ATRANGIRE EK PREM KATHA - 18 books and stories free download online pdf in Marathi

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 18

शौर्यने दिलेला डब्बा उघडताना समीराच्या हृदयाची धडधड वाढत होती. अलगदपणेच तिने डब्याच झाकण उघडलं.. त्यावर एक कार्टुन काढलेले असत.. त्या कार्टुनच्या टिशर्टवर S हे अक्षर लिहिलेलं असत. त्या कार्टुन ने हातात एक बोर्ड पकडला असतो.. त्यावर " I Aम इN... "एवढंच लिहिलं असत.. समीरा तो कागद हातात घेऊन शौर्यने काढलेल्या त्या चित्राचा अर्थ लावत बसते.. आय एम इन.. पण पुढे काय?? अस अर्धवट कस काय पाठवल.?? पंधरा एक मिनिटं तिची अशीच विचार करण्यात निघुन जातात. ती तो कागद असाच डब्ब्यात ठेवणार तोच तीच लक्ष डब्यात असणाऱ्या खुप सुंदर आणि आकर्षीत अश्या चॉकलेटांकडे गेले.. गोल्डन रेपर्सवर मध्ये गुंडाळून ठेवलेली हार्ट शेप मधली चॉकलेट्स आणि बरोबर त्यांच्या मोधमध ठेवलेलं रेड रेपर्समध्ये गुंडाळलेले एक चॉकलेट.. तेही हार्ट शेप्स मधलं.. ते बघताच एक वेगळीच चमक समीराच्या डोळ्यांत आली.. गोड अस हसु तिच्या गालांवर उमटलं.. समीरा हातातील कागद डब्यासमोर धरत शौर्यने त्याद्वारे व्यक्त केलेल्या त्याच्या त्या प्रेम भावनांचा अर्थ लावु लागली.. आय एम इन लव्ह... म्हणजे त्याला अस म्हणायचं आहे की तो प्रेमात आहे... अलगदच कागदाचा चुंबन घेत ती हसतच रूममध्ये जायला निघाली..

सीमा तिला अस हसत हातात डब्बा घेऊन येताना बघतच राहिली...

सीमा : "काय ग काय झालं?? आणि हा डब्बा तु परत द्यायच बोलत होतीस.. आणि आता.."

"सीमा... सीमा... सीमा... आय एम सो हॅप्पी..", समीरा सीमाला गोल गोल फिरवतच बोलली..

सीमा : "अग हो हो... झालं तरी काय??"

समीरा शौर्यने दिलेला चॉकलेटचा डब्बा सीमा पुढे धरत तिला तो दाखवु लागली..

"वाव्ह चॉकलेट्स. ए मी एक घेऊ प्लिज.. " अस बोलत सीमा त्यातलं एक चॉकलेट घेणार तोच समीराने तिच्या हातावर एक फटका मारला..

"आऊच... काय झालं?? एवढे तु एकटी खाणार काय??.. एक चॉकलेट तर देऊ शकटेस ना?? एक तर मीच तो डब्बा घेऊन आलीय त्या शौर्यकडुन…",सीमा हात चोळत आणि तोंड पाडत बोलली.

"अग एक काय दोन घे. पण त्याने काय पाठवलं ते नीट तरी बघ.", समीराने हातातील कागद आणि तो डब्बा तिला दाखवला..

"आय एम इन ... पुढे काय??", सीमा समीराकडे बघु लागली.

समीरा तिला रेड रेपर्स असलेल्या चॉकलेटकडे डोळ्याने इशारा करत बघायला सांगते.

सीमा : "हार्ट मिन्स लव्ह... ओहह.. हो..."

समीरा : "कसलं भारी ड्रॉविंग काढलंय ना?? मी खुप खुश आहे आज. एटलिस्ट शौर्यने मान्य केलं की तो प्रेमात आहे.. ए मी पण त्याला असच काहीस तरी गिफ्ट देते.. त्याच्या भाषेत बोलायला गेलं तर स्पेसिअली.. तुला काय वाटत..?"

