ATRANGIRE EK PREM KATHA - 30 books and stories free download online pdf in Marathi

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 30

शौर्य विराजला घेऊनच ज्योसलीनच्या घरी जायला निघतो.

विराज : "तु जा मी आहे इथे.."

शौर्य : "ए विर तु मला बोललेलास तु सोबत येणार म्हणुन.. "

विराज : "हो ते मी ज्योसलीनच्या घरापर्यंतच बोललो होतो.. घरी नाही.."

शौर्य : "कसला आहेस यार तु.. शब्दांत फसवायला तु पण शिकलास..'

विराज : "तुझ्याकडूनच शिकलोय रे ब्रो.. तु लवकर जाऊन ये.. मी आहे.. नाही तर मी घरीच जातो.. तस पण इथे थांबलं काय आणि घरी थांबलं काय एकच आहे.."

शौर्य : "ऐकणं..मला बरोबर अर्ध्या तासाने कॉल कर.. तुझा फोन आला की मला निघायला.."

विराज : "ओके डन आणि बेस्ट ऑफ लक.."


शौर्य : "विर तु घाबरवतोयस मला.."

विराज : 'धीर देतोय अस म्हणायच का तुला??"

शौर्य : "अजिबात नाही.. तु घाबरवतोयस असच म्हणायचय मला.."

विराज शौर्यच्या बोलण्यावर हसु लागतो

"आधीच उशीर झालाय अजुन उशीर नको करुस.. मी जातो घरी आणि आता दहा वाजलेत मी बरोबर साडे दहा वाजता फोन करतो.. ठिक आहे..."एवढं बोलुन विराज तिथुन जायला निघतो..


शौर्य : "मी काय बोलतो विर.. मी उद्याच जातो आणि भेटतोना तिला.."

विराज : "उद्या तु सकाळी निघशील दिल्लीला जायला मग घाई घाईत काय बोलणार.. आत्ताच भेटुन ये उद्यावर नको अजुन.."

शौर्यला विराजच म्हणणं पटत.. तो विराजला ओके बोलतच ज्योसलीनच्या घरी जातो..

ज्योसलीनचे आई आणि वडील बाहेर हॉल मध्ये डोक्यावर हात ठेवुन बसले असतात..

"हॅलो अंकल! हॅलो आंटी... ज्यो कुठेय...??", शौर्य हॉल मध्येच बसलेल्या ज्योसलीनच्या आई पप्पांना बोलतो

"अरे शौर्य बेटा.. हाऊ आर यु मेन?? मुंबईत आल्या पासून आज वेळ मिळाला तुला इथे यायला??"ज्योसलीनचे वडील तक्रारीच्या सुरातच शौर्यला बोलले..

शौर्य : "ते अंकल..डॅडच अस झालं मग.."

ज्योसलीनचे वडील : "ya.. I Know... Even we all are shock... सुरजच्या अश्या जाण्याने आम्हाला ही धक्काच बसलाय.. How is Viraj now??"

शौर्य : "He is fine now.. I want to meet Jyo.. Can may I??"

ज्योसनली मम्मा : "तिला भेटायला तु परमिशन कसली मागतोयस...ती तिच्या रूममध्येच आहे. तु भेट तिला.. मी सगळ्यांसाठी जेवण वाढायला घेते.. ज्यो मुळे आम्ही कोणीच जेवलो नाही.. तिला काय झालंय काय माहीत.."

शौर्य : "आंटी जेवण खरच नको.. "

आंटी : "आमच्यासोबत तु जेवणार आहेस"

"आंटी विर वाट बघतोय माझी... मी ज्यो ला भेटुन येत आधी.", अस बोलत शौर्य ज्योसलीनच्या रूममध्ये जातो.. शौर्य ज्योसलीनची रूम नॉक करतो..


"मला कोणाशीच बोलायच नाही आहे मम्मा तुला समजत नाही का??", ज्योसलीन आतुनच ओरडली.

"ज्यो मी शौर्य आहे.. ते मी तुला सॉरी बोलायला आलोय. प्लिज ओपन दि डॉर... प्लिज.."

दोन मिनिटं अशीच शांततेत जातात.. शौर्यला वाटत आता ज्योसलीन दरवाजा काही उघडणार नाही..

"ज्यो प्लिज नाsss", शौर्य अस बोलताच दुसऱ्या क्षणाला ज्योसलीन दरवाजा उघडते आणि सरळ पुन्हा बेडवर जाऊन बसते..


