ATRANGIRE EK PREM KATHA - 15 books and stories free download online pdf in Marathi

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 15

रोहन : "आपण आपला प्लॅन चेंज केला तर चालेल का?? आज भूकंच नाही आहे ग."

(रोहन आणि मनवी हॉटेलमध्ये लंचसाठी जाऊयात की नको ह्यावर डिस्कस करत कॉलेज जवळील गार्डन मध्ये बोलत बसले होते)

मनवी : "ठिक आहे मग आपण कुठे तरी फिरायला तरी जाऊयात. "

रोहन : "आज?? आय मिन आत्ता..?"

मनवी : "होss आत्ताच.. का काय झालं??"

रोहन : "नाही काही नाही.."

मनवी : "सांग तर.."

रोहन : "एक्सामच टाईम टेबल बघुन मुड नाही ग..एक काम करूयात ना..एक्साम होई पर्यंत थोडं फिरायचं वैगेरे नकोच.. तुला काय वाटत??"

मनवी : "आता तु ठरवलंच आहेस तर हो बोलावच लागेल ना.. पण ते सगळं जाऊ दे आज मी खुप खुश आहे."

रोहन : "का?? एक्सामचे पेपर वैगेरे भेटले का काय तुला??"

मनवी : "वेरी फनी...! तस काही नाही.. खुप दिवसांनी फुटबॉलच्या त्या ग्राउंडवर तुझं नाव ऐकायला मिळालं. नाही तर नेहमी बॉर व्हायला व्हायचरे. नुसतं शौर्य शौर्य काय??."

रोहन : "पण शौर्य खरच छान खेळतो ग. बिचारा किती रडत होता. नशीब त्याची मम्मा आली. कसली भारी आहे ग त्याची मॉम आणि तुला माहिती तो बोलत होता की स्टेरकेजवर कोणी तरी तेल सांडलं त्यामुळे त्यावर पाय घसरून तो पडला.. "

मनवी : "काहीही काय.. तेल वैगेरे नाही ते सिरम होत.. केसांना लावायचं.."

रोहन : "काय?? तुला कस माहिती..??"

(ओहह शट... मनवी मनातल्या मनात बोलु लागली)

"मनु मी काय विचारतोय??"

मनवी : "चल आपण निघुयात मला उशीर होईल.."

रोहन : "माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मग जाऊयात.."

मनवी : "प्लिज तु गैरसमज नको करून घेऊस. त्या दिवशी तो आला ना तेव्हा मी स्टेरकेजजवळ उभी होती तुम्ही बोलेपर्यंत मी केसांना लावायसाठी ती बाटली काढली. बट चुकून ती बाटली माझ्या हाताने उलटी झाली आणि सगळ सिरम खाली पडल."

रोहन : "अग मग तो उतरत होता तेव्हा त्याला अडवायच ना. तो उतरत असताना तु का नाही त्याला अडवलस??"

मनवी : "तो कधी तिथुन उतरून गेला मला कळलंच नाही. तो जेव्हा एकदम खाली गेला आय मिन पडलाना तेव्हा मी भानावर आली."

रोहन : "अस कस तुझ्या पुढ्यातूनच तो उतरला ना??"

"ते.. मी.. अ.. " (मनवीला काय बोलावे सुचतच नव्हतं) बेगेत टिस्यु शोधत होती ते सिरम पुसायला. तुला माहिती किती महाग होत ते. इट्स नोट इंडियन ब्रँड. UK वरून मागवलेलं ते मी. सगळं वेस्ट झालं ते..",मनवी चेहरा पाडतच बोलली

रोहन : "what!! तु बरी आहेस ना???"

मनवी : "मला काय झालं??"

रोहन : "शौर्यला लागलं त्याच तुला काहीच नाही का? एवढं करून तु एक सॉरी पण नाही बोललीस त्याला आणि एक मिनीट आम्ही लोक सुद्धा त्याच जिन्याने उतरलो मग आम्ही कसे नाही पडलो??"