सीमा : "आयडिया छान आहे पण एक्झाम तोंडावर आल्यात त्यामुळे जरा अभ्यासात ही लक्ष दे.. "

समीरा : "काय ग तु पण.. एक्झामच नाव काढुन सगळा मुड खराब केलास बघ.. मी येतेच.."

सीमा : "कुठे चाललीस..??"

समीरा : "इथेच आहे ग.. वृषभला फोन करून बघते डॉक्टर काय बोलले ते.. ती लोक आली का की अजून हॉस्पिटलमध्येच आहेत ते नको का बघायला??"

सीमा : "पण मी काय म्हणते त्याला फोन करण्यापेक्षा शौर्यलाच करना.."

समीरा : "नको.. वृषभलाच करते.. एक तर मी काल उगाच वेड्यासारखी त्याच्यावर रागवुन निघुन आली त्याला काय वाटलं असेल. मगाशी बघितलस ना तो कस बोलला.."

सीमा : "ते तूझ्यासाठी होत का??"

समीरा : "मग अजुन कुणासाठी असणार. मीच तर काल रागात निघुन आली. बिचारा एवढं आवाज देत होता तरी.."

सीमा : "हम्मम.. बघ वृषभला फोन करून आणि मला पण सांग मग काय बोलले डॉक्टर ते."

समीरा वृषभला फोन लावायला गेलेरीत येते. वृषभचा फोन रिंग होत असतो पण तो फोन काही उचलत नाही..

"शौर्यला करू का??", समीरा मनातच विचार करते पण शौर्यला फोन करताना तीच मन थोडं घाबर घुबर होत..

पावसाच्या रिमझिम अश्या सरी बरसत असतात.. त्या सरी एका हातावर झेलतच ती शौर्यला फोन लावण्यासाठी त्याचा नंबर मोबाईलमध्ये शोधुन मोबाईल समोर धरते.

पण तोच समोरून वृषभचा फोन येतो...

वृषभ : "हॅलो समीरा तु फोन केलेलास? फोन सायलेंटवर असल्याने आवाजच नाही आला.."

समीरा : "शौर्य..??"

वृषभ : "तोsss. तो आहे की बरा. आत्ताच रूममधुन आलो त्याच्या.."

समीरा : "आणि त्याचा पाय..?".

वृषभ : "पंधरा दिवस पायावर जरासुद्धा ताण पडु देऊ नका अस डॉक्टर बोललेत.. बाकी उद्या भेटूच तेव्हा बोलूयात.."

समीरा : "बर.. थेंक्स.."

समीरा फोन ठेवुन एका वेगळ्याच धुंदीत हरवते. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरीसोबत तिला पहिल्यांदाच पावसात भिजलेला शौर्य आठवतो.. जणुं तोच तो क्षण जेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली. जुण्या आठवणी आणि शौर्यचा अतरंगीपणा आठवत ती एकटीच वेड्यासारखी हसते...

"वेडी झालीस की काय?? एकटीच काय हसत बसलीस??", सीमा तिला अस एकटीच हसताना बघते म्हणुन बोलते..

समीरा : "अग जुन्या क्षणांत हरवुन गेले की हसु आपण येत ग गालावर.."

सीमा : "शौर्य आहे ना बरा???".

समीरा : "हो आहे.."

सीमा : "चल मग अभ्यासाला बस.. जास्त विचार केलास तर खरच वेडी होशील आणि मला ही करशील.."

समीरा : "प्रेम खरच वेड लावत ग.. समीरा आता एका तंद्रीत हरवुन गेलेली.. "

¶¶रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे …

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा,
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे …¶¶

"अग समीरा ये ना आत..",सीमाच्या आवाजाने ती प्रेम धुंदीतून बाहेर आली

"थोडा अभ्यास केलास तर तुला नक्की फायदा होईल आणि तो डब्बा ठेव आता बस झालं..",सीमा एकटीच बोलत असते.. समीराच सीमाचा बोलण्यात लक्षच नसत. ती शौर्यला आपण सुद्धा काही तरी असच स्पेसिअल द्यायच ह्याच विचारात असते आणि ती त्या तैयारीला लागते..