शौर्य : "ज्यो आय एम रिअली सॉरी ते मम्माचा राग मी तुझ्यावर काढला.. प्लिज मला माफ कर.."

शौर्य दोन्ही हात कानाला लावतच तिची माफी मागतो..

ज्योसलीन : "शौर्य तुला माहिती ना मी तुला माझा बेस्ट फ्रेंड मानते रे आणि तु माझ्यावर अस ओरडलास ते मला नाही आवडल म्हणजे मला राग आलेला तुझा पण आता गेला तो.. सो ते कानाला लावलेले हात काढ.."

शौर्य : "नक्कीना???"

"हम्मम.." ज्योसलीन मानेनेच हो बोलते..

"मग फ्रेंड", शौर्य आपला हात पुढे करतच ज्योसलीनला बोलतो..

ज्योसलीन सुद्धा आपला हात त्याच्या हातात देत त्याच्याशी पुन्हा नव्याने झालेली फ्रँडशीप एक्सेप्ट करते..

शौर्य : "बाय दि वे तु काय सांगत होतीस मला मगाशी.."

तोच ज्योसलीनचे डॅड तिच्या रूममध्ये येतात..

ज्योसलीनचे डॅड : "तुम्ही दोघांनी जेवायला आधी खाली या बघु जेवण वाढलंय."

शौर्य : "अंकल मला खरच नको जेवायला.."

ज्योसलीन : "अस कस नको.. तु माझ्या घरी येऊन न जेवता कस काय जाऊ शकतोस आणि मी तुला बर सोडेल.."

ज्योसलीन आणि तिचे वडील जबरदस्ती शौर्यला जेवणासाठी घेऊन खाली येतात..

जेवुन झाल्यावर शौर्य आणि ज्योसलीन पुन्हा तिच्या रूममध्ये येतात..

शौर्य मोबाईल मध्ये समीराचे आलेले मेसेज वाचत असतो... तोच ज्योसलीन त्याच्या हातातुन मोबाईल खेचुन घेऊन टेबलवर ठेवते..

शौर्य : "ज्यो मोबाईल देणा ग.."

"मला तुला महत्वाचं सांगायचय आणि तु मोबाईल मध्ये घुसलायस..", ज्योसलीन त्याला राग दाखवतच बोलते..

तोच शौर्यचा फोन वाजतो..

विराजच नाव बघुन ज्योसलीनच उचलते..

"विर शौर्य आमच्या घरी जेवला आहे तु त्याची वाट बघू नकोस आणि प्लिज सारख फोन करून आम्हाला डिस्टरब करू नकोस..तुला जर शौर्यची आठवण येत असेल तर तु सुद्धा आम्हाला येऊन जॉईंट करू शकतो.. I don't mind..", ज्योसलीन विराजला एकाच श्वासात सगळं काही सांगुन मोकळी झाली.


विर पुढे काही बोलणार तोच ज्योसलीनने फोन कट सुद्धा करते..

शौर्य : "ज्यो काय ग तु.. मला बोलायच होत विर सोबत.."

ज्योसलीन : "शौर्य ते सोडना मला तुला काही महत्वाचं सांगायचंय यार."

शौर्य : "मगासपासून ऐकतोय महत्वाच सांगाय, महत्वाचं सांगायच.. पण काय ते सांगतच नाहीस तु??"

ज्योसलीन : "मी रॉबिनला हो बोलले.."

शौर्य : "what!! त्या.. चरसीला..??"

"Don't call him Charsi ha... He Is MY fiance now.."ज्योसलीन थोड रागातच बोलते


शौर्य : "ए हॅलो मी नाही बोलत पूर्ण कॉलेज त्याला बोलत.. ते सोड.. Are you Serious??"

ज्योसलीन : "येस एम आय.."

शौर्य : "तुझ्यामुळेच लास्टटाईम त्याची आणि माझी मारामारी झाली.. मॅन म्हणजे मम्माने पण मला त्याच्यासोबत मारामारी करताना बघितल आणि मला दिल्लीला पाठवलं.. तु त्याच्या प्रेमात आहेस??? आत्तापर्यंत मला तो त्रास देत आलाय ज्यो.. माझ्या सगळ्यात मोठ्या दुष्मनच्या तु प्रेमात कसं काय पडुशकते यार"

ज्योसलीन : "तो तसा नाही जसा आपण समजत होतो.. खुप छान आहे तो.."

