Ani Tya Raatri books and stories free download online pdf in Marathi

आणि त्या रात्री - आंतिम भाग

पहिल्या भागापासून पुढची कथा आशा प्रमाणे . . .

मी त्या काळ्या आकृतीला विरोध करण्याचा प्रयत्न करत होतो ...पण ती आकृती जणू काही सुडाला पेटली होती...मला खेचत असतानाच ती आसुरी हास्य हसत होती...अन् मी मात्र जिवाच्या आकांतानी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.... त्या आकृतीने मला खेचत एका अंधाऱ्या जागेत नेलं...तिथे माझी मानगुट पकडून त्याने मला वर उचललं...मला जाणवत होतं...माझं शरीर जास्त काळ त्या काळ्या आकृतीचा प्रतिकार करु शकणार नाही... माझा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला...माझं शरीर थंड पडलं...शरीराचे अवयव हळूहळू ताठ होऊ लागले...माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडले....आता उरलं होत फक्त निर्जीव शरीर....माझं शरीर जे मला प्रिय होतं ...पण या क्षणी ते माझं राहिलं नव्हतं...

तेवढ्यात माझ्या शरीराला पुन्हा कोणीतरी जोरजोरात हलवलं....शरीरात एक तीव्र कळ सळसळली...मेंदूला झिनझिन्या आल्या....त्यासरशी माझं शरीर दोन फूट उंच उडाल्याचा भास झाला.....मी खाडकन डोळे उघडले...तो माझा बालमित्र परेश समोर बसलेला....माझ्याकडेच रोखून पाहत होता..त्याला पाहून मी दचकलोच...

त्याने माझ्या कपाळाला हात लावला...मी घामाने चिंब झालेलो...अंग थरथरत होतं...त्याने मला पाणी आणून दिले...तू इथे कसा? मी त्याला विचारले....तर तो म्हणाला अरे ! तू एकटाच होतास...आणि मला माहित आहे तू किती भित्रा आहेस...तुला सोबत करण्यासाठी आलो होतो...किती वेळ दार ठोठावत होतो...

अरे ! पण दार बंद होतं मग तू आत कसा आलास?...तू दार उघडलं नाहिस शेवटी गावी काकूंना फोन केला...त्यांनीच सांगितलं शेजारच्या काकूंकडे एक्स्ट्रा किल्ली ठेवलेली असते...मग काय तीच घेऊन दार उघडलं...पाहतो तर तू गाढ झोपलेला...म्हणून बसून राहिलो...मी त्याला म्हटलं बरे केले आलास ...तसंही मला सोबतीची गरज होतीच...त्याला म्हटलं झोप पण तो म्हणाला झोप नाही आली तू झोप घाबरला आहेस ...मी बसून राहतो खुर्चीवर...

त्याला असं सोबतीला पाहून मला ही थोडा धीर आला...त्याच्या भरवशावर मी निवांत झोपी गेलो...सकाळी जाग आली...पाहतो तो परेश खुर्चीवर नव्हता...बाथरूममध्ये असेल असा विचार केला...पण बराच वेळ झाला तरी तो आला नाही...म्हणून मी दार वाजवलं... पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही...मी दार ढकललं दार उघडंच होतं...पण परेश आत नव्हता...मी सगळ्या घरात शोधलं पण तो कुठे ही नव्हता...मला वाटलं तो सकाळी सकाळीच उठून गेला असेल...पुन्हा येऊन कॉट वर लोळत पडलो...तेवढ्यात फोन वाजला...माझ्या मित्राचा फोन होता...तो रात्रभर मला फोन लावत होता पण माझा फोन लागत नव्हता...त्याने घाईने मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं...

काय झालं विचारलं...पण तो सांगायलाच तयार नव्हता...त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो...हॉस्पिटलमध्ये गर्दी होती... परेशचे आई बाबा रडत होते...कॉटवर परेशचा मृतदेह होता...मला धक्काच बसला ...रात्रभर माझ्यासोबत असणारा परेश इथे कसा काय?

काकूंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, रात्री तुला सोबत करण्यासाठी म्हणून तो निघाला...पण वाटेत त्याचा अपघात झाला...अपघात इतका मोठा होता की...परेशचा जागीच जीव गेला...

म्हणजे रात्री माझ्या सोबतीला जो होता तो परेश नव्हताच... म्हणजे त्याचं भूत होतं... मी कोणाला सांगू रात्रभर परेश माझ्या सोबत होता... कोण माझ्यावर विश्वास ठेवेल...

अन् माझा तरी विश्वास कुठे बसलाय...की परेश आता या जगात नाही...
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

काही वाचकांनी दिलेल्या पुनरावलोकनासाठी धन्यवाद, तुम्ही दिलेले रीव्ह्यूस मला वाचायला फार आवडतात व त्यामूळे मला पुढे लिहिण्या प्रेरणा मिळते. मी आशाच आजून भयकथा लवकरात लवकर आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन ....
माझ्याकडून लिहिण्यात काही चूक झाली असेल तर माफ करा.
..... धन्यवाद .....