मनवी : "अस काय करतोस मी मध्ये उभीच राहिली नाही का मग तुम्ही कोणीही तिथुन जाऊ नये म्हणून. "

रोहन : "म्हणजे शौर्य काल बोलत होता ते खर होत. आम्ही दोघेही त्याला वेड्यात काढत होतो. "

मनवी : "सॉरी ना.."

रोहन : "सॉरी मला नाही शौर्यला बोल. तुझ्यामुळे तो फुटबॉल मॅच खेळु शकणार नाही.."

मनवी : "मी कुणाला सॉरी वैगेरे बोलणार नाही.. मी थोडी ना मुद्दामुन केलंय आणि आता झालं ना सगळं ठिक.. मग नको ना हे सगळ. मी तुला ना काही सांगायलाच नको होतं..आणि तो फुटबॉल मॅच नाही खेळत ते बरच आहे.."

रोहन : "मनवी तु जर माझ्यावर प्रेम करत असशील तर तु आता माझ्याबरोबर कॉलेजमध्ये येशील आणि शौर्यला सॉरी बोलशील.."

रोहन मनवीची समजूत काढत तिला कॉलेजमध्ये घेऊन जातो.

वृषभ ने सगळ्यांना मेसेज करून प्ले हाऊसमध्ये बोलवुन घेतल असत..

टॉनी : "काय झालं?? असं घाईत का बोलवलस"

राज : "अभ्यास झालाय वाटत दोघांचा?? "

शौर्य : "वृषभ आत्ता तरी सांग काय झालं ते??"

वृषभ : "थांब जरा.. सीमा आणि समीराला येऊ दे.."

राज : "हा मोठा होऊन स्वतःचा मुव्ही नक्की काढेल. किती ते सस्पेन्स. प्रत्येक गोष्टीत सस्पेन्स असतो ह्याच्या.."

समीरा आणि सीमा देखील येतात..

सीमा : "एवढं घाई घाईत बोलवायला झालं तरी काय??"

"हा बघा शौर्चा शुज.. त्यादिवशी हा पडला ना तेव्हा त्याने हाच शुज घातलेला.",वृषभ आता वेळ वाया न घालवता बोलत होता.

समीरा : "हां मग??"

वृषभ : "काल तो आम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगत होता की त्याच्या पायाखाली unctuous अस काही तरी होत ज्याच्यावर पाय पडताच त्याचा पाय स्लिप झाला आणि तो घसरून पडला. मला आणि रोहनला खर तर काल पटलच नाही पण आम्ही आता दोघ त्याच सामान लावत होतो तेव्हा त्याचा हा शुज जो त्याने काल पडल्यापासून घातलाच नाही तो आम्ही बघितलं आणि खरच त्याला तो बोलत असल्याप्रमाणे unctuous अस लागलंय. तुम्ही पण बघा आणि त्याचा सुगंध ही ओळखीचा आहे. मला माहिती कोणाचा आहे पण तुम्हा सगळ्यांना पण ओळखीचा वाटतो का बघा आणि त्याच व्यक्तीचा आहे का ते ही बघा जी व्यक्ती मला वाटते.."

समीरा आपली दोन बोट लावत अंगठ्यानेच आपल्या बोटांवर हलकेच अस घासते. नाकाला लावंतच त्याच वास घेते.

समीरा : "हे हेअर सिरम आहे. आय थिंक मनवीच हे वापरते."

"हो.. हे तीच सारख सारख केसांना लावत बसते ना..",सीमा ही वास घेत म्हणाली.

राज : "अरे पण ते केसांना लावायचं असत तु बुटाला का लावलस?? नको ते प्रयोग करत बसतोस.. मग पडणारच ना.."
राज हसतच टॉनी ला टाळी देण्याच्या उद्देशाने बोलला पण टॉनी ने टाळी न देता गंभीर चेहरा करून दाखवला यावरून राजला कळलं की तो चुकीच काही तरी बोलला..

समीरा : "आपल्याला मनवीला विचारावं लागेल की हे शौर्यच्या बुटाला कस लागलं ते.."

