Abhagi - 14 books and stories free download online pdf in Marathi

अभागी ...भाग 14

मधू ,सायली व अनु ट्रिप ला जायचं ठरवतात..मधू घरी बाबा ना विचारते ते ही तिला सहमती देतात..मधू खूपच खुश होऊन सायली व अनु ला फोन करून सांगते .. त्यांना ही परमिशन मिळालेली असते ..तिघी ही खूपच एक्साईट असतात...ट्रिप ला जाण्याचा दिवस उजाडतो...साया ही येणार असतो ट्रिप ला ..तो कोण आहे हे माहीत नसले तरी ..तो आपल्या सोबत आहे इतक्यानेच मधू खुश होते.

मधू: आई मी फक्त दोन दिवसा साठी जात आहे ..अग इतकं कशाला बनवत आहेस ? मी तिथे एन्जॉय करायला जावू की हे तू दिलेलं ओझ घेऊन फिरायला ?

आई: मधू ,तू जरा शांत रहा ..बाहेर च खा वून ..उगाच तू आजारी पडायला नको म्हणून मी बनवलं आहे सर्व ..आणि त्यात भूक लागेल तेव्हा तुला जर काही खायला मिळालं नाही तर ? उगाच पडशील कुठे तरी चक्कर येऊन ..

मधू: बर बाई कर तुझ्या मना सारखं पणं ..मी यातल थोड थोड च नेणार मी पहिलच सांगते.

आई: आणि बाकीचं काय करू ?

मधू: बाकीचं राहू दे तू आणि बाबा खा..

आई : अग असू दे सोबत ..सायली ,अनु ला दे .

मधू: होय का ? त्यांच्या आया ही तुझ्या सारख्या च ढीग भर देणार मग आम्ही तिघी मिळून ते तीन ढीग करून बसतो त्या महाबळेश्वर मध्ये विकत ह..

तिच्या बोलण्यावर आई ही हसते आणि मधू ही..

मधू सर्व आवरून पॅकिंग करून कॉलेज मध्ये पोहचते..बाबा तिला सोडवायला येतात..कॉलेज वर सर्व जण जमलेले असतात..मधू सायली व अनु जवळ येते ..त्या तिघी बस मध्ये सिट वर जाऊन बसतात..पणं सिट वर फक्त दोघींना च जागा असते म्हणून सायली व मधू बसतात व अनु शेजारच्या सी ट .. वर ..एका कॉलेज मैत्रिणी सोबत बसते..विराज ही त्याचं बस मध्ये असतो ..ज्यात मधू असते ..मधुर ही...सर्व जण खुश असतात..रात्री आठ वाजता बस प्रवासाला निघते मधू चे बाबा तिला काळजी घ्यायला सांगून ..निघून जातात..सायली व अनु चे ही बाबा आले असतात मग सर्व जण त्यांना बस मध्ये बसवून निघतात.. टीचर्स सर्व जण आलेत का याची चौकशी करतात....बस सुरू झाली तशी सर्व जण ..गप्पा ना सु र वात करतात... टीचर्स त्यांना आराम करायला सांगतात....उद्या खूप थकाल त्यामुळे आता आराम करा म्हंटल्यावर वर ..सर्व जण सिट वरच झोपी जातात..सकाळी आकरा वाजता सर्व जण औरंगाबाद येथे पोहचतात... पहिलं तोंड वगेरे धुऊन नाश्ता होतो.एका ठिकाणी त्या नंतर ..पुन्हा प्रवास सुरू होतो..पहिल्यांदा दौ लताबाद चा देवगिरी किल्ला पाहायचं ठरलेलं असत..त्यामुळे सर्वजण .. औरंगाबाद वेरूळ रस्त्यावर औरंगाबाद हुन सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगिरी किल्ल्या जवळ पोहचतात..चौथ्या शतकातील राष्ट्र कुटानी हा किल्ला बांधला तर काही इतिहास करांचे असे मत आहे की १२ व्या शतकातील यादव कुळातील राजपुत्र भिलंम याने हा किल्ला बांधला ..सर्वांना एकत्र करून किल्ल्याबद्दल ची माहिती सर देत असतात..सर्व जण मन लावून ऐकत असतात..मग सर्वजण ग्रुप ग्रुप करून टीचर्स मागे किल्ल्यात प्रवेश करतात..भव्य प्रवेशद्वारतून पुढे महकोट ,शिप संग्रह ,निरीक्षण बुरुज , हाथी हौद ,भारत माता मंदिर ,मेंढा तोफ ,खंदक सर्व पाहत पाहत पुढे जातात..अंधकार मय मार्गातून वर जाताना तर सर्व घाबरून जातात..सायली तर मधू चा हात घट्ट पकडून चालू लागते ..मधू ही घाबरली होती पणं तिला सायली च हसू येत होत..विराज गॅंग ..मधुर सर्व जण मधू तीकडीच्या मागेच असायचे..सर्व किल्ला पाहून झाल्यावर ..परत येताना ..प्रवेश द्वारा जवळ असणाऱ्या तोफ जवळ सायली ..अनु..मधू ने उभा राहून छान छान फोटो काढले..नंतर त्यांनी मधुर ला बोलावून तिघीं न चा एक साथ ..एक मेकिणा बिलगून पोज देऊन फोटो काढून घेतला..सर्व जण पुन्हा बस मध्ये आले ..सर्व आलेची खात्री करून मग बस पुढे वेरूळ लेणी पाहायला निघाली.

क्रमशः