शौर्य : "लहान पणापासुन त्याचाचांगले पणा मी बघत आलोय.. तो कसा आहे हे तुझ्यापेक्षा मला चांगलं माहिती आणि तो मला आधीही आवडला नाही आणि आता तुझ्या सांगण्यावरून आवडेल अस तुला वाटत असेल तर तस काही होणार नाही.."

ज्योसलीन : "एवढा नाही रे तो वाईट.. तु एक वाईट गुण त्याच्यातला सांग.. मग मी बोलेल.."

शौर्य : "एक काय खुप सारे वाईट गुण आहेत त्याच्यात.. तो दारू पितो.. लेट नाईट आऊटिंग ला जाण.. स्मोकिंग"

ज्योसलीन : "ते तर कधी कधी मी ही करते मग तोच का वाईट."

शौर्य : "what...!! ए ज्यो तुझ डोकं ठिकाणावर आहे ना.. तु मला आज एक एक नको त्या गोष्टी सांगून सरप्राईज द्यायच ठरवलंयस का??"

ज्योसलीन : "थ्रिल असत रे ह्यात.. एन्जॉय दि लाईफ ऑन युअर वे... आपल्याला आवडत ना ते करावं असरॉबिन सांगतो मला.. "

शौर्य : "ज्यो यु आर माय बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड आणि तु माझं सगळं ऐकतेस.. म्हणजे आत्तापर्यँत तु सगळं ऐकत आली आहेस.. तसच तुला मी आत्ताजे काही सांगणार आहे ते सुद्धा तु ऐकणार आहेस.. आत्ता पासुनच तु तुला ज्या बॅड हेबिट्स लागल्यात त्या सर्व काही बंद करणार आहेस.. हे सगळ थोडे दिवस ठिक वाटेल मग ह्यातुन बाहेर पडणे मुश्किल होईल तुला आणि अंकल आंटीचा विचार कर.. तुझ्याशिवाय त्यांना काही सुचत नाही.. तु खुश रहावी म्हणुन तुला सगळं काही एन्जॉय करू देतात.. कारण ते विश्वास ठेवतात तुझ्यावर.. त्यांचा विश्वास घात नको करुस.. नाही जगणार ते आणि रॉबिनच बोलशील तर तो कसा आहे हे माझ्यापेक्षा तुलासुद्धा चांगलं माहिती.. फक्त त्याच्याबद्दलचा जो चांगलेपणाचा चष्मा तु लावलास ना तो आधी काढ आणि मग माझ्याशी बोल.. मी जातो घरी...मला पेकिंग करायचीय.. उद्या मी चाललोय दिल्लीला.."

ज्योसलीन : "शौर्य थांब तरी.."

शौर्य : "तुला अस वाटत असेल आपली मैत्री शेवट पर्यंत राहावी तर तुला लागलेली व्यसन आधी सोड.. नाही तर मी विसरून जाईल की मला ज्यो नावाची कोणी मैत्रीण होती. रात्र खूप झालीय. गुड नाईट..."

ज्योसलीन पुढे काही बोलणार पण शौर्य तिथे तीच बोलणं ऐकायला थांबला नाही..

शौर्य विराजच्या रूममध्ये जाऊन बसतो.. विराजची अनघा सोबत चॅटिंग चालू असते..

शौर्य : "विर तु बिजी आहेस का??"

विराज : "तुझीच वाट बघत होतो.. शेवटी सोडलं तुला तिने.. "

शौर्य : "तिने नाही सोडलं मीच आलो निघुन.."

विराज : "का?? काय झालं.."

शौर्य : "असच.."

शौर्य शांतच बसतो आणि विराज पुन्हा मोबाईल मध्ये बिजी.. नंतर विराजच लक्ष जात की शौर्य एकटाच कसल्या तरी विचारात आहे.. विराज मोबाईल बाजूला ठेवतो..


विराज : "शौर्य कसला एवढा विचार करतोयस..??"

शौर्य : "विर तु कधी हार्ड ड्रिंक केलंस??"

विराज : "अस का विचारतोयस??"

शौर्य : "सांग तरी."

विराज : "अजुन तरी नाही आणि कधी करणार ही नाही.. तु केलंस काय??"

शौर्य : "ज्यो करते.."

विराज : "what!!!"

शौर्य : "आणि तुला माहिती ती स्मोकिंग पण करते आणि सगळ्यात महत्त्वाचं ती कोणाच्या प्रेमात आहे माहिती.. त्या रॉबिनच्या.."

विराज : "रॉबिन म्हणजे तोच का?? ज्याच्यामुळे.."

