ATRANGIRE EK PREM KATHA - 40 books and stories free download online pdf in Marathi

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 40

शौर्य एक टक त्याच्या मम्माकडे बघतच राहिला.

समीरा रागातच शौर्य जवळ येते. सोबत त्याचे मित्र मंडळी सुद्धा.. समीराच त्याच्यापाठी असलेल्या त्याच्या आई आणि भावाकडे लक्षच नसत..

ती रागातच त्याच्या हाताला धरतच त्याच तोंड आपल्याकडे फिरवते..

समीरा : "शौर्य प्लिज स्टॉप दिस... सोड त्याला जाऊदे.. आणि चल तु इथुन.."

राज : "ए समीरा तु उगाच घाबरतेस.. कसला भारी फायटिंग करतो तो.. मी तर फॅन झालोय ह्याचा.."

टॉनी : "मग गोल गोल फिरून हवा घाल ह्याला.. घाम बघ किती आलाय ह्याला.."

टॉनी वृषभला हसतच टाळी देत बोलला..

वृषभ : "तु असा शांत का आहेस??"

"ते मss मम्माss", शौर्य रडवा चेहराकरतच बोलतो..

वृषभ : "काय!!!"

शौर्य बाजूला होतो तस सगळ्यांना त्याची मम्मी आणि विराज दिसतो..

"ओहह शट", सगळ्यांची एकच प्रतिक्रिया असते.

अनिता : "ह्यासाठी तुला इथे परत यायच होत शौर्य?? त्या मुलाला काही झालं असत मग.. तु हे असमारामारी करणं का बंद नाही करत"

शौर्य : "मम्मा तोचss"

"जस्ट शट युअर माऊथ शौर्य",अनिता रागातच शौर्यवर ओरडते


शौर्य घाबरतच अनिता सोबत असलेल्या विराजकडे बघत त्याच्यापासुन आपली नजर लपवु लागतो..


वृषभ : "आंटी शौर्यची काहीही चूक नाही.."


रोहन : "हो.. हा फैयाजच हॉकी स्टिक वैगेरे घेऊन आलेला.. ह्याला मारायला.."

फैयाज : "बिअर की बॉटल कॉलेज में लेकर कोण आया?? जरा वो भी बता दो"

"मे लेकर आया था",रोहन फैयाजकडे रागात बघत शौर्यची बाजु सावरतच बोलला...


"ए रोहन शौर्य को बचाने के लिये अब झूट मत बोल यार.. वैसे भी कॉलेज में दारू की बॉटल लेकर घुमना आदत हे इसकी.. शौर्य वैसे कितने पॅक लेता हे तु दिनमे.. ?"फैयाज अस बोलताच अनिता रागात शौर्यकडे बघु लागते..


"साले कुछ भी क्यु बक रहा हे.",शौर्यने रागाच्या भरात फैयाजची कॉलर पकडली.. आपल्या हाताची मुठ करत समोर धरतच तो त्याला मारणार.. तोच अनिता शौर्यवर ओरडते..

अनिता : "शौर्य.. लिव्ह हिम..

पण शौर्य त्याची कॉलर धरून आपला हात तसाच त्याच्या नजरेसमोर धरून एका रागभऱ्या नजरेने तो त्याच्याकडे बघत होता.. फैयाज मात्र चेहऱ्यावर समाधानकारक हसु आणत त्याच्याकडे बघत जणु त्याला मारण्यासाठी उकसवत होता..

अनिता : "शौर्य आय सॅड लिव्ह हिम..सोड त्याला."

पण शौर्य अनिताच ऐकत नव्हता.

"शौर्यsss", शौर्य फौयजला मारणारच तोच विराज रागानेच शौर्यवर ओरडला..

विराजचा आवाज ऐकताच शौर्य भानावर आला आणि त्याने फैयाजची कॉलर सोडत त्याला रागातच खाली ढकललं..

"काय चाललंय तुझं??",विराज रागातच त्याच्यावर ओरडतो..


