Longing for you ... books and stories free download online pdf in Marathi

ओढ तुझी...

पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या. जुलै महिन्यातला पाऊस चालू झाला होता सगळीकडे ढग जमा झाले होते. हिरवळ पसरली होती. गाण आणि पाऊस तिचे विक पॉइंट होते. आज पावसाने सगळी कडे वातावरण बहरले होते. त्यामुळे आज ती अगदी वेडी होऊन गाणे म्हणत होती. आज खूप दिवसांनी तिने सुर छेडले होते.

" या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन-मन। फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखच हाती

धुंद गार वारा ,हा कोवळाा शहारा
उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले ,रंग प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेेले
बरसुनी आले, रंग प्रीतीचे "

तो घरी आला तेव्हा दारातच थबकला, खुप दिवसांनी त्याच्या ओळखीचा आणि आवडता आवाज त्याचा कानावर पडत होता.तो आवाजाचा कानोसा घेत आवाजाच्या दिशेने गेला.आवाज बंगल्याचा मागील बाजूच्या पोर्च मधून येत होता. ती झोपाळ्यावर बसून बाहेर बागेत पडणारा पाऊस बघत गाणं म्हणत होती.फिक्कट पिंक कलरची सिम्पल कॉटन साडी, पदर मोकळा सोडल्याने वाऱ्यावर उडत होता कानात ग्रे कलरची टॉप्स,त्यामध्ये पांढरे पर्ल चमकत होते. गळ्यात डायमंडचे नाजूक मंगळसूत्र,मेकअप तो कसाला नव्हताच.केस वरती बांधले होते.पण ती मग्न होती तिच्या गाण्यात.तो तिथेच उभा राहून गाणंं ऐकत होता.ती गाण्यात इतकी मग्न होती की तिला कळलच नाही तो मागे येऊन थांबला आहे.तिचे गाणे संपतच आले होती की त्याने, आपली बॅग व त्याचे सामान दुसऱ्या रूम मध्ये ठेवले.आणि फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन आल्यावर झोपळ्या नजर टाकली तर ती तिथे नव्हती. मग त्याने किचन मध्ये जाऊन दोन कप कॉफी बनवणली.

ती गार वारा सुटला म्हणून रूम मध्ये आली.थंडी वाजते म्हणून तिने शॉल घ्यायला वॉर्डरोब उघडले,आणि शाल स्वतःभोवती लपेटून घेतली.तीच लक्ष त्याच्या कपड्यांवर गेले सगळे शर्ट त्याने मुद्दामून तिच्या चॉईस चे घेतले होती.तिने एक शर्ट हातात घेतला आणि त्याच्या परफ्युमचा सुगंध मनात भरला. "किती वाट बघायची अभी दोन दिवस म्हणून गेला होतास , आठवडा झाला तरी अजून नाही आलास "अचानक तिच्या मागून त्याच्या हाातांचा विळखा तिच्याभोवती पडला.
"माझे शर्ट इतके आवडतात तुला शरू, इतका मिस करतेस मला "असं म्हणत त्याने तिच्या कानावर ओठ टेकवले .ती आधी थोडी दचकली
"कधी आलस अभी तु?
जेव्हा तू गाणं म्हणत लाजत होतीस तेव्हा.
किती उशिर अभी,दोन दिवस म्हणून गेला होतास आणि आज आलायस तु,तिने खोटा खोटा राग दाखवत त्याला बाजूला केल.
सॉरी न शरू,अगं तिथे गेल्यावर कळलं थोडे दिवस अजून कामानिमित्त थांबावं लागेल म्हणून. तुला कॉल करून सांगितलं असतं तर तू चिडली असतीस ,म्हणून म्हटलं डायरेक्ट येऊन तुला सरप्राईज द्याव. तर मलाच सरप्राईज मिळालं तुझं गाणं आज खूप दिवसातून ऐकलं.
त्याचा मिठीमुळे तिची थंडी आणि तिचा खोटा राग केव्हाच निघून गेला होता. तरी खोटा राग दाखवत ती म्हणाली" मी अजून चिडली आहे तुझ्या वर अभी".
तुझा राग घालवण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे.मी आपल्या दोघांसाठी कॉफी केली आहे.
"Wow अभी तू कॉफी केलिये, it's long time, thank you अभी. "
चल झोपाळ्यावर बसून कॉफी पीऊ.
"I'm sorry शरु, मी आत्ता ही गोष्ट नोटीस केली बघणा , किती सिम्पल गोष्ट होती की तुला माझ्या हात ची कॉफी आवडते.पण मी तुला तेवढा पण टाईम नाही दिला ,आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुझं गाणं शरू,हे कसं काय मी विसरलो.तुझं गाणं तुझ्यासाठी सगळं काही होतं.तुझं गाणं ऐकूनच तर मी तुझ्या प्रेमात पडलो होतो.शरू कॉलेजच्या फंक्शन मध्ये पहिल्यांदा तुला गाणं म्हणताना पाहिलं होतं. तेव्हा पासून मला तु तुझ्या गाण्यासहित आवडू लागली होतीस .शरू एक विचारू तुला ,तू गाणं का सोडलं?माझ्यामुळेच ना?
" नाही अभी तुझ्यामुळे नाही गाण सोडलं मी, माझ्यासाठी गाणं सगळं काही आहे. आणि ते सुटणार पण नाही.आपलं लग्न झाल्यावर तुझ्या घरच्यांना आवडेल की नाही म्हणून अभी"
" शरू एकदा तरी म्हणून बघायचं ना मला. तुला माहिती आहे आपले लग्न होण्यासाठी हे तुझ्या गाणं खूप इम्पॉर्टंट होतं. आईचा काहीच प्रॉब्लेम नव्हता पण बाबांना कनविन्स करण्यासाठी तुझं गाणं खूप उपयोगी पडलं.तुला माहित आहे ,आईने सांगितलं की बाबांना पण गाणं आवडत होतं पण कामाच्या नादात ते राहून गेले. पण तुझं तसं नाही होणार.मी बोलेण आई बाबांशी."
"खरच अभी I'm so happy, thank you so much. अस म्हणून तिने त्याला मिठी मारली."
" I promise you शरू इथून पुढे माझ्याकडून तुला टाईम दिला नाही असं होणार नाही. बर आज काय मला अशीच पकडून राहणार आहेस का?"
"गप रे काय पण काय बोलतोस बर कॉफी एकदम मस्त झाली होती. नेहमीसारखी एकदम दर्जा."
"ओ हो पुणे बरच मानवल दिसते ,तुला पुण्याची भाषा शिकलीस एकदम तू."
अभी ऐकना मला पावसात खूप भिजूवाटले आहे, चल ना?
"ऐ नाही हा, एक तर मी येताना भिजत आलोय आणि आत्ताच मी बाथ घेतलाय. आता परत मी नाही भिजनार."
"काय रे अभि आत्ता तर म्हणालास ना माझा टाईम तुझा म्हणून,ती गाल फुगवून परत झोपाळ्यावर बसली."
"I'm just kidding my jaan, चल पण तु माझ्या साठी आधी एक म्हणायच."
ती पळतच बाहेर बागेत गेली,स्वतःभोवती एक गिरकी घेऊन तिने गाण म्हणायला सुरुवात केली.