"हो तोच.. त्याच्यामुळे तर डॅडला मला मारण्यासाठी बहाणाच भेटायचा..", मध्येच विराजला तोडत बोलतो..

शौर्य अस बोलताच विराज शांतच बसुन राहतो..


शौर्य : "एवढं काय असत रे त्या ड्रिंक मध्ये.. किती बकवास लागत ते.. कसे काय लोक पितात.."


विराज : "इथे बघ.. तुला काय माहिती ते बकवास लागत.."

शौर्य : "चुकून एकदा घेतलेलं म्हणजे खरच मला माहित नव्हतं की ते हार्ड ड्रिंक आहे.."

"आत्ताच मम्माला सांगतो मग कळु दे तिला पण कस चुकुन घेतलं ते..", अस बोलत विराज जोर जोरात मम्माला आवाज देऊ लागला..


"तु मम्माला कश्याला सांगतोयस..", शौर्य विराजच्या तोंडावर हात ठेवतच बोलला..

विराज : "चुकुन कशी घेतली ते कळेल मला.."

शौर्य : "विर खरच चुकुन घेतली रे.. त्या राज ने फसवुन दिल.. मला तर नेक्स्ट डे कळलं ते हार्डड्रिंक होत ते.. मी खुप ओरडलो पण त्यांना.. तुझी शप्पथ.."

विराज : "माझी शप्पथ घेतोस मग ठिक आहे.. पण पुन्हा अस काही केलंस तर याद राख.."

शौर्य : "एवढा काय तु भडकतोस रे.. जरा हसत रहा.. नुसता भडकत असतोस माझ्यावर आणि त्यात तु असा टकलु केलायस सेम टु सेम कर्ट एंगल दिसतोस.. एंग्री मेन.."

"अच्छा!! कर्ट एंगल दिसतोय मी??", शौर्यचा उजवा पाय पकडतच विराज शौर्यकडे बघत आपली एक भुवई उडवु लागला..

शौर्य : "विर मी जॉक करत होतो.. तु सिरीयसली घेतोस.."

विराज : "मी प्रत्येकगोष्ट सिरियसलीच घेतो रे बट शौर्य तु आत्ता ह्या कर्ट एंगल चा एक्सपेरियन्स घे"..

विराज शौर्यच्या उजव्या पायाला मुरगळतच बोलला..

"विर दुखतंय हा.. प्लिज.. सोड.. आत्ताच बरा झालाय रे पाय", शौर्य कळवळतच बोलतो..

विराज : "लगेच कसं रे सोडु...थोडी मज्जा घे.. मला चिडवून मज्जा घेत होतास ना तशीच."

"ब्रुनो वाचव..", अस बोलत शौर्य ब्रूनोला आवाज देऊ लागला.. ब्रुनो विराजच्या अंगावर मोठं मोठ्याने भुक लागला..

"मम्मा हेल्प मी.. विर प्लिज यार.. मम्माss", शौर्य अनिताला आवाज देऊ लागतो कारण त्याचा पाय खरच दुखत होता..


एवढा गोंधळ कसला म्हणुन अनिता ही विराजच्या रूममध्ये आली..

काय चाललंय तुमच..??", अनिता मोठ्यानेच ओरडली..

विराजने पटकन शौर्यचा पाय सोडला.. तसा शौर्य पाय धरून बेडवर लोळू लागला..

अनिता : "विर काय चाललंय??"

"मम्मा विरने माझा पाय बघ ना..", शौर्य रडतच त्याच्या मम्माकडे विराजची कम्प्लेन्ट करू लागला..


विराज : "शौर्य ओव्हर एकटिंग बंद कर हा.. मम्मा आम्ही मस्ती करत होतो ग.. हा नाटक करतोय आणि हाच मला टकलु बोलतोय..


अनिता

: "शौर्य कधी मोठा होणार ना तेच कळत नाही मला.."


शौर्य काही बोलणार तोच अनिता त्याला शांत बसायला लावते..

"मला उद्याच्या मिटिंगची तैयारी करायची आहे तुम्ही प्लिज गोंधळ घालु नका..", एवढं बोलुन अनिता आपल्या रूममध्ये निघुन गेली..

अनिता जाताच विराज शौर्यला रडुबाई म्हणुन चिडवु लागतो..

पण शौर्य आपला पाय धरून रडत असतो...आता मात्र विराजला खरच वाटत की शौर्यला खुप दुखलय नाही तर अस रडणार नाही..


