Abhagi - 17 books and stories free download online pdf in Marathi

अभागी...भाग 17

कॉलेज सुटल्यावर मधू घरी गेली .. हातातला वेगवेगळ्या फुलांचा सुंदर बुके पाहून आई ने कोणी दिला ग फार छान आहे अस म्हणाली तेव्हा मधू थोडी गोंधळली..अग कॉलेज मध्ये मैत्रिणींनी दिला अशी थाप मारून ती रूम मध्ये गेली.. टेबल वर असलेल्या फ्लॉवर पॉट मध्ये तिने त्या बुके मधली सारी फुल कोंबली ..आता तर ती जास्तच सुंदर दिसत होती..ती फुल जवळ घेऊन तिने त्यांचा परत एकदा सुगंध घेतला..आणि मग जेवण करून आई ला मदत करू लागली..संध्याकाळी बाबा नी छोटासा केक आणला..सायली ,अनु ही आल्या मधुचा छोटा च पणं एकदम मस्त बडे साजरा झाला .मधू खूप खुश होती..रात्री झोपताना तिला साया ची आठवण झाली तशी तिने मोबाईल घेऊन त्याला एक मॅसेज सेंड केला..

मधू: हॅलो..

पलीकडून लगेच रिप्लाय आला..

साया : मधू ,वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा..मी दिलेली फुल आवडली ना ?

मधू : हो आवडली ..पणं..

साया : पणं काय ?

मधू : फक्त फुले च ? मला तुझ्या कडून दुसरं गिफ्ट हवं आहे.

साया : अरे मग बोल ना ..तुझ्या साठी काही पणं..

मधू : डायलॉग्ज नको..खर बोलतेय मी..

साया : अग हो तू माग तर..काय हवं तुला..

मधू : मला तुला भेटायचं आहे ..तू समोर ये ना प्लीज आता तरी एक वर्ष होत आले पणं मी अजून तुला पाहिलं ही नाही..

साया : हो..पणं मला भीती वाटते ..तुला मी नाही आवडलो ..तुला माझा राग आला तर ? तू माझ्या सोबत बोलणं सोडलस तर.?

मधू:अरे नाही मी तस काही करणार नाही..मी नाही रागावणार ..आणि बोलणं सोडणार ही नाही..

मधू खूप रिक्वेस्ट करते पणं साया तयारच होत नसतो मग मधू थोड रागातच बोलते..

मधू : ठीक आहे तू नको भेटू ..आता मी या पुढे तुझ्या सोबत अजिबात बोलणार नाही आणि तू ही मला मॅसेज करायचे नाहीत..

साया ला मधू च बोलणं ऐकून खूप वाईट वाटत आणि तो घाबरतो ही..

साया : प्लीज मधू अस नको बोलू ..ठीक आहे आपण भेटू..

मधू रिप्लाय वाचून खूप आनंदी होते ..तिला तिच्या भावना सांगायच्या होत्या साया ला की तिचं ही प्रेम आहे त्याच्या वर ..आणि आता तो भेटणार हे ऐकुन तर मधू हवेतच उडू लागते..

मधू : खरंच ना ? कधी भेटायचं ? आणि कुठे ? मी तुला कसं ओळखणार पणं ?

साया : अग हो हो किती प्रश्न विचारतेस ?भेटू पणं माझी एक अट आहे ?

मधू : आता आणि काय ?

साया : आपली फायनल सेमीस्टर संपली की मग आपण भेटू ..तो पर्यंत तू ही स्टडी कर .. आणि मी ही एक्सा म..संपली की दुसऱ्या दिवशी आपण भेटू..आणि तू मला ओळखत नसलीस तरी मी ओळखतो ना ..तुला ..मी च येईन तुझ्या कडे आणि कुठे भेटायचं हे ठरवू नंतर आता स्टडी वर लक्ष दे ..फक्त पंधरा च दिवस राहिले आहेत.

मधू : हो ..नक्की .

मधू खुश होऊन झोपी जाते ..ही बातमी कधी सायली आणि अनु ला सांगेन अस झाल होत तिला .

मधू कॉलेज मध्ये पोहचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मोठीशि स्माईल होती..सायली आणि अनु ती पाहून तिला चिडवत होत्या..

कुछ तो हुआ हैं..
कुछ हो गया है..
दो चार दिन से लगता हैं ऐसे..
सब कुछ नया हैं..सब कुछ अलग हैं..

मधू ही हसते आणि दोघींना बोलते..

मधू : आता गाणं बंद करा आणि मी काय सांगणार आहे ते ऐका..

सायली :हो सांग तेच ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो आहे..तुझं हे हसू पाहून कळलं आम्हाला काही तरी बातमी आहे आता सांग लवकर..

मधू : मी काल साया ला मॅसेज केला आणि तो भेटतो म्हणाला..

अनु : अरे वा..म्हणून तर असा पौर्णिमेचा चंद्र झाली आहेस वाटत..

सायली : वा वा..ये पणं कधी, कुठे भेटणार आहे ? आणि पहिलं आम्हाला सांगायचं आहे माहित आहे ना?

मधू : अग हो ग..पणं तो आपली सेमीस्टर संपली की भेटू बोलला आहे ..त्यामुळे अजून थोडे दिवस बाकी आहेत मला च कळायला की तो कोण आहे ?

सायली: आता लगेच भेटायला काय झालं होत..आणि सेमीस्टर होण्याची वाट कशाला पहायची ?

अनु : अग ..फायनल एक्सा म..आहे आपली आणि साया च बरोबर आहे ..उगाच एक्साम् वेळी ती डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्याने नंतर भेटायचं ठरवल असेल ?

साया : ह.. बर ठीक आहे ..आता इतके दिवस वेट केलं अजून थोडा करू ..

मधू : हो आणि अनु आता टीव्ही पाहणं बंद कर आणि सायली तुझी थोडी नौटंकी बंद कर ..आणि स्टडी कडे लक्ष द्या थोड ..आज पासून आपण जास्तीत जास्त वेळ स्टडी करायची .

सायली : हो मधू देवी जशी आपली आज्ञा ..

मधू : झालीस का तू चालू सायली ?

अनु : ये सायली आपल्या साठीच बोलत आहे ती ..

सायली : आता मी काय केलं ..हो च तर बोलले ना ..

मधू : बर ठीक आहे चला ..लेक्चर ला जावू .

तिघी ही लेक्चर ला जातात.. पहाता पहाता एक्साम चा दिवस उजाडतो ..सर्व जण एक मेकाना बेस्ट लक विश करतात..विराज आठ दिवस कॉलेज ला आलेलाच नसतो तो कुठे तरी बाहेर गावी गेला होता.. एक्झामं दिवशी तो ही परत येतो ..तो ही सर्वांना बेस्ट लक विश करून एक्सा म ला बसतो..सर्वानाच पेपर छान जातात...उद्या शेवटचा पेपर असतो ..आणि परवा साया आणि मधू ची भेट होणार असते..भेटी चा दिवस जवळ येईल तस मधू ला भीती ही वाटू लागते आणि भेटीची ओढ ही जाणवू लागते..तिचं मन खूप गोंधळून गेलं होत..काय बोलायचं कसं बोलायचं ? कोण असेल साया ? आणि मी मी कस सांगणार त्याला ..माझ्या भावना ..माझं तर आताच धाडस होत नाही.

क्रमशः