संपुर्ण दिवस तिचा त्यात जातो..

★★★★★

दुसऱ्यादिवशी कॉलेजला जाते.. पण शौर्य काही आलेला नसतो. वृषभला विचारल्यावर कळत की शौर्य आजही येणार नाही आहे.. समीरा थोडी नाराज होते पण वृषभ असतो त्यामुळे तो डब्बा शौर्यपर्यंत पोहचवेल हे नक्की.. लेक्चर संपल्यावर वृषभ एकटा दिसताच समीरा त्याला गाठते आणि हा डब्बा प्लिज शौर्यला दे अस सांगते.

वृषभ : "अग पण हा तर तुझा डब्बा आहे ना मग??"

समीरा : "तु फक्त शौर्यला दे.. आणि त्याला सांग काही तरी स्पेसिअल आहे.."

वृषभ : "बर.. अजुन काही.."

समीरा : "काल डॉक्टर काय बोलले..??"

वृषभ : "त्याच्या पायाला फ्लेक्चर होत आणि डॉक्टरांनी त्याला अजिबात हालचाल करू नको म्हणुन सांगितलं तरी त्याने केली त्यामुळे पायाच्या नसांवर जास्त ताण आला. वेळेवर नेलं म्हणुन बर..पंधरा वीस दिवस आराम केला की फरक पडेल पण कितपत बरा होईल हे नाही सांगु शकत.."

समीरा : "बर पण आता पाय दुखतोय का त्याचा..?"

वृषभ : "आता नाही दुखत.. पण अधुन मधून थोडा दुखतो.."

समीरा : "काळजी घ्यायला सांग.. आणि मी विचारल म्हणुन पण सांग.. आणि हो हा डब्बा ही त्याला दे.. "

वृषभ : "अजुन काही.."

समीरा : "नाही.. तेवढंच.."

वृषभ जायला निघतो..

समीरा : "वृषभ.. खुप खुप थेंक्स.."

वृषभसुद्धा तिला "मेंशन नॉट" बोलून तिथुन निघुन जातो..

वृषभ हॉस्टेलमध्ये जाताच शौर्यच्या रूममध्ये जातो. शौर्य अभ्यास करत बसलेला असतो..

वृषभ : "OMG! Where exactly did the sun rise today ?? तु चक्क अभ्यासाला बसलायस??"

शौर्य : "सूर्य त्याला उगवायचाय तिथेच उगवलाय. आज मुड झाला म्हणुन बसलो अभ्यासाला.."

वृषभ : "खर सांग..इंटरनेट बंद आहे की लॅपटॉप बिघडलाय, का चार्जिंग नाही.. का अजुन काही?? नक्की काय प्रॉब्लम आहे की जे तु पुस्तक घेऊन बसलायस"

शौर्य : "ह्या पैकी काहीही झालेलं नाही. माझा खरच आज अभ्यास करायचा मुड आहे.."

"बर हे धर आणि मी ही जातो अभ्यासाला.", हातातील डब्बा शौर्यला देतच वृषभ बोलला.

शौर्य : "हा डब्बा.. ??"

"समीराने दिलाय. स्पेसिअल..", वृषभ चिडवतच बोलला

शौर्य : "कसल स्पेसिअल ठेव तो तिथे टेबलवर. किती राग आहे यार हिला?? "

वृषभ : "अस का बोलतोस.. ??"

शौर्य : "मग कस बोलु यार.. हा डब्बा मीच काल तीला दिला तु मॅच खेळत होतास तेव्हा.. तर तो सुद्धा तिने तुझ्याकडे असा पाठवुन दिला. आता सॉरी बोललो ना मी तिला.. अजुन किती सॉरी बोलु सांग.."

वृषभ : "एवढं चिडायला काय झालं पण ??"

शौर्य : "एक खोटं बोललोरे मी त्यामुळे तिला अस वाटत की मी खोटारडाच आहे.. अस कस बोलु शकते यार ती मला. सॉरी ह्या शब्दाला तिच्याकडे ना किंमतच नाही."