"खरच दुखलं काय??", विराज काळजी घेतच बोलतो..

शौर्य : "कधीच ओरडुन सांगत होतो मी तिला.. तु पण ना.."..

विराज : "एवढं काय झालंय पायाला??",

शौर्य : "फलेक्चर होता.. आत्ताच बरा झालाय रे तो पाय.. जवळपास महिना भर मी त्रास काढलाय.. आता तु परत दुखवलास."

विराज : "आय एम सॉरी शौर्य.. मला माहित नव्हतं.. बघु इथे.."

अस बोलत विराज शौर्यचा पाय बघु लागला.. फस्ट एड बॉक्स मधुन पेन रिलीफ स्प्रे काढत तो त्याच्या पायावर फवारतो आणि पायाभोवती बेंडेज बांधतो..

"थोड्या वेळाने वाटेल बर.. तस ही नाही झाला तर मग उद्या तुझं दिल्लीला जाण केन्सल..नाही तर थांब मी मम्माला सांगतो की पुढच्या आठवड्याच बुकिंग करायला..",विराज चिडवतच शौर्यला मुद्दामुन चिडवतच बोलतो..


शौर्य : "एवढा पण नाही दुखत.. म्हणजे आत्ता स्प्रे मारलाय मग होईल बरा.."

विराज : "नक्की???"

शौर्य : "हो नक्की.."

विराज आणि शौर्यची रात्रभर मस्तीच चालु असते.. शौर्य पुन्हा दिल्लीला जाणार म्हणुन विराजने आजची पूर्ण रात्र शौर्य सोबत मस्ती करायच ठरवलेलं असत..

★★★★★

वृषभ, राज आणि टॉनी तिघेही शौर्यला खुप मिस करत असतात..

वृषभ : "उद्या किती वाजता येईल शौर्य काही बोलला पण नाही.."

राज : "आपण तो आला की फिरायला जाऊयात.. तस पण मनवीची पार्टी बाकी आहे.."

वृषभ : "रोहनला विचारुयात.. तो विचारेल मनवीला.. नाही तर एवढ्या रात्री पुन्हा तिला फोन केला तर आपली कॉलर धरेल तो.."

टॉनी : "अरे पण शौर्य कधी येणार.. आपण लाख प्लॅनिंग करू.. नेमकं तो संध्याकाळी आला मग??"

वृषभ : "एक काम करतो.. रोहनला व्हिडीओ कॉल लावतो.. रोहन हो बोलला की लगेच आपण शौर्यला कॉल करूयात.."

दोघांनीही संमती दाखवताच वृषभने रोहनला व्हीडीओ कॉल लावला..

रोहनला उद्या काहीच काम नव्हतं.. तो लगेच हो बोलला.. रोहन हो बोलताच वृषभ त्याला तसच थांबायला सांगतो आणि शौर्यला व्हिडीओ कॉल लावतो..

शौर्य कडुन फोन रिसिव्ह होताच सगळे एकत्रच... हॅलो शौर्य बोलतात.. पण समोर ज्योसलीनला बघुन त्यांना धक्काच बसतो..


राज : "तुला शौर्यला फोन लावायला सांगितलेला तु ज्योसलीनला कुठे लावलास..."

वृषभ : "शौर्यलाच लावलेला मी फोन आणि तस पण माझ्याकडे हिचा नंबर पण नाही.. "


ज्योसलीन तिथुन सगळ्यांना हॅलो करत असते..

रोहन : "हॅलो ज्योसलीन शौर्य कुठेय?? आणि त्याचा मोबाईल तुझ्याकडे कसा..??"

ज्योसलीन : "अरे तो मला आत्ता भेटायला आलेला.. मोबाईल माझ्या रूममध्येच विसरून गेला..जस्ट आत्ताच गेला.. जरा आधी फोन केला असता तर कदाचित भेटला असता तो.."

सगळेच घड्याळात किती वाजले ते बघतात..

वृषभ : "एवढ्या रात्री तो तुझ्या रूममध्ये??"

ज्योसलीन : "ते मी त्याच्यावर रागवलेली.. मग मनवायला आलेला तो मला.."

रोहन : "एवढ्या रात्री??"

ज्योसलीन : "मग काय झालं.. माझा BF आहे तो.. कधीही येऊन शकतो मला भेटायला."

राज : "कोण BF??"

ज्योसलीन : "शौर्य आणि कोण.. बाय दि वे तुम्ही सगळे कसे आहात.."