शौर्य : "मला पाडुन तिला काय मिळेल..??"

वृषभ : "हेच आपण तिला विचारू.. पण आता ती गेली असेल.. उद्या बघु."

तोच रोहन आणि मनवी कॉलेजच्या गेटजवळ पोहचतात. रोहन शौर्यला फोन लावायला मोबाईल हातात घेणार तोच त्याच लक्ष प्ले हाऊसजवळ जात. सगळे मित्र मंडळी घोळका करून काही तरी डिस्कस करताना त्यांना दिसतात..

मनवी : "काय झालं?? फोन उचलत नाही का तो.. नाही उचलत मग चल जाऊयात घरी आधीच उशीर झालाय.."

रोहन : "अग ते बघ सगळे तिथे दिसतायत.."

मनवी तिथे बघते तर सगळेच तिथे असतात..

मनवी : "रोहन मी सगळ्यांसमोर नाही हा सॉरी बोलणार प्लिज.."

रोहन : "सगळ्यांसमोर बोलणं आणि एकट बोलणं ह्यात काय फरक आहे. उलट तुझ्या हातुन हे नकळत झालय तरी तु सॉरी बोलतेयस हेच खूप मोठं आहे अग."

मनवीला सुद्धा रोहनच म्हणणं पटत..

दोघेही सोबत प्ले हाऊसजवळ जायला निघतात..

टॉनी : "रोहन आणि मनवी.. अजून गेले नाहीत ही दोघ.."

रोहन : "हाय गाईज.. "

राज : "तुम्ही अजुन गेलात नाही.."

रोहन : "जात होतो पण मनवीला तुम्हा सगळ्यांना काही तरी सांगायचं.."

"त्या आधी मला काही दाखवायचंय..", शौर्य हातातला शुज रोहनला दाखवतच बोलला..

"तुला बोललो होतो ना, कश्यावर तरी घसरूनच मी पडलो.. हे बघ हेअर सिरम.."

रोहन : "मनवी त्याबद्दल तुला सॉरी बोलायला आलीय.. ते चुकून तिच्या हातून पडलरे.."

शौर्य : "चुकून??"

रोहन मनवीने सांगितलेला सगळा प्रकार त्याला सांगितला.

मनवी : "शौर्य आय एम सॉरी.. तु जिने उतरत होतासना तेव्हा मी टिस्यु काढत होती बेगेतुन म्हणून तुला उतरताना थांबवु नाही शकले.. प्लिज माफ कर मला.."

शौर्यला आता काय बोलावं ते कळतच नव्हतं..

समीरा एका वेगळ्याच संशयी नजरेने मनवीकडे बघत होती.. पण ह्या प्रकरणात ती काही बोलु शकत नव्हती.

रोहन : "शौर्य.. माफ करना तिला.."

शौर्य : "God is watching if she has done by knowingly or unknowngly who am I to forgive her."

एवढं बोलत शौर्य वृषभचा आधार घेत उभा राहिला..

"भेटुयात मग आणि हो बेस्ट ऑफ लक फुटबॉल मॅचसाठी.." रोहनच्या खांद्यावर हात ठेवत शौर्य बोलला.. बाय गाईज बोलत एका पायाने तो लंगडतच जाऊ लागला..

"मी ही निघतो", अस बोलत राज शौर्यच्या मागे पळत गेला. शौर्यचा हात खांद्यावर घेत त्याला आधार देत त्याला हॉस्टेलमध्ये घेऊन जाऊ लागला.

दोन मिनिटं का होईना कोणालाच काय होतंय हे कळत नव्हतं..

शौर्य एवढी शांत रिएक्शन देईल अस कोणालाच वाटत नव्हतं.

"आम्हीही निघतो", अस बोलत सगळेच तिथुन निघाले.. रोहन सोडून सगळेच मनवीला ओळखत होते म्हणून कोणालाही ह्यात बोलणं योग्य वाटत नव्हतं.

सगळे तिथुन गेले हे बघताच मनवी रडायचं नाटक करते..