"तू ही मेरी हे सरी जमी,चाहे काहीसे चलू
तुज पे ही आके रुकू
तेरे सिवा मे जाऊ कहा, कोई भी राह चुनू
तुझपे ही आके रुकू,
तुम मिले तो, लम्हे थम गये,तुम मिले तू सारे गम गये
तुम मिले तो मुस्कुराना आगया
तुम मिले तो जादु छागया,तुम मिले तो जिना आगया
तुम मिले तो मैने पाया हे खुदा "
आज तो तिला डोळे भरून पाहत होता. त्याला आज कॉलेज मधील शरु आठवत होती. एकदम बिनधास्त अशी सतत गाण गुणगुणत असायची. आज ती तशीच भासत होती.

" So Miss.शरयू अभ्यंकर राजे would you like to dance with me ?"
"yes Mr.राजे why not,
आज दोघेही बिनधास्त पावसात भिजत होते.डान्स करत असताना ती म्हणाली"माझ गाणं आज मला परत मिळवून देण्यासाठी thanks अभी. "
"नाही, माझी गाण म्हणतानाची वेडी शरु मला पुन्हा मिळवून देण्यासाठी thank you शरु .मला प्रॉमिस कर तु गाण कधी सोडणार नाही. "
"I will promise you Abhi मी गाणं नाही सोडणार. पाऊस,गाण आणि तु माझा विक पॉइंट आहे. हे मी कधीच सोडणार नाही. "
"हम्म आणि पावसात भिजलेली तु माझा विक पॉइंट आहेस.
त्या वर ती छानशी लाजली. तिच लक्ष त्याच्या कडे गेले तर त्याचा व्हाईट शर्ट अंगाला चिकटला होता. त्यामुळे त्याचे बायसेप्स, बॉडी दिसुन येत होती.तिची नजर खाली होती. त्याने तिचा चेहरा वर करून हळुच तिच्या गालावर ओठ टेकवले.
"अभी चलना मला थंडी वाजतेय. त्यानी तिला उचलून घेतले. थंडी वाजत असल्यामुळे तिने त्याला घट्ट पकडले होते. रूम मध्ये आल्यावर त्याने तिला उभे केले."
"थांब मी पटकन चेंज करून आले,खूप थंडी वाजते आहे.
" अरे चेंज काय करून आले तुझ चेन्ज मी करणार."
"अभी काय करतोयस ?"
"अरे आपल्या लग्नाला दोन वर्ष होतील आता,आणि तू अजून इतकी काय लाजतेस."
तिची नजर वर होत नव्हती त्याने तिला बेडवर ठेवले आणि तिच्या कडे बघितले तर तिचे गाल लाजेने आरक्त झाले होते. त्याने हळुच साडीचा पदर बाजूला केला.

बाहेर पावसाचा जोर अधिक वाढत होता, पण ती मात्र तिच्या सर्वांगावर होणार्‍या त्याच्या ओठांच्या स्पर्शात भिजत होती. तिला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ त्याने त्याच्या स्पर्शातून मिटवली होती.
***********************************************