टॉनी : "आम्ही मस्त.."

रोहन : "शौर्यशी बोलायच होत.."

ज्योसलीन : "काही काम होत का?? खर तर मीच त्याच्या घरी जाणार होती त्याचा फोन द्यायला.. पण मला आता कंटाळा आलाय.. तुम्ही एक काम करा विर च्या फोन वर ट्राय करा.. "

वृषभ : "विरचा नंबर नाही आमच्याकडे.."

ज्योसलीन : "मी देते.. माझ्याकडे आहे.."

रोहन : "नाही नको.. राहू दे.. आम्ही उद्या बोलुच त्याच्याशी.."

ज्योसलीन : "ओके..बाय.."

ज्योसलीनला सगळे बाय करत फोन ठेवुन देतात....

वृषभ फोन कट करतो..

राज : "शौर्यची मज्जा आहे ना यार.. मुंबईत एक दिल्लीत एक.."

वृषभ : "नशीब समीरा नव्हती व्हिडीओ कॉलवर.. "

टॉनी : "पण शौर्यच हे अस वागणं मला तर काही पटलेलं नाही.."

वृषभ : "मला सुद्धा.. समीराला फसवतोय तो.. ह्याच्यासोबत बोलावच लागेल आत्ता"

शौर्य विषयी सगळ्यांच्याच मनात शंकेची लहर निर्माण होत होती..

★★★★★

मनवी आज पुन्हा डॉक्टरकडे चेकअप साठी आलेली..

डॉक्टरांनी पुन्हा तिच्यासोबत प्रश्न उत्तरांचा खेळ सुरू केला.. आणि नेहमीप्रमाणे तिला बाहेर बसायला सांगितले..

"आता काही फरक जाणवतोय का??", मनवी चे वडील काळजीच्या सुरातच विचारतात..

डॉक्टर : "पाहिजे तसा रिस्पॉन्स ती देत नाही.. सुधारणा नाहीत असही नाही मी बोलणार पण आपण औषध बदलून बघुयात.. जर त्यानेही फरक नाही पडला तर आपल्याला तिला एडमिट करून घ्याव लागेल.."

मनवीचे वडील : "फक्त दोन महिने सांभाळुन घे.. एकदा का कॉलेज संपल की मग तु बोलतोस तस एडमिट करूयात हवं तर.."

डॉक्टर : "काळजी घे तिची आणि औषध वेळेवर दे..."

मनवीचे वडील डॉक्टरांचा निरोप घेऊन घरी येतात..

मनवीला बर नाही असं ती रोहनला सांगते त्यामुळे लेक्चर संपवुन तो थेट तिला भेटायला तिच्या घरी येतो.. ती रूममध्ये आराम करत असते..

मनवीचे वडील रोहनला बसायला सांगतात..

रोहन : "काय झालं मनवीला??"

मनवीचे वडील : "साधारण डोके दुःखी.. एवढ काही खास नाही.. तु बस ना. मी तिला बोलावतो.."

मनवीचे वडील मनवीला आवाज देत खाली बोलवुन घेतात..

"तुम्ही बसा मी येतोच..", अस बोलुन मनवीचे वडील तिथुन निघून जातात..

रोहन : "आता कस वाटतंय???"

मनवी : "आता आहे ठिक.. शौर्य आला का रे. नाही म्हणजे आज येणार होता ना.."

रोहन : "नाही आला तो अजुन.. "

मनवी : "फोन केलास की नाही त्याला.. का अजुन तो बोलत नाही तुझ्याशी.. म्हणजे माझ्यामुळे तुमच्या दोघांत भांडण झाली म्हणुन विचारलं.."

रोहन : "त्याचा फोन त्याच्या जवळ असायला हवा ना.."

मनवी : "म्हणजे??"

रोहन : "ते.. तु समीराला काही सांगणार नसशील तर सांगतो.."

मनवी : "नाही सांगत मी तिला.."

रोहन काल घडलेला सगळा प्रकार मनवीला सांगतो..

हे सगळं ऐकुन मनवीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दिसत होती..

रोहन तिची विचारपुस करून निघुनही गेला.. पण रोहनने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती पुन्हा पुन्हा आठवुन अगदी खुश होत होती..

खर तर तिला ही गोष्ट ती कधी समीराला हे सांगते अस झालेलं..

(आता पुढे काय?? ज्योसलीनने घातलेला गुंता शौर्य कसा सोडवेल?? भेटूया पुढील भागात. हा भाग कसा होता ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल