Game of Love. - 2 books and stories free download online pdf in Marathi

गेम ऑफ लव - 2

गेम ऑफ लव..।

भाग 2

पूर्वार्ध.......

तिच्या डोळ्यातली... प्रचंड भीती त्याला जाणवत होती.... त्या भितीनेच ती त्याच्या पासून लांब पळू लागली असता... त्याने... तितक्याच तत्परतेने तिचा हात पकडत.... तिला... खुनशी नजरेने... स्वतःकडे वळवून घेत.... जवळ ओढून....


"जो मेरी है ....उस पर किसी का हक तो क्या
नजर तक... बरदास्त नही है मुझे..।"


आता पुढे.........

तिला आणखीनच जवळ घेत ...मागून मिठी मारत....


"उफ् ये मोहब्बत का आलम् ..
हमे डर नही कि हमें कुछ हो जाये
डर तो बस इस बात का हैं कि
आपको कुछ ना हो जाये।"


मागून तिला मिठीत घेताच ...कानात ...तिच्या मेंदीने रंगलेल्या हातावरून स्वतः हात फिरवत ...


"मेहंदी का रंग नही है ये ...
ये रंग तो हमारे मोहब्बत का चढ रहा हैं।"


तो तिच्या इतक्या जवळ आला होता... की त्यांचे उष्ण श्वास तिच्या गालाजवळ जाणवू लागले होते ...भीतीने ओठ थरथरत होते ...डोळ्यांच्या पापण्या फडफडत.. होत्या... अशाच भीतीने थर थरत्या ओठां ने हळूच तिच्या तोंडातून आवाज निघतो....


"राज...वीर...!"


शु.ss. शू...ss sh....sh...Don't speak...
असे करत तिच्या ओठांवर बोट ठेवत ...तिला काहीच न बोलण्याचा इशारा करतो ...तिचे संपूर्ण अंग थंड पडलं होतं... तिला असं घाबरलेले पाहून ..
."घाबरू नकोस ..!असं म्हणतच ...
तिला बेड वरती बसवतो.... टेबलवर असलेले ताट.. तिच्या समोर धरून... त्यातील एक घास तिच्यासमोर धरतच ..."खाऊन घे काहीतरी !"असं म्हणत असताना..

ती... तितक्यात गडबडीत उठून बेडरूमचा दरवाजा कडे जाऊ लागते.... आणि दरवाजाची लाॅक उघडत.. दरवाजा ओपन करायचा प्रयत्न करत असताना ...तिला जाणवते की तो दरवाजा बाहेर ने बंद आहे....
राजवीर ने तिच्यासाठी घेतलेला घास स्वतः स्वतःच्या तोंडात टाकत....तिची मजा बघत असतो....
संपूर्ण रूम मध्ये ती इकडे..... तिकडे.... पळत बाहेर...पडण्याचा मार्ग शोधू लागते... खिडकीचे कर्टन उघडताच.... खिडकीतून बाहेर दिसणार्‍या भयान अंधार पाहून ....
बाहेर अंधार कसा झाला ...
:मी कुठे आहे !"
"मला का कैद केले ...!
"असे प्रश्न विचारू लागते ...
राज मस्तपैकी तिची..ती.. केविलवाणी धडपड बघत आणखीन दोन चार घास खातो ....

"सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आधी जेवण कर!" असं हसत तिला सांगत असतो...
तरी ती पुन्हा ओरडतच...
" मला का आणली इथे !"
आता तो ते ताट झाकून ठेवत ..तिच्याजवळ जाता... ती बाथरूमच्या दिशेने पळू लागते ....बाथरूममध्ये जाताच... तेथील दरवाजा ती बंद करत असताना... दरवाजा आतून बंद होत नाही... त्याला फक्त मॅग्नेट चे लाॅक आहे ....हे तिच्या लक्षात येते.... ती तशीच निराशेने बाहेर येते...
तो तिथेच भिंतीला टेकून उभा राहिलेला पाहून द दचकताच...

त्याच्या जड आवाजात तिला उद्देशून...
"राज .. राज.... हूँ मैं ...! "
"बाहेर पडायचे सगळे प्रयत्न करून... दमली असशील.. तर... एक काम कर ....
"जेवण कर ! आणि ते दूध... थंड व्हायच्या आत पिऊन घे!"
"गेली आठ-दहा तास तू काहीच खाल्लेले नाहीस.."
ती त्याच्याकडे रागाने बघत....
"नको आहे मला जेवण "
"मला काहीच नको आहे "
"मला बाहेर जायचं आहे "
"का आणले मला इथे!"
तो मात्र तितक्याच शांतपणे... तिला प्रतिउत्तर करतो
" तू जेवण कर"
" मग सोडतो तुला "

"काय ...!"

"होय ....!"
"तू जेवण कर मग सोडतो तुला!"