"विर हा खोटं बोलतोय यार.. ह्याच्यामुळे मलाsss",शौर्यला हाताची पाच बोट दाखवतच विराजने थांबवलं..


विराज : "गाडीत बस."

शौर्य : "विर... माझं ऐकून तर घे.."

"शौर्य गाडीत बस.. मला तुझ्यावर इथे सगळ्यांच्या पुढ्यात हात उचलायला प्लिज लावु नकोस.. गप्प गाडीत बस.. तुला जे काही बोलायच ते रूमवर गेल्यावर बोल. आता प्लिज गाडीत बस.. प्लिज..",शौर्यच्या हाताला पकडत विराजने त्याला गाडीत बसवलं..


विराजच अस रूप अनिता सुद्धा बघतच बसली होती.. कदाचित शेखर असता तर तोही असच वागला असता अस तिला वाटलं आणि नकळत ती शेखरच्या आठवणीत गुंतली.. डोळ्यांतुन आलेलं पाणी ती पुसतच गाडीत बसायला जावू लागली..

समीरा : "आंटी शौर्य चुकीचा नाही आहे.. हा फैयाज खोट बोलतोय.. प्लिज एकदा त्याच ऐकुन घ्या.."

रोहन : "हो आंटी प्लिज.."

सगळेच अनिताला समजवु लागले.. पण अनिता कोणाच काहीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.. ती सरळ गाडीत जाऊन बसली..


गाडीत सगळे शांत होते.. गाडी मोठ्या अश्या हॉटेलजवळ येऊन थांबली.. विराज ड्रायव्हरला पैसे देत गाडीतुन उतरला .. अनितासुद्धा गाडीतुन उतरून सरळ आत जाऊ लागली..

"मम्माsss", शौर्य आवाज देत होता पण अनिता त्याच्याकडे न बघताच आत निघुन गेली..

शौर्य हॉटेल आणि त्याच्या आजु बाजूला असलेला निसर्ग बघत राहिला..

विराज : "आत चालत येणार आहेस की उचलुन घेऊ.."

विराज रागातच शौर्यला बोलला..

शौर्य : "विर प्लिज ना.. तु तरी नको ना रागवूस.. तो खोटं.."

"इथे तमाशा नकोय.. रूमवर चल..", शौर्यला मध्येच थांबवत शौर्य बोलला..

तोच शौर्यचा फोन वाजला.. रोहनचा नंबर बघुन तो विराजकडे बघु लागला..

"फोनवर बोलुन येऊ आत..??", शौर्यने अस विचारताच विराज रागातच त्याच्याकडे बघु लागला..


शौर्य : "प्लिज ना विर.. एकच मिनिटं"

विराज शौर्य समोर हात धरतच त्याच्याकडे बघु लागला..

शौर्यने फोन सायलेंट करतच खिश्यात टाकला..

विराज : "फोन इथे दे.."

शौर्य : "नाही ना उचलत.."

विराज : "शौर्य मोबाईल दे.."

शौर्य मोबाईल विराजच्या हातात देत रागातच आत गेला.. पण आत गेल्यावर तो पुन्हा विराजकडे बघु लागला.. कारण रूम नंबर त्याला माहीत नव्हता..

विराज त्याला घेऊन रूममध्ये आला.. अनिता आधीच त्याची वाट बघत होता..

शौर्य आत गेल्या गेल्या अनिताला मिठी मारतो..

शौर्य : "मम्मा.. आय एम सॉरी.. प्लिज रागवु नकोस ना माझ्यावर.. तो त्रास देत होता ग मला.."

"शौर्य सोड मला..", त्याचा हात झटकुन देत ती त्याच्यावर ओरडली..

अनिता : "तु कॉलेजमध्ये बिअरच्या बॉटल घेऊन जातोस?? असले नको ते उद्योग कधी शिकलास तु शौर्य??"

शौर्य शांत बसतो..

अनिता : "म्हणजे तो खर बोलत होता तर.."

शौर्य : "पण सगळंच खर नव्हतं बोलत होता.."

