How are you? in Marathi Short Stories by vaishnavi books and stories PDF | तु-असा कसा रे

तु-असा कसा रे

आज पुन्हा तुजी खूप आठवण येतेय.ये न आता परत किती वाट बघायची तुजी? पण तु काही आला नाहीस. अजून किती वाट बघायला लावणार आहेस तू येणारे लवकर ,या आठवणी नकोश्या झाल्या आहेत ,फक्त तु हवा आहेस मला.बघ मी आज पुन्हा हट्ट करतेय, तुला आवडायचे ना माझे हट्ट करने .मी होते हट्टी पण तु होतास ना समजूतदार किती छान समजून सांगायचास. फक्त ऐकत रहावेसे वाटायचं इतका कसा शांत आणि समजुतदार होतास तू. तुझ्याकडे बघितलं ना की तु एकदम शांत आणि संथ वाहणाऱ्या नदी सारखा वाटायचा. मी हरवून जायचे रे तुझ्यात. तुझी मीठी एकदम हविशी वाटायची त्यात फक्त काळजी, प्रेम आणि मायेचा स्पर्श भरभरून होता तुझ्यासारखी पण मुलं असतात असं वाटलं नव्हतं मला पण तू भेटला तेव्हा खरं वाटलं .तु एकदम वेगळा होतास . तुझं माझ्या बद्दल असलेले प्रेम, तुझं माझी काळजी घेणे ,तुझ्या अशा वागण्याने मी पुन्हा नव्याने प्रेमात पडायचे .तू एकदम शांत स्वभावाचा आणि मी हट्टी, बालिश आणि एकदम बिंदास अशी होते. त्यामुळे मी तुला कशी काय आवडले हा प्रश्न मला सारखा पडायचा ? तुला ला विचारले तर फक्त हसायचास ,तुझा हे हसन वेड करायचे मला. तु कसा काय इतका का चांगला आहेस? तुला माझ्याशी खूप काही बोलायचं असायच ,पण तू शांत राहायचं फक्त माझी बडबड ऐकत राहायचास.
तुज्या जवळ असताना मला काहीच नको असायचे, सगळे विसरून फक्त तुझा सहवास हवा हवाासा वाटायचं .का गेला तू ?ये न परत नाही राहू शकत तुझ्याशिवाय तुला माहिती आहे ना ,किती त्रास होतोय मला. अजून किती त्रास देनार आहेस तु? आता नाही सहन होत मला. तुज्या आठवणी खुुप त्रास देतात मला. पण त्यामुळे तर वाटते की तु माझ्या सोबत आहेस. आज त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत आणि आता मला रहावत नाहिये आता तुझ्या मिठीत शिरून खूप रडावेसे वाटतेय.का गेलास तु मला एकटीला सोडून? तुुुुझे मन खूप हळवे होते. तुला माझे बोलणे पटले नाही तरी तु काही बोलायचा नाही मला. तु गेेेेल्या पासून प्ररत्येक क्षण तुज्या सोबतच्या आठवणीत जगतेेेय. पुन्हा एकदा नव्याने तुज्या सोबतच्या प्रत्येक आठवणीत तुला शोधतेेेय पण तू साापडतच नाहीए. कारण प्रत्येक वेळी तू फक्त माझ्यासाठी जगला, मला काय आवडते त्याप्रमाणे तूूू करत गेला. मला काय आवडतं काय नाही सगळे तुला माहित होतो .मी रूूूूसले तर मला किती काय करायचास मला हसवण्या साठी .तुझी ती कपाळावर केलेली कीस किती आश्वासक असायची ,मी फक्त तुझा आहे आणि कायम तुझ्या सोबत असणार आहे असं आश्वासन ती द्यायची मला. त्याने त्याच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत.
मी किती हट्टी आहे तुला पण माहित आहे ,तू परत येणार मला माहित आहे .आणि हा माझा हट्ट आहे असं समज माझ्या , हट्टीपणा मुळेच तू त्या दिवशी मला सोडून गेलास.का गेलास तुुयेना लवकर. मला माहीत आहे तु नक्ककी येनार. मी रडलेली तुला आवडायचे नाही ना, मग येेणारे रोज रडतेय मी, गाला वरचे अश्रू पुसायलला तरी ये ते तसेच गालावर वाळून जात आहेत. आता बास खुप खूप वाट बघितली, माझ्या एकाच चुकीमुळे तू मला सोडून गेला . माझ्या एका हट्टामुळे तू निघून गेेेेलास .
त्या दिवशी मी बाईक वर जान्याचा हट्ट केला नसता तर तूू आज माझ्यासोबत असतास मी वाचलले, पण तुझ्या या स्थितीला मी जवाबदार आहे.माझ्या मुुुळे तू कोमात गेलास. बास आता मी कोणताही हट्ट नाही करणार ,पण प्लीज तू परत ये आणि मला माहितीये तू नक्की परत येणार .
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
Vaishnavi ❤

Rate & Review

vaishnavi

vaishnavi 1 year ago

अशाच कथांसाठी तुम्ही मला प्रतीलिपी वर पण फॉलो करू शकता. id: vaishnavi🍁

Indrajit Suresh Kurpad

खूप छान लेख , मनाला भिडला खूप भारी

Vaishali Kamble
Satish MOre

Satish MOre 1 year ago

खुप मस्त आहे

Male

Male 1 year ago