणी पाजवतो....विराट तिला कुशीत घेऊन केसांव‌रुन हात फिरवत तिला शांत करतो..पिहु आता शांत हो बर....घर लांब नाहीये...कधीही भेटायाला येऊ शकतेस...तो तिचा चेहरा वर करत समजावत होता...पिहु पण डोळ्यानेच हो म्हणत परत त्याला बिलगते...घरी यायला मध्यरात्र झाली होती....पूण्याच्या घरीच तिच गृहप्रेवश होणार होते.

दोघेही दरात थांबतात. रोहिणी दोघांच औक्षण करते...पिहुला तिचा आधीचा दिवस आठवतो...

सुधा तिला भानावर आणत..पिहु नाव घेऊन माप ओलांड ...तसे सगळेच नाव घे म्हणून मागे लागतात..

मोगरयाचा सुगंध ,पावसाळ्यातील मृदुगंध
विराटरावांशी जुळले , रेशमी नाते.....

पिहु लाजून खाली बघते...विराट गालात हसत तिच्याकडेच बघत असतो..

विराट आता तु सुधा हसत बोलते...

मी,ssमला येत नाही अस काही ...काय ते उखाणे एवढ गोल फिरुन बोलण्यापेक्षा सरळ बोलायच....तो रुबाबतच बोलतो...

घे तुला कस घ्यायच. सुधा वैतागतच बोलते...

पिहु..तो तिला बघत हसत म्हणतो..सगळे हसू लागतात..
इतक नाव घ्यायला पण गोल‌गोल बोलायच...
सुधा तु त्त्राच्या नादी लागु नकोस तो आपल्यालाच वेड्यात काढतो..सुमन वैतागतच बोलते.

पिहु हसत माप ओंलडते..विराट तिचा हात धरतो....कुंकुवाच्या पावलांनी पिहु आत येते...दोघेजण देवघरात जाऊन नमस्कार करतात..

सुमन पिहुला रुममध्ये घेऊन येतात..पिहु इकडे तिकडे नजर फिरवत बघते...पिहु माहीत आहे तु काय विचार करतेस...काळजी करु नकोस...आता लग्न झालं कोणीही काही ही विचार करणार नाही...गेस्ट सगळे हॉटेलमध्ये आहेत..फ्रेश हो...उद्या सकाळीच निघायचे आहे मूंबईला....सुमन बोलुन बाहेर येते...

विराट ही आला...सुमन गालात हसत विराट जवळ येते...फ्रेश होऊन झोप..‌पिहु तुझ्याच रुममध्ये आहे.

विराट चमकुन बघतो..

काळजी घे...

विराट खुश होतच रुममध्ये येतो.पिहु फ्रेश होऊन‌ बाहेर ‌येते..विराट दार लावुन घेत हात पसरुन तिला ये म्हणतो...पिहु गालात हसत पळतच त्याच्या मिठीत शिरते..तो ही खुश होत मिठी घट्ट करतो....आजपासुन कुठलीही बंधने नाही दोघांच्या प्रेमाला ...विराट तिचा चेहरा ओंजळीत धरत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो...

दोघेही किती तरी क्षण मिठीत होते.,अहो मी इथेच आहे...फ्रेश व्हा पिहु हसत बोलते.

विराट हसत तिला सोडुन फ्रेश होऊन येतो...पिहु गॅलेरीत थांबुन गुणगुणत होती...विराट फ्रेश होऊन तिला मागुन मिठीत घेतो...पिहु गुणगुण्याच थांबते..आणि त्याच्या केसांमधुन हात फिरवते....

झोप आली नाही का ..

आलीये खुप पण तुझ्या मांडीवर झोपायच आहे.आज शांत झोपायच मला विराट डोळे झा्कुनच बोलतो..
पिहु हसुन त्याच्या हात पकडत बेडवर बसवते..ती ही बसते विराट त्याच डोक तिच्या मांडीवर ठेवतो..तिच्याकडे एकटक बघत असतो..

पिहु डोळ्यानेच काय विचारते...

विराट मोबाईल वर गाण,लावतो..आज न बोलुन सुध्दा दोघांचे डोळे खुप काही बोलत होते...दोघांना फक्त एकमेकांचा सहवास हवा होता....पिहु त्याच्या केसांमध्ये हात फिरवत होतु‌ी‌‌‌‌‌‌‌‌.

देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ आप में बात ऐसी है

लेकर इजाज़त अब आप से
सांसें ये आती जाती है
ढूंढें से मिलते नहीं हैं हम
बस आप ही आप बाकी हैं

पल भर ना दूरी सहें आप से
बेताबियां ये कुछ और हैं
हम दूर होक भी पास हैं
नजदीकियां ये कुछ और हैं

देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ आप में बात ऐसी है

आगोश में है जो आपकी
ऐसा सुकून और पायें कहाँ
आँखें हमें ये रास आ गयी
अब हम यहाँ से जायें कहाँ

देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है

संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ प्यार में बात ऐसी है
हम्म..

फिर बेक़रारी कैसी है हम्म..
कुछ प्यार में बात ऐसी है.
..
विराटला कधी झोप लागली कळलंच नाही...आज कितीतरी व‌र्षाने तो सगळ टेंशन काम जबाबदारया सगळ विसरुन पिहूच्या मांडीवर रीलॅक्स होत शांत झोपला होता...जगण्याला आता नवी दिशा मिळाली होती....पिहु त्याच्या चेहरा निहळात गालात हसते.ती अलगद त्याच डोक उशीवर ठेवते..ती मोबाईल बंद करते..विराट झोपेतच तिला एका हाताने खाली सरकवत कुशीत घेतो..पिहुला त्याच हसुच येत होते..
मी कुठेही जाणार नाहीये ..ती मनातच बोलत त्याच्या ओठावर हलके ओठ ठेवते...ती अलगद डोळे झाकते

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्टोरी आवडतअसेल तर पुढे कंटिन्यू करते कमेंट द्वारे कळवाा😊.