अनिता : "तुला दिल्लीला पाठवुन मी माझ्या आयुष्यात खुप मोठी चुक केलीय अस मला वाटतंय.. पण अजुन तुला इथे मी नाही ठेवु शकत शौर्य... विर फ्लाईट बुक कर.. आपल्या तिघांची.. आपण आत्ताच्या आत्ता आपण मुंबईला जातोय.."

विराज : "तेच करतोय.."

शौर्य : "विर नाही हा.. मी नाही येणार मुंबईला."

विराज : "तु कस नाही येत ते मी बघतो.."

शौर्य : "तुम्ही लोक फ्लाईट बुक करा नाही तर काहीही करा मी येणार नाही.. "

अनिता : "एक दोन तासांनी असेल तर वेल एन्ड गुडच.."

शौर्य : "मम्मा दोन महिन्याने माझी एक्साम आहे.. तु अश्या स्टुपिड कारणाने माझं पुर्ण इयर वेस्ट करतेयस.."

अनिता : "फ्लाईट बुक झाली असतील तर बेग भरायला घे विर.. "

"विर तु तरी समजव ना मम्माला.. मला नाही यायचंय मुंबईत..", शौर्य विरच्या हातातला मोबाईल खेचतच बोलला..

विराज : "शौर्य मोबाईल दे."

शौर्य : "विर मला नाही यायचंय मुंबईला.. मी तिकीट केन्सल करतोय.."

"शौर्य मोबाईल दे..", विराज थोडं रागातच शौर्यला बोलला.

पण शौर्य मोबाईलमध्ये तिकीट केन्सल करण्यात बिजी होता हे बघुन एक सनसनीत कानाखाली विराज शौर्यला देतो..

विराज : "इथे दिल्लीत तु केलेली नाटकी बघून तुला अस वाटत मी तुला इथे रहायला देईल तर तो तुझा गैरसमज आहे.. माझंच चुकलं.. आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या चुकांवर मी पांघरून घालत आलो ते.. पण आत्ताच्या आत्ता हे सगळं इथेच थांबवायच.. आणि गप्प मुंबईला यायच तेही आमच्यासोबत.."

शौर्य : "विर तु पण मला चुकीच समजतोस.. "

विराज : "त्यादिवशी तूच बोललेलास ना तु ड्रिंक घेतलेलंस ते.. का ते ही खोट..'

शौर्य : "विर तुझी शप्पथ घेऊन बोललेलो रे.. ते चुकुन झालेलं.. मला नव्हतं माहिती त्यात ड्रिंक आहे.. "

विराज : "आणि आजच काय?? "

शौर्य : "त्या फैयाजमुळे मला सस्पेंड केलेलं म्हणुन मी ते.. "

विराज : "तु कॉलेजमध्ये शिकायला जातोस कि मारामारी करायला.?? "

शौर्य : "सॉरी ना.. परत नाही होणार अस.. मम्मा प्लिज ना.. "

विराज : "मोबाईल दे.. मला तिकिट बुक करू दे..

शौर्य मोबाईल काही देत नसतो..

विराज : "शौर्य माझा परत हात उठेल हा.. मी शेवटच सांगतोय."

शौर्य : "मग मार मला.. हवं तर.. पण मी नाही देणार मोबाईल.. मला नाही यायचंय मुंबईला.."

"हॅलोss", दिल्ली टु मुंबईसाठी तीन फ्लाईट तिकीट बूक कर.. आजच्या डेटची.. आम्हां तीन फेमिली मेम्बरसाठी.. लवकर बुक करून मला कळव..", अनिताने आपल्या कामावरील रिसेप्शनिस्टला फोन करून तिकीट बुक करायला सांगितली.

शौर्य : "मम्मा माझी काहीही चुकनसताना खुप चुकीच वागतेस तु माझ्याशी.."

विराजचा फोन बेडवर फेकत रागातच खिडकीजवळ जाऊन उभं राहतो.. थोड्या वेळात तिकीट कन्फर्म झालीय असा रिसेप्शनिस्टचा फोन येतो..