तरी मी तुला नाही म्हणुन बोलत होते.. आता बघितलंस सॉरी बोलुन सुद्धा तो कस बोलून गेला.. मनवी रडतच रोहनला बोलु लागली..

रोहन : "इट्स ओके मनु तु त्याला सॉरी बोललीस आणि माझं ऐकलस खरंच थेंक्स.. लव्य यु माय जान अस बोलत रोहन मनवीला घट्ट मिठी मारतो.."

"आपण कॉलेजमध्ये आहोत.. तुझ्या घरी नाही..", मनवी रोहनपासून स्वतःला सोडवतच बोलली..

"खरच..? मला तर माहीतच नव्हतं", रोहन मनवीची मस्ती करतच बोलतो..

"आत्ता काय प्लॅन आहे??", मनवी रोहनच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवतच त्याला बोलते..

"आत्ता तु विसरतेस का आपण माझ्या घरी नाही आहोत ते??", रोहन तिची गंमत करतच बोलतो..

"मग जाऊयात??", एक अश्लील इशारा करतच ती त्याला बोलते.

"मनु हे जरा जास्तच होतय.. तु बस बघु बाईकवर.. मी तुला घरी सोडतो आणि मग जातो घरी.. एक्झाम आहे अभ्यासाला लागलं पाहिजे", मनवीला थोडं लांब करतच तो बोलतो..

रोहनच्या बाईकवर त्याला अगदी घट्ट मिठी मारत बसते.. आणि दोघेही तिथुन निघाले..

शौर्य रूममध्ये मात्र शांत होता..

टॉनी : "तुम्हा लोकांना मनवी जे बोलली ते खरं वाटतय का??"

वृषभ : "ते खरं खोटं करून काही उपयोग होईल अस नाही वाटत मला. जर त्याने शौर्यचा पाय बरा होत असेल तर आपण त्यावर चर्चा करूयात otherwise Full स्टॉप.."

राज : "वृषभ माझ्या मित्रा.. कोणते संत तुमच्या अंगात संचारलेत म्हणावे?? एवढी मधुर अशी वाणी आपण कधी आणि कुठे शिकलात?? कुठे क्लासेस घेतलेलेत का??"

टॉनी राजला टाळी देतच हसु लागतो..

शौर्य : "वृषभ बरोबर बोलतोय गाईज. तो रोहन आत्ता कुठे सुधारलाय पुन्हा पहिला रोहन मला नाही बघायचं. मला ही माहिती मनवी खोट बोलतेय आणि ती खोट बोलतेय हे मी दोन मिनिटात सिद्ध करेल बट मला रोहनसोबतची मैत्री नाही तोडायची. कारण त्याच मनवीवर असणार प्रेम. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. उद्या जर मी रोहनला प्रूफ जरी करून दाखवल तर त्याला त्या क्षणाला पटेल सुद्धा पण मनवीने डोळ्यांना पाणी लावत सांगितलं ना की हे मी नाही केलं तर रोहनचा तिच्यावर सहज विश्वास बसेल. तो मला बोलेल की, शौर्य तु खोट बोलतोस अस नाही बोलणारे मी पण मनवी चुक आहे असंही नाही वाटत मला. रोहनला ना आपण सगळेच हवे आहोत. सो हा टॉपिक इथेच स्टॉप.."

वृषभ : "यु आर रिअली ग्रेट शौर्य.."

टॉनी : "खरच.."

शौर्य : "हा बट मी मनवीला माफ केलंय असा ह्याचा अर्थ होत नाही. "

राज : "मग तु करणार काय आहेस.."

शौर्य : "पहिला माझा पाय ठीक होऊ दे.. मग बघतच रहा.. tit for tat"

राज : "तेच मनात बोललो.. हा अतरंगीपणा करणार नाही असं होणारच नाही.."

(समीरा आणि सीमा ही सेम टॉपिकवर चर्चा करत होते..तोच सीमाला काही तरी आठवत..)

सीमा : "समीरा तु मला खर खर सांगशील.. आणि फ्रेंड मानत असशील तर सांग.."

समीरा : "काय झालं??"