आता ते त्याला उद्देशून...."तू कधी आला स इथे !"
आणि पुन्हा तितक्याच आवेगाने...." का आणले मला इथे!" असं त्याला चिडून विचारत असते....
तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात बघत... हसूनच
"मी कधी आलोय ...!"
"तुला का आणलं येथे..!"
"तुला माहीत नाही... का आणलय ?"असं म्हणून
तिचा हात हातात घेताच.... तिच्या हिरवागार चूड्यावर व लाल मेहंदी च्या हातावर ...किस करतो....
ती तितक्याच तत्परतेने तो हात त्याच्या हातातून काढून घेते....

"खबरदार ..! तू माझ्या जवळ आलास तर!"

तिच्यावर केसांपासून पायाच्या नखापर्यंत स्वतःची नजर रोखत...
"यही अदा ..
बस यही अदा ..
पे ....तो फिदा है हम ...!"

ती ..तिथेच खाली बसते..

जवळपास साडेआठ वाजता आलेले असतात ....
तो पुन्हा बेड वरती जाऊन शांत पाठीला उशी लावून बसतो... आणि तिला म्हणतो...." जेवण कर आणि इथे बेड वरती येऊन झोप ...!"
"बाहेर फार थंडी आहे ..फरशी गार पडली आहे !
बाहेर पाऊस पडतोय एसी पण मी कधीच बंद केलाय ...
उगाच आजारी पडशील म्हणून...
ती त्याला उद्देशून.." बंद कर तुझे काळजी करण्याचे नाटक!" "बंद कर..!"
" मला बेशुद्ध करण्यासाठी त्या जेवणात सुद्धा काहीतरी मिक्स केले असेल....!,"
"साहिल शोधत असेल मला ...नक्कीच तो येईल..!.."

तिच्या तोंडून साहिल चे नाव ऐकताच ..
त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात...

"खबरदार पुन्हा साहिल चे नाव घेतील तर.... अजून मारलं नाही ...त्याला..!"
.जिवंत मारून टाकीन....साहिल ला...!"
"तू फक्त माझी आहेस रश्मी"
फक्त माझी !
"राज ची रश्मी" !
पुन्हा हसतच ..."मगाशी मी खाल्ले आहे जेवण... तू पाहिल नाहीस का !"
"काही मिक्स नाही केलं ...तू खाऊ शकतेस...!"
ती...अशा या भयाच्या वातावरण बेचेन असते...
तिला कळालेल असतं ...
आता आपली सुटका नाही आणि तिच्या डोळ्यात पाणी जमा झालेला असतं...
ती तशीच खाली बसलेली पाहून राजवीर तिच्याजवळ जातो.... "चूप ...ss एकदम चूपsss !"
"तू कधीपासून रडायला शिकलीस..!"

"गेली दहा तास तू माझ्या जवळ आहेस या रूममध्ये...!"
" तुला बाहेर जायचंय ना... सोडतो उद्या..."
"उद्या जाऊया आपण "
ती स्वतःचे डोळे दोन्ही हाताने पुसतच ...
"राजवीर..!"
तो मानेनेच होय म्हणून... तिला प्यायला पाणी देण्यासाठी तिथून उठतो आणि पाणी घेऊन तिच्याजवळ येत
"खरंच जेवण कर आणि शांत झोप!"
"मला नको आहे जेवण" अशी म्हणूनच ...ती तशीच बसून राहते ..
तो बाहेर फोन करून त्याच्या सहकाऱ्याला रूम उघडायला लावतो ... बेडरूम मधून राजवीर बाहेर निघून जातो... दरवाजा पुन्हा बाहेर ने आठवणीने लाॅक करतो....!

तिथेच आता हताश होऊन.... ती मनातच विचार करायला लागते ...बाबा या सगळ्यामुळे टेन्शनमध्ये असतील ... साहिल किंवा साहिलच्या घरातले मला शोधत असतील का??
राजवीर इथे कसा आला ??
याचा विचार करतच ...आधीच पोटात काही नसल्यामुळे ..भुकेने व्याकुळ झालेली .. त्यातच.. तिला पुन्हा एकदा ग्लानी येते....

थोड्या वेळाने राजवीर आत येतो.... त्याने अंगात क्रीम कलर टी शर्ट आणि ब्लॅक कलरची ट्राऊजर घातलेली असते..
त्याचे बाणेदार नाक...धारदार नजर...त्याचा... . गोरा रंग ..त्या..लूक मधे..आणखीन खुलून दिसत असतो.... ती तशीच खाली फरशीवर झोपलेले पाहून.... तिला हळूच उचलून घेत ...पुन्हा अलगत बेडवरती झोपवतो....
तिला तसाच ..तिच्या शेजारी बसून बराच वेळ पाहत राहतो ...

दुसरा दिवस.....
सकाळी आठच्या दरम्यान कर्टन लावलेले असल्यामुळे ... व रूमचे लाईट बंद असल्यामुळे ...रूम मध्ये अजूनही अंधारच असतो ...रश्मीला जाग येते... बाहेर प्रकाश आहे.. म्हणजे सकाळ झाली आहे ....