अनिता : "एक तासाने आपली फ्लाईट आहे आपल्याला निघावं लागेल.."

शौर्य : "मम्मा प्लिज"

अनिता शौर्यकडे न बघताच तिथुन बाहेर पडली..

विराज : "चलss"

पण शौर्य काही रूमबाहेर पडत नाही हे बघुन विराज त्याचा हात पकडतच त्याला रूमबाहेर नेतो.. विराज समोर त्याच काहीही चालत नसत.. गप्पपणे तो जिथे नेतो तिथे जाऊ लागतो..

तिघेही विराजने बुक केलेल्या कारमध्ये बसत एअरपोर्टवर येतात..

★★★★★

इथे सगळेच शौर्यची वाट बघत प्ले हाउसमध्ये बसले असतात..

रोहन : "शौर्य फोन का नाही उचलत..?? आणि आता तर फोन पण लागत नाही त्याचा.."

वृषभ : "मे बी चार्जिंग नसेल.. नंतर करेल फोन.."

समीरा : "आपण थोडा वेळ त्याचा फोन येतोय का त्याची वाट बघुयात.. कारण आंटी आणि विर दोघेही खुप भडकलेत त्याच्यावर.. त्यांच्या समोर मे बी तो फोन उचलत नसेल.."

सगळ्यांना समीराच म्हणणं पटत.. सगळेच प्ले हाउसमध्ये बसुन त्याची वाट बघतात. पण शौर्य काही येत नाही..

थोडा वेळ होताचं सगळे तिथुन निघुन रूमवर जातात..

जवळपास संध्याकाळ होते.. तरीही शौर्यचा काही पत्ता नसतो..

समीरा वेड्यासारखी गेलरीतच इथुन तिथे फेऱ्या मारत असते.. वृषभला फोन करून शौर्य रूमवर आलाय का त्याची ती चौकशी करत असते.. वृषभकडुन मिळणाऱ्या नाही ह्या उत्तराने ती नाराज होत फोन ठेवुन देते...

तोच शौर्यचा फोन तिला येतो..

समीरा : "शौर्य कुठेस तु?? किती फोन लावले तुला..?? ₹

(शौर्यसोबत बोलताना समीरा थोडी हळवी झाली होती.. तिच्या डोळ्यांतुन नकळत पाणी येत होतं)

शौर्य : फोन विरकडे होता ग.. आत्ताच घेतलाय त्याच्याकडून..

समीरा : आहेस कुठे??

शौर्य : मम्मा ऐकुनच घेत नव्हती ग माझं काही.. मुंबईला घेऊन आलीय मला..

समीरा : काय??

शौर्य : मी येईल दिल्लीला.. तु काळजी नको करुस.. आणि मी तुला नंतर फोन करतो..

समीरा : काळजी घे..

शौर्य : हम्म बाय..

समीरासोबत बोलुन शौर्य फोन ठेवुन देतो..

शौर्य : तु अस रागात काय बघतोयस.??

(फोन ठेवताच शौर्य विराजला रागात बोलतो)

विराज : अस काही करत असशील दिल्लीमध्ये अस वाटत नव्हतं.. बाय दि वे किती पॅक घेतोस तु??

शौर्य : व्हॉट यु मिन.. किती पॅक घेतोस...?? तुला बोललो ना तो खोटं बोलत होता ते

विराज : सोड... जेवायला चल.. मम्मा वाट बघतेय तुझी..

शौर्य : वाट बघतेय तर मग बघु दे..मला भुक नाही आहे..

विराज : नक्की??

शौर्य विराजकडे न बघताच मोबाईल ठेवुन बेड वर आडवा होतो..

विराज : चल ना जेवायला.. का नकरे करतोयस..

शौर्य : नको आहे.. आणि मला झोपु दे.. प्लिज..

विराज : भुक लागल्यावर बरोबर जेवशील..