वृषभ : "पण काय खोटं बोललास??"

शौर्य : "मी पार्ट टाईम जॉब करतो म्हणुन."

वृषभ : "अरे देवा.. पण तुला पैसे कमवायची गरज कधी पडली?? म्हणजे एवढं मोठं खोट.! पण तू अस खोटं का बोललास??"

शौर्य घडलेला सगळा प्रसंग वृषभला सांगतो... वृषभला थोडं हसु येत..

शौर्य : "तुला पण हसु येतंय ना.. हस मग"

वृषभ : "तु सांगितलं आणि तिने विश्वासही ठेवला म्हणून हसतोय.. एवढं भोळ कस कोण असू शकत...? ते ही ह्या जमान्यात.."

शौर्य : "समीरा आहे ना तशी..भोळी.. रागात सुद्धा भारी दिसते यार ती.. पण माझ्याशी अस अबोला धरला ना तिने तर मन नाही ना लागत कश्यात.. आणि खर सांगु.. मुंबईतना भरपुर मुली माझ्या मागे पुढे असायच्या..दिसायला ही छान होत्या पण समीरा आणि त्यांच्यात खुप म्हणजे खुप फरक आहे. समीराला माझ्या गरीब असण्याने काहीच फरक पडणार नव्हता ह्यालाच खर प्रेम म्हणतात.. "

वृषभ : "मग आता करायचं काय??"

शौर्य : "पाय आधी बरा होऊ दे मग तिच्या मागे पळतो..रागात खुप फास्ट पळते यार ती..आणि एका पायावर मला नाही पळता येत."

वृषभ हसु लागतो..

शौर्य : "अरे खरच.."

वृषभ : "ती तुझ्यावर रागावली असेल पण मला काल दुपारी फोन केलेला आणि तुझ्या बद्दल विचारत होती.. आणि आज लेक्चर संपल्यावर हा डब्बा देताना पण तुझ्याबद्दलच विचारल तिने. पण ती अशी रागात आहे असं नाही वाटलं मला."

शौर्य : "मग तिने मला का नाही केला फोन??"

वृषभ : "आता ते तीच सांगेल आणि तिचा राग शांत झाला की बोलेल ती.. तात्पुरतीचा राग असतोरे तिचा.. तु अभ्यास कर मी ही अभ्यास करायला जातो. एक्झाम झाल्यावर बघु काय करायचं ते.. तोवर हा डब्बा कुठे तरी दुसरीकडे ठेव.. नाही तर पुन्हा राज आणि टॉनी तुला त्रास देतील त्यादिवशी सारख.. डॉक्टरांनी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना तुझ्या??"

शौर्य : "हम्मम"

वृषभ शौर्यला बाय करतच तिथुन निघुन गेला.

शौर्यने हातात घेतलेलं पुस्तक पुन्हा बेडवर ठेवलं.. आणि तो डब्बा कुठे तरी लपवायचा म्हणुन डाव्या पायावर बेलेन्स करतच उभा राहिला.. डब्बा हातात घेताच त्याला त्यात काही तरी फरक जाणवला..

"डब्बा असा हलका का लागतोय??", तो स्वतः च्या मनाला प्रश्न विचारू लागला.. शरीराचं तापमान अचानक वाढव आणि सोबतच हृदयाची धडधड अस काहीस त्याच झालं.. चेहऱ्यावर त्याच्या आता नकळतच हसु उमटलेल..

"येसsss", अस बोलत तो डब्बा हातात पकडतच बेडवर पडला.. जणु त्याला कळलेलं की समीराने त्या डब्यात त्याच्यासाठी काही तरी गिफ्ट पाठवलय.. डब्बा उघडण्याची एक वेगळीच उत्सुकता शौर्यमध्ये निर्माण झालेली..

(आता समीराने काय स्पेसिअल गिफ्ट पाठवल असेल शौर्यला?? पुढे ही प्रेमभरी अतरंगी कहाणी अजुन काय वळण घेईल ते पाहूया पुढच्या भागात.. आणि हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल