Janu - 9 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 9

जानू - 9

अभय जानू पासून लांब राहायचं ठरवतो..आणि जानू ही आता परत त्याच्या वर रागवायच नाही असं ठरवते.
अभय जरी आता जानू समोर येत नसला तरी त्याचं सर्व लक्ष जानू वर असत .तो तिला दुरून पाहूनच खुश होत असतो .जानू ला ही आपण उगाच इतका राग केला अभय चा याच वाईट वाटत पणं ती त्याला काहीच बोलत नाही.
अभय च्या आते भाऊ च लग्न असत ..त्यासाठी अभय ८ दिवसा साठी गावी जाणार असतो पणं त्याला जाण्याची अजिबात इच्छा नसते ..८ दिवस जास्तच होतात ..इथ एक दिवस जानू नाही दिसली तर आपण बेचैन होतो ..आणि आता ८ दिवस तिला न पाहता कसं राहायचं ? जानू सोबत बोलणं होत नसले तरी तिचं दिसणं आपल्या आसपास अस आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ..पण शेवटी आते भाऊ च लग्न म्हंटल्यावर अभय ला जावं लागत..इच्छा नसता ना ही तो जातो .
लग्न छान होत ..पण अभय च लक्ष कुठे तिथे लागतच नाही..८ दिवसा साठी गेलेला ..५ व्या च दिवशी अभय परत येतो ..आल्या आल्या जानू च्या घराकडे त्याचं लक्ष जात ..तिलाच तर पाहायचं असत..५ दिवस झाले नाही पाहिलं..किती तडफड लो जानू ला पाहण्या साठी ..तिची smile ...ओह..kadhi दिसणार ती ?तो जानू च्या घरा समोर उभा असतो पण ..अरेच्या तिच्या घरा ला कुलूप ?कुठे गेली असेल ? ती ही कुठे पाहुण्यांना न कडे गेली असेल का ? कधी येईल परत ? कधी पाहायचं तिला ? सारे प्रश्न तो स्वतःला च विचारत असतो ..दिवस भर याच विचारात जातो ..संध्याकाळी ..तो काट्यावर जातो ..तिथं मिहिर त्याला भेटतो ..आता त्यालाच विचारावं अस तो ठरवतो .पण मिहिर चा चेहरा पाहून त्याला कळत की त्याचं काही तर बिनसलं आहे ..असा का चेहरा पाडून बसला आहे हा ?

अभय: काय रे मीहू ? असा का तोंड पाडून बसला आहेस ? कोण काही बोलल का तुला ?

मिहिर त्याला पाहतो ..त्याला आश्चर्य वाटत ..दादा ला माहित नाही का ?

मिहिर : दादा ,तुला काहीच माहीत नाही का ?

अभय: काय ? काय माहित नाही रे ?

मिहिर : दीदी ,गेलीय ना इथून .

अभय: मी आलो तेव्हा पासून पाहिलं ,त्याचं घर बंद आहे रे? कुठे गावाला गेलीय का जानू?

मिहिर परत उदास होऊन बोलतो ..

मिहिर : गावाला नाही रे ? ती आपल शहर सोडून गेली ..तिच्या बाबांची बदली झाली ना ..त्यामुळे ते कायमचे इथून गेले.

अभय: काय ?

शॉक लागावा तसा अभय एकदम दचकतो..जानू गेली ? शहर सोडून गेली ? कसं काय ? नाही नाही.. ती आपल्याला मित्र मानत होती एकदा तर तिने सांगितलं असत आपल्याला..अस कस होईल आणि ५ च दिवस झाले ती होती इथे आणि आता अचानक गेली कसं काय ? आता जानू आपल्याला दिसणार नाही का? कसं पाहणार आपण रोज तिला ? तिचं हसणं ..ती इथे नसणार ..आपल्या आजूबाजूला नाही जानू ? राहू दे तिने नको आपल्या सोबत बोलायला ..पण निदान आपल्या डोळ्यासमोर तर असू दे ती ?जानू ने एकदा ही का सांगितलं नाही आपल्याला ती जाणार आहे हे ? काहीच किंमत नव्हती का तिच्या नजरेत आपल्याला ?एक ना हजार विचार अभय च्या डोक्यात सुरू होते ..आपल्याला वेड लागेल की काय असच त्याला वाटू लागलं.
अभय मिहिर सोबत न बोलतच घरी गेला ..घरी ही तो कोणा सोबतच बोलला नाही ..ना जेवायला उठला.. बर वाटत नाही असं सांगून ..त्याने स्वतः ला खोलीत बंद केलं .जानू ने शहर सोडून ३ दिवस झाले होते .. पणं अभय ने ना जेवण केलं होत ना कोणा सोबत बोलत होता..घरा बाहेर ही येत नव्हता..खूप अशक्त झाला होता ..पोटात अन्नाचा एक कण नाही ..तो बेशुद्ध झाला..घरच्यांनी त्याला हॉस्पिटल ला नेलं ..सलाईन लावल्या..त्याला काय झालं ..हे मात्र घरच्यांना कळेना ..आत्याच्या गावी गेलो होतो तिथलं पाणी आणि इथलं पाणी बदल असल्यामुळे आपण आजारी पडलो अशी थाप त्याने मारली..सर्वांना ते खर वाटलं..

अभय चा जिगरी दोस्त आकाश त्याला भेटायला आला..आकाश ने त्याची अवस्था पाहून ओळखलं या मागे काही कारणं आहे ..हा सर्वान सोबत खोट बोलत असला तरी आपल्याला समजायला च हवं अभय ला काय झालं आहे ? आकाश अभय ला बाहेर घेऊन जातो ...त्याला खूप खोदून विचारतो काय झालं सांग ..पण अभय काही केल्या सांगत नसतो ..तरी आकाश काही त्याला सोडत नाही ..जो पर्यंत सांगणार नाहीस ..मी तुला अस जावू देणार नाही अभय?
आकाश च बोलणं ऐकून अभय ला खूप गहिवरून येत..आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं ," ..आकाश ती गेली रे शहर सोडून गेली.?"

आकाश : अरे कोण गेली ?

अभय : जानू ..खूप प्रेम करतो रे मी तिच्यावर ..तिला मी माझ्या मनातल्या भावना बोलू ही नाही शकलो ..मला कधी वाटलच नाही रे ती अचानक अस मला सोडून जाईल..तिला फक्त पाहूनच मी खुश होतो पण ..आता ती मला दिसणार ही नाही रे ?माझं खरंच खूप प्रेम आहे तिच्या वर ..मला जानू हवीय ?

क्रमशः


Rate & Review

Vaishali Kamble

Vaishali Kamble 2 years ago