(विराज पण रागातच शौर्यच्या रूम मधुन बाहेर पडतो.. )

रात्रभर शौर्य काहीही न खाता तसाच झोपुन जातो..

दुसऱ्यादिवशी अनिता आणि विराज नेहमीप्रमाणे आपापल्या कामावर निघुन जातात.. दोघांनाही कामावरून यायला रात्रीचे दहा वाजुन जातात.. विराज आणि अनिता दोघेही फ्रेश होऊन डायनींग टेबलवर जेवायला बसतात..

अनिता नेहमीप्रमाणे लॅपटॉप समोर घेऊन जेवणासोबत आपलं काम करतच जेवत असते..

विराज सुद्धा जेवत असतो..

"शौर्य जेवला काय??",जेवता जेवता तो शौर्यची त्याच्या नोकरदार मंडळींकडे चौकशी करतो..


नोकर : 'छोटे साहेब तर आज रूममधुन बाहेर पडलेच नाही.."

विराज : "सकाळपासुन काही खाल्लं का नाही??"

नोकर : "नाही.."

विराज : "मम्मा का हा अस वागतो..", अस बोलत विराज जेवणाच्या ताटावरून उठु लागला..


अनिता : "विरss अस भरलेल्या ताटावरून उठायच नाही.."

विराज : "अग पण शौर्य.."

अनिता : "तु आधी जेव.."

विराज कस बस ताटातील जेवण संपवतो आणि तिथुन उठुन शौर्यच्या रूममध्ये येतो..

शौर्य मोबाईल मध्ये काहीतरी करत बसलेला असतो..

विराज रूमची लाईट चालु करत त्याच्या बाजुला जाऊन बसतो..

विराज : "जेवला का नाही तु?? तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय.. जेवुन घे.."

शौर्य : "नकोय.."

विराज : "शौर्य उठ आणि जेवुन घे.. उपाशी नको झोपुस.. प्लिज"

शौर्य : "प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती करणार का तुम्ही लोक.. मला नकोय जेवायला.. नाही समजत का तुला.."

विराज : "परत दिल्लीला जाण्यासाठी ही अशी नाटकी करतोयस ना.. का ड्रिंक घेतल्याशिवाय जेवण पोटात नाही जात तुझ्या??"

शौर्य : "आत्ता पर्यंत तर घेत नव्हतो पण तुझ्या अश्या सारख्या सारख्या बोलण्याने मी नक्कीच घेईल.. ते पण तुझ्या पुढ्यात.. तु बघच आत्ता.."

"तु माझ्या पुढ्यात ड्रिंक घेणार.", विराज शौर्यचा उजवा हात पाठी मुरगळत बोलला..

शौर्य : "हो घेणार.. काय करणार तु??".

विराज : "शौर्य मला राग देऊ नकोस हा.."

शौर्य : "राग तुम्ही लोक मला देतायत आणि हात सोड माझा."

"नाही सोडणार..", विराज अजुन जोरात हात मुरगळत बोलला..

शौर्य : "आहह मम्मा.. विर.. हात सोड ना.."

विराज : "शौर्य तुला अस वाटत असेल ना की तु अस मेलोड्रामा करशील, आम्हाला ब्लॅकमेल करशील तर तुला आम्ही दिल्लीला जायला देऊ तर तो तुझा गैरसमज आहे.. सगळी नाटकी आत्ताच्या आत्ता इथेच थांबवायची आणि गप्प पणे जेवायच.."

"तु हाथ सोड आधी.. मला लागलंय हाताला..", शौर्य अस बोलताच विराज हात सोडतो त्याचा..


शौर्य हातावरच टिशर्ट वर करतो तस विराजला त्याच्या हाताला लावलेली पट्टी दिसते.. सोबत त्यातून येणार रक्त..

विराज : "काय झालं हाताला??"

शौर्य रागातच विराजकडे बघतो आणि बेडवरचा उठुन आपल्या रूमच्या दरवाजाच्या दिशेने जातो..

विराज : "कुठे चाललायस??"