..आता राजवीर तिला शांत मिठीत घेऊन झोपलेला असतो... स्वतःला असं राजच्या मिठीत बघून ...ती आश्चर्यचकित होते... आणखीन जास्त घाबरते ..आपण तर काल खाली झोपलो होतो.?... राजवीर कधी आला रूम मध्ये ?...नेमकं रात्री काय घडलं ?...असे एक ना हजार प्रश्न तिच्या डोक्यात येतात ...आणि ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करताना ...राज ती मिठी आणखीनच घट्ट करू पाहतो ...तेव्हा तसाच प्रयत्न...आणखीन एकदा करताना तिच्याकडे डोळे उघडून तिला पाहत....


"बस एक ही ख्वाब है हमारा ....
इस कदर दुल्हन सी..
सजी हमारी बाहो में
बेहोश रहकर
यु सिमटकर ...बिखर जाना की...
हमे भी... होश ना रहे "


त्याच्या मिठीतून ..ती...सुटण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करते.. ती बेडवरून खाली उतरत असताना.. तिच्या हाताला धरून तिला स्वतःच्या जवळ ओढत... त्या झटापटीत ...तिच्या बांगड्यांना ....राजवीर ने धरलेल्या हातामुळे ...बांगडी कचकते..व.. तिच्या हाताला काच घुसल्यामुळे रक्त यायला लागतं ...आलेले रक्त पाहून ...राजवीर पटकन उठतो ...आणि कपाटातील फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढून.. तितक्यात काळजीने तिचा हात पकडून कॉटन ने रक्त पुसत असताना... ती पटकन हात हिसकावून घेत असते... तिला नजरेनेच पाहत ...शांत रहा...!
" रक्त किती येत आहे..!" असं म्हणत
जखम कॉटन ने स्वच्छ करून त्यावर मलम लावू लागतो ..
"घाबरू नकोस...! मी तुला काहीच करत नाही!"
"रात्री तू कधी आलास या रूममध्ये" आणि" मला बेडवर का झोपवलं.??" रश्मी

तिच्या हातावरुन हलके हात फिरवत...
तिच्या डोळ्यात बघत...." मी लग्न करणार आहे तुझ्याशी!" "माहित नाही का तुला..!"
:अजून ही काहीही केलेलं नाही मी तुला...!
"तरी..का..घाबरतेस...!"

त्याच्या आशा अटीट्युड कडे बघत त्या वाक्यावर चिडूनच ....
"ह्या शरीरावरच प्रेम आहे ना तुला..!"
अस..स्वतःकडं बोट दाखवत
" मला बरबाद करायच आहे ना !"
"बरबाद ...कर ना....मग कदाचित तुला शांतता मिळेल..!:.

तिला असं म्हणताना.... तिचे अंग प्रदर्शन चा हेतू ने खाली घेतलेला गाऊन.. रागाने तिच्याकडे बघत राज व्यवस्थित करू लागतो ...आणि तिच्या उघड्या शरिराला झाकत.. ... तिच्या केसांना मागून पकडत...


"यु गुरुर ना कर अपने हुस्न पर...
बात अगर सिर्फ जिस्म की होती...
तो कब के बरबाद कर देते तुम्हे...।"

"कंबक्त इश्क ये मोहब्बत
सिर्फ दिल में उतर ते... तो बात और थी
रूह में उतर गई हो
तभी तो कोहीनूर हो।"


तिच्या ओठांच्या आणखीन जवळ जात...


"आज तुम्हे छुने से कोई रोक नही सकता मुझे...
बस हमारे प्यार के इबादत ने रोक रखा है "


असे म्हणून कपाळावर ओठ टेकवत ....तिला घट्ट मिठीत घेतो...
बेडरूम चे एक कपाट उघडून त्यातील साड्या ड्रेस आणि गाऊन दाखवत ....
"जा... अंघोळ करून घे आणि घाल तुला हवे ते कपडे....!"
तोपर्यंत मी खाली व्यवस्था करतो ...आवर लवकर ब्रेकफास्ट घेऊन येतोय...

मला काही नकोय...!रश्मी

टिप: सर्व स्वरचित शायरी....🙂

#######################
@लेखिकेच्या परवानगीशिवाय लेखन कुठेही वापरू नये अन्यथा कारवाई केली जाईल लेखकाचे सर्व हक्क सुरक्षित

आता इथून पुढील कथा पुढील भागात.....

राजवीर कोण आहे??? रश्मी राजवीर ला ओळखते?? कधीपासून आणि कशी...??
हे सर्व जाणून घेण्यासाठी...

पुढील कथेसाठी मला फॉलो करत राहा नुसते फॉलो करू नका तर समीक्षाही लिहा....
क्रमशः....


@स्वाती पवार (अभिप्राय)