सीमा : "तु टेबल टेनिस काय नाही खेळायचं बोलतेस.. आणि तु मला सांगणार आहेस.."

समीरा थोडं शांत झाली..

सीमा तिच्या बेडवर जाते..

सीमा : "कोणी त्रास देतंय का?? का पुन्हा तेच..??"

सीमा अस बोलताच समीरा तिच्याकडे बघु लागली..

सीमा : "तरी मला वाटलंच होत. "

समीरा : "प्लिज तु कुणालाही ह्या बद्दल सांगणार नाहीस. तस पण स्पोर्ट प्रॅक्टिस मुळे मला अभ्यासासाठी वेळ ही मिळत नाही. मी रनिंगमध्ये पार्टीसिपेंट करायचं ठरवलंय. "

सीमा : "नक्की..??"

समीरा : "हो नक्की.."

सीमा : "काय ग समीरा.. तु तर बोलत होती तो शौर्य पार्ट टाईम जॉब करतो. "

समीरा : "हा मग त्याच काय??"

सीमा : "अग त्याची आर्थिक परिस्थिती थोडी नीट नाही असं तूच बोललीस बरोबर..मग त्याची मॉम लगेच मुंबईवरून कशी काय इथे आली?? म्हणजे दिल्लीला यायला ट्रेनने तर दोन दिवस आरामात लागतात. विमानाने आली असेल तर त्यासाठी भरपुर पैसे लागले असतील.. आणि तु बघितलस केवढं खायचं सामान ती घेऊन आली. जवळपास पाच सहा हजार तर लागलेच असतील.. आणि शौर्य ज्या हॉस्पिटलमध्ये होता त्याच बिल देखील दहा हजारच्या वरच झालं असेल."

समीरा : "हा ग.. मी पण विचारच नाही केला ह्या गोष्टीचा. पण मला अस वाटत ना की ते हॉस्पिटलच बिल रोहन ने दिलय. कारण मनवी रोहनशी त्या कारणाने भांडत होती फोनवर हे मी स्वतःच्या कानाने ऐकलय.. आणि त्यादिवशी सुद्धा ग्राउंडवर दोघांची भांडण चालू होती... हा पण आता ती त्याच गोष्टींवरून की काय माहीत नाही. पण बाकीच्या गोष्टी तर मी शौर्यला विचारेल. तो माझ्यापासुन काही तरी लपवतोय अस तर नसेल.."

सीमा : "समीरा मग करूयात का तुमच्या दोघांचं??"

समीरा : "काय ??"

सीमा : "शुभ लग्न सावधान..."

समीरा आता भारी लाजते...

समीरा : "आधी दोघेही मिळुन सेटल होऊ आणि मगच लग्न. पण हे सगळं होण्यासाठी त्याने मला प्रपोज तर करायला हवं ना.."

"एक मिनिट हा.."अस बोलत सीमा हातात फोन घेते.. आणि काही बटन दाबते..

समीरा : "काय करतेस?? "

सीमा : "अग त्याला फोन करून सांगायला नको का तुला प्रपोज करायला.."

"सीमा तु पण ना...",अस बोलत समीरा बाजूलाच पडलेली उशी घेऊन तिला मारते.. सीमाही अजुन अजुन तिला शौर्यच्या नावाने चिडवते.. पण समीराला आता राग येत नाही.. उलट एक वेगळीच फिलींग येते..कदाचित जी फिलिंग कोणाच्या खऱ्या अर्थाने प्रेमात पडल्यावर येते ती..

पण ती शौर्यवर प्रेम करते ह्याची कबुली नकळत का होईना सीमाला देते.

क्रमशः

(ह्या भागात देखिल खुप सारे प्रश्न पडले असतील पण त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला पुढील भागात व त्याचबरोबर इतर अतरंगीपणा आणि त्यात दडलेली एक अनोखी प्रेमकथा.. हा भाग कसा वाटला?? ते नक्की कळवा.. आणि कथा आवडल्यास नावासकट शेर करा.. )

©भावना विनेश भुतल