"

ड्रिंक करायला... येतोस सोबत..??", शौर्य रागातच विराजवर ओरडतो...


"तो रागातच घरातुन बाहेर पडतो..", विराजसुद्धा त्याच्या मागे जातो..

शौर्य तिथुन निघुन घराशेजारी असलेल्या समुद्रकिनारी येऊन बसतो.. रात्रीची वेळ असल्याने एक वेगळीच शांतता असते.. त्यात तो कालपासून त्याच्यासोबत चाललेलं अशांततेच वादळ विसरून डोळे मिटुन थोडं शांत रहाण्याचा प्रयत्न करत असतो..

विराज त्याच्या बाजुला येऊन बसतो.. पण शौर्य एक खोल श्वास घेत स्वतःला शांत करतो..

शौर्य : "माझी ही सिक्रेट जागा पण तुला माहिती.. माझ्या बाबतीतली सगळी सिक्रेट पण मी तुला सांगतो विर.. तरी तु माझ्यावर काल पासून विश्वास नाही ठेवत आहेस.. "

विराज : "तुला सरप्राईज द्यायच म्हणुन मी मम्मा सोबत दिल्ली आलेलो शौर्य.. पण तूच आम्हाला सरप्राईज दिलंस. तसही मला माहिती तु ड्रिंक नाही करत ते.₹ पण तुला मारामारी करताना बघुन माझे हात पाय गळुन गेलेले.. ती मुलं ज्या पद्धतीने हॉकी स्टिक घेऊन तुला मारायला बघत होती.. त्यातली एक जरी हॉकी स्टिक तुला लागली असती ना शौर्य.. तुझ्यापेक्षा जास्त मला लागलं असत.. तो मुलगा खोटं बोलतोय हे ही मला माहित होतं.. पण त्या मुलाकडे बघुन तो कोणत्याही लेव्हलला जाऊ शकतो हे पण दिसत होतं आणि मी तुला अजुन तिथे ठेवुन कोणतीही रिस्क नाही घेऊ शकत शौर्य आणि मुळात तुला एवढं बिअरच्या बॉटल वैगरे घेऊन कॉलेजमध्ये जायची गरजच काय?? आणि हाताला काय झालंय तुझ्या??"

शौर्य : "त्या फैयाजने बिअरची बॉटल माझ्या हातावर फोडली.. "

विराज : "कधी??आणि तु सांगितलं का नाही मला??"

शौर्य : "कस सांगणार होतो मी विर?? तुझा फोन लागत नव्हता रे.. त्यादिवशी तु फोन केलेलास तेव्हा तु USA ला होतास आणि तेही अनघा सोबत.. हे सगळ सांगुन तुझा मुड ऑफ करू का मी?? आणि काल तु काहीही ऐकायच्या मुडमध्ये नव्हतास.. "

शौर्य विराजला घडलेली सगळी हकीकत सांगतो..

विराज : "आणि बाटली तुझ्या डोक्यात फुटली असती तर.. "

शौर्य : "पण नाही ना फुटली आणि तसही मी एकटा नसतोच कधी नेहमी मित्रांसोबत असतो.. त्यादिवशीच एकटा होतो..म्हणून ते.."

विराज : "मला अजुनही वाटत तु दिल्लीला नको जावं बस.."

शौर्य : "इथे राहून काय करु..?? तुम्ही दोघे सकाळी कामावर निघुन जाता ते रात्री दहा नाहीतर अकराला घरी येता.. कधी माझा विचार केलायस का विर तु?? तिथे मित्रांसोबत माझा वेळ निघुन जातो रे.. हे एवढं मोठं घर मला खायला उठत.. मला नाही रहावस वाटत इथे.. विर प्लिज.. मी मारामारी वैगेरे नाही करणार रे ह्यापुढे.. प्लिज मला जाऊ दे दिल्लीला.. प्लिज विर.",शौर्य विरला मिठी मारतच त्याला रिक्वेस्ट करतो..


(विराज जाऊ देईल शौर्यला दिल्लीला?? पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल